Sashal
| |
| Wednesday, August 15, 2007 - 4:56 pm: |
| 
|
मला वाटत होत कि शाहिद कपुर पंकज कपुर आणि सुप्रिया पाठकचा मुलगा आहे. >>> हो, मलाही अशीच माहिती आहे की तो पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक चाच मुलगा आहे ..
|
Nalini
| |
| Wednesday, August 15, 2007 - 5:33 pm: |
| 
|
शाहीद कपुर हा पंकज कपुर आणि निलिमा अजीम(की अझीम) यांचा मुलगा आहे. तो तिन वर्षाचा असतानाच त्याच्या पालकांनी घटस्फोट घेतला. सुप्रिया पाठक हि त्याची सावत्र आई आहे. Ref: http://en.wikipedia.org/wiki/Shahid_Kapoor
|
Sayuri
| |
| Wednesday, August 15, 2007 - 5:49 pm: |
| 
|
पूर्वी 'फ़र्मान' नावाची सिरियल लागायची..कंवलजीत सिंहची..त्यात निलिमा अजीम होती बहुतेक...
|
Maanus
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:52 pm: |
| 
|
शाहीद कपुर i am complan boy/girl च्या जहीरातीत पन यायचा. girl आयेशा टाकीया होती.
|
Disha013
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:57 pm: |
| 
|
हो हो, आणि संजुबाबाच्या 'सडक' चित्रपटात ही निलिमा आजिम दिपक तिजोरीची नायिका होती. 'फ़िर वही तलाश' या मालीकेत पण होती. तिने दुसरे लग्न केले तेव्हा शाहिदने तिला support दिला म्हणे.
|
शाहिद कपुर अतिशय रद्दड अभिनय करतो. काहिच खास नाहि त्याच्यात. तसे आजकाल सुनिल शेट्टिसारखे मख्ख अभिनेते येणे खुपच कमि झाले आहे
|
Aashu29
| |
| Thursday, August 16, 2007 - 8:43 am: |
| 
|
अरे लोकहो पण शाहिद दिसायला तरी चांगला आहेना सुनिएल शेट्टी पेक्षा!!
|
शाहिद कपूर पंकज कपूर आणि निलीमा अजीझचा मुलगा. त्यानंतर निलीमा अजिझने दुसरंलग्न केलं. (तो चार पाच वर्षाचा असताना) त्यानंतर पंकज कपूरने सुप्रिया पाठकबरोबर लग्न केलं. त्या दोघाना दोन मुले आहेत. निलीमा अजिझने नंतर तिसरं लग्न केलं. त्याही नवर्याला सोडलय आणि चौथं लग्न केलं. पण तो माणूस फ़्रॉड होता. त्यामुळे ती परत तिसर्या नवर्याकडे गेली. शाहिदला सख्खे भाऊ बहीण नाहीत, पण सावत्र आणि अजून सावत्र (निलीमाच्या नवर्याची आधी लग्नं झाली होती म्हणे) एकूण नऊ(??) भाऊ बहीण आहेत. हुश्श!!!!
|
Farend
| |
| Thursday, August 16, 2007 - 3:57 pm: |
| 
|
या वेगाने त्यांच्या पैकी कोणालाही सख्खे भाऊ बहीण आहेत हेच आश्चर्य, कारण जन्मे जन्मे पर्यंत आई किंवा बाप दुसरे लग्न करून मोकळे होतात असे दिसते नंदिनी तिचे आडनाव अज़ीज की अज़ीम? पूर्वी टीव्ही वर अज़ीम बघितल्याचे आठवते.
|
Slarti
| |
| Thursday, August 16, 2007 - 4:01 pm: |
| 
|
व्वा ! या निलीमाबाई म्हणजे भारतीय एलिझाबेथ टेलरच जणू...
|
Disha013
| |
| Thursday, August 16, 2007 - 4:32 pm: |
| 
|
नंदिनी,माझ्याकडचं ज्ञान लैच तोकडं होतं म्हणायचं!!
|
आता या सर्व बाबींचा 'चित्रपट कसा वाटला'(बी बी चे नाव) याच्याशी काय संबंध आहे बरे?
|
चालत हो रॉबिन तेव्हढ!!!ज्या व्यक्तिबद्दल चर्चा चाललिय ति चित्रपटात आहे न मग पुरे!!
|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 7:42 pm: |
| 
|
gods must be crazy (1980) त ला शेवटचा क्षण आठवतोय का... त्यात तो ती coca-cola ची बाटली जगाच्या end ला टाकायला जातो... मस्त आणि realistic movie आहे.
|
Jadhavad
| |
| Friday, August 17, 2007 - 3:14 am: |
| 
|
एक coke ची bottle , तिचा कोण कसा उपयोग करेल, नाही सांगता येणार. god must be crazy
|
Tulip
| |
| Friday, August 17, 2007 - 3:24 am: |
| 
|
चक दे इंडिया. whatta movie!!!simply fabulous! . जयदीप साहनी ( स्क्रिप्ट ) , शिमित अमीन ( दिग्दर्शन ) , शाहरुख खान आणि त्या most adorable सोळा मुली ... सुपर्ब पर्फ़ॉर्मन्स. मस्ट वॉच.
|
दिशा. एक पिक्चर आला होता... वाह लाईफ़ हो तो ऐसी म्हणून. त्याच वेळेला मी शाहिद आणि त्याच्या एका भावाची मुलाखत घेतली होती. त्यावेळेल्स मिळालेली माहीती..
|
हा चित्रपट नाही एक नाटक आहे पण नाटकाच्या बीबी वर कोणी नसत म्हणुन ईथे लिहीतो. मी नथूराम गोडसे बोलतोय. देशात पाहन्याचा योग आला नाही (जेव्हा होत तेव्हा) तिकडुन येताना VCD आनली ती आज बघन्याचा योग आला. मला एकदम आवडल. नथुराम ने तो वध (हो माझ्या लेखी वधच) का केला असावा या बद्दल बरीच पुस्तके वाचली होती तसेच गांधीवाद्याचे म्हणने देखील बरेचदा वाचले पण नाटक पाहाताना नथुराम माणसिक दृष्ट्या किती खंबीर असेल याचा प्रत्यय येतो. त्याची वध करन्याची भुमीका काय होती व किती गरजेची होती हे प्रदिप दळवींनी खरच चांगल्या रितीने मांडल आहे. हे राम म्हणलेल नसताना ते म्हणल आहे हा जो नेहमी प्रचार असतो (वा आता तर ते सत्यच वाटु लागल आहे) ते किती खोट व भंपक रितीने गांधीवाद्यांनी माडंल हे पण त्यात दाखविले आहे. त्यातले अनेक संवाद खरच चांगले आहेत. एकदा जरुर बघाच. आता मी अनिल कपुर ने निर्मान केलेल्या गांधी सिनेमाची वाट बघतोय.
|
Farend
| |
| Friday, August 17, 2007 - 10:53 pm: |
| 
|
भूषण ( mbhure ) वगैरेंचे येथील वर्णन वाचून Children Of Heaven बघितला आणि अतिशय आवडला. त्याच DVD मधे Baran म्हणून आणखी एका चित्रपटाचा उल्लेख आहे, कोणी बघितलाय का तो?
|
Tulip
| |
| Saturday, August 18, 2007 - 5:35 am: |
| 
|
हो. मी पाहिलाय बारान. सिद्दिक बार्मॅक चे सगळेच मूवीज खूप सुंदर आहेत. त्यापैकीच हा ही. लहान मुलांकडून अतिशय नैसर्गिकपणे कामं करवून घेतो हा इराणी दिग्दर्शक. साधी कथानकं, त्याला इराणच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचा संदर्भ, आणि कलाकारांचा निखळ, नैसर्गिक अभिनय ही सिद्दिक बरमॅकची वैशिष्ट्ये बारान मधेही आहेत. बारान चा अर्थ पाऊस. परिस्थितीने मुलाचा वेष घ्यायला लागलेल्या एका नुकत्या तारुण्यात प्रवेशणार्या इराणी मुलीचे आणि ती ज्या बांधकामाच्या ठिकाणी चहावाल्या पोर्याचे काम करते तिथल्या लोकांचे जुळलेले भावबंध, त्यातच फ़ुलणारी एक हळुवार प्रेमकहाणी असणारा बारान न चुकवावा असाच आहे.
|