|
नावं नुसती deceptive च नसतात, ती वयाला शोभावीही लागतात... आमच्या एका परिचिताचे म्हातारे नातेवाईक आहेत, आजोबा बोलू लागले की जीभ हिरड्यांवरून स्किड होते, आणि आजींच्या कानात बोलावं लागतं, पण photo-op च्या वेळेला 'बाळमामा' आणि 'बेबीमावशी'चा पत्ता नाही ऐकून नकळत पणे " Aww, cho chweet!" निघून गेलं!!
|
Mahaguru
| |
| Saturday, August 11, 2007 - 6:03 pm: |
| 
|
काहीच्या काही नावे असतात: इंग्लंड च्या संघातील एका खेळाडुचे नाव काय तर म्हणे 'Sidebottom'
|
Bsk
| |
| Saturday, August 11, 2007 - 7:26 pm: |
| 
|
हो महागुरु, मला ते नाव वाचुन कायम हॅर्री पॉटर मधला लॉंगबॉटम आठवतो! माहीत नव्हतं त्या पुस्तकातल्या नावांच्या-सारखी नावं खरच अस्तित्वात आहेत!!..
|
Slarti
| |
| Saturday, August 11, 2007 - 8:32 pm: |
| 
|
ओशिन हे जपानी नाव आहे. दूरदर्शनवरची मालिका आठवते का ? मी ऐकले त्याप्रमाणे 'सहन करणे, सोसणे' असा काहीसा अर्थ होतो. कृष्णपक्षाला असितपक्ष असेही म्हणतात, त्यावरून असितचा अर्थ काळा, गडद असा असावा. अशीत = जो शीत नाही तो, अग्नी, सूर्य ? नीलांजन हे शनीचे नाव झाले, पण नीलांजनचा अर्थ काय ? शनी डोळ्यात नीळे काजळ घालतो असा काही फंडा आहे का ? ;) तुकाराम या नावाचा अर्थ काय ? (तू का राम ? मी का नाही ? वगैरे गोष्ट नका सांगू... )
|
Slarti
| |
| Sunday, August 12, 2007 - 3:05 pm: |
| 
|
आज फारच भन्नाट नाव वाचले - Yedendra ... हे नाव कसे उच्चारावे आणि अर्थ काय ?
|
Disha013
| |
| Sunday, August 12, 2007 - 11:04 pm: |
| 
|
'येडेन्द्र' असे वाचावे.... क्क ह्य्ग ह्ह व्ह क्क्ल
|
Aaftaab
| |
| Monday, August 13, 2007 - 11:29 am: |
| 
|
नावे वयाला शोभावीत वरून आठवले.. 'खाकी' चित्रपटात 'महालक्ष्मी' नाव असलेल्या व्यक्तीकडून पोलीसांना फोन येतो. पोलीस (अक्षय कुमार, तुशार कपूर) एका म्हातारीलाच महालक्ष्मी समजतात. ती केबलवाल्यांची वाट बघत असते म्हणून confusion होते. तर महालक्ष्मी हे ऐश्वर्याचे नाव असते आणि त्या म्हातारीचे नाव ती ठसक्यात सांगते-"सपना"...
|
Monakshi
| |
| Tuesday, August 14, 2007 - 6:24 am: |
| 
|
काल मराठी सा रे ग म प मध्ये परिक्षक म्हणून पं. कुमारगंधर्वांची मुलगी आलेली होती. त्यांचे नावही जरा निराळेच होते. 'कलापिनी कोमकली.'
|
आमच्या नातेवाईकांत एका मुलाचे नाव आहे 'समाधान'!
|
Mazya eka mitrache naav ahe "Abhinandan" !!
|
Aashu29
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:55 pm: |
| 
|
एक tv स्टार कलाकाराचे नाव आहे `रोमांचक`!!
|
संजय जुमानीने आणि मंडळींनी इंग्रजीप्रेमींना न जुमानता इंग्रजी स्पेलिंग्स चे जे काही मुडदे पाडायचा उ(अ)पक्रम मांडलाय, त्यांच्याप्रमाणे उच्चार करायचा म्हटला, तर सीरियल्सची आणि लोकांची नावं अशी वाचावी लागतील... १)क्यूउंकीई सांस्स भी कभीई बहूऊ थीई!- कुमकुम्म- केसर्र २) कसम्ह से ३) विवेइक (ओबेराॅय हो!) ४) तुषार्र कपुर्र! ५) देलनाज़्ज़ पाउल (दिलनाज़ पाॅल) ६) सुनिएल शेट्टी ७) रितेइश देशमुख ८) कसौटीइ ज़िंदगीइ के (?!??) ९) अभिषेक 'भ'च्चन (त्यापेक्षा त्याला भकाराची शिवीच द्या... परवडली) १०) वि'ध्या' बालन ११) 'स्वेट्टा'- जुमानींच्या लेकीचं नाव आता ह्याला 'ब्भार्रत र्रत्त्न' देऊन मोकळं करा!!
|
Farend
| |
| Wednesday, August 15, 2007 - 3:39 am: |
| 
|
आमच्या नातेवाईकांत एका मुलाचे नाव आहे 'समाधान'! म्हणजे एखाद्या मुलीने 'चित्ती असो द्यावे समाधान' म्हंटले तर अभंगा ऐवजी प्रेमगीत वाटेल
|
Tanya
| |
| Wednesday, August 15, 2007 - 4:31 am: |
| 
|
माझ्या बंगाली मैत्रिणीच्या मुलाच नाव आहे 'पुष्किन'. रशियन कविच्या नावावरुन ठेवलय. ( Alexander Pushkin ) florence airport वर security officer ने तुटक्या इटालियन इन्ग्लिश्मध्ये मला विचारल की 'स्वामी' चा अर्थ काय? पहिल्यांदा मला ऐकु आल, 'सामी', माझ्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव? तिने तिच्या कलिगला मला विचारायला सांगितल, की स्वामी म्हणजे ' love' का? तिच्या मुलीचं नाव तिने स्वामी ठेवल होतं आणि मी भारतीय आहे म्हणुन तिने मला विचारल होतं
|
अमोल, ... ... ...
|
Zakki
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:52 pm: |
| 
|
झंपा लहरी यांच्या गाजलेल्या पुस्तकात ( Namesake ) सुद्धा बंगाली मुलाचे नाव त्याच्या बापाने 'गोगोल'असे ठेवले, कारण गोगोल हा रशियन लेखक त्या बापाचा आवडता लेखक होता.
|
Naatyaa
| |
| Thursday, August 16, 2007 - 2:11 pm: |
| 
|
हे वाचा.. .. .. http://www.cnn.com/2007/funnynews/08/16/strange.name.reut/index.html
|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 2:29 pm: |
| 
|
gods must be crazy (1980) पाहीला आहे का. त्यातल्या त्या आफ्रिकन लोकांच्या नावामधे ! वैगेरे symbol असतात... ज्याचा उच्चार टाळुवर जीभ लावुन करायचा असतो. त्या हिरोचे नाव N!xau होते.
|
Slarti
| |
| Thursday, August 16, 2007 - 4:07 pm: |
| 
|
माणसा, ते फाफेचे 'ट्टॉक्'. रसेल पीटर्सने या नावपद्धतीवर धमाल विनोद केले आहेत.
|
Sunidhee
| |
| Thursday, August 16, 2007 - 5:35 pm: |
| 
|
माणसा, gods must be crazy... काय छान आठवण करुन दिलीस!!! आतापर्यन्त अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ज्या सिनेमांनी हसुन हसुन शब्दश: खूर्चीवरून खाली पाडलय किंवा पोट दुखवलय त्यातला हा एक.. बाकी येऊ द्या नावे अजुन..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|