Disha013
| |
| Monday, August 13, 2007 - 8:22 pm: |
| 
|
हिमेस्भैया ब-यापैकी music देतात. पण अभिनय,गाणी स्वत्: गाणे यामुळे हसे करुन घेतात. त्याने फ़क्त music director चाच रोल केलेला त्यालाही चांगलं नि आपल्यालाही! उगीच एक ना धड भाराभर चिन्ध्या नको.
|
Aashi
| |
| Monday, August 13, 2007 - 8:28 pm: |
| 
|
काल Inside Man बघितला. पिक्चर सुरु झाला अणि चक्क छैंया छैंया गाण सुरु! आधि गोन्धळलो वाटलं दोन वेगवेगळ्या डीवीडी चालु झाल्या का एकाच वेळी म्हणुन पण नाही. पुर्ण गाण दोनदा वाजल एकदा सुरुवातिला आणि एकदा शेवटी
|
आशी, आम्ही तर DVD चारदा निरखून पाहिली आणि मग फ़ास्ट फ़ॉरवर्ड करून 'इन्साईड मॅन' च आहे याची खात्री करून घेतली!
|
audrey hepburn चा wait until dark पाहिला. तीस एक वर्षापूर्वीचा हा थ्रीलर अजूनही हृदयाचे ठोके वाढवतो! खूपच मस्तय.
|
Slarti
| |
| Monday, August 13, 2007 - 9:03 pm: |
| 
|
inside man शिनिमाघरात पाहिला. सुरू झाल्यावर काही सेकंद जन्ता आ वासून बघत होती... चित्रपट बरा आहे. ultimatum पाहिला, उत्तम भट्टी जमलेला thriller . मला त्रयीमध्ये सर्वात आवडला. खरोखर खिळवून ठेवतो. वॉटर्लू स्टेशनचा प्रसंग तर बुंगाट आहे. आता stardust पाहणे आहे.
|
चल छैया छैया गाणे deja vu च्या startign ला सुद्धा आहे. नविन trend आहे वाटते.
|
Farend
| |
| Monday, August 13, 2007 - 10:50 pm: |
| 
|
आणखी कोणत्यातरी चित्रपटांत आहे ना? का Inside Man च तो.
|
Sashal
| |
| Monday, August 13, 2007 - 11:09 pm: |
| 
|
Inside Man मध्येच आहे Deja vu मध्ये नाही ..
|
Giriraj
| |
| Tuesday, August 14, 2007 - 7:11 am: |
| 
|
कालच चकदे... ला गेलो होतो... पण सोमवार असूनही चित्रपट हौस फ़ुल्ल होता त्यामुळे तिकिट मिळाले नाहीच आणि तशातच the blue umbrella चे पोस्टर पाहिले... पंकज कपूर,विशाल भारद्वाज ही नावे पाहताच जास्त विचार न करता तिकिट काढले.. रस्किन बॉन्ड यांच्या कादंबरीवर आधारीत किंवा कादम्बरीचे रुपांतरछ असा हा चित्रपट आहे. हिमाचलमधल्या एका लहानश्या गावात घडणारे कथानक 'बिनिया' या मुलीवर आणि नंदकिशोर खत्री या दुकानदारावर पूर्णपणे बेतेलेले आहे. बिनियाला जपानी पर्यटक अस्वलाच्या नखांच्या बदल्यात एक निळी जपानी छत्री देतात आणि त्या लहानश्या गावात ती सुंदर छत्री आणि बिनिया कौतुकाचा आणि काहींच्या द्वेषाचा विषय बनतात. पुढे ति छत्रि चोरिला जाते आणि बिनिया आपले बालपण हरवून बसते. कायम छत्रीच्या दुःखात राहते. त्यातूनच ती छत्रीचा छडा लावते. पंकज कपूरने उभे केलेले कंजूश आणि स्वार्थी दुकानदाराचे पात्र तर अप्रतिम आहे. त्याचबरोबर त्याला वाटणारे छत्रीचे अप्रूप आणि आकर्षण यातून तो 'हौसेला मोल नसते' वगैरे प्रकार खूपच मजेशीर आहेत. बिनिया आणि खत्रीच्या दुकानात काम करणारा पोर्या यांनीसुद्धा खूप छान काम केले आहे. गाणि एका ऐकण्यात लक्षात राहण्यासारखी नाहीत. या front वर विशल भारद्वाज ने जरा निराश केले आहे असे म्हनावे लागेल... जी आहेत ती लहान मुलांचीच आहेत आणि गुलज़ारची गीते आहेत.. चित्रपटाचा शेवटही खूप छान आहे.. छत्रीचोराला गाव वाळीत टाकते पण शेवटी बिनियाच त्याला गावात घेते. कोणतेही तामझाम नसलेला,कोणताही extrimist view किंवा सेन्टीमेण्त्स कॅश न करणारा आणि सामान्य माणसांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट मला तरी खूप आवडला..
|
Slarti
| |
| Tuesday, August 14, 2007 - 3:35 pm: |
| 
|
कथाबीजाच्या ऐवजी कथानक सांगायचे असेल, विशेषतः शेवट सांगायचा असेल तर कृपया spoiler warning तरी द्यावी.
|
Mbhure
| |
| Tuesday, August 14, 2007 - 5:25 pm: |
| 
|
धर्मः काल ADLABS ने काढलेला आणि भावना तलवार यांनी दिग्दर्शित हा चित्रपट अवश्य पाहावा. कथा तशी छोटीशी आणि नेहमीचीच आहे पण ती सही present केली आहे. सर्वांचीच कामे छान आहेत. पंकज कपुर हा नेहमीप्रमाणे अप्रतिम!!!!! (पोरग इतके फालतु कसे निघाले. बापाच्या आत्तापर्यंतच्या सर्व भुमिका ५० वेळा अभ्यासुन आणि वडिलांकडुन अभिनयाचे धडे घेऊन मगच पोराने सिमेनात येण्याचा विचार करावा.) सुप्रिया पाठकनेही तोडीस तोड काम केले आहे. कॅमेरा वर्क चांगले आहे तरी गंगाघाट असला तरी मणीरत्नम स्टाईल फोटोग्राफी करून मुळ कथेची वाट लावण्याचा मोह टाळल्याबद्दल दिग्दर्शिकेचे आभार. MUST SEE विनंतीः ह्या चित्रपटाचा Soundtrack CD वर मिळू शकेल का? किंवा कुठुन Download करता येतो का?
|
Malavika
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:18 pm: |
| 
|
पंकज कपूरचा मुलगा कोण आहे?
|
Amol_amol
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:32 pm: |
| 
|
शाहिद कपुर. ... .......
|
Malavika
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:56 pm: |
| 
|
खर का काय? ह्म्म्म.....वाटत नाही.....
|
Disha013
| |
| Tuesday, August 14, 2007 - 9:03 pm: |
| 
|
शाहिद हा पंकज कपूर आणि निलिमा अजीम या दोघांचा मुलगा आहे. ती पुर्वी सिरियल्स मधे दिसायची.
|
Tiu
| |
| Tuesday, August 14, 2007 - 11:38 pm: |
| 
|
<पंकज कपुर हा नेहमीप्रमाणे अप्रतिम!!!!! (पोरग इतके फालतु कसे निघाले.> चांगलं काम करतो कि शाहीद कपुर...मला तरी इतका काही फ़ालतु वाटत नाही...करीना कपुर पेक्षा तर नक्किच चांगलं काम करतो...
|
Slarti
| |
| Wednesday, August 15, 2007 - 12:00 am: |
| 
|
करीना कपूर हा अभिनयाचा मापदंड आहे काय ? तसे तर बहुतेक लोक सुनील शेट्टीपेक्षा चांगला अभिनय करतात...
|
Tiu
| |
| Wednesday, August 15, 2007 - 12:16 am: |
| 
|
हो पण सुनील शेट्टी काय राज कपुर च्या घरात नाही जन्माला आला ना...शिवाय सुनिल शेट्टी आणी शाहीद कपुर चा काही संबंध असल्याचं पण कधी ऐकण्यात आलं नाही...
|
Amruta
| |
| Wednesday, August 15, 2007 - 12:30 pm: |
| 
|
मला वाटत होत कि शाहिद कपुर पंकज कपुर आणि सुप्रिया पाठकचा मुलगा आहे.
|
Mbhure
| |
| Wednesday, August 15, 2007 - 3:56 pm: |
| 
|
काल " पार्टनर " पाहिला. विनोदी होता म्हणे. डेव्हिड धवन आणि गोविंदा होता म्हणुन शेवटपर्यंत बघितला. एकाच आशेवर की कधीतरी सिनेमा टर्न होईल आणि धमाल येईल पण छे!!! नीलीमा अझिम फार पुर्वी रविवारी सकाळच्या एका सिरीयलमध्ये " शाहिन " ची भुमिका करायची. सिरीयलचे नाव आठवत नाही. शाहिद कपुरचे चित्र्पट बघणेबल होते कारण They are always supported by others like actors OR directors.
|