Zakki
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:49 pm: |
| 
|
'हिरल' किंवा 'हिराल' हे नाव ऐकले आहे का? हिरल पटेल नावाची एक मुलगी आहे. (खरे तर एका मुलाची आई आहे, पण माझ्या वयाच्या मानाने मुलगीच.)
|
Manuswini
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:56 pm: |
| 
|
झक्की काका, तुम्ही संस्कृताचे पंडीत ना मग हे कसे माहीती नाही, नीलांजन?? तो मंत्र मला आजी शिकवायची शनीवारी,विसरलेय आता पण असाच काहीसा होता नी अर्थ होता शनी रविचा पुत्र आहे(आजी इती) नीलांजन समा भासम रविपुत्रम
|
Karadkar
| |
| Thursday, August 09, 2007 - 7:49 pm: |
| 
|
अत्ताच एक नाव वाचले - Lyric Doshi . हे मुलाचे नाव आहे गुज्जुभाई झिन्दाबाद!!!
|
झक्की काका, तुम्ही संस्कृताचे पंडीत ना मग हे कसे माहीती नाही, >>> हो, पंडितच पण स्वयंघोषित!!!
|
मनु तो मंत्र असा: नीलांजन समाभासम् रवीपुत्रम् यमाग्रजम् I छायामार्तंड संभूतम् त्वं नमामी शनैश्वरम् II
|
Dakshina
| |
| Friday, August 10, 2007 - 6:03 am: |
| 
|
Recently २ व्यक्तींशी ओळख झाली त्यांची नावं 'दिनार' आणि 'कलिंद'..... नावं छान वाटली मला.... पण दिनार जरा अरबी वाटतं. पुर्वी मी एक नाव ऐकलं होतं असीम चिपळूणकर.. ऐकलं तेव्हा तर मला ते नाव एखाद्या मुस्लिम मुलाचं असेल असंच वाटलं.... माझ्या मैत्रिणीने मुलगी दत्तक घेतली आहे.. तिचं नाव 'ओशिन'
|
Aashi
| |
| Friday, August 10, 2007 - 6:44 am: |
| 
|
असीम मीही बर्याचदा मराठी मुलांचं ऐकलय. दक्शिना तु म्हणते त्याप्रमाणे आम्हालाही असच वाटायचा. नंतर सवय झाली. अजुन एक्- दोन भावंडांची नावं कौतुक अणि कौस्तुभ आणि दोन बहिणींची नाव स्विटी आणि पिंकी (मराठी मुली आणि शाळेतली नाव!)
|
असिम नाव मीही बरच ऐकलय... माझ्या मैत्रिणीने मुलाच नाव अनिस(कुलकर्णी) ठेवलय. हे नाव पण,मुसलमान लोकांत असत. डॉली !! हे नाव शाळेच्या हजेरीपटावर ... कॉलेजात काय वाटत असेल ते तिच जाणे .. बिचारी !!!.
|
Swa_26
| |
| Friday, August 10, 2007 - 10:22 am: |
| 
|
असीम म्हणजे ज्याला सीमा नाहित असा तो... पण त्यातील अक्षरांमुळे ते मुस्लिम नाव वाटत असेल.
|
Manjud
| |
| Friday, August 10, 2007 - 11:24 am: |
| 
|
" सिमरन पाठक " कसं वाटतं? आणि " नवल " म्हणजे नवलकोलाची भाजी केल्यासारखं वाटतं की नाही!!! " जित्वरी " (मुलीचं नाव), " अध्वरी " (मुलाचं नाव) ह्या नावांचा अर्थ कोणि सांगू शकेल का? ही नावे एक संस्कृत महापंडिताने त्याच्या नातवंडांची ठेवलीयेत.
|
Lalitas
| |
| Friday, August 10, 2007 - 11:40 am: |
| 
|
"ऊर्ध्वी" कसं वाटतं ऐकायला? माझ्या ओळखीतल्या गुज्जु मुलीचं नाव आहे....
|
Runi
| |
| Friday, August 10, 2007 - 1:04 pm: |
| 
|
असीम हे नाव बंगाली लोकांमध्ये खुप कॉमन आहे.
|
Zakki
| |
| Friday, August 10, 2007 - 1:30 pm: |
| 
|
'असित' हे नाव बंगाल्यात असेल तर पंचाईतच. समजा त्यांनी त्यांच्या उच्चारात ओरडून 'असित' म्हंटले तर?
|
Lalitas
| |
| Friday, August 10, 2007 - 1:40 pm: |
| 
|
जुना नट "आसित सेन" आहे की बंगाल्यांत! बंगाली त्याचा उच्चार ऑशित असा करतात
|
Dineshvs
| |
| Friday, August 10, 2007 - 1:51 pm: |
| 
|
सिमरन, हा मला वाटतं स्मरण चा अपभ्रंश आहे. नाहीतरी पंजाब्याना असली जोडाक्षरे जमतच नाहीत. प्रणव चे परणव करतात. प्रणाम चे परनाम करतात ते. असित हे पण आशित चे भ्रष्ट रुप असावे.
|
Lalitas
| |
| Friday, August 10, 2007 - 2:06 pm: |
| 
|
दिनेश, बंगाली लोक "स" चा उच्चार "श" करतात... उदहरणार्थ, आसितचं "ऑशित", सचिनचं "शोचिन", सुपर्णाचं "शोपर्णा" होतं
|
Storvi
| |
| Friday, August 10, 2007 - 5:30 pm: |
| 
|
माझा एक colleague होता, त्याचे नाव अधिर.. आता त्याचा एकुण स्वभाव बघता त्याच्या आईवडीलांनी पाळ्ण्यातच गुण ओळखले असतिल अशी शंका येते आणि एकीने मुलीच नाव निश्चला ठेवल. आता त्यांना मारे firm वगैरे अर्थ अभिप्रेत असेल पण मला तरी नवजात अर्भकाचे नाव निश्चला ऐकुन अभद्रच वाटलं
|
मृण्मयी thanks विसरले होते तो मंत्र.
|
Upas
| |
| Friday, August 10, 2007 - 6:28 pm: |
| 
|
किंजल म्हणजे काय.. नावात काय आहे म्हणा.. ;)
|
Savani
| |
| Friday, August 10, 2007 - 8:39 pm: |
| 
|
किंजल म्हन्जे कोकिळा.. चु.भु.दे.घे.
|