|
रीलीज होऊन बरेच दिवस झाले तरी हा पिक्चर इथे कसा आला नाही याचं मला आश्चर्य वाटतय. बरं एम टीव्हीवरचा रोडीज कोण कोण बघतात? बाणी आठवते का त्यातली? अर्शदचा "कुछ मीठा हो जाये" कुणी बघितलाय? त्यात एक क्युट टीनेजर होता. (नाव माहीत नाही) तो आठवतो? हंसिका मोटवानी नावाची बाल कलाकार आठवते? जागो, कोई मिल गया मधे होती? सरतेशेवटी, हिमेश रेशमिया आठवतो? चॅनलवाले त्याला विसरू देत नाही हे खरं आहे. आणी याची उत्तरे नकारार्थी असतील तर मग आप का सुरूर नक्की बघा. आयुष्यत एक वेळ स्वत्:चे नाव विसराल पण या महान लोकाना विसरणार नाही. पिक्चरमधे हिमेश सिंगर आहे (दुर्दैव आपलं ) आणि त्याच्या वर खुनाचा आळ आहे. सुरुवातीलाच हिमेश आत जातो (आपण जरा हुस्श म्हणतो तवरच) 10 months earlier असा बोर्ड येतो. आणि अचाटपणाला सुरुवात होते. आमच्या पाठच्या रांगेत बसलेल्या पंजाबी कपलमधल्या त्याची हा बोर्ड वाचायला चुकला (आधी ते कॅलेंडरची पानं फ़डफ़डवायचे ते बरे होते.) तर तो तिला म्हणे "ये महिने गिनने मे इनसे गलती नही हो गयी!!! असो, नंतर तो असल्या शिव्या घालत होता बास्स... अर्धे पैसे तर त्याचे कमेंट्स ऐकुनच वसूल झाले. परत एकदा ऍडमिनकडून spoiler warning यायची भिती असल्यामुळे मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगत नाही (प्रत्यक्षात मला समजलंच नाही काय चाललय ते.) मधेच मल्लिका येते नाचते, मधेच गायत्रीमंत्र, मधुनच दर्दे दिल... काहीही चालू होतं. पण सर्वात वैतागवाणा प्रकार म्हणजे ती बाणी आणि हंसिका डिस्क मधे येतात तो सीन. ही पोरगी डिस्कमधे येताना सलवार कमीझ घालून येते आणि तिची मैत्रीण बाणी अर्धवट कपड्यात येते. तिच्या त्या एंट्रीला इतके अश्लील हावभाव केले आहेत तिने यक्क... टीपिकल राखी सावंत वाटते ती, हंसिका कुठेच शोभत नाही. एखादा डबा असल्यासारखी आहे ती. हिमेशला ऍक्टिंग जमत नाही. आणि दिग्दर्शक (कोण आहे??) कित्येक वेळा झओपल्यासारखा वाटतो. ईव्हन पिक्चरच्या कलर टोनमधे पण गडबड आहे. म्युझिक नेहमीसारखंच हिट आहे. (मला एकही गाणे लक्षात नाही.) हिमेशचे मिथुनसारखे नाचणे बघून मिथुन आत्महत्या करेल. त्याच्या टोपेवर आणि नाकातून गाण्यावर पण पंच मारले आहेत. त्या टोपीवाल्या जोकनंतर हिमेश जे काही हसतो, ते बघून वैतागच येतो. पण तरी हा पिक्चर एकदातरी बघाच. स्पेशली जर मोठ्ठा मित्राचा ग्रूप असेल आणि एकदम कॉलेज कॅंटीनवाला गोंधळ घालायचा असेल तर नक्की बघा.आम्ही तेच केलं. खुप वैताग आला की पॉपकॉर्न फ़ेकत होतो
|
Zakasrao
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:47 am: |
| 
|
हंसिका मोटवानी ही "डालडे का डिब्बा" अशी कॉमेंट मी कुठल्या तरी न्युज चॅनेल वर एका समिक्षकाकडून ऐकली होती आणि कुठेतरी लिहिली होती. हा पिक्चर इथे आलाच नाही कारण बर्याच जणानी त्याविषयी चित्रपट कसा वाटला ह्या मधे लिहिल आहे. तु अजुन जरा वर्णन करायला हव होत अस वाटतय कारण तु रिस्क घेवुन पाहिलाच आहेस तर बाकीच्याच्या डोक्याला ताप कमी होइल
|
Dhumketu
| |
| Wednesday, August 08, 2007 - 9:18 am: |
| 
|
पण मी म्हणतो ईथे एव्हढे लिहायची काय गरज होती? एकच पोस्ट टाकायचे की "सगळा पिक्चर".. पुढे ४ शब्दाच्या लिमीट साठी पांढर्या रंगात २ शिव्या लिहायच्या.. त्यानंतर एडमीन ला सांगायचे की कायमचे कुलूप लाऊन टाका म्हणून...
|
Chinya1985
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:44 pm: |
| 
|
हिम्या त्या पहिल्या गाण्यात कानाला हात का लावत असतो?? काहिहि असो त्याच्या आत्मविश्वासाची दाद द्यायला हवि. पिक्चरची खिल्लि उडवण्यात एक वेगळाच आनंद मिळाला मला तर
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 9:55 pm: |
| 
|
हे वरील चित्रपटाशी निगडीत नाहीय. राझ चित्रपटावरुन तुम्हाला काय शिकवण मिळाली?
|
Bittu
| |
| Friday, December 14, 2007 - 1:17 am: |
| 
|
चिन्या, तो गायला येतो तेव्हा लोक आरडा-ओरडा करत असतात, पण त्याच्या मते ते पुरेश्या जोशाने ओरडत नसतात. म्हणून तो कानाला हात लावून दाखवतो की त्याला नीट ऐकू नाही येत आहे... त्याने तसे केल्यावर प्रेक्षकांचा आवाज लगेच वाढतो. हिमेश किती अति style मारतो खरेच
|
Maanus
| |
| Friday, December 14, 2007 - 6:18 pm: |
| 
|
काय हे, कुणालाच राझ चित्रपटाची शिकवण कळाली नाही. मराठीत moral of the story तर moral आहे, की तुम्ही लग्नाबाहेर पाहीजे तितकी लफडी करु शकता. आणि जर चुकुन (sp?) माकून जीच्याबरोबर लफडे चालु होते ती भुत झाली तरी टेंशन घ्यायची गरज नाहीय. कारण story च्या शेवटी professor मरतो, व तुम्ही परत तुमच्या बायको बरोबर आनंदाने राहु शकता. किवा नविन affair करायला मोकळे
|
Aashu29
| |
| Saturday, December 15, 2007 - 9:44 pm: |
| 
|
मी असे ऐकले की आपका सुरुरच्या यशामुळे हिमेशला ३ चित्रपट मिळाले, देवा ये सब सुननेसे पेहले तुमने मुझे मार क्यु नहि डाला?
|
Ankyno1
| |
| Monday, December 17, 2007 - 6:44 am: |
| 
|
कुणीसं म्हटलंय, इस दुनिया मे सरफिरो की कमी नही, १ ढून्डने निकलो.... १०० मिलेन्गे.... खरच आहे... हिमेश ला (नायक आणि गायक म्हणून) सिनेमे मिळतात यानी हेच सिद्ध होतं त्या ३ चित्रपटा मधला १ सुपरहिट 'कर्ज' चा रीमेक आहे ('ऊऊऊऊऊऊऊम शान्तीईईईईईईईइ ऊऊऊऊऊऊऊम' ऐकायची तयारी ठेवा...) या रीमेक चं दिग्दर्शन सतीश कौशिक (पप्पू पेजर) करणार आहे... आणि नायिकेचा शोध चालू आहे.... सिम्मी चा रोल उर्मिला कडे जाण्याची शक्यता आहे (बाकी तिला तरी काय काम आहे आज्-काल) १ प्रामाणिक इच्छा... हा ही सिनेमा 'उमराव जान, आग' यान्च्या वाटेनी जावा...
|
आपका सुरूर, हमारा कसूर!!
|
मायबोली वर तरी राखी सावंत ला काही बोलु नका या डालडा च्या डब्यांपेक्षा ती बरी, निदान उघड पणे सांगते तरी की मी पैसे कमवायला आली आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|