|
Pancha
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:18 pm: |
| 
|
हो अपुर्व, Bommarillu बद्दल मी आधी लिहिले आहे. Nuvvu Naaku Nachchav पण बघ.
|
Farend
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:05 pm: |
| 
|
The Prestige कोणी बघितला का? मस्त आहे.
|
Mansmi18
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:48 pm: |
| 
|
मी काल "झूम बराबर झूम" पाहण्याचा प्रयत्न केला. एक जाणवले कि हा चित्रपट जरा वेगळ्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते हे त्यानी जाहीरातीमधे सांगितले असते तर प्रेक्षकानी जरा वेगळ्या अपेक्षा ठेवल्या असत्या. एका वेगळ्या तर्हेच्या comedy चा प्रयोग होता पण तो फसला. आपण एक regular यश चोप्रा मसाला पाहण्याची अपेक्षा ठेवतो आणि तिथेच अपेक्षाभन्ग होतो. दुसरी गोष्ट अभिशेक बच्चन हा pleasant वाटण्याऐवजी annoying वाटतो. आणि त्यानी डायना बद्दल फ़ारच वाह्यात तर्हेचे jokes वापरले आहेत. हा चित्रपट पाहताना कोणाला ते offensive कसे वाटले नाहीत याचेच नवल वाटते. ------------------------- जाणकाराना एक प्रश्न: वरील चित्रपट black comedy या सदरात मोडतो का?
|
हिंदीमधे male सिंगर्स बरेच आहेत आणि चांगले आहेत. तमीळांपेक्षा तर नक्किच चांगले. सोनु निगम चांगला गायक आहे. हरीहरण एव्हढाहि ग्रेट नाही. एका पिक्चरमधे(माधवन,जिम्मि शेरगिल) 'तुम बिन..जाउ कहां' हे किशोर कुमारच गाण त्याने म्हटल होत. आणि अक्षरश्: गाण्याची वाट लावली आहे त्यानी. शी!!!!!!! तो जरा जास्तच feelings नी गाण गातो. overacting असते ना तसच गाण गाताना over च करतो तो हरिहरण.
|
अगदी अगदी !! हे South Indian singers आणि त्यातल्या त्यात S.P. तर अतिच over singing करतो !! उलट मलाही सध्याचे हिंदी मधले male singers चांगले वाटतात .
|
Farend
| |
| Wednesday, August 01, 2007 - 9:52 pm: |
| 
|
खरे म्हणजे विनोदाच्या बीबीवरच टाकायला पाहिजे पण इथे टाकतो, आजचा मोठ्ठा विनोद
|
Ravisha
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:05 am: |
| 
|
काहीच्या काही आहे हे, farend.By the way, मी पण पाहिला आहे " The Prestige".It's an amazing movie."The illusionist" पाहिला आहे का? चिन्या,हरिहरण
|
Zakki
| |
| Thursday, August 02, 2007 - 3:30 pm: |
| 
|
इथे 'बयो' हा मराठी सिनेमा दाखवणार आहेत. त्याबद्दल काही माहिती?
|
Farend
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:41 pm: |
| 
|
हो The Illusionist ही मस्त आहे. कदाचित visuals मधे जास्त चांगला आहे Prestige पेक्षा.
|
Pancha
| |
| Friday, August 03, 2007 - 5:27 am: |
| 
|
zakki बयो गजेंद अहिरे चा श्रेयश तळपदे, विक्रम गोखले आणि म्रुनाल कुलकर्नी आहेत. स्वातंत्र्याच्या काळातली हिंदु मुलगा व मुस्लिम मुलगी ह्यांची प्रेम कथा आहे. गाणी चांगली आहेत. चित्रपट बरा आहे. श्री ज जोश्या यांच्या पुस्तका वर आधारित आहे बहुदा. आजुण काय माहिती पाहिजे सांगा.
|
Psg
| |
| Friday, August 03, 2007 - 9:07 am: |
| 
|
पंचा, बयो मधे हीरॉईन म्हणून 'मृण्मयी' म्हणून आहे ना? रीमा लागूची मुलगी? मला वाटतं हा तिचा पहिला चित्रपट.
|
The Illusionist चांगला आहे. Farend ला अनुमोदन. मला चक्क मागच्या डिंसेबर मध्ये Air-India (mumbai to chicago) मध्ये बघायला मिळाला!
|
Ravisha
| |
| Friday, August 03, 2007 - 3:36 pm: |
| 
|
काय सांगतेस,राणी air india मध्ये? मला वाटतं पूनम,रिमा लागूची मुलगी "सातच्या आत घरात" ह्या चित्रपटात होती,म्हणजे तो तिचा पहिला चित्रपट...
|
Pancha
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:45 am: |
| 
|
Psg, हो ... ....
|
समस्त लोकहो मी काल "गान्धी माय फ़ादर" पाहिला.. सुंदर चित्रपट जर का अनिल कपूर चे हे पहिले अपत्य असेल तर अगदी बाळसेदार आहे.. अक्षय खन्ना ची भूमिका सुरेख झालीये. मुख्य म्हणजे ते त्याचे नेहेमीचे भुवई-विक्षेप,ओठान्चे वेडेवाकडे चाळे टाळलेत त्याने-पहिला सुखद धक्का इथेच बसतो (अक्षयच्या पन्ख्यांची क्षमा मागून मुळात गंभीर विषयाला छान न्याय दिलाय त्याने. पूर्ण चित्रपटात आवश्यक असणारा एक थिरथिरा भाव चेहेर्यावर ठेवणे जमलेय त्याला- बाकी गान्धींची भूमिका जरीवाला म्हणून एका नटाने अप्रतिम वठवलिये..प्रश्नच नाही मला तर वाटते तीच ती गान्धीभूमिकेतली नेहेमीची वाक्ये म्हणताना जर हास्यास्पद नाही वाटले तरच त्या माणसाला गान्धी जमले! शेफ़ाली छाया नव्हे शहा(हो फाटले म्हणे तिचे नी हर्ष चे जबरदस्त दिसते..उत्क्रुष्ट काम करते. या तिघांच्या भावकल्लोळात बिचारी भूमिका चावला बावरते...तिची भूमिका खरच चावली गेलिये पण एकूणच ती खपून जाते.. तिच्या जागी आयेशा तकिया जास्त गोड वाटली असती असे वाटले मला,खैर.. मध्येच थोडेशी द्रुष्ये तुटक तुटक वाटतात पण म्हंटले ना,अनिल कपूर पहिले अपत्य..सो इट इज ओके! मागे अतुल कुलकर्णीचे "गान्धी विरुद्ध गान्धी" पाहिले होते.. अतुलचा जबरदस्त अभिनय..त्याच्या (फक्त आणि फक्त) गोष्टीची आठवण झाली. राष्ट्रपुरुषाच्या छायेत त्याच्या मुलान्चे कर्तुत्व कसे झाकोळू शकते याचे उदाहरण.. मला सतत याची तुलना शिवाजीमहाराज शन्भुराजे या जोडीशी करावी असे वाटत होते. पण एकूणात एकदा पहावा असा चित्रपट..
|
काल ' cash ' नामक रद्दड पिक्चर पाहिला. बराच काळ काय चालले आहे हेच समजत नाहि. कोण कुणाबरोबर आहे, काय करतोय वगैरे काहिच समजत नाहि बराच वेळ. पिक्चरमधे action भारि आहे अशी जाहिरात केलि होति. पण त्याच बरोबर animation पण आहे हे माहित नव्हत. म्हणजे action च्या ज्या दाखवायला अवघड गोष्टी आहेत तेथे कार्टुन टाकल आहे. आणि हे अगदी सहजपणे दिसुन येत. ईतरहि वेळि कार्टुन टाकुन action च्या मर्यादा झाकायचा प्रयत्न केला आहे पण प्रयत्न असफ़ल आहे विनोद करायचा पण असफ़ल 'प्रयत्न' केला आहे. दुसर्या देशातल्या भारतिय एम्बसिच्या सिक्युरिटि adviser ला वाटेल तशी मारामारी गोळिबार करायची परवानगी कशि मिळते?? २ गाणी ठिक आहेत आधिच इतकि पात्र आहेत त्यात आयटम नंबरला वेगळि 'आयटम' कशाला बोलावलि आहे कळत नाहि. ईशा देओल आणि शमिता शेट्टी काहि खास दिसत नाहित. एकच कपडा २-३ वेळा का घातला आहे त्यांनी हेही कळत नाहि(बहुतेक एकदमच सर्व गाणि शूट केलि असावित ). अजय देवगणचा एक जोक (जो दिया मिर्झाला इतका आवडतो की ती अनेक वेळा फ़र्माईश करुन तो जोक परत परत ऐकत असते आणि ति मेल्यावर अजय तिचा हात पकडुन तो जोक परत सांगतो [वाह क्या इमोशनल सीन है,मेरि तो आंखे भर आई]) तो जोक असा(भाशांतर)- एकदा संटा आणि बंटा रस्त्यात भेटतात. संटा घोड्यावरुन जात असतो. बंटा विचारतो 'तुझा घोडा कुठेय?' संटा म्हणतो ' अरे मी घोड्यावरच तर बसलोय'. बंटा म्हणतो -'विचारायला काय हरकत आहे??'
|
मी काल पार्टनर आणि आप का सुरूर पाहिला. (अजून जिवंत कशी काय हा प्रश्न पडला असल्यास उत्तर सोपं आहे. दोन्ही पिक्चर खूप ऍंजॉय केले. पार्टनर हीच वरून घेतलाय असे म्हणतात, पण माझ्या मते हा एक ओरीगीनल पांचट पिक्चर आहे. गोविंदा जबरदस्त फ़ॉर्मात आहे. काय नाचतो? सलमान गोविंदाच्या समोर उभा राहील तर पुरे असं म्हणत असतानाच एकदम सही काम करून जातो. लारा दत्ता अत्यंत विचित्र दिसते. ना धड पत्रकार न एक आई, अशी मधेच कुठेतरी हरवून जाते. (आणि त्या डोनचे फोटो छापून काय मिळालं असतं??) कतरीना छान दिसते, आणि काहीतरी बोलते, आधीसारखी मख्ख उभी राहत नाही, (ते डान्ससाठी जरा काहीतरी शिकवणी लाव गं बाई) राजपाल यादवला वाया घालवला आहे, irritating वाटायला लागतो. मुळात वेगवेगळे विनोदी प्रसंग एकत्र केले की विनोदी पिक्चर तयार होत नाही हे डेवीडला कोण सांगणार? (तरी त्याच्या मुलाने थोड्याफ़ार तांत्रिक करामती दाखवायला सुरुवात केली आहे. Lets hope he will be better . सलमान गोविंदाचे पंचेस सही जमले आहेत. त्यातल्या त्यात सरकाय लियो आणि जस्ट चिल वाला सीन मस्तच. बाथरूम ह्युमर अति झाला आहे. कधी कधी असह्य असे जोक्स टाकले आहेत. एकंदरीत एकदा बघायला ठीक आहे. ते मिसाईलवाला सीन आणि शेवटचा आचरटपणा उडवला असता तर अजून बरं झालं असतं.
|
Aashu29
| |
| Monday, August 06, 2007 - 10:15 am: |
| 
|
partner मलाहि नलिनीप्रमाणेच मुर्तिमंत आचरटपणा वाटला!! पण नलिनी ते सुरूर चे काय तो कसाय? हिमेशला पडद्यामागे सहन केला, आत पडद्यावर पण? ए आई, याला सान्ग ना!! ( रडवेला चेहरा)
|
आशु. मी नंदिनी रे.. नलिनी नव्हे. आणि आप का सुरूर साठी लिहणार आहे. पण बरंच लिहायचे आहे. म्हणून वेळ लागेल
|
Aashu29
| |
| Monday, August 06, 2007 - 3:45 pm: |
| 
|
ohh sorry, nandini bhagini!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|