आदिल म्हणजे पहिला. ' आधी पेटलेला दिवा ' नाही. ज्ञानेश्वरीतल्या त्या ओळी जैसा दीपे दीपु लाविजे | तेथ आदिल कोण नोळखिजे | अशा आहेत. त्याचा अर्थ: दिव्याने दिवा लावला असता त्यात मूळचा दिवा ( ज्यावरून दुसरा दिवा लावला तो) कोणता हे ओळखू येत नाही, असा आहे. बाकी या BB वर वाचलेली नावं भन्नाट आहेत. 
|
Disha013
| |
| Friday, August 03, 2007 - 5:18 pm: |
| 
|
सही नावं आहेत एकेक!कोणाला 'हटके' नाव ठेवायचे असेल तर भरपुर चॉइस आहे. अक्षयकुमार ट्विन्कलच्या मुलाचे नाव 'आरव' आहे म्हने!
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 5:34 pm: |
| 
|
नि टॉम कृझ च्या मुलीचे नाव 'सुरी'! यहुदी लोकांच्या भाषेत त्याचा काहीतरी अर्थ होतो म्हणे. पण यहुदी लोकांना माहित नाही ते!
|
Aashi
| |
| Friday, August 03, 2007 - 5:47 pm: |
| 
|
अर्णव माझ्या मुलाचे नाव आम्ही ठेवले तेव्हा नाविन्य होत. आत्ता दर तिसर्या व्यक्तिशी बोलताना ऍकते - ओह! आमच्या अमुक अमुकच्या पण मुलाचे नाव अर्णव आहे आरव अगदी कोम्बड्याला आरवायला सन्गितल्यासारख वाटतं!
|
पण अत्यन्त काव्यमय आणि नाजूक नावे ती मुले छोटी असताना चांगली वाटतात पण ही मुले प्रौढ झाल्यावर ही नावे फार विजोड वाटतात. बायकांचे ठीक आहे पण पुरुष अशा नावांमुळे फार "बायकी" वाटतात....
|
Supermom
| |
| Friday, August 03, 2007 - 7:16 pm: |
| 
|
आमच्या माहितीतीतल्या एकीने चारही मुलांची नावे मिळून एक वाक्य व्हावे या कल्पनेने 'आशा, वीणा, जीवन, व्यर्थ' अशी ठेवली आहेत. यात मुळीच अतिशयोक्ती नाही. शेवटच्या मुलाचे आयुष्य जन्मल्याबरोबर व्यर्थ का केले कोण जाणे.
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 7:33 pm: |
| 
|
तो बिचारा आयुष्यभर 'मी व्यर्थ आहे' म्हणणार. लोकहि म्हणणार हा व्यर्थ आहे. काय हे जीवन बिचार्याचे!
|
ओजस हे माझ्या मैत्रिणीचे नाव आहे. सुरवातीला भेटले तेव्हा विचित्र वाटले. ती मराठी आहे. पण ओजस म्हणजे कय?
|
पौलमी म्हणजे नक्शत्रांचा समुह. माझ्या एका गुज्जु मैत्रिणीचे नाव आहे. आरव म्हणजे बहुतेक आवाज like केकारव .
|
Ajjuka
| |
| Saturday, August 04, 2007 - 3:59 am: |
| 
|
ते पौलमी आहे की पौलोमी आहे? माझ्या माहितीतली एक पौलोमी आहे. पसायदानामधे 'चला कल्पतरूंचे आरव' असं आहे. त्यातल्या 'आरव' चा अर्थ काय? आणि आरव जे नाव आहे त्याचाही तोच अर्थ आहे का? मुलांच्या नावांपैकी मला आवडतं एक नाव (गौरी देशपांड्यांच्या कादंबरीत वाचलेलं) म्हणजे वनमाळी. कृष्णाचं नाव आहे. पण प्रत्यक्ष माणूस मी अजून पाह्यला नाहीये या नावाचा. बर मधे मी एका सिरीयल मधे एक नाव ऐकलं 'पवित्रा'. पवित्र शब्दाचं स्त्रीलिंगी करायचा प्रयत्न असावा पण मला एकदम कोणीतरी कसला तरी पवित्रा घेऊन उभं आहे असं वाटलं.
|
Psg
| |
| Saturday, August 04, 2007 - 5:22 am: |
| 
|
माधुरी दिक्षितच्या मुलांची नावं आहेत 'आरिन' आणि 'रायन'. यातलं 'रायन' मला वाटतं अमेरिकन असावं.. Ryan असं नाव असतं ना तिकडे? 'आरिन' म्हणजे काय माधुरीच जाणे! आणि कालच भेटले एकाला.. त्याचं नाव 'हसनैन'! गुज्जु होता हे सांगणे नलगे!
|
Dinesh77
| |
| Saturday, August 04, 2007 - 8:17 am: |
| 
|
मी ऐकलेली मुलींची नावे: विश्रांती (बहुतेक तिला लहान भावंड नसणार ) कादंबरी (भावाचे नाव काय "कथासंग्रह"???)
|
Zakasrao
| |
| Saturday, August 04, 2007 - 9:01 am: |
| 
|
काय भन्नट नाव आहेत एक एक.
|
माझ्या आधीच्या ऑफ़िसमधे एक जण होता, गुज्जू, त्यचं नाव डीप्पी. पासपोर्टवर दिलीप आणि लग्नपत्रिकेवर डीप्पा.. (सध्या मुंबई मिररला क्राईम कव्हर करतो त्याची बायलाईन वाचली असेलच बर्याचजणानी.) अजून थोडे "हटके" नावं. अभिती, सुरंजना, शीतछाया, मारियालक्ष्मी (मल्लू. एका नातेवाईकाचे नाव तुशार म्हणून बायकोचे "तृप्ती" ठेवले, आजेसासूबाईना ते काही म्हणता येईना, त्यानी आपलं हाक "तीरूपती" म्हणून हाक मारायला सुरुवात केली.
|
माझे ख्रिस्ती वर्गमित्र जोडपे आहे. त्याचे नाव फिलोमन आणि तिचे शालिनी. मुलाचे नाव ठेवले शाफि!
|
Pooh
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:31 pm: |
| 
|
"आरव" म्हणजे "बाग" किंवा "उद्यान"
|
Sahi
| |
| Saturday, August 04, 2007 - 1:08 pm: |
| 
|
१ गुज्जु मुलीचे नाव उपग्न्या म्हनजे काय कोण जाणे... अजुन एक नविन नाव "जिआना: दुर्गा वेश्णो देविचे आणि इटलिअन आहे शब्द्श्: अर्थ देवाची क्रुपा ग़्रेस्फुल प्रिन्सेस
|
Arch
| |
| Saturday, August 04, 2007 - 6:49 pm: |
| 
|
इथे आल्यावर काही Indians आपली नाव anglosize करतात. मग विनोदचा विनी होतो. विक्रमचा विकी होतो. अरुणचा एरन करतात. जोशीचा जो होतो वगैरे. आणि सांगणं असत की इथल्या लोकांना म्हणायला सोप्प पडाव म्हणून अस केल. तर असच एकाने आपल नाव Ian केल, तर आमचा मित्र म्हणतो तू जर Mideast मध्ये गेला असतास तर अहमंद केल असतस का त्यांना म्हणायला सोप्प पडाव म्हणून. 
|
Mahaguru
| |
| Saturday, August 04, 2007 - 8:05 pm: |
| 
|
मला पण असे नामांतर केलेले आवडत नाहीत. पुण्यात आमच्या कडे Switzerland हुन एक sales manager आला होता. त्याचे नाव होते beath (की असेच काहिसे) त्या शब्दाचा अर्थ happy असा होतो. त्याला आम्ही सांगीतले की आमच्याकडे आनंद नाव खुप पोपुलर आहे आणि त्याचा पण अर्थ तोच होतो. तेव्हापासुन तो सगळ्यांना त्याचे नाव सांगताना my name is beath, you can call me anand असेच म्हणायचा. अर्थात तो sales वाला होता म्हणुन ही नाटके करत असावा.
|
Aashi
| |
| Saturday, August 04, 2007 - 9:17 pm: |
| 
|
अजुन काही हटके नाव - पुलक आणि मोहोर. दोघि बंगली मुली माझ्या वर्गात होत्या. पुलक चा अर्थ मराठी प्रमाणे होतो. मोहोर आठवत नाही आत्ता
|