|
Dineshvs
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:27 pm: |
| 
|
रॉबीन त्या कंकणा बॅनर्जी म्हणजे सुलक्षणा पंडीतची सावत्र आई. छान आवाज आहे त्यांचा. अज्जुका, तो जोक नाही, पण भैयांचा एक ग्राम्य जोक आम्ही सांगायचो. त्यातली नावे, रादर आडनावे, शर्मा, दोंदे, तिवारी, चौधरी, पांडे आणि श्रीवास्तव. BTW रमेश पवारांचे गुरु नाटक याच स्पर्धेतुन पुढे आले. या नाटकातुन बाळ धुरी, उषा कलबाग यानी पदार्पण केले. त्यातही बेबली आणि शकुली, अशी मजेशीर नावे होती.
|
Madhura
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:40 pm: |
| 
|
विरल हे असेच एक विचित्र गुज्जू नाव.
|
Arch
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:03 pm: |
| 
|
रॉबीन त्या कंकणा बॅनर्जी म्हणजे सुलक्षणा पंडीतची सावत्र आई. छान आवाज आहे त्यांचा. >> खरच की काय. विजयेता पंडीत वगैरे त्यांच्या बहिणी न? मला वाटायच ह्या मुली मराठी आहेत. आणखी काही गुजराथी नाव. अंकीत (कह्यात गेलेला?) हा मुलगा बायकोच्या कह्यात जाणार ही लक्षण पाळण्यातच दिसतात की काय? तसच मुलाच एक नाव वृषभ. मुलाला त्याच्या नावाचा अर्थ विचारला तर काय सांगणार? बैल? आमच्या इथे एका मनिषा नावाच्या मुलिच पेट नेम " मिशी "
|
Zakki
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:05 pm: |
| 
|
दिनेश, माकडाच्या हाती शॅंपेन या नाटकातहि पेन्सिल, चाकू अशी (टोपण) नावे होती. नाटकात तीच नावे वापरत.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:27 pm: |
| 
|
मैत्रेयी, काय की! खरं खोटं माहित नाही ग! असा जोक ऐकला होता खूप वर्षांपूर्वी आणि फिरोदियांशी काहीतरी संदर्भ होता असं अंधुकसं आठवतंय. बहुतेक कोणीतरी त्यांच्या मुलांची नावे बघून हा जोक तयार केला असावा आणि मुलाची गाडी नंतर स्वतःच्या मनाने जोडली असावी. ती चाकू, पेन्सिल नावे मुद्दामून प्रतिकं म्हणून वापरली आहेत.
|
Preetib
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:47 pm: |
| 
|
Ajun Gujju Nave: Nehal Ripple hee mulanchi naava aahet 
|
Storvi
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:46 pm: |
| 
|
ते वृषभ नसुन रिषभ असेल असे वाटते, अनेकदा ही चुक झालेली मी पाहिली आहे
|
Prajaktad
| |
| Thursday, August 02, 2007 - 7:56 pm: |
| 
|
खरच की काय. विजयेता पंडीत वगैरे त्यांच्या बहिणी न? मला वाटायच ह्या मुली मराठी आहेत. >>>>विजयेता पंडित म्हणजे जतिन्-ललित (पंडित)ची बहिण आणी सध्याची विजयेता आदेश श्रीवास्तव.
|
माझ्या एका मैत्रीणीच्या मुलीचं नाव आहे मिल्पा. म्हणजे सोन्याची खाण. कुठल्या देशात कुठल्या भाषेत आता मला आठवत नाही. सांत्वना ही नाव असू शकतं हे प्रत्यक्ष मुलीला भेटेपर्यंत मला माहिती नव्हतं. पायल नाव का ठेवत असावेत लोकं? परी? इथे तर नवांच्या बाबतीत आनंदीआनंद असतो. बाळ झाल्यावर काही दिवसांनी एकाला विचारलं काय नाव ठेवलं? म्हणाले शौर्या (मुलगी) मग काही महिन्यांनी भेटले तेव्हा मी विचारले 'कशी आहे शौर्या?' तर म्हणाले 'आता ते नाव आम्ही बदललं.' आपल्याल एकदा नाव ठेवल्यावर नाव बदलणं माहितीच नाही. नी हे लोक म्हणतात 'त्यात काय? शाळेत जाईपर्यंत नाही आवडलं तर बदलतो आम्ही नावं. पुढे शाळेचं एक नाव घरच एक नाव असही होऊ शकतं'.. आहे की नाही मजेदार? नुकतं ऐकलेलं वेगळं नाव.. गुनगुन (मुलगी).. ? मेघा
|
Alpana
| |
| Friday, August 03, 2007 - 4:56 am: |
| 
|
गुनगुन, रिमझिम असली नावे बन्गाली ठेवतात.. आमच्या डिविजनच्या MD चे नाव रुमझुम... अजुन एक बन्गाली नाव पॉलमी (spells poulamy) अर्थ नाही माहित पण छान वाटले ऍकायला... किसलय (spells kislay) नावाचा पण एक बिहारी होता आमच्याकडे माझ्या पुतणीचे नाव पण छान आहे ओजस
|
Maudee
| |
| Friday, August 03, 2007 - 5:56 am: |
| 
|
माझ्या मैत्रिणीच्या मुलाच नाव आहे ओजस. मी ऐकलेलं आणख़ी एक गोंडस बंगाली नाव म्हणजे पापरी. बंगालीत त्याचा अर्थ पाकोळी असा होतो. आणख़ी एक गोंडस नाव म्हणजे साजिरी.
|
Alpana
| |
| Friday, August 03, 2007 - 8:14 am: |
| 
|
अजुन एक नाव......... प्रेम पण हे नाव मुलीचे आहे.... अर्थातच पंजाबी
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 8:55 am: |
| 
|
वृषभ आणि रिषभ मधे काहि फरक आहे का ? रे या संगीतातल्या सूराला जरी रिषभ म्हणत असले तरी त्याची उत्पत्ती बैलापासुनच झाली असे म्हणतात. आदिल हे मुसलमान नाव मराठीतही ठेवायला हरकत नाही. आदिल कोण जो नोळखिजे, अशी ज्ञानेश्वरीत ओळ आहे. त्याचा अर्थ, आधी पेटलेला दिवा. आशा बगे नी हे नाव कथेत वापरलय. आमच्या कॉलेजमधे एक बालसुभ्रमणियम होता, त्याला आमची प्राध्यापिका पण म्हणायची, तु बडा कब होगा ?
|
Manjud
| |
| Friday, August 03, 2007 - 9:44 am: |
| 
|
मी ओजस हे नाव मुलाचे नाव ऐकले होते. माझ्या एका भाच्याचे नाव ठेवले आहे " सतेज " आणि दुसर्या बहिणीच्या मुलाचे नाव " अर्णव " . " बोलते जे अर्णव पियुषाचे " अशी पसायदानात ओळ आहे. अर्णव म्हणजे समुद्र. गंमत म्हणजे त्याच्या आईचे सासरचे नाव " पियुषा " च आहे. आम्ही लहान असताना असा जोक सांगायचो की पहिली मुलगी झाली तिचं नाव ठेवलं " कविता " मग दुसरा मुलगा झाला तर तो " धडा "
|
Aashu29
| |
| Friday, August 03, 2007 - 10:52 am: |
| 
|
मन्जु,मला तर अर्णव चा अर्थ म्हणजे मोति माहित आहे!! ओजस नाव मी माझ्या मुलाचे ठेवणार होते पण श्लोक ठेवले!! जास्त आवडले म्हणुन!!
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 12:03 pm: |
| 
|
सावल्या नाटकात, सर्वात धाकट्या मुलीला सगळे मणि म्हणत असतात. एकदा ती वैतागुन म्हणते, मी आता मोठी झाले, मला मणि नाही म्हणायचे, पुर्ण नावानी हाक मारायची, पुर्ण नाव काय असते माहितीय ? मणिषा. !!!!
|
Alpana
| |
| Friday, August 03, 2007 - 12:30 pm: |
| 
|
माझी पुतणी पंजाबी आहे ना, म्हणुन ओजस नाव मुलीला पण चालले असेल... पण नाव मात्र मराठी जावेने ठेवलेय
|
Ana_meera
| |
| Friday, August 03, 2007 - 12:36 pm: |
| 
|
आमच्या समोर एक बंगाली रहायचे. त्यांच्या मुलीच नाव होत . "शिंजिणी" नाव ओबडधोबड पण अर्थ पैंजणांची मधूर किणकिण.. एक वर्षाची असेल तेव्हा व पापा घेतला की माशाचा वास यायचा.
|
पार्थीव पण असेच प्रेता सारखे झिणझिण्या आणते बुवा.. >>>>कारण त्याचा अतिवापर. पार्थिव हे पृथ्वीपासून बनलेले विशेषण आहे... Dead body ला पार्थिव म्हटले जात असल्याने ह्या झिण झिण्या अपेक्षितच आहेत .
|
गुनगुन.. डास किंवा गांधील्माशी वगैरे डोळ्यास्मोर येतेय 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|