|
पार्श्वनाथ हे नाव भगवान महावीराना वापरतात. त्याचा अर्थ मागे उभा असलेला इश्वर. पाठीराखा या अर्थाने....
|
कंकणा बॅनर्जी म्हणून एक शास्त्रीय गायिका माहीत असतीलच. त्यांचे स्पेलिंग cuncuna केले जाते. एका आकाशवाणी कार्यक्रमात निवेदिकेने चक्क कुनकुना बानर्जी असे सांगितले... ही नवी जी बया आली आहे तिचे नाव कंकणा सेन आहे तर तिला कोंकणा सेन म्हणतात... अस्सल कोंकणी वाटते की नाही?
|
Ajjuka
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:30 pm: |
| 
|
मी पण हेच नाव लिहिणार होते दिनेश... पार्श्वनाथ आळतेकर.. माझ्या गुरूंचे गुरू.. आणि प्रेता बद्दल.. माझ्या माहितीप्रमाणे ते लोक मराठी आहेत. अजून खोलात चौकशी करून मग टाकते येथे.
|
आज पेणच्या एका कार्यक्रमात ऐकलेली ही खास नावे. हार्दिक, अभिनंदन, स्वागत, दिलखुश, समाधान, विभक्ती, निराशा, आंचल, छैला...
|
Amruta
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:54 pm: |
| 
|
निराशा?? हि असली नाव कोण ठेवत कहर आहे अगदि. ) इथला नवर्याचा boss - सरमा. हे आडनाव नाही तर नाव आहे म्हणे.
|
Kulk_arti
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:22 pm: |
| 
|
एका ओळखितल्यांनी त्यांच्या मुलिचे नाव लावण्य ठेवल........मला मज्जा वाटली. म्हणजे ती मुलगी उद्या साठ वर्षाची झाली तरी लावण्य???????
|
Disha013
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:44 pm: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणीच्या ३ वर्षांच्या मुलीचे नाव आहे 'उल्का'. खेळताना ती पडली की आम्ही म्हणतो,' उल्का पडली!' अजुन एक ऐकलेले नाव 'मनचली'.
|
Storvi
| |
| Wednesday, August 01, 2007 - 9:54 pm: |
| 
|
>>इथला नवर्याचा boss - सरमा>>किती आहेत? आणि कुठे कुठे? 
|
Arch
| |
| Wednesday, August 01, 2007 - 10:04 pm: |
| 
|
हे बंगाली लोक व ला ब म्हणतात. त्यामुळे वनानीला बनानी, रवीला रबी वंदनाला, बंदना मग तिला इथे Bandana म्हणतात.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:07 am: |
| 
|
उल्का हे फारच कॉमन आहे त्यामुळे त्यात गम्मत असली तरी आपले कान रूळलेत त्यासाठी. त्या ४ मुलांच्या नावांची गोष्ट असा एक जोक होता कुणाला आठवतोय का तो पूर्णपणे? १. ___ (मुलगी) आनंद झाला म्हणून २. किमया दुसरी मुलगी बघून आश्चर्य वाटलं म्हणून ३. सुलज्जा तिसरी मुलगी बघून लाज वाटली ४. अजिंक्य मुलगा झाल्यावर सगळं जिंकल्यासारखं वाटलं संपूर्ण आठवतोय का कोणाला. मला वाटतं फिरोदियांच्या मुलांच्या बाबत हे म्हणले जायचे.
|
हूड कंकणा बंगाली आहे म्हणून तिच्या नावाचा उच्चार "कोंकणा" होतो ना.. आणि बया काय हो! मला फ़ार आवडते ती
|
Karadkar
| |
| Thursday, August 02, 2007 - 3:59 am: |
| 
|
माझ्या गावातल्या एका मुलीचे नाव आहे विश्पला!!! अर्थ काय देव जाणे.
|
Psg
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:38 am: |
| 
|
अरेरे केदार.. 'लव्हलीन' नावाचा बुटका फ़ालतू कलीग म्हणजे फ़क्त अरेरेच! तशीच 'जयंती', 'अमिता', 'सुनिला', 'अनिला' ही नावं मला खास नाही आवडत. मुलाच्या नावाला 'आ' लावून काय मुलीचे नाव करायचे? मुलींची खास कितीतरी नावं असताना! कोणी असतील त्या नावाच्या तर दिवे घ्या प्लीज. कोणाला दुखवायचा हेतू नाही!
|
आमाच्या एका कलीगने लव्हलीन नावाने आलेल्या आर्टीकला सरळ Ms Lovemeen लिहून फ़ॉरवर्ड केले. प्रूफ़ रीडींगसाठी माझ्याकडे आल्यावर समजले की ते Mr Loveleen, HOD, Enviornment आहेत.
|
Maudee
| |
| Thursday, August 02, 2007 - 11:31 am: |
| 
|
आमच्या समोर रहणार्या एका पंजाबी कुटुंबातील मुलींची नावे मिंटी आणि गगन (अर्थात पुढे कौर लावूनच). गगनला विचारले तुझे नाव गगन का ठेवले तर म्हणे आई मिंटी नंतर गोल्डी ठेवणार होती. पण तेव्हाच गोल्डी मसाले market मध्ये आले म्हणुन गगन ठेवले
|
Zakki
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:19 pm: |
| 
|
मागे इथे एका सिरियलमधे, मुलीचे नाव 'सिक्स' (सहा) होते. तर इतरहि आकडे कुणाची नावे होतील का? जसे एक, चार, वगैरे. समजा बाईचे नाव रेखा आहे, तर तिने आपल्या मुलांची नावे, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ वगैरे ठेवावीत का?
|
Maitreyee
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:35 pm: |
| 
|
झक्की सिक्स नव्हते ऐकले मी, पण साइनफ़िल्ड मधे जॉर्ज आपल्या होणार्या पोराचे नाव 'सेवन' (मिकि मॅन्टल की तत्सम कोणाचा तरी नंबर असतो ७!) ठेवणार असतो असा एक धमाल एपिसोड होता अज्जुका, ती फ़िरोदियांच्या मुलींची नावं किमया, विस्मया, सुलज्जा अशी आहेत गं अजिंक्य पण आहे की काय खरच!! नव्हते माहित, आणि हा इनोद पण नव्हता माहित 
|
आमच्या खेड्यातल्या एका जवानाने त्याच्या मुलाचे नाव 'प्रदेश' असे ठेवले होते. माझ्या मुलीचे नाव मी 'रिमझिम' ठेवले त्यावेळी ती नॉव्हेल्टी होती. या नावाला बरेच compliments मिळतात. हे नाव मी विविध भारतीच्या एका फर्माईश कार्यक्रमात ऐकले होते. लग्नाच्या अगोदर खूप पूर्वी. त्यावेळीच ठरवले होते आपल्याला मुलगी झाल्यास हेच नाव ठेवायचे. या नावाला तेव्हा घरातून फार विरोध झाला होता.. मी बॅण्केत असताना आमच्या एका छोट्या खातेदार मराठी मुलीचे नाव 'तशनिता' होते त्याचा अर्थ मला अद्याप कळालेला नाही...
|
माझ्या गावातल्या एका मुलीचे नाव आहे विश्पला!!! अर्थ काय देव जाणे. >>>> विश्पला हे नाव वैदिक स्त्रीचे आहे. ऋग्वेदात तिचा उल्लेख आहे...
|
Sunidhee
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:10 pm: |
| 
|
ह्म्म.. नाव पार्श्वच आहे पण मग पार्श्वनाथाचे पार्श्व केले असावे त्यानी कारण ते लोक पण जैन आहेत.. चला ज्ञानात भर पडली.. पार्थीव पण असेच प्रेता सारखे झिणझिण्या आणते बुवा..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|