Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 01, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through August 01, 2007 « Previous Next »

Robeenhood
Monday, July 30, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इलय राजाने ही धून चीनी कममध्ये तिसर्‍यान्दा वापरली आहे...

पहिल्यान्दा 'गीता'(त्यांच्या भाषेत गीथा) या कन्नड चित्रपटात..'ज्योते ज्योतेयली..' एस पी बालसुब्री आणि एस जानकी.

नन्तर इलय राजानेच noorvudhu naal या तमिळ चित्रपटात ही धून रिपीट केली.विळीयले मनी विळयील, SPBal.& S Janaki दोन्ही ठिकाणी फार गाजली.
यातील कन्नड गाणे musicindiaonline.com वर ऐकता येते. आणि तमिल गाणे dishant.com वर! मला वाटते तमिळ गाणे youtube.com वरही आहे.

मला तर श्रेया घोषालचेच जास्त आवडले एस पी चा फॅन असूनही!!:-)


Robeenhood
Monday, July 30, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्तर मला जाणवले की तमीळ आणि कन्नड गाणी जुनी असल्याने व जुन्या तंत्राने ध्वनिमुद्रित झाली असल्याने तितकीशी क्लीअर वाटत नाहीत. नव्या गाण्याला नव्या तंत्राचा आधार मिळाल्याने अतिशय स्फटिकासारखा आवाज येतो. त्याचा परिणामही असेल.
अर्थात श्रेया घोषालचा आवाज दर्जेदार आहेच....


Shyamli
Monday, July 30, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.youtube.com/watch?v=TWmn9P3Ou1A

कन्नड गाण्याची लिंक :-)

RH तामिळ गाणं कुठय जरा लिंक देणार का ?

Ravisha
Monday, July 30, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्पना,"आप का सरूर" ऑटोवाले ५-६ वेळा पाहतात कारण त्या सिनेमात चक्क जर्मनीत एक नव्हे तर ३ भारतीय (हो हो काळ्या-पिवळ्या) ऑटोरिक्षा एकदम कुठुन तरी अवतरतात असे दाखवले आहे ...कायच्या काय (त्यामुळे आपल्यालाही पुढेमागे परदेश गमनाचा योग येईल कदाचीत,असे वाटत असेल त्या बापड्यांना)...
बाकी श्यामली,"चीनी कम"पण तसा धन्यवादच आहे,नाही का? तू म्हणतेस त्याप्रमाणे संगीत चांगलं आहे मात्र.


Chinya1985
Monday, July 30, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पार्टनर बघितला. चांगला time pass आहे. गोविंदा चांगलाच गट्टू झाला आहे पण चांगला डान्स करतो. गोविंदा आणि कत्रिनाची जोडी जमी नहि. १-२ गाणे ठिक. यमक जुळवत डायलॉगचा प्रयत्न चांगला आहे पण कधीकधी बोअर होतो.तो लारा दत्ताचा मुलगा कोण आहे?? डेव्हिड धवन कॉपी न करता पिक्चर कधी काढणार कोण जाणे.

Aktta
Monday, July 30, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर लारा दत्ताच एके मुलगा वाटते... very handsome girl :-)
एकटा...


Robeenhood
Tuesday, July 31, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.dishant.com/album/Nooravudhu-Naal.html, शामली,तमिळ गाणे येथे ऐकता येईल! :-)

Robeenhood
Tuesday, July 31, 2007 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे रोजाच्या पुढील cassettes आहेत रोजा(हिन्दी),तमिळ तेलुगु, आणि ए आर रहमानने काढलेली insTrumenTal . तसेच जन्टलमन, नायक,इ. च्याही डबल व्हर्शन्स आहेत. south indian गाणी ऐकायला मजा येते. एक तर एस पी बालासुब्रण्यणम, हरिहरनसारखे क्लसिकल बेसचे matured आवाज. हिन्दीत सध्या पुरुष गायकांची फारच शोचनीय परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात उदितनारायण. तो ही काही प्रमाणात Nasal आहेच. हिन्दीत मात्र श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर हे चांगले पर्याय आहेत... दक्शिणेतले female आवाज किनरे वाटतात...

Deepanjali
Tuesday, July 31, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी मधे अत्ताही चांगले गायक आहेत .
हरिहरन - शंकर महादेवन हे हिंदी मधेही छान गातात .
रेहमान गातो छान पण हिंदी उच्चार लय भारी असतात त्याचे !
S.P. चा आवाज फ़ारच काकुळतीला आल्या सारखा आहे , नको तितके करुण मुरके मारतो तो आवाजात .
उदित नारायण नको तितका लाडात गातो आणि श्वासाचा खूप आवाज येतो तो गाताना .
सोनु निगम सगळ्या प्रकारची गाणी सुरेख गातो पण त्याच्यावर महम्मद रफ़ी चा जबरदस्त influence आहे .
त्यापेक्षा कैलाश खेर , सुखविंदर , प्रीतम , कुणाल गांजावाला , विशाल , James, शान , राहत फ़तेह अली खान , केके यांचे आवाज fresh आहेत .


Meghdhara
Tuesday, July 31, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली उदीतबद्दल अगदी खरं! :-)

आणि पूर्ण अनुमोदन.
अजुन अभिजीत सावंतचं स्वतंत्र अस्तित्व जाणवत नाही.त्याचं नवीन गाणं ऐकायला छान वाटतं. पण हल्ली, गायकाला गीताचा फील त्याच्या आवाजाबोरोबर त्याच्या चेहर्‍यावरही आणता आला पाहिजे(अल्बमसाठी) ही जी टूम आलेय ती गायकासाठी अन्यायकारक आणि आपल्यासाठी आणखीनच..

मेघा



Zakki
Tuesday, July 31, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यापेक्षा कैलाश खेर , सुखविंदर , प्रीतम , कुणाल गांजावाला , विशाल , James, शान , राहत फ़तेह अली खान , केके
किती हे गायक! आमच्या वेळी बरे होते. महम्मद रफ़ी, मुकेश नि किशोर कुमार. अधून मधून चवीला तलत महमूद. हळू हळू मला सुद्धा समजू लागले होते महम्मद रफ़ीचा आवाज कोणता आहे, नि दुसर्‍या कुणाचा तरी कोणता.



Asami
Tuesday, July 31, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु निगम सगळ्या प्रकारची गाणी सुरेख गातो पण त्याच्यावर महम्मद रफ़ी चा जबरदस्त influence आहे . >>चांगलेच आहे कि. influence साठी अजून कॉन लायक मनुष्य सापडणार होता त्याला ?

Mansmi18
Tuesday, July 31, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वासाचा आवाज ऐकायचा असेल तर सोनु चे "ये हवायेन" हे (परीणीता मधले) गाणे ऐका..:-)

Farend
Wednesday, August 01, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mansmi18 हो ना, त्या रेल्वेच्या आवाजापेक्षा याचेच फूस फूस जास्त ऐकू येते :-) तो Jungle Book मधे Kaa (अजगर) जसा प्रत्येक शब्दाला आणखी ssss लावतो (उदा: go to ssssleep ) तसे वाटते.

Dineshvs
Wednesday, August 01, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ हे श्वासाचे आवाज हल्ली बहुतेक गायकांचे ऐकु येतात. लताचा एकमेव सन्माननीय अपवाद. ( तिचे तंत्र जरा गुढच आहे. ती बोलत नाही या विषयी. )
शास्त्रीय गायनासाठी प्रचंड दमसास लागतो, त्या गायकांचे देखील कधी श्वास ऐकू येत नाहीत. एकदा मालिनी राजुरकराना खुप जवळुन गाताना बघितले, त्यावेळी एखादी खुप मोठी पल्लेदार तान घ्यायच्या आधी त्या तोंड किंचीत माईकपासुन दुर नेत व पटकन मोठा श्वास घेत. तसेच जोरदार पणे समेवार आल्या, कि देखील तोंड बाजुला नेत.
या क्रिया इतक्या पटकन होत, कि माईकमधुन त्या अजिबात ऐकायला येत नसत.
हे तंत्र गायक गायिका का वापरत नाहीत, कुणास ठाऊक ?


Deepanjali
Wednesday, August 01, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगलेच आहे कि. influence साठी अजून कॉन लायक मनुष्य सापडणार होता त्याला ?
<<< हो , पण त्यामुळे सोनु निगम ची स्वत : ची voice quality काही special आहे असे कधीच जाणवत नाही .
' सोनु निगम किती छान गातो असं वाटतं पण सोनुचा आवाज किती जबरदस्तं आहे ' असं कधीच वाटत नाही .. अर्थात हे माझं मत . :-)
मानसी ,
हो , सोनु निगम च्या ' ये हवाए ' मधे भयानक श्वासाचा आवाज येतो .



Farend
Wednesday, August 01, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ये हवाये" कदाचित तो स्वत्:च्याच श्वास आणि उच्छ्वासांबद्दल तर म्हणत नसेल? आणि आजकाल हे सगळे गायक कोट टाय आणि प्रचंड वाढलेले केस आणि दाढ्या अशा गणवेषात का असतात?

Ajjuka
Wednesday, August 01, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, लता मंगेशकर आणि आशाबाई दोघींनीही याबद्दल वेगवेगळ्या मुलाखतीत बोलल्याचं मी वाचलंय बरंच पूर्वी. त्यावर्षी कॉलेजच्या ऑर्केस्ट्रा मधे गायचं भूत डोक्यावर होतं त्यामुळे पक्क लक्षात राह्यलंय वाचल्याचं. काय ते आता विसरलं!
पण हेच तेवढ्या काळात माईकपासून तोंड दूर नेणे इत्यादी.
आशाबाईंना तर श्वासाचा किती आवाज कुठल्यावेळी कसा ऐकू यायला हवा याचं पण तंत्र अवगत आहे.
त्या काळातल्या संगीतकारांची हुकुमत होती या सगळ्या गोष्टींवर त्यामुळे ते शिकवू शकायचे हे सगळे.
आता एकतर श्वासाचा आवाज नको असेल तर recording नंतर मिक्सिंग मधे कमी करता येतो. त्यामुळे live concert मधे हे गायक उघडे पडतात.


Savyasachi
Wednesday, August 01, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशाताईंनी कुठल्यातरी मुलाखतीत सांगितले होते की आम्हाला आमच्या वडीलांनी श्वास घेतानासुद्धा कसे गायचे ते शिकवले आहे.

Apurv
Wednesday, August 01, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bommarillu तेलगु चित्रपट... फारच मजेशिर आहे...

शुभमंगल सावधान... अर्धा चित्रपट कसातरी बघितला... पण काहीच अर्थ नाही वाटला... पुढे बंदच केला.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators