Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इंदुरी चा भुइकोट किल्ला... ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » इंदुरी चा भुइकोट किल्ला... « Previous Next »

Phdixit
Wednesday, August 01, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंदुरी चा भुईकोट किल्ला......

ऑफिस मधुन त्या भागात रहाणार्‍या एका मित्रा कडून, तळेगाव पसुन जवळ इंदुरी गावात एक किल्ला आहे अशी थोडी माहिती मिळाली. ईतक्या जवळ किल्ला असुनही आपल्याला माहिईत कसा नाही ह्याचे थोडे आश्चर्य वाटले, कारण माझ्या डोक्यात किल्ला म्हणले की ट्रेकिंग असे काहीसे डोळ्यासमोर उभे रहाते.
सकाळी मामेभावाला (श्री) ला फोन करुन तयार रहाण्यास सांगितले. सकाळी ८ ला घरून निघालो, पुढे वाकड पाशी श्री च्या घरी गेलो तेथे थोडाफार चहा नष्ता झाला. ९.३० ला मुंबई- पुणे बायपास ला पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती, वातावरणही अश्या ड्राईव्ह साठी हवे तसेच होते. पावसाची नुकतीच पडुन गेलेली सर, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवळ, रस्त्याच्या मधोमध लावलेली फुलझाडे, आधुन मधुन दिसणारी तळी आणी सोबतीला वेगाने वहाणारे वारे प्रवासाची मजा द्विगुणीत करत होते. तळेगाव मधे इंदुरी ला कसे जायचे विचारुन घेतले. पुढे तळेगाव चाकण रोड ला ५-६ किमी चे अंतर कापुन इंद्रायणी नदी चा पुल ओलांडला. इंदुरी गावात प्रवेश करतानाच डाव्या बाजुला किल्ल्यचे बुरुज दिसले, वळसा घलुन पुढे मुख्य दरवाजा पाशी गेलो, पाहील्यावर आपला ट्रेकींगचा बेत संपल्याचे लक्षात आलेच.
तिथुन पुढे जवळच भंडारा डोंगर आहे, काहीतरी ट्रेक करायला मिळेल म्हणुन प्रथम तिकडे गेलो तर तिथेही वरपर्यंत गाडी जाते. पण डोंगरावर जाणारा घाट रस्ता मात्र अतिशय नागमोडी वळणे घ्यायला लावतच वरपर्यंत नेतो. घाट चढताना माझी नजर मात्र बाजुच्या अप्रतीम निसर्गावर, त्यामुळे माझी गाडी चालवताना एक दोन वळणांवर थोडी गडबड झाली, आणी मागे बसलेल्या श्री कडून काही सुचना ऐकायला मिळाल्या. एक मोठे वळण घेउन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे मध्यभागीच ओळेने काही गाड्या उभ्या केल्या होत्या, मीही तिथेच गाडी लावली.
भंडारा डोंगर, शिवाजी महाराज आणी तुकाराम महाराजांची भेट झाली ते ऐतिहासीक ठिकाण. तुकाराम महाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याचे देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई, गणपती , शिवलिंग अशा देवतांच्या मुर्ती आहेत. दर्शन घेउन डोंगर परिसर पहायला निघालो. मंदिरा शेजारी एक मोठा डेरेदार वटवृक्ष आपले लक्ष वेधुन घेतो. मग एक ठिकाण निश्चीत केले आणी तेथुन डोंगर प्रदक्षणा सुरुवात केली. तेथुन सभोवताली दिसणरे दृश्य तर खासच. जसे जसे डोंगर फिरायला सुरुवात केलि तसा हात नाकाजवळ न्यावा लागला, तिथे रस्त्याच्या कडेनेच लोकांनी नैसर्गीक विधी केले होते. ही मंडळी काही सुधारायची नाहीत, तसेच तिथुन माघारी फिरलो. गाडीला किक मारली थोडे खाली उतरुन आलो. मग एके ठिकाणी थांबुन परिसरातिल काहि फोटो काढले. घाट जितक्या सफ़ाईने चढलो तितका तो उतरताना सोपा नाही हे लक्षात आले.
ईंदुरी गावत परतलो. तिथे किल्ल्याचा बाहेर एका माणसाला विचारले तर त्याने आत जाउन देवी चे दर्शन घेण्यास सांगीतले. गाडि किल्ल्याच्या आतमधे थेट मंदिरापर्यंत नेली. कडजाई देविचे दर्शन घेतले. मंदिराचे बांधकाम चालु आहे. किल्ल्याच्या आतला परिसर एकदम दुर्लक्षीत आहे. झाडा झुडपांचे रान माजले आहे. तटबंदी पर्यंत जाणेही अवघड आहे. गडाचे प्रवेशद्वार मात्र बघण्यासारखे आहे. मग गडाच्या बाहेर जाउन बाहेरील तटबंदीचे फोटो घेतले. इंद्रायणीनदी चे पात्र दुथडी भरुन वहात होते. पुल ओलांडे पर्यंत एक जोरदार पावसाची सर आली पण रस्त्यावर एकही अडोसा नव्हता. बाजुला एक फुलझाडांची नर्सरी दिसली, घुसलो तिथे. पाउस थांबल्यावर तिथल्या फुलांचे काही फोटो टिपले.
पुढे शिरगाव ला गेलो पण गुरुपोर्णिमा निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भावीक तेथे दर्शनासाठी आले होते. अतिशय अरुंद रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजुस केलेले चार चाकी वहानाचे पार्कींग आणी तेथेच अडकुन बसलेली आपली Pंट ची बस. आता ह्या पुढचे वेगळे दृष्य सांगावे का ??. साई मंदीराच्या कळसाचे दर्शन घेउन मघारी फिरलो. तब्बल तासाभराच्या कसरती नंतर तेथील वहानांच्या कोंडीतुन बाहेर पडलो. अतीशय भुक लागली होती त्यामुळे आजुन कोठे जायचा बेत रद्द करुन थेट घरी पोहोचलो.





Phdixit
Wednesday, August 01, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



बाकीचे फोटो येथे आहेत

Dhumketu
Thursday, August 02, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे...
नवीन काहीतरी..
पावसात कुठेही जायला मजाच येते... मागच्या आठवड्यात कोकणात गेलो होतो.. वरंध घाटातून उतरलो... चिपळुण पर्यंत गेलो आणी येताना महाबळेश्वर मार्गे आलो. ठिकठिकाणी खाली उतरायचा मोह होत होता..


Mansoon
Thursday, August 02, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे धुमकेतु वरन्धा घाटातून जावून आलास पण माहिती कुटे टाकली आहेस वाचनात आली नाही लवकर माहीती टाक मला पण जायाचे आहे.

Dhumketu
Thursday, August 02, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे फ़िरलो नाही घाटात आणी फ़ोटोही काढले नाहीत.. त्यामुळे लिहिले नाही... आणी तसेही माझे अनुभव कथन एव्हढे खास नाही.. त्यामुळे मी
ईथे culture ह्या विभागातच टाकतो..
तसा वरंध घाट सुरु व्हायच्या आधी एक मंदीर ठळक पणे दिसते. आधी एव्हढे दिसायचे नाही.. बर्‍यापैकी उंचावर आहे.. जनाई देवी का असेच काहीतरी आहे. तिथे फ़ेरी मारायची आहे.. श्रावणात जाईन बहूतेक तिथे..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators