|
Aashu29
| |
| Monday, July 30, 2007 - 8:30 am: |
| 
|
माझ्या नात्यातल्या एका मुलिचे नाव आहे ´´किसलिया´´ काय तरी विचित्र नाव!! आता ती लहान आहे म्हणुन बरे आहे उद्या मोठी झाल्यावर मुलं किती चिडवतील!!
|
आमच्या शेजारच्या बिल्डींगीत एक गुजराती कुटुंब होते, त्यांच्या मुलीचे नाव "झनकना". मला कितीतरी दिवस ते नक्की झनकना आहे की धनकना की आणखी काय ते कळायचेच नाही.
|
इथे आहे ती 'साती' आहे..... राशी माझ्या मुलीचं नांव आहे..
|
माझ्या एका friend च्या मुलीचे नाव आहे: तोरल
|
Upas
| |
| Monday, July 30, 2007 - 1:34 pm: |
| 
|
डुगली हे एक गुजराथी नाव.. मुंबईत एक famous chemstry professor आहेत!
|
नवर्याच्या मित्राच्या मुलीचं नाव: 'मिया नारी'. आई अमेरिकन आहे आणि अशी जोड नावं ठेवायची पध्दत आहे (अन्ना मरिया, लोगन जॉर्ज वगैरे) ! पण शेवटी काय कधीही न ऐकलेलं नाव पहील्यांदा ऐकून गमतीदार किंवा विचित्र वाटलं तर काय नवल? इथे एका नेहेमी भेटण्यार्या बाईंनी विचारलं, " Mrs Vaidya, what is your frist name? मी सांगीतलं "मंजुषा". तर तीचं ९ वर्षांचं पोर खीक करून हसलं!
|
Anjut
| |
| Monday, July 30, 2007 - 4:17 pm: |
| 
|
माझ्या नात्यातल्या एका मुलिचे नाव आहे ´´किसलिया´´ काय तरी विचित्र नाव!! आता ती लहान आहे म्हणुन बरे आहे उद्या मोठी झाल्यावर मुलं किती चिडवतील!! किसलय किसलिया नाहि म्हणजे आम्ब्याची कोवळी पाने. तसेच ज़न्खना चा अर्थ इच्छा. जेसल आणि तोरल ह्या कच्छी लोककथेनुसार दोन प्रेमी व्यक्ति होत्या.जेसल हा डाकू तोरल ह्या अत्यन्त पवित्र अश्या राजकन्येच्या प्रेमात पडून शेवटी सन्मार्गाला लागला.
|
Aktta
| |
| Monday, July 30, 2007 - 8:38 pm: |
| 
|
मस्त बी बी आहे हा..... माझ्या एका गुजु मैत्रीनीच नाव र्दशन एकटा...
|
Ravisha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 12:53 pm: |
| 
|
एकटा,"र्दशन" हे नाव म्हण बरं .... तुला "दर्शन" असे म्हणायचे आहे का?
|
Arch
| |
| Tuesday, July 31, 2007 - 3:31 pm: |
| 
|
आता गुजराथी नाव खूप झाली म्हणून ही काही पंजाबी नावं ... बिशनसिंग बेदीच्या मुलाच नाव - गावास्करसिंग आणि काही common नावं जरनॅलसिंग, कर्नॅलसिन्ग, महेंगासिंग. मुला मुलिंची नावं ठेवायलापण सोप्पी. नावाला कौर लावल की मुलगी आणि त्याच नावाला कौरच्या ऐवजी सिंग लावल की मुलाच नाव. जास्त विचार नको करायला.
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:00 pm: |
| 
|
शिवाय पंजाबीत जिथे जोडाक्षर नसेल तिथे ते घालायचे नि जिथे असेल ते तोडायचे. म्हणजे 'इंदिरा' ऐवजी 'इंद्रा' म्हणायचे नि 'रामचंद्र' ऐवजी 'रामचंदर' म्हणायचे. माझ्या मते 'कर्नेलसिंग' हून मोठा म्हणून 'जनरलसिंग' म्हणायचे होते, पण ते चुकून जरनेल झाले.

|
Ajjuka
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:49 pm: |
| 
|
पंजाबी दोन अक्षरी नावं महागमतीशीर प्रकार १. अकाराने सुरू होणारं आणि ईकाराने संपणारं. आणि तो ईकार डब्बल अक्षरांचा... जस्सी, पम्मी, लक्की, पप्पी, प्रकार २. बाराखडीतील कुठलाही कार आणि त्यावर अनुस्वाराने सुरूवात होऊन पी किंवा की ने शेवट डिंपी, गंपी, चिंकी, चंकी प्रकार ३. मुळाक्षरांच्या आणि व्यंजनांच्या चिठ्ठ्या टाकून प्रत्येक गटातून दोन उचलून मग १०-२० करून पहिलं कोण आणि दुसरं कोण असं ठरवलंय असं वाटावीत अशी.. पण तरी ईकाराने शेवट याला प्राधान्य. पिंचू, डुप्पो, किट्टू, रिंगू, डिंगी, लोलो, निमो, सिमि, रिकि, झिमी.... इत्यादी!! बर तुम्हाला वाटलं असेल ही लाडाची नावं आहेत तर तसं नसून त्यांची कागदोपत्री हीच नावं असतात.
|
Ravisha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:06 pm: |
| 
|
अज्जुका,शेवटी गुजराथी नाही पण पंजाबी व्याकरणात बसले... शेवटच्या ओळीतील सर्व नावं
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 7:42 pm: |
| 
|
पिंचू, डुप्पो, किट्टू, रिंगू, डिंगी, लोलो, निमो, सिमि, रिकि, झिमी.... कित्येक नवीन ID's च्या कल्पना मिळाल्या! लोकहो, धन्यवाद!

|
Sunidhee
| |
| Tuesday, July 31, 2007 - 9:58 pm: |
| 
|
अज्जुका तुआ भारी भारी नावे माहित आहेत की... पण "प्रेता" कहर होता.. मला गुज्जु मित्राच्या मुलाचे न आवडलेले नाव म्हणजे "पार्श्व ". कसेसेच होते त्याला विचारताना... "तुम्हारा पार्श्व कैसा है?" .. माझे भाषा ज्ञान इतके खास नाही.. अजुन काही वेगळा अर्थ आहे का ह्याचा?
|
Psg
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:01 am: |
| 
|
"तुम्हारा पार्श्व कैसा है?" ..
तसेच 'लव्हलीन' हे नाव! 'काहीतरी वेगळच' वाटतं नाही? एखादी vamp किंवा गळेपडू बाईच डोळ्यासमोर येते. 'स्वीटी' हे नाव पण तसंच. लाडानी ठीक आहे, पण शाळेत, नोकरी-व्यवसायाच्या ठीकाणी हे नाव????? अज्जुका, 'झिमी'! 'झिपरी' सारखं आहे!
|
Ajjuka
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:31 am: |
| 
|
ही ही.. पण झिपरी, टिपरी ही नावं मध्यप्रदेशातल्या आदिवासी भागातली वाटतात!!
|
तसेच 'लव्हलीन' हे नाव! 'काहीतरी वेगळच' वाटतं नाही>>>> माझ्या प्रोजेक्ट मध्ये असनार्या पुरुष कलीगचे हे नाव होते (म्हणजे आहे नी आडनाव त्यागी. काय तरी नाव. तु बाई नी व्हम्प म्हणतेस ईथे तर बुवा नी तो पण एकदम फालतु, बुटका).
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 12:04 pm: |
| 
|
सुनीधी, पार्श्वनाथ असे पुर्ण नाव असावे. पार्श्वनाथ आळतेकर यांच्या नावाने वांद्र्याला नाट्यस्पर्धा व्हायच्या पुर्वी. अज्जुका, मला ते प्रेता, म्हणजे कदाचित Preetha असावे असे वाटताय. आमच्या कोचीन ऑफ़िसमधे आहे या नावाची मुलगी.
|
बिशनसिंग बेदीच्या मुलाच नाव - गावास्करसिंग Arch ते 'गावससिंग' होतं बहुतेक...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|