|
Dineshvs
| |
| Tuesday, June 05, 2007 - 5:55 pm: |
| 
|
या फळाना Rose Hips असे नाव आहे. यात भरपुर म्हणजे संत्र्यापेक्षाही जास्त क जीवनसत्व असते. ब्रिटनमधेही पुर्वापार ती खाली जातात. वरती नलिनीने लिहिल्याप्रमाणे यातल्या केसाळ बिया वगळायच्या असतात. ज्याम जेली वैगरे करताना, द्रव दोन तीन वेळा गाळुन घ्यायचा असतो.
|
Nalini
| |
| Tuesday, June 05, 2007 - 6:41 pm: |
| 
|
क जीवनसत्वाऐवजी चुकून मी कॅल्शिअम लिहिले होते. ह्यातुन आणखी बरीच जीवनसत्व मिळतात. गुलाबाच्या काड्या लावुन त्यावरच कलम केले जाते. आमच्याकडे एकदा गुलाबाच्या बिया विकणारा माणूस आला होता. मी आईच्या मागे लागुन काही बिया घेतल्या होत्या पण त्या नाही रुजल्या. परत एकदा लावून पहायला पाहिजे. दिनेशदादा, ह्याचे काही औषधी उपयोग महिती असले तर, लिही ना. रविशा, मेथी, मिरची बागेत लावणार की कुंडीत? मेथीदाणे तर कोणत्याही भारतीय दुकानात मिळतील.
|
Ravisha
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:11 pm: |
| 
|
नलिनी,कुंडीत लावायच्या आहेत ह्या भाज्या आणि तुळस सुद्धा...तरी कृपया माहिती पुरवावी...म्हणजे ऊन,पाणी कसे व किती?
|
Sheshhnag
| |
| Wednesday, June 06, 2007 - 10:22 am: |
| 
|
धन्यवाद! आता ही फळे सुकवून त्यातील बिया जमिनीत रुजतात का पाहायला हवे. माझ्याकडे चोवीस निरनिराळी गुलाबाची झाडे आहेत. त्यातून एक जरी फळ मिळालं तरी पुरे.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:06 am: |
| 
|
हा अजुन एक वेंधळेपणा.... मला नलिनी म्हणायचे होते....
|
Zakki
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:11 pm: |
| 
|
क जीवनसत्वाऐवजी चुकून मी कॅल्शिअम लिहिले होते असे होय्? तुम्ही क लिहीले असते तरी आम्ही कॅल्शियमच समजलो असतो. त वरून ताकभात ओळखण्याची सवय!

|
Bhagya
| |
| Thursday, June 07, 2007 - 12:47 am: |
| 
|
हो, बरोबर आहे.... या रोझ हीप चा चहा पण असतो. हर्बल टी मध्ये. आणि गुलाबाची अशी फ़ळे मी जास्त करून western countries मध्ये बघितलीत, आणि त्यांची फ़ुले एकेरी पाकळ्या असलेली दिसली. नलू.... Danube च्या काठी गुलाबाची झाडे... Budapest ला बघितलेली danube आणि तिच्या दोन्ही काठावरच्या, सुर्यप्रकाशात सोनेरी मुलामा चढलेल्या सुंदर इमारती अजून डोळ्यांसमोरून जात नाहित.
|
Nalini
| |
| Friday, June 08, 2007 - 12:36 pm: |
| 
|
भाग्या, हो. जर रविवारी तिकडे चक्कर मारणे झाले तर तुझ्यासाठी कही फोटो काढून पाठवेन. मिरचीची लागवड: मिरचीची नेहमीच पुनर्लागवड केली जाते. पुनर्लागवड करणे म्हणजे आधी गादीवाफ्यामध्ये रोप लावले जाते व ठराविक कालावधीनंतर ह्या रोपाची सरी-वरंब्यावर लागवड केली जाते. जर मिरची बागेत लावायची असेल तर कुंडीत किंवा छोटासा गादीवाफा करुन त्यात थोडेसे खत मिसळून घ्यावे. मग त्यात १ ते २ सें. मी. खोलीची रेष मारावी. ह्या रेषेत पातळसर बी पेरावे. दुसरी रेष मारताना त्याची माती पहिल्या रेषेवर पडुन ती बुजली जाते. अश्याप्रकारे सर्व बी पेरून झाले की मग पाणी द्यावे. वाफ्याला पाणी देताना झार्याने द्यावे लागते. ज्यावेळी मोठ्याप्रमाणावर लागवड केली जाते तेव्हा शेतात दंडातून पाणी दिले जाते. जर का वाफ्याच बारं मोडल की पाणी वाफ्यात जोरात शिरते व वाफ्याच्या तोंडाशी असलेले बी वाहून जाते. त्यामुळे पहिले पाणी देताना रिकाम्या पोत्याचा वापर केला जातो. तर त्या पोत्याला पहार किंवा लोखंडी गज घालुन एक बाजू शिऊन घेतली जाते. असे किमान दोन पोते तयार केले जातात. तर हे पोते ज्या वाफ्याला पाणी द्यायचेय त्या वाफ्याच्या तोंडाशी आंथरले जाते मग वाफ्याचे बारे मोडुन पाणी आत मध्ये सोडतात. ह्यामुळे वाफ्याच्या तोंडाशी असलेले बी वाहून जात नाही. ( हे सगळ ईथे लिहायची गरज नाही आहे पण अस काही लिहायला घेतले की हाताखालून गेलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आठवणींच्या रुपाने खुपच गर्दी करतात. हे लिहीता लिहीता पुन्हा एकदा ते सुखद आयुष्य जगतेय.) हे रोप लावुन झाले की १०-१५ दिवसांनी परत एकदा त्याला थोडेसे खत घालवे. साधारण ३०-४० दिवसात रोप लागवडीसाठी तयार होते. मग हे रोप उपटुन त्याचे शेंडे खुडायचे असतात. सरी वरंबा पद्धतीने केलेल्या वाफ्यांमध्ये पाणी सोडले जाते. मग हे एक एक रोप साधारण दोन्-अडिच विताच्या अंतरावर सरीवर लावले जाते. सर्या ह्या आधी पाणी दिल्याने ओल्या झालेल्या असतात त्यामुळे मिरचीचे रोप तर्जणी आणी मधल्या बोटाच्या सहय्याने सहज खोचता येते. अंगठ्याने रोप दाबणे सगळ्यात सोपे, पण असे केले की आजीला आवडायचे नाही. ती म्हणायची मिरच्या लावतानाच त्याला अंगठा दाखवायचा नसतो. कुंडीत लावायचे झाले तर एका कुंडीत फक्त एकच रोप लावायचे. साधारण १५-२० दिवसांनी थोडे खत घालून माती खालीवर करावी. साधारण ३०-४० दिवसानी मिरच्यांना मातीची भर घालावी. शेतात ही भर पहिल्या खुरपणीच्या दरम्यान घातली जाते. भर घालणे म्हणजे मिरचीच्या खोडाशी माती लावायची. जास्त उष्णता असेल तर ८ दिवसांनी अन्यथा १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी घालावे. मिरची लागवडीसाठी शक्यतो ज्वाला, पंत सी-१, अग्निरेखा, तेजस, अर्का लोहित, कोकण किर्ती, फुले ज्योती हे वाण वापरले जातात. घरच्या घरी बागेत किंवा कुंडीत लावयचे म्हणून खास हे आणणे शक्य होत नाही. घरात सुकलेली लाल मिरची असतेच तर ती मोडून त्यातले बी वापरले तरी चालते. वांगे, सिमला मिर्ची ह्यांची लागवड देखील ह्याचप्रकारे केली जाते. लवकरच मेथी, कोथिंबीरीबद्दल लिहीते.
|
Ravisha
| |
| Friday, June 08, 2007 - 2:35 pm: |
| 
|
वा,वा,नलिनी, अतिशय उपयुक्त माहिती...धन्यवाद!!! मेथी आणि तुळस यांसाठी वाट बघते.(कोथिंबीरही चालेल)
|
Karadkar
| |
| Friday, June 08, 2007 - 4:00 pm: |
| 
|
रविशा तु कोठे आहेस? भारतात कि दुसर्या देशात?
|
Dineshvs
| |
| Friday, June 08, 2007 - 5:31 pm: |
| 
|
नलिनी, सगळे परत अनुभवलेस ना ? प्रत्येक पिकाबद्दल तु लिहु शकशील. मिरचीच्या पिकाचे फार कौतुक करतात. उगवण किती झाली, पाने किती वैगरे. पण एकदा मिरची धरु लागली कि फ़क्त तिचेच कौतुक. ( म्हणुन पानामागुन आली तिखट झाली, असे म्हणतात. कानामागुन हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. ) कोल्हापुरला त्याला आगिनफ़ुलं म्हणतात. तूमच्याकडे हा शब्द वापरतात का ?
|
Nalini
| |
| Friday, June 08, 2007 - 6:03 pm: |
| 
|
दिनेशदादा, आगिनफुलं हा शब्द मी प्रथमच ऐकतेय. कधी विचारच नाही केला की ते पानामागून आली असे असेल. मामाकडे तर माझा मिरच्या तोडण्याचा किस्सा अजुन प्रसिद्ध आहे, ह्याचा उल्लेख मी आजोबांसाठी लिहिलेल्या लेखात केला होता. मिरच्या तोडणे सोपे पण वांगे तोडायला कठीण. पाटिभर वांगे तोडेपर्यंत कितीतरी काटे टोचतात. कोथिंबीर, मेथी हे वांग्या, मिरच्यांच्याच शेतात लावले जाते. सरीच्या एका बाजूला मिरची तर दुसर्या बाजूला मेथी किंवा धने.
|
Lalu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:08 am: |
| 
|
आगिनफुलं ही तोडा बायांनो, आगिनफुलं ही तोडा लाल लाल मिरची तोडा बायांनो, लवंगी मिरची तोडा.. पुढचं गाणं लिहा कोणीतरी.(इथे नको) खूप जुन्या आठवणी आल्या एकदम.
|
Bhagya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 2:42 am: |
| 
|
नलू, मिरचीबद्दल छानच माहिती. तुझ्या लिखाणातून वांगी, मिरची, कोथिंबीर याचा उल्लेख वाचून आठवले- शेतावरची ताजी वांगी, मिरच्या, टमाटर (हा खास उच्चार), कांदे एकत्र भाजून केलेले भरीत. त्यावर टाकलेली गावरान कोथिंबीर. आणि गरम गरम भाकरी. विषयांतर झाले.... sorry .
|
Savani
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:17 pm: |
| 
|
नलू, छान माहिती देतीयेस. कोथिंबीर आणि मेथी कशी लावायची तेही सांग.
|
Nalini
| |
| Wednesday, June 27, 2007 - 6:48 pm: |
| 
|
सर्वांचे आभार. थोडेसे मेथी आणि कोथिंबीरीबद्दल. शेतात मेथी आणि धने लावताना, शक्यातो मिरची, वांगे यांच्यासोबतच लावले जाते. मी वर सांगितलेच आहे की मिरची सरीच्या एकाच अंगाला लावली जाते. दुसर्या अंगाला(बाजुला) सरीच्या मधोमध म्हणजे वरती माथ्यावरही नाही आणि खालीही नाही एक रेष मारली जाते त्यात बोटांमधुन पातळसर मेथी टाकतात व ती रेष बुजवतात. कुंडीत किंवा वाफ्यात लावाय्ची असेल तर ३-४ बोटांच्या अंतरावर रेषा मारून त्यात मेथी पेरावी व रेषा झाकुन घ्याव्या. सुरवातीला पाणी घलताना झार्याने घालावे किंवा हाताने शिंपडुन घालावे म्हणजे बी वर येणार नाही. मेथी साधारण ५-६ दिवसात दिसायला लागते. उन्हाळयात लावलीत तर बाहेर लावता येईल आणि पुर्ण वाढलेली मेथी खायला मिळेल. कुंडीत किंवा वाफ्यात लावलेली मेथी उपटुन न काढता ती खुडून घेतलीत तर परत फुटते. हिवाळ्यात जर घरात कुंडीत लावणार असाल तर १०-१२व्या दिवशी मुंबईत मिळते तशी दोन पानांची मेथी वापरता येईल. जर भरतात लावणार असाल तर केव्हाही लावली तरी पुर्ण वाढलेली मेथी खायला मिळू शकते. भारतात शक्यतो भादव्याच्या(भाद्रपदाच्या) महिन्यात लावलेली मेथी जळते. कुंडितल्या मेथीला फारसे पाणी घालू नये. बाहेरच्या उष्णतेवर पाण्याचे प्रमाण कमी अधिक करावे. उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याला पाणी देताना सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडतात, त्यातही संध्याकाळीच ४ नंतर पाणी द्यावे असे म्हटले जाते ह्याचे कारण म्हणजे दुपारच्या उन्हात तापलेल्या जमीनीला पाणी दिले की त्या पाण्याची गरम वाफ भाजीच्या मुळांना लागते व बर्याचदा त्यामुळे भाजी जळून जाते. कोथिंबीर लावताना वरती सांगितली त्याप्रमाणे काळजी घ्यावी लागते. का ते माहित नाही पण मेथी ओळीत लावली जाते आणि कोथिंबीर बुचक्यात(एकाच जागी १०-१२ दाणे टाकायचे) लावली जाते. कोथिंबीर लावताना न विसरण्याची गोष्ट म्हणजे धने हे आधी चपलेने शक्यतो स्लिपरने रगडून घ्यायचे, एका धन्याचे दोन भाग होतिल असे. मेथी आणि धने सोबत लावलेत तर पहायला मिळेल की मेथी लवकर उगवते. भेने उतरायला साधारण १०-१२ दिवस लागतात तर मेथी ५-६ दिवशी उतरते. माझी आजोळची आजी कोथिंबीर खास करुन विकायला लावायची असेल तर बदामी धने लावयची आणि जर धने करण्यासाठी लावायचे असेल तर गावरान धने लावायची. गावरान कोथिंबीरिला बारिक पानं असतात.
|
Bhagya
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:47 pm: |
| 
|
नलु, खुपच छान. माझी इथे मेथी १००% चांगली येते. अगदी frost असेल तरीही. पण कोथिम्बीर frost मध्ये येत नाही. ती जर घरात किवा व्हरांड्यात लावायची असेल frost च्या दिवसांत तर कशी लावू?
|
Dineshvs
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:39 pm: |
| 
|
नलिनी, नुसते वाचुनही वाफ्यात गेल्यासारखे वाटले. मी नायजेरियात होतो, त्या गावात सगळी रेतीच होती. तरी तिथे मेथी, मुळा, पडवळ चांगले यायचे. मुळा तर मी मिनरल वॉटरच्या बाटलीत लावायचो. बाटली एवढा मुळा तयार व्हायचा तिथे.
|
Ravisha
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:49 pm: |
| 
|
नलिनी,छान,फारंच सखोल माहिती... मी मिरचीच्या बिया लावल्या होत्या एका कुंडीमध्ये,फक्त एक मिरची आली त्यानंतर काही नाही आणि झाडाची थोडी पानेही कडेकडेने जळून गेल्यासारखी दिसत आहेत,काय करावे बरे? ऊन्-पाणी देण्यात काही चुकले असेल का?
|
Nalini
| |
| Friday, June 29, 2007 - 9:55 am: |
| 
|
रविशा, ऊन जास्त झाल असावं म्हणुन पाने कडेने जळून गेल्यासरखी दिसत आहेत. त्यातले एकच रोप उतरले म्हणजे जे बी टाकले होते ते कोवळे असावे. परत एकदा थोडेसे बी एका कुंडीत लावुन ती कुंडी उन्हात न ठेवता भरपुर सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेव. बी लावण्यापुर्वी ते एका वाटित पाणी घेऊन त्यात टाक. थोड्यावेळानंतरसुद्धा जे बी वरती तरंगत राहिल ते काढुन टाक. तु भारताच्या बाहेर असशील तर तुला मार्केटमध्ये तयार रोपही मिळू शकेल. भाग्या, अगं frost च्या दिवसात माझ्याकडेही कोथिंबीर नाही येत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|