Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 18, 2007 « Previous Next »

Chyayla
Tuesday, July 17, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मन्दार, नागेश चे ईतरही चित्रपट पहायला मिळाले तर नक्की पाहिन, मला वाटत श्रेयस तळपदेचा ईकबाल हा पहिला सिनेमा असावा.

Farend
Tuesday, July 17, 2007 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर 'ता रा रम पम' ला अर्थ आहे तर.

त्या गडबडीत ' Catch and release ' बद्दल लिहायचे राहिले. अगदी धमाल कॉमेडी बिमेडी नाही, पण एकदा पाहायला ठीक आहे. Kevin Smith म्हणून तो एक आहे त्याचे काम मस्त झाले आहे.

मला कदाचित नीट समजला नसेल पण येथेही ते नाव कथानकाशी ओढून ताणून जुळवल्यासारखे वाटते.

मात्र Colorado मधले सीनरी जबरी घेतली आहे.


Slarti
Tuesday, July 17, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

transformers पाहिला. मला फार आवडला नाही. animation चांगले आहे, चित्रपट रटाळवाणा होत नाही, पण cheesy and corny आहे. त्यांच्यावर कॉमिक्ससुद्धा आहेत आणि तो प्रभाव खूप जाणवतो, विशेषतः autobots च्या तोंडचे संवाद. शिवाय Americana चा मोठ्ठा डोस मिळतो तो वेगळाच...
आता होमरभाऊंची आतुरतेने वाट बघत आहे.


Slarti
Tuesday, July 17, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Paris je taime अवश्य बघा. भारतात व्यावसायिकरित्या प्रकाशित होईल का ही शंकाच आहे. पुण्यात राहणार्‍या जन्तेस कदाचित NFAI मध्ये बघायला मिळेल. 'पॅरिस व प्रेम' हा समान धागा धरून प्रत्येकी साधारण ५ मिनिटे अशा पंधराएक दृष्यांची विणलेली गोधडी आहे, प्रत्येक तुकडा वेगळ्या दिग्दर्शकाचा. आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आहेत (त्यात गुरिंदर चढ्ढाही आहेत). तुकडे थोडे जास्त वाटतात चित्रपट बघताना, पण एकंदरीत सुंदर चित्रपट.

Rutu_hirwaa
Wednesday, July 18, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सान्गा नागेशचे सगळे चित्रपट कुणी पाहिलेत?
म्हणजे "हैद्राबाद ब्लूज" किन्वा "तीन दिवारे"?
कसे आहेत?
आणि "बाॅलीवूड काॅलीन्ग" हा कोणता?


Mahaguru
Wednesday, July 18, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिन दिवारें-चांगला आहे. अवश्य बघा.
बॉलिवुड कॉलिंग - एकदम मस्त आहे. ओमपुरी अफलातुन काम करतो.


Bee
Wednesday, July 18, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी bacteria वर बनवलेली एक DVD बघितली. ती शाळकरी मुलांसाठी होती तरी पण मला त्यातून खूप काही शिकायला मिळाले. शाळेत असताना त्यावेळी जे कळले नाही ते आता ह्या वयात कळते आहे :-)

Mahaguru
Wednesday, July 18, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मल्लिका शेरावतची official website:
http://www.mallikasherawatwow.com/


Mandard
Wednesday, July 18, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RUTU - HIRAWA
Hydrabad Blues - Very good. It is based on NRI's at time 1998/99 when software boom was started(Y2K). You may feel this movie little irrelavant considering sistution today. (Who cares for NRI's):-). The movie has some double meaning dialogues.
Hydrabad Blues 2 - Hopeless
Rockford - On the hostel life in school. Nice time pass.
Bollywood calling - Agreed with Mahaguru.
Teen Diware - Agreed with Mahaguru.
Rest DOR & IQBAL lot is written on this BB. Good movies.

Rutu_hirwaa
Wednesday, July 18, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
अशा बर्याच गोष्टी असतात की ज्या शाळेत कळत नाहीत पण नंतर पाहिल्या की कळतात
दिवा घे :-)
उदाहरणार्थ्: शाळेत मठ्ठ वाटणारी वर्गातली काही काही मुलं नंतर कुठे भेटली की उगाच स्मार्ट बिर्ट वाटतात

धन्यवाद मन्दार




Runi
Wednesday, July 18, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु, मंदार एकदम पटेश. मी नागेश्चे बहुतेक सगळे (मिळतील तेवढे) सिनेमे बघते. तिन दिवारे म्हद्ये नसिरुद्दिनचे काम खुपच मस्त आहे. रुतु_हिरवा बघ तु पण मिळवुन जमतील तेवढे सगळे.

Sayuri
Wednesday, July 18, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकाब चांगला आहे(हिरॉईन सोडल्यास)

एकदा जरुर पहावा. मला अब्बास मस्तानचा हमराज सुद्धा आवडला होता.


Mbhure
Wednesday, July 18, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देसीकडे available होता म्हणुन Red Swastik नावाचा चित्रपट बघितला. विनोद पांडेचा हा चित्रपट म्हणजे (नेहमीचेच) चांगले potantial असलेल्या कथेची वाट. बर्‍याच इंग्रजी सिनेमांची मिसळ आहे. चित्रपटाला A Certificate आहे का?

त्याच देसिने हळुच आतुन आणुन " झूम बराबर... " हा अजुन एक खतरनाक सिनेमा दिला. किती गचाळ सिनेमा आहे. यशराज आणि त्याच्या समस्त दिग्दर्शक मंडळीने आता जरा ब्रेक घ्यावा. यशरजचे नाव, फारीन, बच्चनस आणि जे काही चित्रपट आहे(विचित्र पोषाखातील अमिताभ, पांचट विनोद)ही रेसिपीआता जुनी झाली आहे त्यामुळे असे शूट केलेले काहीही लोक बघितील हा " चुकीचा " गैरसमज त्यांनी सोडुन द्यावा. ऊडप्याच्या हॉटेलातील पंजाबी किंवा चायनिज डिश खाताना जसे वाटते तसा हा चित्रपट बघताना वाटले.

ह्या सर्वांवर उतारा म्हणुन काल " रंगल्या रात्री अश्या " पाहिला. Just Superb!! उस्तद अल्लार खाँचा तबला, छोटा गंधर्वांची गाणी, सुलोच्ना चव्हाण यांच्या (तुमचा नी माझा एक काढा फोटू, लवंगी मिर्ची) लावण्या आणि आशाची कोठीवरील हिंदी गाणी. परत नॉर्मलवर आलो.


Ravisha
Wednesday, July 18, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" Metro" पाहिला का कुणी? मला कळतच नाहिये आजकाल "वास्तववादी" ह्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवत आहेत हिंदी चित्रपटात :-(


Deepanjali
Wednesday, July 18, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" Metro" पाहिला का कुणी? मला कळतच नाहिये आजकाल "वास्तववादी" ह्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवत आहेत हिंदी चित्रपटात
<<<वाट्टेल ते काय त्यात ?
अशा गोष्टी घडत नाहीत का भारतात , ते ही call centre crowd मधे ? :-)
आणि मेट्रो ज्या प्रकारे direct केलाय त्यामुळे तो खरच realistic वाटतो , कथे मधली पत्रं stars म्कमी आणि characters जास्त वाटतात . वास्तववादी वाटतो
मला तरी आवडला मेट्रो , Anurag Basu rocks!



Ravisha
Wednesday, July 18, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात घडत आहे म्हणून तर वाईट वाटतं ना..."का गरज वाटते ह्या तत्सम crowd ला असे विवाहबाह्य संबंध ठेवायची किंवा केवळ perks साठी विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवायची? प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट एकच.... स्त्री-पुरुषाच्या नात्यात निव्वळ मनाची बांधिलकी असू शकत नाही का?" -हे झाले सर्वसाधारण मत.
चित्रपटाबद्दल म्हणायचे झाले तर एकूणच सेन्सोर बोर्डाच्या कात्रीची धार कमी झाली आहे असे वाटते... सर्व पात्रांचा अभिनय किंबहुना पार्श्वसंगीतही उत्तम आहे पण त्यातले "वास्तव" बघून खिन्न वाटले....


Ksha
Wednesday, July 18, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व आजकाल घडायला सुरुवात झाली असं तुमचं म्हणणं आहे का?
तुम्हांला माहिती नव्हतं आणि इतकं पद्धतशीररित्या (चव्हाट्यांवर) मांडलं जात नव्हतं इतकंच!

मेट्रो आवडला मला.


Deepanjali
Wednesday, July 18, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात घडत आहे म्हणून तर वाईट वाटतं ना..."का गरज वाटते ह्या तत्सम crowd ला असे विवाहबाह्य संबंध ठेवायची किंवा केवळ perks साठी विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवायची? प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट एकच.... स्त्री-पुरुषाच्या नात्यात निव्वळ मनाची बांधिलकी असू शकत नाही का?" -हे झाले सर्वसाधारण मत

<<<<मेट्रो मधे जी crowd दाखवली आहे त्यात फ़क्त perk साठी नाही तर career competition मधे इतरांच्या पुढे जाण्या साठी वाट्टेल ते करणारे लोकही दाखवले आहेत .
आणि हे अनैतिक संबंध वगैरे भारतात तर अगदी पुराणकाळातल्या ग्रंथां पासून ते अत्ता पर्यंत लिहिले / दाखवले आहे , अगदी Black and white movies मधेही हा विषय दाखवला आहेच .
त्यामुळे हे विषय निदान भारता साठी तरी अजिबात नवीन नाहीत . :-)


Zakki
Wednesday, July 18, 2007 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुख्य म्हणजे कारण काहीहि असले तरी विवाहबाह्य संबंध हे प्राचीन काळापासून सर्व जगात चालत आलेले आहे, चालत रहाणार आहेत. भारतात होतेच. कदाचित् नको तेव्हढे उघडपणे दाखवले म्हणून तुम्हाला धक्का बसला असेल, एव्हढेच.

या बाबतीत शंभर वर्षांपूर्वीचा किस्सा:
एका कादंबरीकाराने लिहीले होते की संध्याकाळी एक पुरुष कुणा महिलेच्या घरी गेला. नंतरच्या भागात त्याने लिहीले की दुसर्‍या दिवशी सकाळी तो पुरुष त्या महिलेच्या घरून, आपली सायकल घेऊन परत निघाला.

झाले! सगळे लोक त्या लेखकावर नुसते तुटून पडले. उघड उघड अनैतिक गोष्टी लिहीता? काय हे?!





Farend
Wednesday, July 18, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, ती कुणी महिला म्हणजे त्याचीच बायको आणि ते घर म्हणजे त्याचेच घर असू शकत नाही का? रात्री सायकल घेऊन घरी गेला व दुसर्‍या दिवशी परत कचेरीत गेला

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators