Orchid
| |
| Friday, July 13, 2007 - 4:59 pm: |
| 
|
क्श, त्याच्यापुढचा माझा वेंधळेपणा तिनी स्वताचा पंजाबी माझ्या बॅगेत भरला होता, मी सकाळी तशीच बॅग उचलुन गावी निघुन गेले १ महिन्यासाठी. गेल्यावर बॅग उघडल्यावर हा प्रकार लक्शात आला.
|
Chaffa
| |
| Sunday, July 15, 2007 - 5:53 am: |
| 
|
काल संध्याकाळी आमच्या रिसेप्शनिस्टच्या घरी तिलाच सरप्राईज पार्टी देण्याचा कट रचल्या गेला आता कुणी रचला असेल ते जुन्या जाणत्यांना नक्कीच कळाले असेलच तर तिथे एक ईरसालपणा झालाच पण तो त्या BB वर लिहीन पण वेंधळेपणा व्हायचा तो झालाच. त्याचं काय झालं की आमच्या मित्रवर्याने फ़ोटो काढायला कॅमेरा माझ्या हातात दिला माझी फ़ोटोग्राफ़ी ही आभिनव या गटात बसणारी असल्याने मी सहसा फ़ोटो काढतच नाही पण याला नाही म्हणता येईना म्हणुन घेतला कॅमेरा हातात. बोलण्याच्या गडबडीत त्याने आणखी काहीतरी हातात दिले ते न पहाताच खिशात टाकले, आणी मग मशिनगनच्या वेगात जो दिसेल त्याचे फ़ोटो काढून एकदाचा कॅमेर्यावरचा आकडा ३६ वर नेला आणी कॅमेरा पुन्हा परत दिला वर सांगितले " फ़ोटो डेव्हलप करने के बाद पहीले मुझे दिखाना", ........ सकाळीच त्याचा फ़ोन आला होता "यार रोल निकालके ले गया है तो तु ही डेव्हलप करा लेना". आईशपथ मी गाऽऽऽऽ धडपडत जाउन खिसे तपासले तर त्यात कॅमेर्याचा रोल आणी सेल! आता मी त्याला काय उत्तर देउ? काल रिकाम्या कॅमेर्याने फ़ोटो काढले म्हणुन?
|
Chyayla
| |
| Sunday, July 15, 2007 - 5:11 pm: |
| 
|
आयला चाफ़्फ़ा तुझा फ़ोटो काढण्यासारखा चेहरा झाला असेल ना
|
अमच्याकडे एक काकु आल्या होत्या. माझ्या आइने तेंव्हा पपई कापली आणि सगळ्यांना दिली. आमच्या अंगणातल्या झाडाचीच होती ती.ती सीडलेस होती आणी चव अतिशय सुरेख होती.सगळ्यांना आवडली.गप्पा टप्पा झाल्या..काकु जायला निघाल्या आणि जाताजाता म्हणाल्या "अग मला जरा त्या सीडलेस पपईच्या बिया देतेस का,चव अगदी सुरेख होती...मी पण लावीन झाड त्याच" एक क्षण शांतता आणि मग एकदम हास्यस्फोट ज़ाला....काकुंनी सीडलेस पपईच्या बिया मागितल्या होत्या!!!
|
Zakasrao
| |
| Monday, July 16, 2007 - 4:01 am: |
| 
|
चाफ़्या आणि मराठी फ़ॅन पण मराठी फ़ॅन तुमच्याकडे ते झाड कसे लावले आहे? त्यानाही तसच लावण्यासाठी त्या तस बोलल्या असतील. असो काल रविवार सुट्टीचा दिवस. मला आधी सिन्हगड रोड धायरी फ़ाटा येथे जायच आहे आणि तिथुन नंतर पौड रोड कोथरुड इकडे जावुन परत सिन्हगड रोड आणि तिथुन परत घरी असा प्रवास करायचा आहे. घर ते सिंहगड रोड आणि तिथुन कोथरुड पौड रोड हा प्रवास मी व्यवस्थित केला. तस मला त्या एरियाची फ़ार माहिती नाहिये आणि सांगितलेला रस्ता सोडुन माझच बरोबर आहे अशा भ्रमात राहुन रस्ता चुकणे ही माझी खासियत आहे. आणि त्यातच मी हा प्रवास बरोबर केला त्यामुळे मनातल्या मनात हरबर्याच्या झाडावर चढुन घेतल.परतीचा प्रवास करतान निम्म्या रस्त्यात बरोबर होतोच आणि तिथुन काय झाल काय माहित पण गणेश भेळ च्या जवळुन गेलो तर मल नेमक आठवेना की आता कुठे जायचे. मग एका सिग्नल वरुन उजवीकडे वळलो आणि बरच आता गेलो तरी काय मला अपेक्षित रस्ता दिसेना. आजुबाजुच्या दुकानाच्या पाट्या वाचल्या तर नवी पेठ,गंजवे चौक असल काहितरी दिसत होत आणि मी हरबर्याचा झाडावरुन धप्पकन आपटलो. मग एका आजोबाना विचारल आणि माझी गाडी व्यवस्थित रस्त्याला लागली. बर घरी गेल्यानंतर शांत बसाव की पण नाही माझा सत्यवादी बाणा उफ़ाळुन आला आणि बायकोला हे सगळ सांगितल तर तिने एक मोठ्ठSSSSSSS हुं केला.
|
Stg
| |
| Monday, July 16, 2007 - 5:01 am: |
| 
|
नमस्कार माझा हा दुसराचा पोस्ट त्या मुळे जरा साम्भाळुन घ्या. . तसा मी मायबोलिचा नियमित वाचक आहे..पन आत लिहिन्याचे धाड्स काराव असा विचार आहे.. . वेन्धळेपाना हा तर माझा हक्कचा प्रान्त माझ्या करामती लवकरच शेअर करेन.. देवनागरी लिहिन्यचि सवय करतो तो पर्यन्त
|
Monakshi
| |
| Monday, July 16, 2007 - 5:56 am: |
| 
|
आयला, गणेश भेळ म्हणजे आमच्या घरापर्यंत आला होतात की भो? अर्थात मी मुंबईतच होते त्यामुळे भेट झालीच नसती. मलाही पुण्यातले रस्ते ख़ुपच confusing वाटतात. त्यामुळे सहसा मी एकटी कधी बाहेर पडत नाही.
|
Manjud
| |
| Monday, July 16, 2007 - 7:06 am: |
| 
|
चाफ़्फ़ा, एक खरोखरीचा भो. भा. प्र. रोल आणि सेल्स नसताना कॅमेरा ३६ वर गेला कसा?
|
Chaffa
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:36 am: |
| 
|
हां ऽऽ मंजु, प्रश्न्न बरोबर विचारलास मलाही हाच प्रश्न पडला होता पण निट विचारल्यावर कळाले की रोलवाले स्वयंचलीत कॅमेरे असा प्रकार करतात. म्हणजे रोल नसतानासुध्दा आकडे सरकत रहातात.
|
Manjud
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:56 am: |
| 
|
मग त्या सेक्रेटरीने आणि इतर सहकार्यानी धुतला असेल तुला.....
|
Ultima
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:33 am: |
| 
|
मग त्या सेक्रेटरीने आणि इतर सहकार्यानी धुतला असेल तुला..... वाळलास का रे
|
>> वाळलास का रे नसेल अजून. पावसाळा आहे ना.
|
आमच्या कंपनीमध्ये बस पास आणि जिमसाठीचा पास असे दोन प्रकारचे पास आहेत आज सकाळी तंद्रीतच मी जिममध्ये पोचले. तिथे तिथल्या माणसाला बिनधास्त बसचा पास दाखवला.. तो म्हणे: "अहो मॅडम हा पास बसचा आहे." वर मी:"मग काय झालं?" थोड्या वेळाने समजलं मला
|
यावरून आठवलं मी व्हीटी स्टेशनला टीसीने तिकिट दाखवा असं सांगितल्यावर त्याला पर्समधली उरलेली सर्व बसची तिकिटं हातात दिली होती. नंतर माझ्यच लक्षात आलं आणि त्याला बसचा पास दाखवला.
|
Stg
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:08 pm: |
| 
|
माझ्या एक मित्राने खडी साखर समजुन कोस्टिक सोडा खाल्ला होता.. मग कय होनार. साहेब १५ दिवस वानर झाले होते
|
Dhumketu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:17 pm: |
| 
|
कॉस्टीक सोडा पिठीसाखरेसारखा असतो ना? मग खडीसाखर म्हणून कसा खाल्ला?
|
Psg
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:22 am: |
| 
|
पीठीसाखर म्हणूनच खाल्ला असेल रे, 'खडीसाखर' लिहायचा वेंधळेपणा झाला असेल
|
आईशप्पथ मी इथले वेन्धळेपणाचे सगळेच पुरस्कार जिन्कणार बहुधा आमच्या कंपनीमध्ये प्रत्येकाला एकेक चहा प्यायचा मग मिळालाय.. त्यातून फ़ार कमीजण चहा पितात.. मी तर त्यात बर्याचदा पेन,पेन्सिल,मोबाईल असे ठेवत असते. काल का कोण जाणे मला त्यातून चहा प्यायची हुक्की आली. चहा आणला चान्ग्ला अर्धा मग भरून.. तो पिता पिता मध्येच एक फोन आला.. फोन संपल्यावर सवयीने मोबाईल मगमध्ये ठेवला.
|
Monakshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 7:05 am: |
| 
|
तू काय त्या समोरच्याला चहाचं आमंत्रण दिलं होतस काय?
|
Alpana
| |
| Thursday, July 19, 2007 - 9:26 am: |
| 
|
किती बरे वाटते ज्यावेळी आपल्यासारखेच लोक भेटतात.... कॅमेर्याचे किस्से वाचुन आठवले... आम्च्या घरी हा प्रकार एकदा नाही चक्क २-३ वेळा तरी घडला आहे...पहिल्यान्दा घरच्या भुमीपुजनाचे फोटो गेले...आणी त्यावेळी ८-१० फोटो राहिलेत नन्तर काढु करत करत ३-४ महिने कॅमेरा तसाच पडला होता.. शेवटी एकदाचे ते फोटो सम्पवुन रोल धुण्यासाठी कॅमेरा दुकानात नेला त्यावेळी कळाले रोल नाहिये... नन्तर पण एक दिवाळीला असेच झाले... त्याच्यानन्तर मात्र प्रत्येक वेळी आमचा कॅमेरा असला की सगळे विचारायचे रोल आहे न? एकदा तर रोल होता, फोटो पण काढले आणी रोल कढताना गडबड केली आणी सगळे फोटो गेले.... हे सगळे प्रकार अगदी लागोपाठ घडले होते, त्यामुळे बरेच दिवस फोटो काढल्यावर धुवुन येइपर्यन्त येतिल की नाही याची खात्री नसायची... पण हे सगळे मी नाही केले... भाउ आणी बाबा जबाबदार होते याला... कदाचीत आई पण असेल..त्यावेळी माझ्या हातात कॅमेरा देत नव्हते...
|