Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 25, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through June 25, 2007 « Previous Next »

Psg
Thursday, June 21, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्चा, खूप खूप धन्यवाद! अप्रतिम फ़िल्म! दोन्ही मुलांचं काम awesome!
धन्यवाद एक सुरेख चित्रपट दाखवल्याबद्दल! :-)


Pancha
Thursday, June 21, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मला नको, केदार ला द्या. त्याने इथे त्याबद्दल लिहीले म्हणुन मी बघितला आणि आवडला म्हणुन शेअर केला.

पण हो, लिन्क सापडविण्याचे श्रेय मला स्वीकारावे लागेल. धन्यवाद.


Pancha
Friday, June 22, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमल हसन चा अन्बे सिवम हा तमिळ with english subtitles चित्रपट पाहिला. चांगला आहे. शेवट पर्यंत खुर्ची ला खिळवुन ठेवतो.

Sas
Friday, June 22, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमिताभ ला म्हातारचाळेचे च डोहाळे लागलेत. :-) ha ha ha


Kedarjoshi
Friday, June 22, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cidade de Deus अर्थात City of God.हा ब्राझीलीयन चित्रपट. परत एकदा ईंग्लीश मध्ये डब नाही पण सब टायटल्स आहेत.
ब्राझील मध्याला gang war वर आधारीत चित्रपट. ह्यात ला जो हिरो आहे तो कसा अचानक फोटोग्राफर होतो व gang war कसे होते याचे चित्रीकरन.
हा जो फोटोग्राफर आहे त्याचा जिवनातली ही सत्यकथा. थोडा जास्त व्हॉयोलन्स आहे पण नक्कीच बघन्यासारखा. २००२ सालच्या चार ऑस्कर अवार्ड साठी त्याला नॉमीनेशन होते.


Pancha
Friday, June 22, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yes kedar, I have seen Cidade de Deus, a wonderful movie!

All time favourite is Italian Movie "Cinema Paradiso", must watch for everyone.

Kedarjoshi
Friday, June 22, 2007 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा मग तुला gangs of newyork पण आवडेल. कदाचीत तो तु पाहीलाही असशिल. अगदी जुन्यात सिटीझन केन म्हणुन एक चित्रपट आहे तो देखील पाहा.

Pancha
Friday, June 22, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वामी चित्रपट साधारण आहे, नाही बघितला तरी चालेल.

केदार, Gangs of Newyork अतिरंजीत आहे त्यामुळे नाही आवडला. Citizen Ken पेक्षा "MR Smith goes to Washington" चांगला आहे.


Sas
Sunday, June 24, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच Children of Heven पाहिला must c movie

केदार n पांचा Thanks a lot for sharing such a great movie :-)

Dineshvs
Sunday, June 24, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच ओशियन १३ पाहिला. स्लीक आहे. अल पसिनो आहे यावेळी. ( ओशियन १२ मधे ज्युलिया रॉबर्ट्स आणि ब्रुस विलीस असुनही, ओशियन ११ इतकी मजा आली नव्हती. )
ब्रॅड पिट, जरा थोराड वाटतो. जॉर्ज क्लुनी अजुनही फ़िट वाटतो.
यातल्या कल्पना अतर्क्य आहेत. तरीपण बघायला मजा येते.


Kedarjoshi
Sunday, June 24, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी पण या बद्दलच लिहीनार होतो. (तुम्ही लिहीलेच आहे). पण गेल्या दोन्ही ओशन पेक्षा यात जास्त डोकलीटीचा वापर आहे म्हणुन मला हा आवडला. (ऑफकोर्स ११ मस्तच होता).

Nandini2911
Monday, June 25, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा... Cinema Paradiso माझाही अत्यंत आवडता पिक्चर आहे. दिग्दर्शकाची कमाल प्रत्येक फ़्रेममधून जाणवत राहते. Must see..
त्याची कुठे लिंक असली तर द्या ना :-)


Chinya1985
Monday, June 25, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिर खानच्या fans साठी आनंदाची खबर. आमिरनी ब्लॉग सुरु केला आहे. दर २-३ दिवसांनी तो तिथे लिहितो.
बघा-
http://www.lagaandvd.com/blog.php

Storvi
Monday, June 25, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ड्रीमगर्ल्स पाहिला... काय सुरेख अभिनय केलाय Jeniffer Hudson ने. Beyonce वगैरे तिच्या समोर छटछुट वाटत होत्या.. सगळ्यांचाच अभिनय चांगला झालाय Eddie Murphey, Jamie Fox, Beyonce Knowles , पण तरीही, पहिल्याच काही छोट्याश्या शोट्स मध्येच Jeniffer अगदी कसलेली अभिनेत्री वाटते. गाणी सर्वांचीच उत्तम होती

Kedarjoshi
Monday, June 25, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिरनी ब्लॉग सुरु केला आहे. दर २-३ दिवसांनी तो तिथे लिहितो>>>
म्हणजेच आता आमिरला भरपुर वेळ आहे. पिक्चर नाहीत की काय?

Slarti
Monday, June 25, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सप्ताहांती दोन चित्रपट बघितले. You kill me आणि 1408 .
पहिला धमाल आहे. mob comedy आहे, बेन किंग्सले व टेआ लिओनी या दोघांची कामेही छान झाली आहेत, विशेषतः बेन किंग्सलेचा dead pan चेहरा... कथेत काही नाविन्य असे नाही, पण कथा आहे आणि जी काय आहे त्यात फाफटपसारा नाही. कुठेही भावनातिरेक नाही. बेन किंग्सले A.A. मध्ये त्याच्या कामाबद्दल सांगतो ते तर अफाटच वाटले... अगदी धो धो हसू येते असे नाही, पण गुदगुल्या केल्यावर जे येते तसे... मनापासून... उत्तम जमलेली चटकदार भेळ म्हणता येईल.
1408 स्टीफन किंगच्या कथेवर आधारित आहे, यातच त्या चित्रपटाचे सार आले. एकदा पहायला काहीच हरकत नाही. The Shining किंवा Carrie च्या गुणवत्तेची अपेक्षा ठेवू नका. उत्तरार्धात थोडा ओढीव होतो, पण तरी एक सैतानी खोली ( Jackson : The room is ****ing evil. ) हे कथाबीज छान आहे. चित्रपटगृहात पाहिलात तर बेहत्तर.


Farend
Monday, June 25, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेट्रो मलाही खूप आवडला. विशेषत: इरफान खान आणि कोंकणा सेन चे सीन्स. त्यांचा लेडीज डब्यातला शॉट तर जबरी!

के के चे रोल आता एकसारखे होउ लागलेत. तो आणि शायनी आहुजा 'हजारों ख्वाइशे ऐसी' मधे दोघांची कामे खूप छान झाली होती. पण के के चे यातील बेअरिंग साधारण 'सरकार' सारखेच झाले आहे. मला तो त्या 'छल' मधे आवडला होता, पण तेवढा चांगला रोल नंतर फक्त 'हजारों...' मधेच आठवतो. मला वाटले की शायनी ने ही खूप चांगला रोल केला आहे. त्याच्या निदान 'हजारों...' च्या पेक्षा खूपच वेगळे बेअरिंग यात आहे. कदाचित मी इतर पाहिले नाहेत त्याचे त्यामुळे असेल.

धर्मेंद्र उदय चोप्रा म्हातारा झाल्यावर (म्हणजे आणखी १-२ वर्षांनी) कसा दिसेल तसा दिसतो. धरम पंजाब मधून शेवटी बाहेर आला वाटतं :-) आता सनीला ही काढा म्हणावं. धरम आणि राखी हे केवळ 'बोलून' हशा निर्माण करण्याच्या कुवतीचे कलाकार आहेत असे त्यांचे गेल्या १०-१२ वर्षातील चित्रपट पाहिल्यावर वाटते. (राखी तर कदाचित खूप आधीपासून. पहिल्यांदा राखीने हसवले ते मुकद्दर का सिकन्दर मधे त्या 'यल्ला यल्ला' डान्स ला :-) )

कंगणा यात जरा निदान काही शॉट मधे चरसी वाटत नाही. मी गॅंगस्टर पाहिला नाही पण पोस्टर्स मधे तर ती कायम झिंगल्यासारखीच दिसते. शर्मण चा "शेड्युलिंग" चा शॉट धमाल आहे :-) जुन्या चित्रपटांप्रमाणे जे काय सांगायला हवे ते पटकन न सांगता 'मगर मेरी बात तो सुनो' म्हणत वेळ आणि सांगायची संधी घालवण्याचा शॉट इथेही आहे, पण त्यामुळे पूर्ण चित्रपटाची कथा घडवणारे गैरसमज होत नाहीत. कदाचित तश्या पूर्वीच्या चित्रपटांतील शॉटचे विडंबन करायला तो शर्मण, कंगणा आणि कोंकणा चा शॉट घेतला असेल.

अज्जुका, दीपांजली, बरोबर ते शर्मण जोशीचे कंगणाला स्वत:चा प्लॅन दाखवतानाचे शॉट्स त्या दुसर्‍या चित्रपटावरून घेतलेले असतील. Wall Street मधले वेगळे होते.

अज्जुका, ते 'मोहन जोशी' अगदी बरोबर. मला मधे तो एक सद्ध्या make over केलेला अवधूत गुप्ते ही वाटला (त्याला शनिवारी त्या 'सा रे ग म' मधे पाहिल्यावर). पूर्वीच्या काही चित्रपटांमधे कोणीतरी एखादा फ़कीर सतत काही नाट्यपूर्ण शॉट झाला काही जीवनविषयक तत्त्वज्ञान असलेले कडवे गायचा तसे हे लोक कोठेही उगवतात :-)

आणि आजकाल प्रत्येक हिंदी चित्रपटांत ते 'क्लोजेट मधून बाहेर आलेले' दाखवायलाच पाहिजेत असा शिरस्ता दिसतो.

पण एकूण आवर्जून बघण्यासारखा आहे 'मेट्रो'.


Disha013
Monday, June 25, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>धर्मेंद्र उदय चोप्रा म्हातारा झाल्यावर (म्हणजे आणखी १-२ वर्षांनी) कसा दिसेल तसा दिसतो


Pancha
Tuesday, June 26, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, इथे बघ
Cinema Paradiso पण subtitles नाही. उसगावात कोणत्याही library मधे मिळेल. भारतात dvd घ्यावी लागेल.

मित्रहो, हा चित्रपट जरुर बघा. it will make your day, I am yet to see a movie better than this



Deepanjali
Tuesday, June 26, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend,
शिल्पा शेट्टी बद्दल नाही लिहिलस :-)
मेट्रो मधे चक्क तिचाही अभिनय चांगला झालाय ... दिसते तर as usual gorgeous!!
इतर सगळ्या actresses कायम जाड बारीक होत रहातात अगदी Miss World-Miss Universe actresses पण जाड होतात पण गेल्या almost 12 वर्षां पासून शिल्पा शेट्टीची figure मात्र तितकीच perfect आहे ! :-)
अर्थात अभिनया च्या बाबतीत कोंकोणा सेन शर्मा आणि इरफ़ान ला सलाम .. कसले natural actors आहेत दोघं! .. acting करत आहेत असं वाटतच नाही !
मला गाणी पण आवडली metro मधली .. आणि कथेतल्या पात्रांच्या lip singing पेक्षा प्रीतम चा rock band चांगला वाटला:-)
In general, मेट्रो पहाताना मधुर भांडारकर style ची आठवण झाली .



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators