|
Sayuri
| |
| Friday, June 15, 2007 - 5:03 am: |
| 
|
गोलमालची गाणी बरी आहेत. पार्श्वसंगीताचा मात्र अतिरेक वाटला. अगदी प्रत्येक क्षणाला आणि वाक्याला मागे काहीतरी वाजतं काय बाळाच्या रडण्याचा आवाज काय येतो! काहीतरीच. सध्याच्या काळात अजय अतुलचं संगीत सर्वात श्रवणीय वाटतं.
|
हा तसं काही वेळा ते पार्श्वसंगीत बोअर मारतं पण ओव्हरओल परिणाम मला आवडला.. अवधूत ची मी प्रचंड चाहती आहे.. सो मला बहुतकरून त्याचे आवड्तेच पण ते भरत चे गाणे सुरेख च जमलेय.. मला वाटते लाडक्या अवधूत ने च गायलेय ते पण राहवत नाहिये म्हणून पुन्हा सान्गतेय गोलमाल खूप चान्गलाय हो त्या भंपक सरीवर सरी पेक्षा...
|
ती गोलमाल मधली actress अमृता खानविलकर आहे . ' झी सिनेस्टार्स कि खोज ' च्या पहिल्या version मधे judge's choice prize मिळालं होतं तिला .
|
रजनीकांतचा 'शिवाजी' नावाचा एक चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शीत झालाय. त्याचं ब्लॅकचं एक तिकिट कितीला माहिताय????????????????????????? तीऽऽऽऽऽऽऽन हजाऽऽऽऽर!!! अर्थातच तामिळनाडूत!
|
आणि ते रजनीकान्तनेच विकत घेतलेले
|
Pancha
| |
| Saturday, June 16, 2007 - 1:44 am: |
| 
|
छोटिसी बात ईन्टर नेट वर पाहिला, अति उत्तम
|
Zakasrao
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:53 am: |
| 
|
अरे तो सिवाजी कालच रिलिज़ झाला आणि त्याची तुलना कालच रिलिज झालेल्या झूम बराबर झूम सोबत व्हायला लाग्लई आहे. सिवाजी सध्या तरी सगळीकडे हाउस फ़ुल आहे अस न्युज चॅनेल वाले सांगत आहेत. कोण जाणार आहे का पहायला?
|
अरे बाबांनो तो सिवाजी जाम हिट होणार आहे.सगले तमिळ वेडे झालेत त्याला बघायला. रजनीच्या फ़िल्मसाठि ३-४ हजाराला black नी तिकिट खरच विकली जातात.
|
दीपान्जली योग, क्रुपया शिवाजी द बॉस हा चित्रपट लवकरात लवकर पाहून आपला चुरचुरीत रीव्ह्यू टाका.
|
Farend
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:23 pm: |
| 
|
आणि जेथे तेथे T च्या मागे H लावणार्या या लोकांनी जेथे पाहिजे तेथे H काढून औरंगजेब शिवाजीला म्हणायचा तसे 'सिवाजी' का केले? रजनी ला स्वत:चे मूळ मराठी नाव नीट न लिहिलेले चालले? का तमिळ मधे सिवाजी म्हणजे काही वेगळाच अर्थ आहे?
|
मी चाललो आहे सिवाजी, द बॉस पहायला येत्या जुन ३० ला. मला १२$ मधे तिकीट मिळाले. माझा रजनीचा हा पहिलाच (आणि कदाचित शेवटचाही) चित्रपट. मी रजनी आणि तमीळ चित्रपटांचा पंखा मुळीच नाही, पण एकदा मला चित्रपट पहायचा जरुर आहे.
|
Dineshvs
| |
| Sunday, June 17, 2007 - 4:46 pm: |
| 
|
मध्यंतरी मी रजनीकांतचा फोटो बघितला होता, तर केस खुप कमी झालेले होते व म्हाताराही दिसत होता. या बॉस सिनेमाच्या क्लिप्स मधे मात्र तो पुर्वीसारखाच दिसतोय ? माजरा क्या है भाई ? DJ मी काल गोलमाल बघितला. त्या हर्षदाची हेअरलाईन मला खुपच मागे वाटली. What you say ? तशी ती गोड आहे. पार्श्वसंगीताचा मात्र अतिरेक झालाय. त्यातला एक हिरो, थेट एका मायबोलिकरासारखा दिसतो. हर्षदावर चित्रित झालेले गाणे, छान आहे. त्याचे चित्रिकरणही छान आहे. पण त्यात यमक जुळावे म्हणुन, मारवा हा शब्द वापरलाय. मारवा या रागाचे संस्कृत नाव आहे, मारुह. आणि त्याचा अर्थ आहे मायेत गुंतु न देणारा, वैराग्य आणणारा. या रागात अशीच गाणी असतात. त्या गाण्याच्या अर्थात कुठेच हे बसत नाही.
|
अरे फ़ारेन्द इतका चिडू नकोस. तमिळ लोक अशा बर्याच चुका करतात इन्ग्लिशमधे. उदाहरणार्थ्- त हा शब्द ते थ लिहितात. म्हणजे ते Vikrant न लिहिता Vikranth लिहितात. Tangvel नाव असेल तर Thangvel लिहितात. स आणि श चा घोळ पण करतात(पण बोलताना श बोलतात).माझ नाव Chinmay न लिहिता Chinmai करतात. H ला एच न म्हणता 'हेच' म्हणतात. तमिळनाडुतुन आलेले काही मित्र आहेत इथे म्हणुन माहिती आहे.सिवाजीला वेगळा अर्थ नाही आहे. स्वप्निल पिक्चर एन्जॉय कर. फ़ार लॉजिक लावलस तर उगाच डोक्याला कटकट होइल तुझ्या. दिनेश रजनी चांगलाच म्हातारा आहे. केस पांढरेच सोड त्याला टक्कल आहे. लोकांनाही माहिती आहे ते. या बाबतितला एक किस्सा -माझे तमिळ मित्र त्याचा एक फ़िल्म बघत असताना मी तिथे गेलो. मला काही कळत नव्हते.बराच वेळ बघितल्यावर रजनीला एक मुलगी आहे हे कळले. तिच्याबद्दल काही काही चालले होते. नंतर थोड्या वेळानी रजनी तिला मिठ्या मारायला लागला, गाण वगैरे. मी माझ्या मित्रांना म्हणालो हे काय घाणेरडे प्रकार चाललेत?? तर मित्र म्हटले ती त्याचि मुलगी नसुन प्रेयसी आहे.
|
Pancha
| |
| Sunday, June 17, 2007 - 10:13 pm: |
| 
|
छोटिसी बात शांत आणि सुंदर चित्रपट आहे. जमल्यास जरुर बघा. मेट्रो ठिक आहे, विचार करायला लावतो.
|
दिनेश , मी नाही पाहिला गोलमाल . पण तुम्ही अमृता खनविलकर बद्दल म्हणत असाल तर yes.. तिचे केस जरा मागे गेले आहेत खरे ! 
|
तमिळ मध्ये श हे अक्षर नाहीये. त्यामुळे शिवाजीचा सिवाजी होतो.
|
हो , परवा शिवमणीला पण सिवामणी म्हणत होते Rehman show मधे .
|
Jadhavad
| |
| Monday, June 18, 2007 - 7:02 am: |
| 
|
नमस्कार मंडळी, काही बघण्यासारखे (आणि न बघण्यासारखे) नवीन मुव्हीज १. स्वामी:- मनोज वाजपेयी चा अभिनय खरच चांगला. worth a dollar watching. २. लाइफ़ इन अ मेट्रो:- विचार करायला लावणारा पेज ३ टाईप मुव्ही. afterall everything saturates to call center culture ३. शुटआऊट एट लोखंडवाला:- Based on true rumoers माया (विवेक) ओके ओके. बाकी सगळे gangsters are time-pass. संजु बाबा म्हातारा दिसतोय. अमिताभ ची गरज नाहीये. ४. झुम बराबर झुम्:- तद्दन रद्दी, पैसे वाया फ़ालतु *&^(*#$@% असा चित्रपट. हा मुव्ही म्हणजे अभीषेक त्याच्या लग्नाचा व हनीमुन चा खर्च तुमच्या कडुन भरुन काढायचा प्रयत्न. अमिताभ असला की मुव्ही हिट, हे आता यशराज ने थांबवायला पाहीजे. त्याला निशब्द आणि चिनी कम मध्ये इंटरेस्ट असेल तर ते करावे, पण एका फ़ालतु गाण्यासाठी (तेच गाणे ३ वेळेस) २ कोटी म्हणजे जास्तच होतात. USD & GBP पब्लीक साठीचा मुव्ही, not for INR . अमिताभ ची परत एकदा गरज नाहीये. स्टोरी नाही तर बाकीच्या cast ची सुद्धा गरज नाहीये. ५. चिनी कम्: नावाप्रमाणे अमिताभ च्या चहात तब्बु ची कमी साखर. लोक म्हातारे होतात तेव्हा त्यांना शेंडेफ़ळ लागते, हे अमिताभ सारखा Prove करतोय (एकदा निशब्द आणि आता साखर कम). जमेची बाजु म्हणजे इल्लया राजा इन हिन्दी. ६. ट ट्रेन्: राजेश खन्ना च्या मुव्ही चे टाईटल चोरल्याने मुव्ही त्यासारखा हीट होत नसतो. Acting करणं म्हणजे modeling आणि body display scenes नव्हे हे ह्या २ Heroins (ह्यांची heroin म्हणण्याची ऐपत नाही हो.) ला सांगायला पाहीजे. नाशिकच्या प.सा. मध्ये ह्यांच्यापेक्षा सरस act's करणारे आहेत. all in all, its again proved that if u r a model or miss india, u cannot think urself as a good actor. (सुश आज घरी बसलीय) अमित.
|
Zakasrao
| |
| Monday, June 18, 2007 - 8:03 am: |
| 
|
आताच एका मित्राला जेवताना विचारल कि काय केलस काल. तो वाइट आणि त्रासलेला चेहरा करुन म्हणाला कि काल मंगलाला जावुन गाडी पार्क करायला २० रु. घालवुन एक रद्दड पिक्चर पाहिला. झूम बराबर झूम. तिकटाच्या पैशाचे दु:ख चेहर्यावर होते आणि पार्किंग च्या पैशाचे दु:ख त्याने बोलुन दाखवले.
|
मित्रांनो, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियांचा. नाही तर आज मला सुद्धा शिक्षा भोगावी लागली असती ( झूम बराबर झूम साठी ) आणि त्यासाठी पैसे सुद्धा मोजावे लागले असते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|