CLIN ESTWOOD CHA MILLIAN DOLLAER BABY HA PICTURE SUDDHA KHUP CHANGLA AAHE
|
परवा 'सरीवर सरी' पाहीला! क्वचित एखादा चित्रपट सुरुवात ते शेवट संपूर्ण आवडतो, हा त्यापैकी एक. मोहन जोशी चा अभिनय मस्त आहे. एकदम आवडेश चित्रपट! 'चीनी कम' पाहीला, नितांत फ़ालतु चित्रपट! हाणा त्या रॉबीनहूडला!
|
KD, तुला शेवट पटला का सरीवर सरीचा ?
|
हो, आई वडील मुलीला शेवटी पाठींबा देतात हेच योग्य वाटते किंवा हेच शक्य होते. तुला काय शेवट अभिप्रेत होता?
|
तसं नाही , पण ती शेवटी केवळ स्वत : ला आजमावण्या साठी nudes करायचे ठरवते ते थोडे extreme वाटले , शिवाय ते करण्या पूर्वी आधी घरी जाते तेंव्हा या आधी tank top घालण्या वरून भडकणारे तिचे आई वडिल केवळ तिच्या एका dialog ने convince होतात हे काही पटले नाही . In general, लता नार्वेकरांच्या movie सुरु होण्या आधीच्या interview मधे त्या म्हणल्या कि modelling profession विषयीची सर्व सामान्य लोकांची भीती काढून टाकायची आहे , सर्व सामान्य आई वडिलांना आपल्या मुलीने हे profession निवडले तर हे विश्व खूप भयानक आहे असा गैरसमज दूर करायचाय ! पण प्रत्यक्षात ,' सरीवर सरी ' मधे त्यांनी या profession चे -ve points च जास्त दाखवलेत असं मला तरी वाटलं . 
|
डिजे अगदी बरोबर. खरतर त्या चित्रपटाचा उच्च बिंदु म्हणजे मोहन जोशी जेव्हा त्याचा मुलीच्या फोटोज ला प्रेमाने कुरवाळतो व ते दुसर्या व्यक्तींना बिभित्स वाटते. तेव्हा मोहन जोशी जे बोलतो तो म्हनजे अत्युच्च बिंदु तिथे तो पिक्चर संपवायला पाहीजे होता. पण ते न्युड वैगरे आनुन त्या पिक्चर ला एक वेगळे वळन लागते व मुळ उद्देश बाजुला राहतो. कहर म्हनजे शेवटचे वाक्य.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:22 am: |
| 
|
न्युड्स केल्याने स्वातंत्र्य किंवा तिला जे मिळवायच आहे ते कसे काय मिळणार हे नाहि कळाले पण बाकि चित्रपट मस्त आहे. मला तर मानसी साळवे च कॅरेक्टर जास्त आवडल. त्या चाकोरे मधे राहुन ही ती जे कष्ट घेते जे साध्य करुन दाखवते ते जास्त भावल. त्यातल विशेष म्हणजे तिचा चष्मा फ़ुटला असताना ती घरी न संगता त्याच्या एका शाबुत राहिलेल्या काचेतुन सगळा अभ्यास करते आणि पेपर सुधा लिहिते आणि चांगल्या मार्कानी पास होते तो सिन मला खुप आवडला होता. त्यावेळी डोळ्यात आपोआप पाणी आल होत. माहित नाहि पण मला तेच कॅरेक्टर जास्त आवडल.
|
Rani_2007
| |
| Wednesday, June 13, 2007 - 2:41 pm: |
| 
|
'चिनीकम' एकदम फ़ाल्तू सिनेमा आहे..इथल्या प्रतिक्रिया वाचून मागच्या weekend ला आणला. बघून पुर्ण weekend खराब झाल्यासारखे वाटले. मागच्या आठवड्यात 'The Shooter' पाहिला..बरा आहे.. US मध्ये कोणत्या स्तरापर्यंत भ्रष्टाचार जाऊ शकतो हे चांगले दाखवले आहे. एकदा जरूर बघावा.
|
Sas
| |
| Wednesday, June 13, 2007 - 5:42 pm: |
| 
|
मनस्वी मी आमच्या ओळखिच्यांच्या कडे पाहिले दोन्ही movies but I guess "दाना बाजारात" मराठी DVD मिळतात.'Dana Bazar' is in Fremont area Sorry for dely in reply
|
Disha013
| |
| Wednesday, June 13, 2007 - 7:01 pm: |
| 
|
'चिनी कम' OK OK आहे. ते पण अमिताभ मुळे. कमीत कमी त्या निशब्द सारखा लंम्पट म्हातारा नाही वाटत. तबु आता खरच चौतिशीची वाटतेय. परेश रावल ला वाया घालवलेय. उपोषणाला बसतो काय नि अमिताभचे भाषण ऐकुन तबुला जावु देतो काय! एवढे असं काय होतं त्या भाषणात देव जाणे. ती छोटी मुलगी मलाही नाही पटली अगदी नावापासुनच. ती गेल्यावर अमिताभ जी पळापळ करतो तेही पटत नाही. तेवढी maturity असायला हवी त्या वयात. 'चिनी कम' गाणे छान जमलेय.
|
Admln
| |
| Wednesday, June 13, 2007 - 7:47 pm: |
| 
|
चिनि कम एकदम भंकस चित्रपट आहे. चुकुनही बघु नका. इथल्या इतरांना कसा आवडला?
|
हो ना मी एकदम सहमत आहे पण मी सान्गु का तब्बु नी अमिताभ मुळेच तो चित्रपट निदान शेवटपर्यन्त पाहिला जातो प्रेक्षकान्न काय मूर्ख समजतात का हे लोक? चौतीस ची तरुणी नव्हे बाई चौसष्ट च्या म्हातार्याच्या प्रेमात पडते पूर्णपणे अपट्य!! बाकी संवाद उत्तम कामे अप्रतिम (काही संवाद ऐकुन आपण अवाक होतो अर्थात म्हणजे परेश रावल तब्बुचे अफ़ेअर ऐकुन म्हणतो तुम मेरे जितेजी ये शादी नही कर सकती..तर ही बया त्याला म्हणते तो बताओ आप कब जा रहे हो??) आणि हो.. सरीवर सरी याSSSक किती भंपक आहे तो कोणाला तो आवडू शकतो वा श्रेयस नीना मधुरा मिलिन्द सगळ्यान्ची कामे राग येण्यासारखी आहेत त्यात.. नाही म्हणायला मोहन जोशी चे काम सरस.. तो मुलीच्या फोटोचा सीन तर अप्रतिम.. पण म्हणुन काय पूर्ण सिनेमा बघणीय अजिबात होत नही असला चित्रपट मी थिएटरला जाउन पहिल्याचे मला आजही दु:ख होते..
|
Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:08 am: |
| 
|
ऋतु, किती दिवसानंतर आलीस मायबोलिवर. तीही इतक्या आवेशात :-) बर आता आलीच आहेस तर जरा कवितेच्या बीबीवर तुझ्याकडून काही..
|
Rajya
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:56 am: |
| 
|
काल भेजा फ्राय बघितला. मस्त काॅमेडी, डोक्याला ताप नाही, विशेष म्हणजे गाणी नाहीत आणि याच्या वरताण म्हणजे २ तासात खेळ खल्लास.
|
ए प्रेक्षकानो नेमसेक पहिलाये का कुणी? मी कादम्बरी वाचली जबरी आहे.. सो पिक्चर पहावासा वाटतोय बी अहो माझे नावच तसेय ना हिरवा रुतु अनपेक्षित येणार्या पावसाचा नी येतो तेव्हा तो बरसतो च नाही का? हो यायचेच आहे गुलमोहरावरही बरे झाले तुम्ही आठवण केलीत..
|
तबु आता खरच चौतिशीची वाटतेय. <<<काहीतरीच काय , कमीत कमी चाळीशीची दिसते तब्बु त्यात !
|
Disha013
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:00 pm: |
| 
|
चुकुन झालं ते!डोळ्यांसमोर आकडा होता ४३ पण पिक्चर मधला चौतिस ट्याईप झाला की!
|
अमिताभच वय १० वर्षाने कमी आणि तीच १० वर्षाने जास्त दाखवल असतं तर जरा पटल असत जास्त :p
|
ए मागे इथे कुणीतरी गोलमाल या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू दिला होता ना..मी पाहिला काल च.. एकदम सुन्दर सगळ्यान्चीच कामे मस्त.. अवधूत गुप्तेचे संगीत व्वा!! सुनील तावडेचे काम अगदीच छान...जितेन्द्र जोशी सुध्दा गोडच.. भरत जाधव काय सहीच ती नटी कोण आहे..दिसते गोड.. काम सुध्दा कामचलाऊ बरे केलेय.. नवखेपणा एक दोन प्रसंगात दिसतो...पण चलता है टाईप.. एकूणच कथा छानेय..मेरे को तो अच्छी लगी
|
Zakasrao
| |
| Friday, June 15, 2007 - 4:51 am: |
| 
|
ऋतु ति नटी कोणितरी खानविलकर आडनावाची आहे बहुतेक. आणि अवधुत गुप्ते नी जे जे काहि मिळेल ते बडवुन संगित दिलय. मराठीत पहिल्यांदाच अस ढांग चिक संगीत आहे.
|