|
Dakshina
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:14 am: |
| 
|
काल मी डब्यातून दोडक्याची भाजी नेली होती. मैत्रिणीला टेस्ट करायला दिली. पोळी खाऊन झाली तरी तिची भाजी उरलेली.. मी म्हणलं 'का ग? भाजी टाकून दिलीस..?' ती म्हणाली, "पुलाव के साथ, मूँह को लगाने के लिए रख्खी हैं." बराच वेळ विचार केल्यावर कळलं की तोंडी लावायला ठेवली होती ते.
|
मला पडलेला प्रश्न.. तुम्ही दोघी मराठीतून बोलू शकत असताना तिने हिंदीतून उत्तर का द्यावं?? तसं माझं हिंदी बर्यापैकी आहे पण तरीही परवा बॉसला काहीतरी सांगताना मी म्हटलं "वो मेल किया तो भी जवाब नही देता. तर मी परत परत क्यु मेल करू??" बॉस वैतागला माझ्यावर. "जे काय बोलायचं ते धड बोल" "मी तीनदा मेल केलं त्याला... पर वो साला reply ही नही करता... " बॉसने कपाळावर हात मारला.
|
Nkashi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 12:50 pm: |
| 
|
आम्हा मैत्रिणींचा एक वेंधळेपणा... १० वी ची परिक्षा झाली होती आणि एका non महाराष्ट्रियन मैत्रिणी कडे गेलो होतो. तिथुन निघताना तिच्या आईला म्हणलो "अच्छा आंटी हम निघते हे" 
|
मूँह को लगाने के लिए रख्खी हैं. दक्षिणा... ह. ह. पु. वा.
|
पर वो साला reply\ ह. ह. पु. वा. नन्दिनी... बॉसला असं उत्तर!
|
Supermom
| |
| Tuesday, May 22, 2007 - 1:25 pm: |
| 
|
माझ्या एका दूरच्या बहिणीने तिच्या सासूचा सांगितलेला भयंकर म्हणजे भयंकरच किस्सा. नागपूरला उन्हाळ्यात जीवघेणी गर्मी असते. घरोघरी वाळ्याच्या ताट्या लावतात. त्यावर पाणी घालायला काही घरी नोकरही असतात. सासूबाईंच्या घरी व शेजारी मिळून एकच नोकर होता. एक दिवस सासूबाई त्याला रागावून म्हणाल्या, 'क्यु रे, तुम उनकी तट्टी पे पानी डालता है, और मेरी तट्टी पे नही डालता.' आम्ही हसून हसून लोटपोट. तसेच माझ्या मुंबईच्या मावशी कडे घडलेला किस्सा मावशी- 'अरे वो शेजारी है ना उनका पोपट मर गया...' मावशीची सिंधी शेजारीण- 'तो चल, पिठलंभात लेके जायेंगे क्या?'
|
Runi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:42 pm: |
| 
|
आई शप्पथ..खो खो खो.... सुमॉ, अशक्य हसवता तुम्ही.
|
Manjud
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:24 am: |
| 
|
B.Com च्या class ला एका वर्गात १०० students असायचे. class मधे तीन powerful air conditioners लावले होते. परंतू पुढे बसणार्याना खुपच थंडी वाजायची. असेच एकदा lecture चालू असताना थंडी वाजली म्हणून सरांना A.C. low करण्याची request केली. त्यानी विचारले "का"? तर आमच्यातल्या एकीने उत्तर दिले, "सर, बहोत ठंडी बज रही है" आता मराठीत थंडी वाजते म्हणुन हिंदी मधे ठंडी बजेल का?
|
Dakshina
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:06 am: |
| 
|
मी माझ्या Boss ला फोनवर सांगत होते... "पहले तो उसने कुछ बताया नहीं, पर जब मैंने उसको खोद खोद के पुछा तो बोलदीया.."
|
Aditi
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:49 am: |
| 
|
परवाच ऑफीस मध्ये घडलेला किस्सा एकाचा वाढदिवस होता म्हणुन केक आणून केक कापायचा समारंभ पार पडला अणि मग एकाचे मित्रप्रेम जागले. त्याने पुढे होउन, केक चा एक मोठ्ठा तुकडा कापला अनि ज्याचा वाढदिवस होता त्याच्या जवळ जाउन म्हणले, 'चलो, आ करो, जल्दिसे आ करो.' 
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 7:01 am: |
| 
|
जरा हे भी देखो भोत छान हिंदी है!

|
मी माझ्या मित्रांना म्हणालो 'हम सब वहां बैठके ठरवेंगे कहां जाना है' माझा मित्र-'अरे जय पिठ मळणेको जल्दी आ.' मी एका भिंतीवरच्या फ़ुग्याला (जो बरेच दिवस भिंतिवर असल्याने हवा गेलेली होती) बघुन इस फ़ुगेमे हवा भर सकते है क्या??
|
Runi
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:46 pm: |
| 
|
मी एका भिंतीवरच्या फ़ुग्याला (जो बरेच दिवस भिंतिवर असल्याने हवा गेलेली होती) बघुन इस फ़ुगेमे हवा भर सकते है क्या?? >>> चिन्मय, माझी मैत्रीण जी थोडेफार मराठी बोलते, ती एकदा हवा गेलेला फुगा बघुन म्हणाली की अग यातला वारा गेला की.
|
माझा नवरा ' वारा आला ', ऐवजी ' हवा चालतीये ' म्हणतो ! 
|
तरुण तुर्क म्हतारे अर्क नाटकात पण 'सायकलच्या चाकातला वारा गेला की 'असा dialogue आहे
|
Dakshina
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:21 am: |
| 
|
पांडू हवालदार मध्ये पण दादा कोंडकेंचे भन्नाट संवाद आहेत. दादा आणि अशोक सराफ़ चोरून कोंबड्या नेणारा ट्रक पकडतात, तेव्हा, driver २ कोंबड्या अशोक सराफ़ला लाच म्हणून देऊ करतो. आणि दादाला लाच घेतलेली आवडत नसते. त्यामुळे उगिच त्याच्यासमोर अशोक सराफ़ त्या Driver ला म्हणतो... "हमको लाच देता है? तुमको तुरूंग में डालेगा, तब तुम्हारा डोला उघडेगा.."
|
अशोकजींनी कुठल्यातरी चित्रपटात कोकणी मुसलमानाची भूमिका केली होती, त्यातही असेच मस्त संवाद होते, तेही ओरिजिनल, "वो बाई का शेवई देखो कैसा पातल है, नहीं तो तुम्हारा देखो... गांडुल के जैसा जाडा जाडा!!
|
Dakshina
| |
| Monday, June 11, 2007 - 4:39 am: |
| 
|
गांडूल के जैसा जाडा जाडा....  
|
Himscool
| |
| Monday, June 11, 2007 - 8:15 am: |
| 
|
हमारे इधर शादी मध्ये नवरा मुलगा नवरी मुलगीको घास भरवता है
|
Shailaja
| |
| Monday, June 11, 2007 - 9:34 am: |
| 
|
एकदा माझ्या आईने एका अ-मराठी काम वाली ला विचारले की "तुम हमारे भांडे घासेंगी क्या?"
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|