|
खूप दिवसापासून या पिक्चरबद्दल लिहायचं होतं. अर्थात या बीबीवर लिहीला जाणारा म्हणजे शाहरूख खानवालाच देवदास. मला या पिक्चरबाबत काही मूलभूत प्रश्नानी छळलेलं आहे. भन्सालीने आधी सेट कॉस्च्युम वगैरे बनवून घेतला आणि मग विषय ठरवला का? कारण पिक्चरभर चकाचक श्रीमंती दिसत राहते. बाकी काहीही नाही. त्यात तो ऐश्वर्याच्या दिवट्याने एक वैताग आणला आहे. एवढे सदाजळणारे दिवे असतील तर लोड शेडींगचा प्रश्न सुटेल ना. बरं त्या दिवेवाल्या गाणाय ऐश्वर्या सोडून बाकी सगळ्या एकसारख्या साडीत, अगदी युनिफ़ॉर्म घातल्यासारख्या. अचात सीन्: गाण्यच्या सुरुवातीला त्यातल्या एक दोघीजणी दिव्यावर फ़ुंकर मारतात तरीत तो विझत नाही. मुळात शाहरूख दिलीप कुमारची नक्कल करतो हे सर्वाना ठाऊक आहे त्यामुळे यात त्याने "अभिनय" केला असं मी तरी म्हणणार नाही. या पिक्चरला सर्वोत्कृष्ट संवादाचं पारितोषिक मिळाले आहे. "हम लाइलाज हो गये है..." हा नवीन संवाद आहे??? "एक दिन ऐसा आयेगा जब वो कहेगा दुनिया छोड दो...." हा आधी कुणीच ऐकला नाही?? आणि एका ठाकुराची बायको आणि एक तवायफ़ एकत्र नाचतात.. घरातले सगळे ते कौतुकाने पाहतात. त्यावेळच्या समाजव्यवस्थेचा काहीच अभ्यास नाही का?? त्याच गाण्यात "मांग मे भर लेना सिंदूर....???" अरे काय चाललय काय? पूर्ण पिक्चर कादंबरीवर आधारित असूनही जस्तीत जास्त मूर्ख कसा करता येईल याकडे कल आहे. निर्मितीमूल्ये चांगलीइ ठेवली की चांगला पिक्चर बनतो अशी बहुतेकाची समजूत असते. ज्यानी दिलीप कुमारचा (खरं तर बिमल रॉयचा देवदास पाहिला आहे. ते याच्य वाटेला जाणार सुद्धा नाहीत. (मला कुंदनलाल सैगलचा देवदास पहायचा आहे) मुळात देवदास ही शोकांतिका आहे याचाच विसर दिग्दर्शकाअला पडलेला आहे. एका प्रेस कॉन्फ़रन्समधे भन्सालीने सलमान खान बाजीराव, रानी मुखर्जी त्याची पत्नी (मी नाव विसरले) आणि कतरीना कैफ़ मस्तानी असा पिक्चर बनवणार असल्याचे सांगितले. माझ्या डोळ्यासमोर सलमानच्या पुढ्यात गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या" गाण्यावर रानी आणि कतरीना फ़ुगडी खेळत आहेत असं दृश्य नाचायला लागलं होतं. सुदैवाने सध्या तो प्रोजेक्ट लांबला आहे.
|
Dakshina
| |
| Monday, June 11, 2007 - 10:04 am: |
| 
|
खरंय असे चित्रपट हे निव्वळ सामान्य माणसाची टर उडवतात. मोठाले वाडे, उँची साड्या, दागिने, भरपूर पैसा.... या बायकांना काही काम नसतात. घरं पण इतकी spick and Spine की बास. पण हे सगळं त्या करतात कधी? अमची कंबरडी मोडतात घरं साफ़ करता करता... आणि ती ऐश्वर्या तर सहनच होत नाही.. नुसती शोभेची बाहुली असल्यासारखी इकडून तिकडे हुंदडत असते. तिला काय शाळा, घरकाम नसतं वाटतं. बघेल तेव्हा... झोपळ्यात, नहीतर दिवे लावत, नाहीतर बांगड्या घालत... ष्रुंगार.... दुसरं काही काम नाही... यांच्या घरात लाईट, पाण्याची बोंब नसते वाटतं कधी, भाजी आणणे, तांदूळ संपणे असल्या स्वाभाविक गोष्टी पण घडत नाहीत. मी पण देवदास काही पुर्ण लक्षं देऊन पाहीलेला नाही... पण जो पाहिलाय त्यात मला पैसा आणि श्रीमंतीचा भडकपणा नक्किच जाणवला... तशा बर्याच गोष्टी आहेत लिहीण्याजोग्या, पण वेळ कुणी वाया घालवावा? आणि खरं म्हणजे या सिनेम्यांपेक्षा त्या सास बहूच्या serials जास्त अचाट आणि अतर्क्य असतात....
|
Mandard
| |
| Monday, June 11, 2007 - 10:38 am: |
| 
|
दिलिपकुमारचा देवदास पण बोअर आहे.त्यामानाने नव्या देवदास मधे भारी सेट, चकाचक कोठी, इ. गोष्टी असल्यामुळे जरा बरा वाटला. दिलिपकुमारला उगाचच लोकांनी डोक्यावर चढवलेला आहे.
|
Zakasrao
| |
| Monday, June 11, 2007 - 11:33 am: |
| 
|
मला मुळातच देवदास पटला नाहि त्यामुळे मी पाहिलाच नाहि. त्यातला चमचमाट पाहुन मला एक अंतिम सत्य (हा शब्द राफ़ा यांच्याकडुन साभार) समजले. देवदास चा बाप एक जमिन दार होता म्हणुन त्याला कोणतीहिई जबाबदारी नव्हती त्यामुळे एका पोरिशी लग्न झाल नाहि म्हणुन त्याने त्याच आयुष्य दारुच्या ग्लासात आणि अय्याशीत बुडवायच ठरवल. तुमचा आणि आमचा सर्व सामान्यांचा बाप जमीनदार नसतो त्यातच आपल्याला नोकरी,बहिणीचे लग्न,घरची जबाबदारी अस बरच काहि असत म्हणुन आपण अस काहि करत नाही. मुळातच ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्याशीच लग्न झाल पाहिजे हा अट्टाहास का? तस केल तरच प्रेम खर का? आणि तस झाल नाहि तर स्वत्:चा नाश करुन घेण आपल्या मागच्या जबाबदारी टाळुन म्हणजे महान प्रेम का? बोगस आहे हे तत्वज्ञान. त्यापेक्षा मला प्रेमात हरलेला आणि दुसर्याबरोबर संसार करणारा पण तिच्याशी प्रामाणिक असलेला,स्वत्:च्या जबाबदार्या ओळखुन जगणारा एक सर्वसामान्य माणुस त्या देवदासपेक्षा लाखपटीने हिरो वाटतो. आपका क्या खयाल हे इस बारे में.
|
Dakshina
| |
| Monday, June 11, 2007 - 11:48 am: |
| 
|
झकासराव.. तुम्ही लाखात एक बोललात..... माझं अनुमोदन आहे.... आणि हे बॉलिवूडवाले सामान्य हिरो वर चित्रपट काढणार नाहीत, पण त्या दारूत बूडालेल्या देवदासावर २ चित्रपट काढतील...
|
देवदास हा स्वत्: एक पराभूत माणूस आहे. ऐन वेळी तो कच खातो. पारो त्याच्या दरवाजपर्य्नत येते. पण तो तिला स्विकारायची हिंमत तो दाखवू शकत नाही. त्यानंतत आपले चुकले हे वास्तव देखील तो स्विकारु शकत नाही. एका कोठीवालीच्या घरात तो राहतो पण तिला अंगाला हात लावू देत नाही कारण ती वेश्या आणि हा ब्राह्मण. (मूळ कादंबरीचे english translation मधे हे सगळं खूप छान घेतलं आहे. बिमलदाच्या देवदास मधे देवदासचे हे "हरणं" खूप व्य्वस्थित घेतलं होतं. कुठेही त्याला glorify करण्याचा निष्फ़ळ प्रयत्न नव्हता. देवदास स्वत्:च्या चुकाची सजा स्वत्: भोगतो. दुसर्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा स्वत्:ला उद्ध्वस्त करतो. पारो ही सामान्य मुलगी आहे. पण तरीही एका क्षणी ती स्वत्:मधलाच असामान्यपणा दाखवून जाते. आणि जेव्हा तिला पटतं की ती देवाशिवाय राहू शकते. तेव्हा ती जगायला शिकते. भन्सालीच्या देवदासमधे या सर्व गोष्टी गायब होत्या. मुळात पारोला आपल्या दरवाज्यात कुणी येऊन मेलय हेच माहित नसतं. देवाचं प्रेत डोंबारीसुद्धा उचलायला तयार नसतात. इथे तर धावत येणारी पारो आणि वेड लागल्यासारखा तिचा नवरा ओरडतोय "दरवाजा बंद करो" आता त्याला काय ही मरणार्या देवदासाबरोबर सती जाते असं वाटलं की काय??? मंदार, माफ़ करा, पण अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमार शाहरुखपेक्षा निश्चितच सरस आहे. "देवदास" मधे दिलीप कुमार जेव्हा पहिल्यादा दारुचा ग्लास उचलतो तो प्रसंग बघा. त्याचे डोळे बोलतात.
|
दिलीप कुमार हा नक्कीच ग्रेट अभिनेता आहे.खरं तर हे सांगण्याचीही वेळ येऊ नये.मलाही सुरुवातीला दिलीप कुमार अजिबात आवडत नसे. असेच वाटे की लोकानी याला विनाकारण चढवून ठेवलेय. पण एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार होण्याचाही क्षण असतो अन तो यावा लागतो. आदमी हा मनोजकुमार(आई गं आनखी एक दिलिपकुमारची कार्बन कॉपी!)आणि दिलिपकुमार असलेला तसा सामान्य चित्रपट. पण त्यातला एक पियानोजवळचा सीन आहे मनोजकुमारसमवेत. तो पाहताच मला त्या क्षणी त्याची ताकत जाणवली ती आजता गायत. खरा मला त्याचा आवडलेला रोल म्हणजे अमिताभबरोबर शक्तीमधला. सौदागर आणि कर्मामधलेही प्रभावी रोल आहेत. अर्थात ओमप्रकाशने गोपी आणि सगीना महतो मध्ये त्यालाही 'खाल्ले' होते!!!
|
आणि एका ठाकुराची बायको आणि एक तवायफ़ एकत्र नाचतात.. घरातले सगळे ते कौतुकाने पाहतात. त्यावेळच्या समाजव्यवस्थेचा काहीच अभ्यास नाही का?? त्याच गाण्यात "मांग मे भर लेना सिंदूर....???" अरे काय चाललय काय? <<<<तेंव्हा पारो घरातल्या इतरांना चन्द्रमुखी तिची मैत्रीण असल्याचे सांगते , नंतर जेंव्हा मिलिंद गुणाजीला कळते तेंव्हा तो करतोच आरडा ओरडा . त्या वेळी चन्द्रमुखीचा आणि त्याचा dialog चांगला घेतलाय कि उलट ! मला तरी अवडला तो scene!
|
Disha013
| |
| Monday, June 11, 2007 - 5:24 pm: |
| 
|
हा देवदास एक चक्रम माणुस होता. बाकी 'ज्याच्यात परिस्थीतीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य नसते तो व्यसनांचा आधार घेतो' याचा अजुन एक पुरावा म्हणजे देवदास! अन शाहरुखने तर अजुनच ओंगळवाणा करुन टाकला त्याला. ऐश्वर्या सतत दिवे पेटवते अन गाणी गाते. नाचते. बास. देवदास फ़िदा. अन तिच्यावर प्रेम करतो म्हण्याचं अन कोठ्यावर जावुन चंद्रमुखीला बघत बसायचं!डोंबलाचं प्रेम! या पिक्चरमधेच एक अफ़लातुन गाणे-डान्स आहे.किरण खेर ने केलेला...
मी तर पहिल्यांदा बघताना हसुन लोट पोट झालेली. आरडाओरडा करत भर सभेत नाचवलय बिचारीला. जुना देवदास मी पाहिलेला नाही. त्यात असे काही होते का?
|
Mandard
| |
| Monday, June 11, 2007 - 5:30 pm: |
| 
|
मंदार, माफ़ करा, पण अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमार शाहरुखपेक्षा निश्चितच सरस आहे. "देवदास" मधे दिलीप कुमार जेव्हा पहिल्यादा दारुचा ग्लास उचलतो तो प्रसंग बघा. त्याचे डोळे बोलतात. ))))))) मी कुठे असे म्हणालो की SRK चांगला आहे दिलिपकुमार पेक्षा.
|
मुळ कादंबरित आणि पहिल्या (दोन्हि) चित्रपटात पारो आणि चंद्रमुखिचि भेटच होत नाहि. दुर्गापुजेसाठि माति आणायला जाण हा एक उपचार होता कोणा कुलिन स्त्रीला राजेरोस पणे कोठ्याच्या आत जाता येइल अशि सोय नव्हति. मुळात शहरात (लंडन मध्ये नाहि) शिकलेला देवदास जर चनंद्रमुखिला तुछ्छ समजतो तर अशिक्षित पारो तिच्याशि मैत्रि करण्याइतपत पुढारलेलि असेल हे कल्पनेला ताण देवुनहि पटत नाहि. original picture मध्ये मरणासन्न देवदास ला भेटायला पारो पाल्खितुन आणि चंद्रमुखि पायि (गरिबिमुळे) जाते इथे तर पारोपेक्षाहि चंद्रमुखि श्रीमंत वाटलि! पारो हि मुळात एक स्वाभिमानि पण सर्वसामान्य स्त्री आहे. कादंबरित देव्दास जेंव्हा आपल्या बालमैत्रिणिला पहिल्यांदा बघतो तेन्व्हा तिच्या वयात येण्याचा उल्लेख करतो सौंदर्याचा नाहि. पारो आणि देवदास च्या लग्नाला देवदास च्या वडिलांचा विरोध असतो कारण गरिब पारो येताना हुंडा आणणार नाहि म्हणुन. ती जर 'निच कुल' मधलि असति तर देवदास पेक्षाहि घरंदाज अश्या जमीन्दार कुळात कशि उजवलि गेलि असति? दुसरिहि बायको त्याकळि उच्चजातितलिच लागत असे!
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 6:04 pm: |
| 
|
आता कादंबरीच वाचायचीये मला. दिलिपकुमार चा पाह्यला होता आणि देवदास ही व्यक्तिरेखा मुलात न आवडूनही त्या सिनेमाच्या प्रेमात पडले होते. सैगल वर रिसर्च करताना त्याच्या देवदास मधलीही काही दृश्ये बघितली होती. आणि तीही मोहक वाटली होती. स्लो पण मोहक. पण हा भन्साळी देवदास बघून मला अति प्रखर उजेडात ३ तास सलग बसल्यावर कशी भोवळ येईल तसं झालं.. अधून मधून माधुरी दिसत होती तेवढाच विसावा!! बाकी भयाण.. इतका चकचकाट की डोळे दुखू लागले माझे. यापरीस गणपती च्या आराशीतली ढांगचिक गाण्यावर नाचणारी लायटींग परवडली. एक गंमत.. देवदास शिकून परत येण्याचि बातमी कळते ते दृश्य आहे ना त्यात स्मिता जयकर स्वतःच्या आकाराचे भान न ठेवता, हा सेट आहे तो मोडू शकतो याचे भान न ठेवता धावत सुटते.. तो सीन मला असा दिसला... स्मिता जयकर पळत सुटते 'मेरा देव आ रहा है!' अचानक ती स्मिता जयकर नसून गॅसचा गबदुल्या सिलेंडर असतो ज्याला व्यंगचित्रात काढतात ना तसे इतकुस्से पाय आणि हात आणि चेहरा असतो. आणि त्याम इतकुश्श्या पायांमुळे तो भला थोरला सिलेंडर कितीही जोरात धावला तरी बुदुबुदु पळल्यासारखाच वाटतो.... असं दृश्य खरच दिसलं मला... मी आजूबाजूला पाह्य्लं आपण समांतर विश्वात गेलो नाहीत ना म्हणून. नवरा विचारतो काय झालं आणि मी कुठे काय काहीच तर नाही असं करत परत सिनेमा बघू लागले. संपूर्ण सिनेमाभर स्मिता जयकर च्या मागून अधून मधून तोच सिलेंडर दिसत होता मला. दुसरा भयाण प्रकार यातला म्हणजे... माझ्या थोड्याफार संशोधनाच्या आधारे एवढे मी नक्की सांगू शकते की जगभरातल्या कुठल्याही संस्कृतींमधे घरंदाज स्त्रीया, गर्त्या बायका आणि कोठेवाल्या, तमासगिरणी, तवयफ, गणिका यांच्या दिसण्यात, नटण्यात खूपच फरक असतो. पण मग आमचं घराणं म्हणून कंठशोष करणार्या या देवादासच्या घरातल्या बायका, कायस्थ म्हणून हिणवल्या जाणार्या पारूच्या घरातल्या बायका आणि चंद्रमुखीच्या कोठीवरच्या बायका यांच्यात कपडे, नटणे, दागिने यात काही फरकच दिसला नाही. आता म्हणाल चांभाराचं लक्ष चपलेकडे पण काय करणार गेलं हो तिकडे लक्ष! बाकी मला पडलेला अजून एक मूलहूत प्रश्न.. यात काही भारतीय किंवा जागतिक धावण्याच्या स्पर्धेचे छुपे संदर्भ आहेत काय? नाही सगळेच प्रॅक्टीस करत असल्यासारखे विविध वेळेला धावत असतात. अजून मला आणि नवर्याला पडलेला मूलभूत प्रश्न... जनरली दारू पिऊन चढते. मग देवदास आणि इतर बेवड्यांना ओतूनच कशी चढली? उरलेल्या सिनेमाबद्दल न बोलणेच बरे...
|
मुळ कादंबरित आणि पहिल्या (दोन्हि) चित्रपटात पारो आणि चंद्रमुखिचि भेटच होत नाहि. दुर्गापुजेसाठि माति आणायला जाण हा एक उपचार होता कोणा कुलिन स्त्रीला राजेरोस पणे कोठ्याच्या आत जाता येइल अशि सोय नव्हति. मुळात शहरात (लंडन मध्ये नाहि) शिकलेला देवदास जर चनंद्रमुखिला तुछ्छ समजतो तर अशिक्षित पारो तिच्याशि मैत्रि करण्याइतपत पुढारलेलि असेल हे कल्पनेला ताण देवुनहि पटत नाहि. <<<<<भन्साली चा देवदास सरदचन्द्रंच्या कादंबरीशी सम्पूर्ण पणे प्रामणिक असल्याचा दावा करत नाही , भन्सालीची note आहे movie सुरु होण्या आधी . 
|
Asami
| |
| Monday, June 11, 2007 - 7:11 pm: |
| 
|
भन्साली चा देवदास सरदचन्द्रंच्या कादंबरीशी सम्पूर्ण पणे प्रामणिक असल्याचा दावा करत नाही , >> हो तेव्हढाच काय तो प्रामाणिकपणा आहे त्यात मूळात कादंबरीमधे कुठेही देवदासचे उदात्तीकरण केलेले नाही. हे असेच का नि तसेच का नाही ह्याची उत्तरे कोणीच देउ शकणार नाही. काल्पनिक कथा आहे आणी लेखकाला जे पटले ते त्याने लिहिलेय , असे असे झाले अशा स्वरूपामधे असे समजा हवे तर. DK च्या देवदासमधेही देवदास कुठेही hero वाटत नाही. मला तरी कुठेही DK खटकल्याचे आठवत नाही. personally देवदास्पेक्षा DK गंगा जमुनामधे जास्ती आवडला होता. ह्याउलट नवा देवदास हा SRK, MD, Ash ह्यांना encash करायला बनवला आहे असे feeling येत राहते. भले movie interpretation असू दे पण देवदास ऐवजी अजून काहि नाव दिले असते तर हे लिहिण्याची वेळ आली नसती
|
Farend
| |
| Monday, June 11, 2007 - 8:02 pm: |
| 
|
नवीन देवदास बद्दल अजून एक मत म्हणजे गाण्यांमधे बंगालीपणा जाणवत नाही. दिलीप कुमारच्या देवदास मधे S D Burman मुळे तो फील आला. मला तर 'डोला रे डोला रे डोला' हे गाणे मूळ चित्रपटापेक्षा 'मुन्नाभाई MBBS ' मधल्या त्या रॅगिंग शॉट मधेच जास्त आवडते
|
भले movie interpretation असू दे पण देवदास ऐवजी अजून काहि नाव दिले असते तर हे लिहिण्याची वेळ आली नसती <<< ' बेवडादास ' नाव हवे होते या नावाचा जॉनी लिव्हर चा विडंबन पट येणार होता मधे !
|
'इतका चकचकाट की डोळे दुखू लागले माझे. यापरीस गणपती च्या आराशीतली ढांगचिक गाण्यावर नाचणारी लायटींग परवडली. ' १००% सत्य. चंद्रमुखिचा कोठा आहे कि झुंबरांचे showroom काहि कळतच नाहि. 'जगभरातल्या कुठल्याही संस्कृतींमधे घरंदाज स्त्रीया, गर्त्या बायका आणि कोठेवाल्या, तमासगिरणी, तवयफ, गणिका यांच्या दिसण्यात, नटण्यात खूपच फरक असतो. ' दिसण्यात आणि नाचण्यातहि इतक कमालिच साम्य आहे कि पारोने चंद्रमुखिकडुन grooming lessons घेतलेत कि काय अशि शंका येत होति मला पुर्णवेळ.
|
Mbhure
| |
| Monday, June 11, 2007 - 10:11 pm: |
| 
|
मुळातच सं. लि. भ. हाच एक Hyped director आहे. त्याने त्याचा कुठचाही सिनेमा बनवताना सखोल विचार केलेला वाटत नाही. (आणि तरीही ते मी सहन करत बघतो) विमल रॉय, हृषिकेश मुखर्जी आणि इतर बंगाली दिग्दर्शक मुळ अभ्यासू वृत्ती असलेले. त्यामुळे चित्रपट कुठचाही असो,देवदास किंवा मधुमती, आजही बघताना आनंद देतात. सलिभ चा देवदास ही त्या कादंबरीची शोकांतिका आहे. चित्रपट संपल्यावर त्यातील सेट, पोषाख आणि दागिनेच फक्त लक्षात रहातात. दिलीप कुमार मलाही बर्याचदा डोक्यात जातो. पण विमल रॉय सारखे दिग्दर्शक त्याला परफेक्ट कंट्रोल करायचे. नसीरुद्दीन शहाला पुर्वी एका मुलाखतीत हल्लीच्या So called आर्ट मुव्ही न चालण्याबद्दल विचारले होते. त्यावेळी त्याने विमल रॉय यांचे उदाहरण दिले होते. बंदीनी, सुजाता हे देखिल त्या प्रकारात मोडणारे सिनेमा होते पण ते रंजकतेने मांडुन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यचे कसब दिग्दर्शकाचे होते. ते स्कील नविन आर्ट मुव्ही बनवणार्या दिग्दर्शकांकडे नाही असे नासीरने सांगितले होते. असो. पण नवीन देवदास न आवडणारे एव्हढे " फॅन " आहेत हे बघुन बरे वाटले.
|
नवा देवदास फारच फालतू होता.तरीही अत्यन्त टाकाऊ हिन्दी चित्रपटातही विरंगुळा देणारी काही स्थळे असतातच.बन्द पडलेले घड्याळही दिवसातून किमान दोन वेळा बरोबर वेळ दाखवते म्हणतात तसे... देवदासमध्ये मला जॅकीचे काम आवडले.जॅकी मला कधीही आवडत नाही पण पडद्यावर तो दिसू लागला की मी त्याच्या बाजूचा होऊन जातो हा विरोधाभासच आहे... मिलिन्द गुणाजी आणि विजयेन्द्र घाडगे यांचे सुखद दर्शन, गाणी, छलक छलकची कोरिओग्रफी ई. माधुरी दिक्शीत अर्थातच...
|
पण ते रंजकतेने मांडुन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यचे कसब दिग्दर्शकाचे होते. ते स्कील नविन आर्ट मुव्ही बनवणार्या दिग्दर्शकांकडे नाही असे नासीरने सांगितले होते. >>> पूर्वीचे दिग्दर्शक प्रेक्षकाच्या चष्म्यातून पाहून त्यांची 'बात' गळी उतरवत असत. हल्लीचे दिग्दर्शक प्रेक्षकांची अभिरुची घडविण्याची जबाबदारी आपली आहे या दृष्टीकोनातून स्वत:च्या चष्म्यातून पाहून 'अंधारे' सिनेमे बनवतात आणि प्रेक्षकांच्या माथी मारतात अन पुन्हा बोम्बलतात प्रेक्षकाना आमचा सिनेमा कळलाच नाही हो....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|