|
Chyayla
| |
| Friday, May 18, 2007 - 10:23 pm: |
| 
|
अरे काय हे, किती Kiss पाडता आहात प्रत्येक गोष्टीचा विसरा सगळ आता. गाडी मुळपदावर आणायासाठी हा माझा ईब्लिसपणाचा किस्सा देतोय. अमेरिकेत नुकताच आलो होतो, मित्राने सान्गितले की एकटा दुकटा जात असताना ब्ल्याक आणी मेक्सिकन माणसान्पासुन सावध रहा पैसे मागितले तर देउन टाक नाहीतर सरळ गोळी घालतात वैगेरे, शक्यतोवर बोलणेच टाळायचे. झाले नेमका एक दीवस असा प्रसन्ग आलाच. मी बस मधुन उतरुन सुनसान रस्त्यावरुन एकटाच जात होतो आणी तितक्यात एक ब्ल्याक सफ़ाई कामगार बस स्ट्यान्ड वरची Trash उचलण्यासाठी आलाच. मी थोडा लाम्बुन जात होतो, तो मला म्हणतोय Do you Speak English? मी: ऑ... ब्ल्या. मा.: Do you speak english? मी आता त्याला म्हणतोय No I don't आणी सरळ ईकडे तिकडे न पहाता चालायला लागलो. तो थोडावेळ माझ्याकडे कसल्यासा नजरेने पहात राहिला आणी चालला गेला. मी आपला सुटकेचा निश्वास सोडला म्हटल चला आज आपण गोळी नाही खाल्ली.
|
Disha013
| |
| Friday, May 18, 2007 - 10:42 pm: |
| 
|
च्या, ते तुला लुबाडणार की नाही हे तुझ्या इंग्लिश येण्या न येण्यावर अवलंबुन नाही! गन दाखवाय्च्या आधी ते विचारतात ' Do you have change ' म्हणुन. अर्थातच ही भिक मागाय्ची ओळ नाही इथे!सरळ पैसे काढुन द्यायचे!
|
Runi
| |
| Saturday, May 19, 2007 - 12:17 am: |
| 
|
च्या. तू त्याला इंग्रजी मधुन उत्तर दिलेस No I don't .... ही ही ही
|
Chyayla
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:44 am: |
| 
|
दीशा खरे आहे तुझे म्हणणे पण म्हणुनच त्याच्याशी बोलायचे टाळले. मग तो कसचा विचारतो Do you have any change? रुनी अग मग तोच तर ईब्लिसपणा होता.
|
Rajankul
| |
| Saturday, May 19, 2007 - 8:28 am: |
| 
|
संघमित्रा बाई तुमची पण चिकाटी दांडगी आहे.
|
Gobu
| |
| Saturday, May 19, 2007 - 9:17 am: |
| 
|
सन्घमित्रा,
धन्यवाद! आणि हो मला अहो जाहो नाही केल तरी चालेल ("गोब्या" म्हटल तरी चालेल!!!) च्यायला, किस्सा एकदम बढिया!
|
Dineshvs
| |
| Sunday, May 20, 2007 - 3:46 pm: |
| 
|
या बीबी वर मी काही लिहीन, अशी अपेक्षा मला ओळखणारे नक्कीच करणार नाहीत. पण आज माझ्या हातुन हे घडले. लेखमालेसाठी फोटो काढत मी फ़िरत होतो. फोटोचा जो विषय आहे, त्याच्यामागे जर मोकळे अवकाश असेल तर फोकस चांगला होतो, असा माझा अनुभव, त्यामूळे माझी जरा खटपट चालली होती. येऊ घातलेल्या निवडणुकीची प्रचार फेरी रस्त्यावर होती, आणि माझ्या लेन्सचा रोख बहुदा त्यांच्याकडे होता. मनासारखा शॉट झाल्यावर मी त्यांच्या दिशेने जात होतो. फोटो नीट आलाय का ते रिव्ह्यु करुन बघत होतो, आणि त्यांच्यापासुन दहा पावलावर गेल्यावर माझ्या लक्षात आले कि, उमेदवार बाईसकट सगळे माझ्यासाठी ठेवणीतले हसु दाखवत, पोझ घेऊन उभे आहेत. क्षणभर मी गोंधळलो, मग काहिच घडले नाही असे भासवत, त्या बाईलाच एस्क्युज मी, करत त्या ग्रुपमधुन पुढे गेलो. अपोझिशनवला लगता है, अशी कॉमेंट मात्र कानावर पडली. मी वळुन बघितल्यावर त्या सगळ्यांचे चेहरे खरेच फोटो काढण्यासारखे झाले होते. पण मी नाही काढला, फोटो.
|
Lukkhi
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:54 pm: |
| 
|
कसला सही इब्लीसपणा केलात तुम्ही दिनेश!!!
|
Dakshina
| |
| Friday, June 01, 2007 - 8:39 am: |
| 
|
मी एकदा दांडेकर पूलाकडून अलका थिएअटरकडे गाडीवरून निघाले होते. सेनादत्त पोलिस चौकीचा सिग्नल लाल होता म्हणून आम्ही सगळे थांबलो होतो. अलकाडून, सेनादत्तकडे (उजवीकडे) जाण्यासाठी सिग्नल हिरवा होता.... २ मिनिटांनी आमाचा हिरवा झाला तरीही एक महाशय आपली मारुती कार दामटत पुढेच यायला लागले... एक पोलिसमामा होते, पण थोडे दूर, कारवाल्याच्या अंदाजानुसार तो सिग्नल लाल असूनही सटकू पहात होता.. आणि पकडला जाण्याची शक्यता पण जरा कमी होती. मी पहिल्याच रांगेत होते, मला काय सुचलं कोणजाणे मी सरळ गेले आणि गाडी त्या मारुती कारच्या समोरच उभी केली... आणि पोलिसांना तिथूनच हाक मारली.... आणि म्हणलं 'हे घ्या तुम्हाला गिर्हाईक'......
|
'हे घ्या तुम्हाला गिर्हाईक'...... ========= हा हा हा हा. ह. ह. पु. वा. तू तर त्या `गिर्हाईकाची' पातळ कढीच केलीस.
|
Giriraj
| |
| Friday, June 01, 2007 - 10:01 am: |
| 
|
दक्षिणा दिलीस तर परस्पर मामांना! मी हा प्रकार खूपदा करतो.. मुद्दम अश्या वाहनांसमोर मला पिवळा दिवा मिळेपर्यंत तसाच उभा राहतो.. तर कधी कधी समोर लाल दिवा असतांनाही मागचे उगाच भोंगे वाजवून परेशान करतात त्यांना गाडी एका बाजूला कलती करून आता जा पुढे असा ईशारा करतो... लई मजा येते मला अशी!
|
कॉलेज स्लम बूक always there would be a question . Your favourite Crush ...एक बापडा Convent bred असूनही त्याला क्रश माहित नव्हता. त्याने मला विचारले आणि मी tyala sangeetale kee write names of all those girls who crashed ur heart...Bichara Prem Bhangachi Gatha lihit sutala.....
|
अरी मराठी माणसा... त्या slam book प्रकरणाची मी फ़ार वाईट रीत्या बळी ठरलेली आहे. त्यामुळे मी आता सरळ डायरी आणून "लिवा तुम्हाला काय लिवायचे" असं सांगते. आयला.. भानगडी सांगितल्यात कुणी,, crsuh आणि recent accident च्या.
|
Pausvedi
| |
| Monday, June 04, 2007 - 3:52 pm: |
| 
|
ha maza pahila scrap, tumhi saglech mala olkhiche vatta, jevha kadhi mi tumche kisse vachte... hasun hasun purevat hote.. bar mala sanga, marathi kasa lihayacha??
|
Arch
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:26 am: |
| 
|
कॉलेज स्लम बूक >> मराठी माणसा, कुठल्या slum मध्ये मिळत हे पुस्तक? 
|
काल office मधुन घरी येताना bus stop वर एक मुलगी University student भेटली. बराच वेळ बोलली. मग म्हणाली आपण सगळे indians . I said who indians? I am not Indian . I am from Bangladesh, immegrant to Kolkatta . पाच minutes बोलली पण नाही. finally तिला सान्गीतला की मी पुण्याचा आहे.....
|
Farend
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:47 pm: |
| 
|
पण इंग्रजी उच्चारांवरून लगेच कळतं की भारतीय की बांगलादेशी. कदाचित बंगाली आणि बांगलादेशी कळणार नाही. ती मुलगी ही नवीन असेल
|
Dakshina
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:48 am: |
| 
|
हा डॉक्टरांनी केलेला इब्लिसपणा... माझी मैत्रिण, तीला बरं वाटत नव्हतं म्हणून डॉक्टरांना दाखवायला गेली... Consultation सुरु केल्यावर ते म्हणाले 'आता आपण बघू तुम्हाला हा त्रास का होतोय' मग म्हणाले 'आता हे पाहू तो कसा कमी करता येईल' इत्यादी... म्हणजे सगळं 'करूया', 'पाहूया'.... असं. शेवटी तपासायच्या वेळी म्हणाले 'चला तिकडे झोपूया.."
|
दक्षिणा किस्सा जाम भारी आहे!!!!!!!!!!!!!!!
|
दक्षिणा खल्लास. दिनेश सही आहे. बातम्यांमधेही लक्षात येते हे लोक फ्रेममधे येण्यासाठी मरत असतात नुसते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|