>> एक हनुमान भक्त अपन्ग हिरो हनुमानाच्या क्रुपेने सुपर हिरो होतो मराठीत पण असा एक हनुमान भक्त सुपरहीरॉचा मुव्ही आहे ना. लक्ष्याचा आहे बहुतेक.
|
Cosmo
| |
| Tuesday, June 05, 2007 - 4:13 pm: |
| 
|
दे दणादण...महेश कोठारेचा मूव्ही
|
Slarti
| |
| Tuesday, June 05, 2007 - 5:39 pm: |
| 
|
अमोल, अस्सल आहे. 'तिरंगा' मधली राजकुमारची यंट्री भन्नाट आहे. दोन देशद्रोही गुंड हातबॉम्बची चाचणी करत आहेत. एका हातबॉम्बची पिन काढून ते बॉम्ब फेकतात. काहीच होत नाही. मग तिकडून तो बॉम्ब हातात क्रिकेटबॉलसारखा झेलत झेलत राजकुमार येतो, काहीतरी फर्मास डायलॉग हाणतो आणि तो बॉम्ब परत त्या गुंडांवर फेकतो, तेव्हा कुठे त्या बॉम्बचा स्फोट होतो...
|
Farend
| |
| Tuesday, June 05, 2007 - 6:35 pm: |
| 
|
हो बहुतेक त्यातच शेवटी एक अफलातून शॉट आहे... अंधुक आठवते. राजकुमार आणि इतरांना बांधून ठेवलेले असते आणि कोणतातरी बॉम्ब उडणार असतो. पण मधे काहीतरी धूर होतो, कोणालाच काही दिसत नाही आणि जेव्हा चित्र स्पष्ट होते तेव्हा राजकुमार सुटलेला असतो आणि त्याने ते विनाश करणारे मशीनही बंद केलेले असते.
|
Slarti
| |
| Tuesday, June 05, 2007 - 8:09 pm: |
| 
|
तो धूर बहुतेक राजकुमारच्या तोंडातल्या सिगारमुळे झालेला असतो. विनोद नाही, तो सिगार म्हणजे धूर तयार करण्याचे हत्यार असते असे काहीतरी आहे. त्यातल्या गुंड / राजकीय नेत्यांची नावेसुद्धा महानच आहेत. उदा. प्रलयनाथ गुंडास्वामी
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:28 am: |
| 
|
तिरंगा. LOL . त्याचं नाव गुंडास्वामी नाही गेंडास्वामी आहे बहुतेक. त्यात त्या शेवटच्या सीनला राजकुमार त्या गेंडास्वामीला म्हणतो ' ये तो बस हमारे छोटेसे, पीनेवाले पाईपका कमाल था, कही तुम हमारा रुमाल छू लेते तो जलकर भस्म हो जाते. ' आता हा राजकुमार त्याच रुमालाला हात लावेल तरी त्याला काहीच होणार नाही, असं कसं?
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:06 am: |
| 
|
त्या रुमालाला सेन्सर असतील जे राजकुमारच्या हाताचे ठसे ओळखत असतील. तो शेवटचा सिन मस्त आहे. ते अख्ख शहर उडवणार मिसाइल जरा जास्तच छोट होत नाहि. आणि त्यात एक printed circuit board आहे तो त्या धुरात राजकुमार काढुन घेतो त्यामुळे ते मिसाइल उडत नाहि आणि त्या पिक्चर मधील त्या PCB च नाव आहे सेमि कंडक्टर का काहितरी असच. त्यावेळी खुप हसलो. उगीच इलेक्ट्रॉनिक हा विषय शिकलो अस वाटल. श्रद्धा तु भोजपुरी पिक्चर बद्दल लिहि ना इथे आधी चर्चा सुरु झालिये त्याबद्दल. तुला त्या फ़िल्मचा अनुभव असेल.
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:31 am: |
| 
|
सेमीकंडक्टर नाही... फ़्यूज कंडक्टर. बरं ते फ़्यूज कंडक्टर मिसाईल्सना नुसते बाहेरून लावलेले असतात बहुधा कारण तीन फ़्यूज कंडक्टर काढायला राजकुमारला मोजून दोन मिन्टं लागतात.
|
आपण नेहमी म्हणतो की ईंग्लीश सिनेमा च्या थिम वरुन हिंदी सिनेमे काढतात. ह्या थेअरी ला तिरंगा हा सिनेमा बहुदा अपवाद. The Rock हा सिनेमा १९९६ साली आला. (तिरंगा १९९२). the rock मध्ये थिम तिच पण थोडी अदला बद्ल आहे. ईथेही मिसाईल व्दारे शहर ऊडवनार, तिथेही तेच, नंतर दोन माणस येऊन फाईट वैगरे करुन ते कंडक्टर काढुन टाकनार व विजयी होनार, दोन्ही सिनेमात हेच आहे फक्त मांडनी भरपुर वेगळी आहे. ( the rock च्या लेखकानी तिरंगा पाहीला की नाही माहीत नाही पण सिन मात्र उचललेत). हे देखील अचाटच नाही का?
|
Mepunekar
| |
| Wednesday, June 06, 2007 - 8:54 pm: |
| 
|
The Rock वरुन अलिकडे कयामत नावाचा नावाला जागणारा सिनेमा आला होता. अजय देव(कि राक्शस)गण होता त्या मधे.
|
तशी matrix series पण अचाट अतर्क्यमधे येउ शकते नाही???मला तो cinema आवडला पण शेवटी अचात आणि अतर्क्यच की तो. तुम्हाला काय वाटते???
|
बापरे, तिरंगा हा चित्रपट इतक्या बारकाईने कुणी पाहिला असेल असे वाटले नव्हते! असो, राजकुमार हा एक बावळट आक्टर वाटतो. विशेषत: म्हातारपणी तो अगदी पाप्याचे पितर दिसतो आणि सिनेमात हमखास त्याच्या अंगात अतीमानवी शक्ती आहे असा आव आणला जातो. एक बारकासा फटका लगावला की दहाबारा गुंड गडाबडा लोळू लागतात (बहुधा हसत असावेत). अगदीच अतर्क्य. धर्मेंद्र वयोवृद्ध दिसायला लागल्यानंतर त्याचा मैदान-ए-जंग की कायसासा सिनेमा होता. बिचारा धरम मारामारीच्या वेळेस अगदीच बोजड वाटायचा. हालचालीही मंदावलेल्या वाटत होत्या. पण भूमिका अर्थातच नुकतेच मिसरुड फुटू लागलेल्या युवकाची होती. पण एका शॉटमधे एक गुंड त्याला भिरकावून देतो तेव्हा तो ज्या गतीने पडतो त्यापेक्षा जास्त वेगाने जमिनीवरून वरती उसळी मारुन गुंडावर तुटून पडतो तो बघून लोटपोट झालो. सिनेमातील अत्यंत नेहमीचच यशस्वी प्रसंग म्हणजे हीरो पत्ते खेळू लागला की हमखास तीन एक्के वा तीन राजे येणार. त्यात व्हिलन असेल तर त्याच्याकडे तीन गुलाम व हिरोकडे तीन राजे असा बाळबोध प्रकार. सिनेमातील पत्त्यांच्या डावाचे नमुने घेतले तर प्रोबबिलिटी वगैरे थियर्या धुळीस मिळतील.
|
हात टेकले. No Comments !!!!! http://www.youtube.com/watch?v=eB5JzLy2e3c&mode=related&search=
|
याला शॉक लागत नाही तर करंटलाच शॉक लागतो म्हणे. अचाट आणि अतर्क्य शब्द छोटे वाटू लागले आहेत हो मला. http://www.youtube.com/watch?v=6EKHebxZOJY&mode=related&search=
|
Farend
| |
| Thursday, June 07, 2007 - 2:14 am: |
| 
|
स्वप्नील तो बालय्याचा रेल्वे शॉट जबरी. गंमत म्हणजे तो कड्यावरून जेव्हा उडी मारतो गाडीवर तेव्हा आधी गाडीच्या उजव्या बाजूने (आपल्याकडून) आणि नंतर डाव्याबाजूने आलेला दाखवलाय अर्थात जो हे दाखवलेले सर्व करू शकतो त्यला ते ही काय अशक्य आहे!
|
Farend
| |
| Thursday, June 07, 2007 - 2:17 am: |
| 
|
हो आणि आत्ता दुसरा पाहिला. खरच अचाट आणि अतर्क्य याच्या पलीकडचे काहीतरी नाव असलेला बीबी शोधायला पाहिजे यासाठी शेंडेनक्षत्र, काला पत्थर मधे शत्रु च्या हातात दोनच राजे निघतात, पण "और तीसरे हम" म्हणून तो डाव जिंकून जातो (हा शॉट मात्र जमलाय बरा, शेवटी सलीम जावेद चा संवाद आहे).
|
Disha013
| |
| Thursday, June 07, 2007 - 3:07 am: |
| 
|
स्वप्निल, ह्या बालयाला एखादा 'जादु' भेटला असणार परग्रहावरचा. "और तीसरे हम" lol ........
|
Zakasrao
| |
| Thursday, June 07, 2007 - 4:02 am: |
| 
|
स्वप्नील रेल्वेवाला विडिओ जबरी रे. त्याच्या बाइक मधे काय बॉम्ब होता का ते चेक केले पाहिजे. कारण त्या ट्रेन ने धक्का दिल्याबरोबर स्फ़ोट?? फ़ारेन्द तु बोललास ते बरोबर आहे. त्याला काहिही शक्या आहे. उजवी काय आणि डावी काय? त्या दुसर्या शॉक वाल्याला महाराष्ट्रात आणायला हव. भारनियमन कमी करण्यासाठी.
|
Alpana
| |
| Thursday, June 07, 2007 - 6:50 am: |
| 
|
तुम्हा सगळ्यान्चे पोस्ट वाचुन लगेच विडिओ बघावे वाटतायेत..पण ऑफिसमध्ये ही लिन्क उघडत नाही..त्यामुळे घरी बघण्याशिवाय पर्याय नाही.. 
|
मध्ये एकदा घरी लौकर गेले तर TV वर हातिमताई लागला होता. सहसा असे सिनेमे मी सोडत नाही. माझ्या दुर्दैवाने सिनेमाचा शेवट जवळ आला होता. तरी एक अख्खे गाणे आणि शेवटची मारामारी अशी मेजवानी मिळाली. ' आज बचना है मुश्किल तेरा... ' हे गाणं अमरिश पुरीच्या आवाजात सुरु झालं. गाण्यात अमरिश पुरीचे बरेच क्लोजप्स घेतले आहेत. ( अवश्य पहा.) त्यात संगीता बिजलानी आणि सोनू वालिया नाचत असतात. गाणं संपतं. हातिम आणि त्याच्या सहकार्याला बंदी बनवून त्यांच्या समोर नाच चाललेला असतो. (घाबरू नका, त्या दोन बायकाच फक्त नाचतात, अमरिश पुरी नाचत नाही. तो नाचणार्या लोकांमध्ये मधून मधून हिंडत सुपरव्हिजन करत असतो. त्याला पुढचा जन्म दहावीच्या सुपरवायझरचा मिळाला असेल काय?) नंतर तो संगीता बिजलानीच्या हातात सळया देऊन हातिमचे डोळे फोडायला सांगतो; कारण आधी जो डोळे फोडणार असतो, त्याच्या हातातल्या सळया ही धक्का देऊन पाडते. मग ती रडायला लागते. तिच्या हातात जबरदस्ती सळया देऊन तिला पुढे पुढे जायला लावतात. तेव्हा अचानक चमत्कार... खरी संगीता बिजलानी दगडातून सजीव होते ( म्हणूनच या सिनेमात तिचा अभिनय जिवंत वाटतो :-P) , आणि त्या दोघींना ( नाचणार्या संगीता आणि सोनू) यांना जाळून भस्म करते. वर सांगते, की त्या मायावी होत्या, अमरिश पुरीनेच निर्माण केलेल्या. मग त्या तोतया संगीताने हातिमच्या डोळ्यात सळया खुपसायला नाही का म्हणावे? एक प्रामाणिक प्रश्न. :-P मग उडत्या गालिच्यावरची मारामारी आणि संगीता परी (? ) असल्याने तिचे जादूगाराचे प्राण ज्यात आहेत त्या पोपटाच्या मागे उडणे वगैरे रोमहर्षक प्रसंग आहेत. ते लिहिण्यापेक्षा बघण्यात जास्त मजा आहे. ह्या सिनेमाचा बाकी भाग कधी पाहायला मिळेल बरं?
|