Zakasrao
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:56 am: |
| 
|
दक्षिणा हत्तीदेखिल आला नाहि म्हणजे बॉस देखिल आला नाहि का कटकट करायला. रोज ऑफ़िसला रिक्षाने..... ७० से ज्यादा नही दुंगी...... अरे बापरे रोज जायला ७० यायला ७० म्हणजे १४० रु रोज येण्याजाण्याचा खर्च. आमच्याकडे काहि साफ़सफ़ाइला लोक आहेत त्यांना रोजचा पगार ११० च्या पेक्षा जास्त मिळात नाहि.
|
Monakshi
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:13 am: |
| 
|
बापरे, रिक्शाला एवढा ख़र्च?? त्यापेक्षा मस्तपैकी एक Activa घेऊन टाक!
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 6:18 am: |
| 
|
अरे कुणीतरी माझ्या नवर्याला सान्गा ना हे... त्याचे म्हणणे दिल्ली मध्ये बायकानि २ व्हिलर चालवु नये.. कार चालव म्हणतो पाहिजे तर... अर्थात घरी कार नहिये ही गोश्ट वेगळी.. आणी इथल्या बस मध्ये पण जाउ देत नही... मग मी आपली चार्टर बस शोध... अर्धा रस्ता मेट्रो ने जा असले उपाय करते...खरच आपली मुम्बई मस्त आहे या बाबतित.. बेस्ट ला आणी लोकल ला पर्याय नाही
|
Mandard
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:34 am: |
| 
|
दिल्लीत पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंब आहे म्हणुन मी अगदी कंपनीच्या जवळच राहतो.
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:05 am: |
| 
|
अरे माझ्या घरापसुन ऑफिस १७ कि. मी. आहे आणी नवर्याचे कॉलेज उलट्या दिशेला तेवढेच अंतर.... एकाने ३० कि. मी. जाण्यापेक्शा आम्ही दोघे १७ कि. मी. जातो..... तरि बरे काही भागात तरी मेट्रो आहे... मी तर २०१० ची वाट बघतेय... सगळीकडे मेट्रो पोचेल तेन्वा
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:08 am: |
| 
|
अरे कोणीतरी सांगा office कसे लिहितात?
|
Swa_26
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:13 am: |
| 
|
अल्पना... ऑफिस असे लिहि... Ophis ...
|
एकाने ३० कि. मी. जाण्यापेक्शा आम्ही दोघे १७ कि. मी. जातो. ======== विरूद्ध दिशेला? हा काय प्रकार?
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:13 am: |
| 
|
thanks हा बराच जुना किस्सा आहे... वेन्धळेपणा पेक्शा माझा हलगर्जीपणा च जास्त आहे. २-३ वर्शन्पुर्वी अहमदाबादला शिकत असतानची गोष्ट. दिवाळीला घरी औरन्गाबादला यायचे होते... तिथुन ट्रेन नी जळगावला येवुन पुढे बसनी यायचे ठरले... पहिल्यान्दाच स्वतहा एकटीने जावुन तिकिट काढले.... घरी कळवले कि उद्या सन्ध्याकाळ्च्या अमुक अमुक ट्रेन नी येणर आहे.. संध्याकाळी ६ ला निघेन. सकाळी ४ वाजत जळ्गाव ल पोचेन. घरुन २ तास लवकर निघाले. स्टेशन वर कुली ला ट्रेन चे नाव सन्गितले तर तो म्हणाला ती ट्रेन तर सकाळी ६ ला गेली.... मी टरकलेच.... निघताना बरोबर जास्त पैसे नको म्हणुन फ़क्त ३५० रुपये ठेवलेले... debit card होते पण त्यात पण मिनिमम बॅलंस ठेवलेला फ़क्त ५००.. २ दिवसानि दिवाळी.. आणी परत हॉस्टेल वर जायचे नवते..कोणत्याही स्थितीत मला घरी जायचे होते... मग आधी जनरल चे तिकिट काधले सन्ध्याकाळ्च्या ६.३० च्या ट्रेनचे.. कुली घेतला होता बरोबर... मग तिकिट कॅसंल केले...कुली मागे मागे हिन्डत होता.. पैसे परत मिळतात म्हणुन कुणीतरी सन्गितले...त्यामुळे ते घ्ययचा प्रयत्न.. करण बरोबर पैसे नवते... ते कही मिळले नही..तर चक्क डोळ्यात पाणी आलेले.. रिक्शाला देवुन उरलेल्यापैकी ३०० पैकी ६० कुली ल दिले... कारण त्यने लेडीज जनरल डब्ब्यात बसवुन दिले.. बसायल जागा मिळाली. १५० चे तिकिट. ९० रुपये बरोबर घेवुन ट्रेन मध्ये बसले... जशी ट्रेन सुरु झली... मी रडायलाच सुरु केले....बरे जनरल मध्ये कधी बसले नवते म्हणुन सामान चोरी व्हायची भीती वाटत होती...तसे फ़क्त कदडे आणी पुस्तकेच होती... निघायच्या घाइ मध्ये दुपारि जेवले पण नवते मी.. आणी जनरल मध्ये कोणी काही विकायला येत नाही...आले तरी विकत घ्यायला पैसे नवते.. जळ्गाव ला उतरल्यावर त्य जड बगा एकटीने उचलल्या.. कुली ला पैसे कुठुन देणार? नन्तर बस स्टंड वर जायला रिक्शा केला...तो २० रुपये मागत होता..म्हणुन मग शेयर केला १० रुपयात... तिथे पोचल्यावर ठरवले की आधी विचारायचे तिकिट किती आणी मग च गाडीत बसायचे...मझ्याकदे फ़क्त ८० रुपये उरले होते बहुतेक... नाहितर जळ्गाव ला मैत्रिण रहायची तिच्या घरी फोन करायचा आणी त्याना पैसे मगयचे... पण नशिब तिकिट ७० होते..इतकी खुश होउन बसले बस मधे... मझ्या अजिबात लक्शात नाही आले कि मी ATM मधुन पैसे काढु शकते.. स्टेशन वर एक ATM machine होते तरिपण...घरी पोचले तर सगळे काळ्जीत...कारण बाबानी रेल्वे टाइम टेबल कढले होते..त्यात माझ्या ट्रेन चा गोन्धळ त्यान कळाला..पण मला कॉन्टक्ट करता येत नवते त्याना..
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:16 am: |
| 
|
opposite directions...mee south delhi madhye jate to north west la...aaNee aamhee West delhi madhe rahato...almost near to center... sorry for mraThee shudhalekhan in earlier post...haluhalU correct karen... ajun saway naahee jhalee...
|
Ajjuka
| |
| Thursday, May 31, 2007 - 1:07 pm: |
| 
|
अगं अल्पना बहुतेक बरोबरेय तुझ्या नवर्याचे. दिल्लीमधे मुलींनी २ व्हीलर चालवणे safe नाहीये. तसंही माझ्या कुठल्याही दिल्ली ट्रिप मधे मला नुसतं हिंडताना सुद्धा दिल्ली safe वाटली नव्हती. महाराष्ट्रात बरंय. तू कुठे रहातेस. मला जनकपुरी भाग थोडासा माहितीये.
|
Zakki
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:33 pm: |
| 
|
मी पण १९८० साली दिल्लीत गेलो होतो. मला कुठेतरी जायचे होते. माझ्या वहिनीने सांगितले कि कॅनॉट सर्कल ला जा. तुला हव्या असलेल्या रस्त्याची पाटी आहे. म्हणून मी टू व्हीलर घेऊन निघालो नि कॅनॉट सर्कलला पोचलो. दोन तीन फेर्या मारल्या. पण पाट्या फक्त 'पाखाना', 'रेस्ट रूम' च्याच दिसत होत्या! मग लक्षात आले की इकडे डावीकडून गाडी चालवायला पाहिजे म्हणजे पाट्या दिसतील!
|
Alpana
| |
| Friday, June 01, 2007 - 6:38 am: |
| 
|
अज्जुका, मी पटेल नगर मध्ये रहाते.. करोल बाग च्या शेजारी आहे हा भाग... जनकपुरी ला गेलेय मी... पटेल नगर पेक्शा शान्त आणी छान आहे.. मला पण सेफ नाही वाटत दिल्लीत... मी फ़क्त ऑफिसला च एकटी जाते...बाकी कुठेही जायचे असेल तर नवर्याला मस्का मारावा लागतो... झक्कि, १९८० नंतर बरेच बदल झाले असतिल इथे...मला तर कनॉट प्लेस ला गेल्यावर रस्त्यान्चा अन्दाजच येत नाही.. ४ महिन्यापासुन जातेय म्हणुन हल्ली ईन्डिया गेट च्या सर्कल चा थोडा अंदाज यायला लागलाय
|
Manjud
| |
| Friday, June 01, 2007 - 7:53 am: |
| 
|
आज सकाळी ऑफिस मधे meeting च्या आधी बर्याच printouts काढायच्या होत्या. पटापट प्रिन्ट देउन q मधे टाकले आणि letterheads घेउन printer जवळ गेले. ४-५ प्रिन्ट्स घेतल्या. आणि पेपर stuck झाला. शी....वैताग नुसता.... रागारागाने printer open केला. toner काढुन ठेवला. पेपर बाहेर काढला. printer बन्द केला आणि OK केले. काय हे!! print out यायलाच तयार नाही. सारखा error message . तिकडे बॉस आणि बाकीचे कलीग्स माझ्या नावाने शिमगा करतायत. ईकडे printouts येत नाही आहेत. वैताग वैताग सगळा..... शेवटी एक मित्र आला हो मदतीला धावुन... त्याने बघितलं आणि माझी कीव करत म्हणाला, "अगं गाढवे!! toner कोण ठेवणार printer मधे? तुझा ............. ??????
|
Dakshina
| |
| Friday, June 01, 2007 - 8:48 am: |
| 
|
मी पण असाच घोळ घातला होता.. एकदा.. भारंभार दिड एकशे prinouts स्वतःच्या printer वर सोडायच्या ऐवजी तंद्रीत floor वरच्या common printer वरच दिल्या. तिथे प्रत्येकाला फ़क्त २५ printouts allowed आहेत. मग काय गोंधळ झाला तो नका विचारू.. TSG च्या माणसानी माझ्या नावाने अख्खा शिमगा साजरा केला...
|
Alpana
| |
| Friday, June 01, 2007 - 9:19 am: |
| 
|
मी पण printer चा घोळ घातला होता गेल्या आठवड्यात... आणी कारण मला परवा कळाले. एका मीटिन्गला जायचे होते बॉस बरोबर, सकाळी माझ्या घरी ती मला pick up करणार होती. मी थोड्याश्या prints घरी घ्यायचे ठरवले, रात्री laptop वरुन prints दिल्या... तर ERROR MESSAGE , २-३ दा करुन बघितले पण तोच message परत.. म्हटले उद्या बॉस चान्गलीच झापणार, ऑफिस मध्येच सगळे prints घ्यायला काय झाले... अजुन थोडा वेळ थाम्बायचे होते वैगरे... एक शेवटचा प्रयत्न म्हणुन मी घरच्या computer वरुन print दिले... आणी ते आले पण... मी आपली सगळ्याना घरी म्हणाले... हॅरी ने ( हा माझा दिर) काहीतरी गडबड केलिये laptop शी... परवा लक्शात आले.... laptop ला printer जोडलेच नवते
|
Chyayla
| |
| Saturday, June 02, 2007 - 6:40 am: |
| 
|
अल्पना, मन्जु आणी दक्षीणा लई भारी आहात तुम्ही तुमच्याच एका बहिणीचा किस्सा ईथे देतो. नागपुरच्या PWD ऑफ़िस मधे मी आणी सन्दीप बसलो होतो. सन्दीप फ़ोनवरुन एका गावातल्या कसल्यासा कॉम्प्युटर चा प्रोब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत होता. आणी जाम वैतागला होता कारण तिकडे फ़ोन आणी कॉम्पुटर वर काम करणारी एक मुलगी हा जसे सान्गत होता तसे करत होती. सन्दीप मधेच तिला म्हणतोय... आता अस करा सगळे Windows ( Microsoft )बन्द करुन बाहेर या... अर्थात टेक्निकल मराठी. झाल हा वाट पहातोय आता बोलेल मग बोलेल पुढे काय झाल ते सान्गेल पण तिचा काही पत्ताच नाही. याने फ़ोन कापला आणी परत लावला. आणी त्या भवानीने तो फ़ोन येउन उचलला शेवटी. सन्दीप विचारतोय अहो म्याडम तुम्ही कुठे गायब झालात केन्व्हाची वाट पहातोय. त्यावर ती म्हणाली की मी ऑफ़िसच्या बाहेर उभी होती, तुम्हीच तर म्हणालात ना की Windows बन्द करुन बाहेर या... झाल सन्दीपचा हात कप्पाळावर आणी ईकडे आमच पुर्ण ऑफ़िस हसतय. मला असलाच कुठेतरी सरदारजी जोक वाचल्याचे आठवतय पण हा जोक प्रत्यक्ष घडलेला तेन्व्हाच अनुभवला.
|
Sakhi_d
| |
| Saturday, June 02, 2007 - 8:08 am: |
| 
|
च्यायला मस्तच... ही ४ शब्दांची लिमिट म्हणजे....
|
Runi
| |
| Saturday, June 02, 2007 - 5:00 pm: |
| 
|
दक्षिणा, अल्पना धमाल आहेत तुमचे किस्से. च्या. सहिच.... मला वाटायचे कि असे धन्य लोक फक्त जोक्स् मध्येच अस्तित्वात आहेत.
|
Pratyuma
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:46 am: |
| 
|
मी इथे नविनच आहे. तुमचे अनुभव वाचुन मजा आली. हा माझा एक वेन्धळेपणाचा किस्सा. मी लहान होते, ६ वी मधे असेन. आई आजारी होती जरा, म्हणुन मी स्वयंपाक करत होते. पहिल्यांदाच करत होते म्हणुन 'रुचिरा' पुस्तकातुन मदत घेत होते. आमटी ची फोडणी टाकताना त्या पुस्तकामधे 'ओल्या मिरच्या अस लिहिल होत तर मी चक्क मिरच्या पाण्यानी धुतल्या आणि फोडणी मधे टाकल्या. ज़ी फोडणी उडाली अंगावर काही विचारु नका. त्याच दिवशी आणि भाताच्या खिचडीमधे मी जिर्याच्या ऐवजी बडीशेप घातली. सगळ्यानी ती 'पौष्टिक खिचडी' म्हणुन खाल्ली. बिचारे.
|