Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 4:17 am: |
| 
|
फरिश्ते का अशाच कोणत्यातरी चित्रपटात धरम आणि बहुधा रजनी ची एंट्री हवेतून तरंगत उतरत झाली आहे म्हणे>>>>> फ़ारेंदा अरे मी त्या पिक्चरवर वरती ही लिहिलय रे. त्यात धरम आणि विनोद खन्ना हिरो. रजनी साइड हिरो. त्यात लय धमाल प्रसंग आहेत बर. रजनी त्यात मरण्याआधी बरेच अचाट शक्तीचे प्रयोग करुनच मरतो. त्यात चुंबकाचा प्रयोग आहेच त्याविषयी वरती लिहिलय. श्रद्धा गुरुत्वाकर्षण
|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 4:20 am: |
| 
|
डिजे तुझ ओब्जर्वेशन चांगल आहे. म्हणजे तु सिरियली बघतेस तर. फ़ारेंद पण दिल चाहता हे मधे इतक उथळ नव्हत दाखवल रे. त्यात HR सदैव डोक्यावर असलेली त्याची ती गूढ ( आणि कळकट) टोपी काढणार आहे, अशी बातमी आहे>>>> अरे हा तोच तो रिक्षा का कमाल वाला पिक्चर. पण त्या ट्रेलर मधे त्याच्या डोक्यावर तर टोपी होती की.
|
Farend
| |
| Friday, June 01, 2007 - 7:45 am: |
| 
|
Zakasrao हो आत्ता आठवले वाचल्याचे. तो रिक्षा का कमाल बघायला पाहिजे त्याची टोपी काढल्यावर (आणि कडवट चेहर्यामुळे) मॅच हरल्यावरच्या इंझमाम सारखा वाटेल तो बहुतेक Deepanjali तू Friends बघितले असशील किंवा आत्ता reruns बघत असशील तर त्यात तो एक Susan Sarandon आणि Joey चा एपिसोड आहे त्यात आपले थोबाड कॅमेर्याकडे कसे ठेवायचे आणि दुसर्याचे कसे लपवायचे याचे धमाल वर्णन होते.
|
नि:शब्द मी पाहिला नाही, पण म्हातार्यावर एखाद्या तरुणीने प्रेम करावे ही कथा मात्र पटते. १९८४ मध्ये गोव्यात एका `तरुणावर' अशीच एक तरुणी भाळली होती, त्यांचे प्रेमाचे चाळे परिचितांमध्ये चवीचा विषय होता. शेवटी त्या दोघानी पुण्यात पळून जाऊन लग्न केले. `त्या' तरुणाचे त्यावेळी वय होते ५८ आणि तरुणीचे वय होते १९. मुख्य म्हणजे त्या तरुणीने त्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. नि:शब्द आणि या सत्यघटनेत फरक इतकाच की, या घटनेतील तरुणाचे पहिली बायको नव्हती, कारण ऐन तारुण्यात त्यांनी स्वत्:ला गोवा मुक्तिलढ्यात झोकून दिले होते, अर्थात स्वातंत्र्यसैनिक होते.
|
आत्मकथा नावाचे एलकुंचवारांचे नाटक पाहिलेय का कुणी? मी पाहिले तेंव्हा श्रीराम लागू आणि (बहुतेक) शुभांगी गोखले होते त्यात. अर्थात निःशब्दची त्याच्याशी तुलना नाही पण तरीही आठवले. अहो शेषनाग, ८४ सालचे कशाला? आत्ता परवाची प्रोफेसर बटुकनाथ आणि रोझी (का डॉली का ज्युली ) ची मोठ्ठी न्यूज नाही का आठवत?
|
Ajjuka
| |
| Friday, June 01, 2007 - 12:49 pm: |
| 
|
माझं सगळ्यात आवडतं नाटक आहे ते. ते नाटक आणि Educating Rita हे नाटक... माझ्यामते अश्या थीमवरची सगळ्यात उत्तम स्क्रिप्टस आहेत. त्या characters ना काहीतरी अकार उकार आहे. नुसतंच ठरलंय यांना प्रेमात पाडायचं मग करा काही आचरटपणा असं नाहीये. त्यातलं कोणतंही character आपली डिग्निटी सोडून वागत नाही. Character's Dignity म्हणतेय मी...
|
Slarti
| |
| Friday, June 01, 2007 - 5:26 pm: |
| 
|
'मैंने प्यार किया'चे शेवटचे हाणामारीचे दृष्य. त्या कबुतराच्या डोक्यात memory chip आणि graphics card असणार. त्याला आ...ठ...व...ते... तेसुद्धा जसेच्या तसे 'कलर बाय टेक्नीकलर' मध्ये ! 'तेरी मेहरबानीयाँ' नावाच्या एका जॅकी श्रॉफच्या चित्रपटात ३-४ खलनायकांकडून सर्वजण मारले जातात अगदी जॅकीसकट. नायकपक्षात उरतात फक्त एक काळा कुत्रा आणि राजकिरण. तो कुत्रा व्यवस्थित योजना वगैरे करून सर्व खलनायकांना मारून टाकतो. (या वाक्यात चुकून कुत्रा व राजकिरण यांच्यात अदलाबदल झालेली नाही. राजकिरणकडून भलत्या अपेक्षा ठेवायच्या नसतात.) मागे दर्दभरे गीत सुरु - 'तेरी मेहरबानीयाँ, तेरी कदरदनीयाँ...' तेसुद्धा शब्बीरकुमारच्या आवाजात ! सारांश, 'मेहरबानीयाँ' कोणाच्या तर कुत्र्याच्या. पण खरी अतर्क्य गोष्ट ही की हा चित्रपट हिट होता !!
|
मित्रांनो याहुन भारी माल आठवला-मराठी चित्रपटातला. एक मुलगी चालत असते, तिच्या मागे नेहमिप्रमाणे गुंडे लागतात,छेडछाड वगैरे प्रकार. मग एक सज्जन येतो म्हणतो अरे अस करु नका. मग गुंड्-तो कोण हिचा भाऊ लागतो का? आपल्याला वाटत आता तो सज्जन (म्हणजे हिरो हो!!) मारामारी करेल पण नाही अस होत नाही. गुंडाचे बोल ऐकुन हिरॉइनच्या मनात काय येते कुणास ठाउक आणि ती लगेच नाचायला आणि गाण म्हणायला लागते-'तुझ्या प्रितीच्या,प्रेमाच्या' वगैरे वगैरे. आणि मग काय संपुर्ण गाण आणि dance होत.गुंड नुसताच रागानी बघतो मारामारी वगैरे काहिच करत नाही (बहुतेक गाण संपण्याची वाट पहात असावा).मग हे सगळ झाल्यावर गुंडाचा मनावरचा ताबा सुटतो (बहुतेक असल फ़ाल्तु गाण ऐकुन) आणि मारामारिला सुरुवात.मग काय 'ढिशुम ढिशुम', जाडाजुडा किंवा किडकामीडका हिरो(अशोक सरफ़ किंवा लक्ष्या बेर्डे) ८-१० तगड्या गुंडांना बडव बडव बडवतो. मग नेहमीप्रमाणे गुंडाने हिरॉइनच्या पाया पडण आणि ताई,बेहेन वगैरे म्हणन आणि अचाट सीनमधुन प्रेक्षकांची सुटका होण.
|
Amar Akber Anthony मधील अनेक प्रसंगांपैकी अगदी लक्षात राहीलेला प्रसंग म्हणजे. हे तिघे मिळून निरुपा रॉयला रक्त देतात. आपण दवाखान्यात नेहेमी पहातो की रक्त घेताना बातली वर असते वर रक्त दान करताना ती खाली असते. या शॉट मधे निरुपा रॉय सकट सगळ्यांच्या बाटल्या वर? 
|
बाग़बानमध्ये अमिताभ अणि हेमा मालिनी सहा महिन्यांसाठी वेगळे राहतात (होळीनंतर) म्हणजे साधरण मार्च ते सप्टेंबर. मधल्या काळात ते व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतात. आणि करवा चौथ पण. मार्च ते सप्टेंबर या काळात फेब्रुवारी आणि ऑक्टोबर पण येऊन जातात. आणि तो जलवा की कोणता एक सलमान खानचा सिनेमा मध्ये आला होता. त्यात सलमान खान त्याच्या बापासाठी त्याची किडनी देतो. एवढे ऑपरेशन झाल्यावर आणि पोटाला पट्टी असूनपण तो किती सहजतेने चालतो. ते बघून असे वाटते की ते सीन म्हणजे, चला आता चहापान झाले, गप्पाही मारून झाल्या, आता काय बरे करावे? चला एक सीन शूट करूया, असे करून करून तो पिक्चर पूर्ण केला असेल असे वाटते.
|
Alpana
| |
| Monday, June 04, 2007 - 8:14 am: |
| 
|
कुणी भोजपुरी पिक्चरचे चाहते आहेत का? आज च माझी बॉस सान्गत होती...मी पण ठरवलय नेक्स्ट वीकेंड ला भोजपुरी पिक्चर... जर मी दिल्लीत असेन तर.....
|
Mansmi18
| |
| Monday, June 04, 2007 - 2:09 pm: |
| 
|
थोडेसे विषयांतर होतेय पण रजनीकांत च्या पन्ख्याचा एक किस्सा त्याच्या चित्रपटांइतकाच अचाट आणि अतर्क्य्: या पट्ठ्याने लग्नाचा मुहुर्त रजनीकान्तच्या एका चित्रपटाच्या रिलिज़ चा पहिला शो च्या वेळी ठेवला होता आणी तीन वर्षानंतर जेव्हा त्याच्या दुसरा चित्रपट रिलिज़ झाला तेव्हा त्याने पहिल्या शो चा मुहुर्त साधुन बायकोचे सीज़ेरिअन करुन त्याच वेळेस मुलाची जन्मवेळ ही साधली. याला म्हणतात टायमिंग.
|
मी भोजपुरी चित्रपटांचा नाही पण भोजपुरी चित्रपट संगीताचा फॅन आहे... भोजपुरी चित्रपट अत्यन्त बालीश आणि निर्मीतीमूल्ये अत्यन्त दरिद्री. मराठीसारखीच. बहुरेक गाँवका छोरा आणि छोरी असलाच प्रकार. भोजपुरी गाण्याचे शब्द मात्र दादा कोंडक्यांच्या वरताण असतात...
|
Disha013
| |
| Monday, June 04, 2007 - 4:11 pm: |
| 
|
फ़ना मध्ये काजोलचे अगदी वेळ साधुन डोळ्यांचे ऑपरेशन केले जाते, (म्हणजे तीने आमीरला बघु नये याची काळजी घेवुन) आणि त्या ऑपरेशनन्तर ती प्रेग्नंट असल्याचे समजते. प्रेग्नन्ट असुनही ऑपरेशन? ताज्या शूटाऊट at लोखंडवाला मध्ये असाच एक सीन आहे. गुंडांनी मागितलेले खंडणीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे जाताना एक बिल्डर आपल्या पोटच्या मुलाला घेवुन जातो,तेही अपुरे पैसे घेवुन. गुंड सोडतील का पोराला? एवढीही अक्कल नसावी?
|
Alpana
| |
| Monday, June 04, 2007 - 4:31 pm: |
| 
|
अरे नाही रॉबीनहूड, मराठी पिक्चर बरे म्हणवे त्यान्च्यासमोर... मी तुकड्या तुकड्या मध्ये थोडे बघितलेत...मध्ये तर असही ऍकले की भोजपुरी मध्ये spiderman काढलाय
|
Sas
| |
| Monday, June 04, 2007 - 6:10 pm: |
| 
|
कालच ताजा "१:४० की last local पहिला चित्रपट तसा चांगला आहे, एकदा पहण्यास हरकत नाही (अश्याच प्रकारचा एक शिनेमा आधीपण आलेला-पाहिलेला आठवत पण त्याच नाव आठवत नाही. असो.) पण या चित्रपटात कुणालाही लक्षात येईल अशी गड्बड झालि आहे (वा तो माझा नयन दोष असु शकतो) "नेहा धुपिया" जंगलात अभय ने तिचा 'मोबाईल" तोडल्यावर त्याला जाम झाडते, रडते, कुढते ... (अभय तो मोबईल जोडण्याचा प्रयत्न करतो पण तो Mob. again चालतो अहे हे काही दाखविलेल नाही) ह्या सिन नंतर लगेचच अवघ्या (appx.) ३० मी.त एक सिन आहे ज्यात नेहा पर्स मधुन "मोबाईल" काढुन नंबर लावते व त्या एका call ने कहानीत twist n change आता तिच्या जवळ मोबाईल कसा आला हे मला तरि ह्या २ सिन च्या मध्यला सिन्स मध्ये दिसल कळल नाही. (कुणाला महित असल्यास कळविणे)
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:41 am: |
| 
|
भोजपुरी चित्रपट अत्यन्त बालीश आणि निर्मीतीमूल्ये अत्यन्त दरिद्री.>>>> ओय कन्ट्रोल यार! भोजपुरी पिक्चर गंगा मधे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी आहेत. शिवाय त्यांचे ते नेहमीचे २ सुपर स्टार रवीकिशन आणि तो दुसरा गायक कम एक्टर आहे त्याच नाव माहित नाहि. हिरवीन आहे नगमा हो हो तीच सौरव वाली. आता एवढे मोठे मोठे लोक्स आहेत तर त्याच निर्मिती मुल्य कमी कसे? काल आज तक का कोणत्या तरी न्युज चॅनेल वर ही मौलिक माहिती मिळाली.
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 05, 2007 - 5:15 am: |
| 
|
लेटेस्ट न्युज. भोजपुरी पिक्चर गंगा चा सिक्वल गंगोत्रीच शूटिंग पुर्ण होत आलय. आता बोला.
|
Farend
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:05 am: |
| 
|
"बम्बई की लैला छपरा के छैला" या चित्रपटाची जाहिरात ४-५ महिन्यांपूर्वी पुण्यात (आणि मुंबईतही) जोरात होती. पेपरमधील त्या जाहिरातीच्या चौकटीत चित्राशेजारी जागा मिळेल तेथे शब्द बसवून लिहिलेले हे हम है छपरा के नामी लौंडा गुल्ली लेबू के लेबू डंडा गाडदेव जुहू बीच पे झंडा काय आहे हे काही झेपत नव्हते. शेवटी रोज वाचून तो कोणता anagram का काहीतरी असतो त्याच्याकडे बराच वेळ बघितले की एकदम काहीतरी दिसते तशी ही "कविता" लागली: हम है छपरा के नामी लौंडा गुल्ली लेबू के लेबू डंडा गाडदेव जुहू बीच पे झंडा
|
Alpana
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:37 am: |
| 
|
हो रे झकास मी पण ती मुलाखत बघितली होती रवीकिशन ची ज्यात त्याने त्याच्या येणार्या भोजपुरी सुपरहिरो बद्दल पण सान्गितले होते...एक हनुमान भक्त अपन्ग हिरो हनुमानाच्या क्रुपेने सुपर हिरो होतो...आणी त्याचा कॉस्च्युम भयानक आहे... हा सुपरहिरो म्हणे कपड्यांवरुन लंगोट घालणार आहे..
|