Alpana
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:15 am: |
| 
|
किन्व पन्जु शी लग्न केल्यापासुन.. तरी नशिब सरदार नाहिये तो 
|
Sheshhnag
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:59 am: |
| 
|
अल्पना, कॉम्पुटरचा गोंधळ कळला, पण `जो' गोंधळ लिहिण्यासाठी `हा' गोंधळ घातलास `तो' गोंधळ कुठं लिहिलास?
|
Alpana
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:17 am: |
| 
|
नन्तर ते सगळे परत लिहायचा जाम कन्टाळा आला... मुम्बई च्या लोकल मध्ये कधिही न चुकलेली मी दिल्ली मेट्रो मध्ये चुकायची सन्धी नसताना पण उलट्या दिशेने गेले. शेवटच्या स्टेशन वर पोचल्यावर लक्शात आले. तरीपण मेट्रोतच बसुन रहायला सुचले नाही. उतरल्यावर २ मिनिटनी लक्शात आले की ह्याच तिकिटावर ह्याच मेट्रो मध्ये बसुन मला परत जाता येईल. मग काय परत आत चढले.. पण मुख्य गोन्धळ हा कि नवर्याला आधीच फ़ोन करुन सान्गितले होते १५ मिनिटात पोचेन स्टेशन वर घ्यायला ये... तो बिचारा अर्धा तास माझी वाट बघत थाम्बला.. बरे माझा मुर्खपणा सन्गितला तर ओरडेल म्हणुन मी रस्त्यात त्याचा फ़ोन पण उचलला नाही... मग काय उतरल्या बरोबर त्याचे तोन्ड सुरु झाले
|
Mahesh
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:03 am: |
| 
|
मग त्याचे तोंड बंद कसे केलेस ? 
|
मग त्याचे तोंड बंद कसे केलेस ? हा हा हा हा. तो उपाय बायकांकडे कायम असतो. बायकांचे मात्र तोंड सुरू झाले की, पुरुषांचे मात्र काही उपाय चालत नाहीत.
|
Gobu
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:36 am: |
| 
|
शेष, हे मात्र अगदी खर ह!
एक विनोद आठवला लग्नानन्तर पहिल्यावर्षी: नवरा बोलतो आणि बायको ऐकते! लग्नानन्तर दुसर्या वर्षी: बायको बोलते आणि नवरा ऐकतो!! आणि लग्नानन्तर तिसर्या वर्षी: दोघे ही बोलतात आणि शेजारी ऐकतात!!!
|
Alpana
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:58 am: |
| 
|
अगदी असच होते असे नाही हं कधी कधी पहिल्याच वर्षी दोघही बोलतात आणि शेजारी ऐकतात अशी परिस्थिती असते.. हे स्माईली कसे टाकायचे हो?
|
Mahesh
| |
| Friday, May 25, 2007 - 6:41 am: |
| 
|
मला वेगळेच अपेक्षित होते. म्हणून तर मी wink smiley टाकली होती. पण तुम्ही वेगळाच विषय सुरु केलात. 
|
मी पण त्याच उद्देशाने मेसेज टाकला होता. पण आवडता मुद्दा मिळाल्याने जरा भरकटला वाटते. दिवे घ्या. अल्पना... /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi इथे पाहा.
|
Sakhi_d
| |
| Saturday, May 26, 2007 - 10:53 am: |
| 
|
अल्पना आणि सई भारीच वेंधळ्याबाई तुम्ही.... मजा आली पण वाचताना....
|
Chyayla
| |
| Sunday, May 27, 2007 - 2:39 pm: |
| 
|
खरेच मजा आली, तीचा वेन्धळेपणा अल्प ना(ही).. सगळे किस्से भारीच आहेत. सई च्या टीवीच्या किस्स्यावरुन आठवले एकदा माझ्या मामाने ईब्लीसपणा केला टीवी मधे कुठलेसे वादळ वार्याचे दृष्य सुरु होते, त्याने आईला म्हटल... अग ती झाड वार्यानी किती हलत आहेत पन्खा बन्द कर... आणी माझ्या आईनेही उठुन चक्क पन्खा बन्द केला होता.
|
Saee
| |
| Tuesday, May 29, 2007 - 4:46 am: |
| 
|
आजुबाजूच्या इब्लिसांमुळे असा वेंधळेपणा बक्षिस मिळतो!!
|
Dakshina
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:21 am: |
| 
|
आज सकाळी मला घ्यायला office ची कार येणार होती... माझा नुसता गोंधळ उडाला होता.. घाईघाईत Fairness Cream लावलं आणि बाहेर पडले. कारमध्ये बसल्यावर लक्षात आलं की कसलातरी खूप उग्र वास येतोय... ते ही थेट नाकापाशीच.... काय वाटलं कोणजाणे पर्स उघडून पाहीली, मी चक्क Fairness Cream समजून जे मलम चेहर्याला लावलं होतं ते Odomas होतं 
|
Gobu
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:14 pm: |
| 
|
दक्षिणा,
 ग्रेट आहेस ह तु!
|
Sakhi_d
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:01 am: |
| 
|
>>जे मलम चेहर्याला लावलं होतं ते Odomas होतं >> मग कुठ्लाही मच्छर जवळ आला नसेल ना.... दिवे घेशीलच....
|
Dakshina
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:56 am: |
| 
|
डासच काय? हत्ती पण आला नाही...   
|
Alpana
| |
| Wednesday, May 30, 2007 - 11:30 am: |
| 
|
आज सकाळचा किस्सा... मी रोज ओफ़िसला घरुन रिक्शाने जाते. आज माझ्या दीराने मला अर्ध्या रस्त्यात सोडले. तिथुन रिक्शाला हात केला. रिक्शावाल्याने विचारले कुठे जाणार? मी लगेच... पन्चशिल पार्क चलोगे जी? तो म्हणाला हं जी क्योन नही? आत्ता पर्यन्त दिल्लीची सवय झाली आहे घासाघिस करायची. त्यामुळे मी लगेच विचारले कितने लोगे भैय्या? त्यानी पण मी नेहमीची आहे कि नाही बघण्यसठी मला विचारले कि आप कितना देती हो? मी लगेच एका सेकन्दात म्हणाले ७० रुपियेसे ज्यादा नही दुन्गी.. तो माझ्याकडे बघतच राहिला...आणी मग माझ्या लक्शात आले कि तेवढे तर मी माझ्या घरापासुन देते... मग त्याला म्हटले इतना तो मै पटेल नगर से देती हुं... मला तर काही कमीच करता येइन त्यानन्तर.. ३५ ते ४० द्यायचे तिथे ५० रुपये देवुन आले मग...
|
Nkashi
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:07 pm: |
| 
|
हे हे, अरे मग ती रिक्षा सोडुन दुसरी पकडाची ना... वेंधळी ग वेंधळी.... दिवा घेच... 
|
इथे सगंळ्यांचे किस्से ऐकून मलाहि माझ्या बहिणीचा वेंधळेपणा आठवला. आम्ही इंजि. च्या दुसर्या वर्षाचा परिक्षा-पेपर लिहित होतो आणि तिला 'स्टेपलर' ची गरज होती. तर तिने पुढच्या मुलाला विचारले की "तुझ्याकडे लायटर आहे का?". ..पेपर अवघड असूनही सगळे हसत होते.
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:37 am: |
| 
|
स्टेपलर ला लायटर ? म्हणजे कमालच अगदी
|