Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 11:31 am: |
| 
|
मित्रहो (ह्यात सर्व मायबोलीकर आणि मायबोलिकरनी आल्या) ह्या अम्याने मला ति मेल पाठवली आहे आणि त्यातील चित्रे मी इथे देत आहे. हि त्याच फ़िल्म मधील आहेत ज्याचा उल्लेख मी व अम्याने वरती केला आहे. तर पहा आणि मजा घ्या.
नीट पहा हिरो ला कसा बांधला आहे.
हा हिरोचा भाउ त्याच्या अंगाला टाइम बॉम्ब लावला आहे. तो टाइम बॉम्ब पेशल आहे त्यावर ऑन आणि ऑफ़ अशी बटनं आहेत. ( user friendly ). ती तुम्हाला पुढच्या चित्रात दिसतीलच
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 11:45 am: |
| 
|
तुम्हाला तो बॉम्ब सुरु आहे हे दिसल असेलच वरच्या चित्रात. ते आकडे दिसत आहेत ना तो टायमर. म्हणजे बॉम्ब सुरु आहे. आता गुंड पळुन गेले आहेत. हिरो आणि त्याच्या भावाला बांधुन. आता पुढच चित्र पहा. तिथेच बाजुला काहि गोळ्या (बंदुकिच्या) पडलेल्या आहेत. ते पाहुन हिरोच्या डोस्क्यात एक लय भारी आयडीयाची कल्पना येते. काय ते पुढे कळेलच. पण तो गोळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा किती प्रयत्न करतोय. त्याच्या चेहर्यावरचे हावभाव पहा.

|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 11:48 am: |
| 
|
मित्रहो आता तुम्हाला बॉम्ब दिसतोय त्यातील वेळ पहा. किती सेकन्द उरलेत जरा बघा. पुढच्या चित्रात हिरो पुढे पुढे सरकण्याचा किती आटोकाट प्रयत्न करतोय. बघा त्याचे हावभाव.

|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 11:51 am: |
| 
|
आता तुम्हाला हिरो ची डोक्यालिटी कळेल. बघा तो काय करतोय. पुढच्या चित्रात त्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा घाम बघा. मी वरच्या पोस्ट मधे बोल्लो होतो ना ते हेच.

|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 11:53 am: |
| 
|
आणि बॉम्ब बंद पडला. ते लाल बटण बॉम्ब बंद करण्याच होत. ते त्यागोळीने दाबल गेल. पण पब्लिक अजुन नाहि सुटले कारण अजुन व्हिलन जिवंत आहे. पण आपण सुटलो कारण पुढची चित्र नाहियेत,

|
Ajjuka
| |
| Monday, May 28, 2007 - 2:28 pm: |
| 
|
he raam!! aamhi hi sutalo..
|
Monakshi
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:01 am: |
| 
|
च्यामारी त्या हिरोच्या, अरे ऑलिंपिक मध्ये जाना. निदान एक तरी मेडल मिळवून आण. इथे कशाला सडतो आहेस.
|
आम्हाला हे सर्व पहायला आवडते, आम्हाला असे वाटते की आमच्यातलाच कोणितरी असे करतो आहे ज्यामुळे आम्हाला एनर्जी(?????) मिळते. तुम्हाला आवडत नसेल पहायला तर कशाला पाहता? तुम्हाला जशी शाहरुखची "क,क,क" आवडते तशी आम्हाला रजनीची फ़ाईट आवडते. --------इति एक तमिळियन.
|
आता यावर हसावे का रडावे ते कळत नाही. जय चंद्रकेशवा!!! http://www.youtube.com/watch?v=s4CRRbjFXl8
|
Mandard
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:33 am: |
| 
|
Have anyone seen promos of Himesh Reshmiya's new film. 3 autos are coming in front of police car in Europe and they lift autos like bike and hit the bonet of police car and Himesh salutes them. Bajaj Auto in Europe. Hamara Bajaj.
|
Psg
| |
| Tuesday, May 29, 2007 - 7:06 am: |
| 
|
जबरी! मस्त आहे व्हिडीयो स्वप्निल. सोनाली कसली भंजाळली आहे ना! जय केशवा! (मला 'सिद्धकेशवा' ऐकू आले!)
|
Disha013
| |
| Tuesday, May 29, 2007 - 2:38 pm: |
| 
|
स्वप्निल, जय चंद्रकेशव! btw ,हे चंद्रकेशव काय प्रकरण आहे? आणि त्याच लिंकवर येणारा तो heart surgery चा अफ़लातुन सीन बघितला का? बघाच बघाच. चुकवु नये असाच आहे तो. डॉक्टर्स surgery करतायत mobile ने! अचंबित व्ह्यायला होतय!जय director !!
|
Sas
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:58 pm: |
| 
|
Weekend ला असाच एक अचाट आर्तक्य की ह्याहुन काहीतरी वेगळाच प्रकार सोसला. बहुदा चित्रपटाच्या नावाचा कथेशी मेळ असतो जस "कु. कु. हो. है" यात सबंध ३ साडे तीन तास सारख सार्यांच्या मनात कही तरी होत असत., "भुत" म्हणजे भुताटकिचा शिनेमा...पण ह्या चित्रपटाच नाव व कथा ह्यात मला तरी काहीच मेळ आढळला नाही, चित्रपटाच नाव "नि:श्ब्द" पण ह्यात न बोलता, गप्प रहाणार अस कुणिच नाही, सारे धडधड आपल मन-भावना-प्रेम व्यक्त करतात, २-३ तास अगदी सुरवात ते शेवट मध्य मध्ये जमेल तिथे सर्वत्र "अ" ची अखंड रटाळवाणी 'व्याख्यान' आणी भयंकर प्रकार. सिन १ १६-१८ वर्षांची मुलगी मैत्रिणिच्या ६० वर्षांच्या वडिलांना Stupid वै. म्हणते , त्यावर तिला तिला कोणिच काही बोलत नाही. सिन २ पाण्यात भिजलेलि ही 'टिन Age'; वयस्क & जास्त ओळख नसलेल्या माणसाला चिटकते , त्याच्या बायको समोर त्याला बिलगते आणी ही बायकोही त्यांच्या फालतुपणात सामील होते. ("Big B" जिया चे photo काढतो त्या नंतरचा सिन) सिन ३ आपल्या मैत्रिणी कडे रहायला आलेली १६-१८ वर्षाची मुलगी, मैत्रिणिच्या आईला means तिच्या so called Aunty ला पायाने अडवते व ह्यावर ती Aunty तिला काहीही न बोलता उलट हसुन मजेत ते टाळते. कुठल्याही culture मध्ये वा कितिही मोकळ्या मनाच्या व्यक्तिला हे असले प्रकार खपविता येण शक्याच नाही आणी वडिल ह्या नात्याने काही समजावण हा प्रकार ही इथे नाही.
|
चन्द्रकेशवा ची लिन्क जबरी आहे...विनोदी म्हणुन तरी आता तेलगु,तमिल पिक्चर आणायला पाहिजे..या लिंक बरोबरच बाल्या & प्लेन , बाल्या & बाईक असे सुपर विनोदी सिन उपलब्ध आहे...लाभ घ्यावा..
|
कसली जबरी आहे ती link शब्द्श : rofl Btw, कोणाला डॉन मधला प्राण दोरीवरून झोकांड्या खात मुलांना घेउन पळून जातो तो scene आठवतोय का ? तो ही अशक्य आहे आणि Mr. नटवरलाल मधला अमिताभ चा climax scene? तो तुरुंगात असतो आणि जमिनिवर पाय दिला तर स्फोट होणार असतो म्हणून तो जमिनिवर पाउलही न ठेवता दोन भींतीं वर एक एक पाय ठेवुन चालत जातो तो scene
|
याच्यासारखे दोघे तिघे ठेवले तर भारतीय रेल्वे कधीही लेट धावणार नाहीत. आणि पेट्रोलचा खर्चही वाचला. अशा कित्येकसे व्हिडीयो youtube वर सापडतात
|
Dhumketu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:22 am: |
| 
|
तो जमिनिवर पाउलही न ठेवता दोन भींतीं वर एक एक पाय ठेवुन चालत जातो तो scene -- आता त्या भिंतीत कीती अंतर होते आठवत नाही.. पण गिर्यारोहणात (rockclimbing) एक चिमणी म्हणून प्रकार आहे. त्यात पाठ एका भिंतीला आणी पाय दुसर्या असे लाऊन चढायचे असते. अनेकदा गिर्यारोहणातही असे करतात... जर एका झर्यामधून वा तत्सम काही असेल तर दोन्ही पाय फ़ाकून बाजूला लावतो आणी पुढे जातो.
|
Swa_26
| |
| Wednesday, May 30, 2007 - 10:46 am: |
| 
|
काल TV ला रुद्राक्ष नावाचा चित्रपट लागलेला. एकच सीन पाहीला आणि जाऊन झोपले. सुनिल शेट्टीला कसलीतरी अचाट शक्ती वगैरे मिळालेली दाखवलीय त्यात. दुसरा हिरो कोण होता आठवत नाही, पण त्याच्या बरोबरच्या मुलीला एक गोरी नटी येऊन मारत असते. तर हिरो त्या मुलीला वाचवतो आणि त्या गोर्या नटीला विचारतो की,"तुमको किसने भेजा?" तर ही बाई तिथल्या भिंतीवर spiderman सारखी चढते आणि वरुन स्वत:ला झोकुन देते... खल्लास. आत्महत्या करण्याची एवढी creative पद्धत दुसरी कुठे पाहीली नाय बुवा आपण..
|
परिणीता मधे सैफ़ एकटाच भिन्त तोडत बसतो आणि बाकीचे तोड तोड ओरडतात. आरे मदत करा ना त्याला....
|
तेरी मेहेरबानिया मधे कुत्र्याच्या स्वप्नात हीरो हीरोइन चे गाणे आहे केवढे हे मालकावर प्रेम?
|