हे 'शेकोटी' सीन फ़ार घीसेपीटे झाले होते पूर्वी! अतर्क्य गोश्ट ही की आता कुणी दोघे पावसात चुकून भिजले आणि निर्जन ठिकनी आसरा घेतला, शेकोटी पेतवली इथवर ठीक.. कोनीही सभ्य मानसं फ़ार तर शेकोटीजवळ बसतील थंडी वाजू नये म्हणून. पण अशा वेळी हे शेकोटीबहाद्दर लोक (उदा शर्मिला, रूप तेरा मस्ताना मधे) अंगावरचे सगळे कपडे काढून लगेच दोरीवर वाळत वगैरे टाकण्याचा उरक का पाडतात मग त्या हिरॉइनीच्या अंगावर एखादी तोकडी घोंगडी किन्वा हीरो चा (फ़क्त) शर्ट, वगैरे असले काहीतरी मग अजून काय होणार पुढे मग आहेच सकाळी उठून रडणं ' ये हमसे क्या हो गया' 
|
Sas
| |
| Friday, May 25, 2007 - 7:24 pm: |
| 
|
मुख्य म्हणजे हिरोइनला थंडित गुंडाळायला तो चिथडा कसा मिळातो अश्या निर्जन ठिकाणी, घरुनच पर्स मध्ये Emergency "निर्जन बारीश" situation साठी ठेवलेला असतो वाटत. तसच निर्जन ठिकाणी "वो उधर घर/झोपडा" दिख रहा है with ह्यांच्या मापाच्या कपड्यांसोबत व घर-मालक घराला कडी-कोंडा न करताच बाहेर गेलेला; जणु काही त्यांची वाट पाहुन घर-मालक थकला व आता पाय मोकळे करयला गेला, तितक्यात हे आले व आपलच घर समजुन नाचु-गाऊ-प्रेमु लागले.
|
Atul
| |
| Friday, May 25, 2007 - 7:27 pm: |
| 
|
रामसे टाईप भूताच्या सिनेमात ४-५ जणान्च टोळ्क नेहमी खन्डहर वजा हवेलीत का रहात हे एक त्या भूताईतकच गूढ आहे. एक्-एक जण मरतोय तरी पण बाकीचे तिथेच राहतात आणि मरायची वाट बघतात. शेवटी हिरो अस्वल कम भूताला मारतो आणि प्रेक्शाक सुटतात.
|
Slarti
| |
| Friday, May 25, 2007 - 10:28 pm: |
| 
|
>>>अस्वल कम भूत...
अतुल, अगदी अगदी !
|
Hems
| |
| Saturday, May 26, 2007 - 1:47 am: |
| 
|
मैत्रेयी , इथली एकेक पोस्ट वाचून म्हणजे अगदी हहपुवा ! कुणाला तो एक थोर चित्रपट आठवतोय का : ज्यात हीरो की हिरॉईनचा एक घोडा असतो आणि तो संकटकाळी त्याला गोळी लागलेली वगैरे असताना हिरऑईनला चक्क आपल्या खुरांनी लिहून - हो लि..हू .. न दाखवतो हिरो ला कुणी मारलय ते !
|
Farend
| |
| Saturday, May 26, 2007 - 2:33 am: |
| 
|
अरे तो तर मी केव्हापासून आठवतोय आणि एक टी व्ही सिरीज मधे शॉट आठवतोय. एक राजा झोपलेला असतो आणि तेथे एक्-दोन साप शिरतात. आता राजाला चावायच्या ऐवजी तो साप तेथील दूध का असेच काहीतरी पितो आणि भिंतीवर असे थुंकतो की अक्षरे उमटतात (ती ही उर्दू मधे, उजवीकडून डावीकडे!). असे काहीतरी असते की त्या सापाला पूर्वी राजाने काहीतरी मदत केलेली असते. ते तो लिहून दाखवतो त्याला.
|
Sayuri
| |
| Saturday, May 26, 2007 - 3:28 am: |
| 
|
हिरो/हिरॉईनची अपघातात मेमरी गेलेली असते. 'गेहेरा सदमा पहुंचनेसे इनकी याददाश चली गयी है..' इति डॉ.('याददाश'च नं? जय हिंदी! ) नंतर काहीतरी आघात होऊन नेहेमीप्रमाणे ती परतही येते..सगळं पूर्वीचं आठवायला लागतं..अपघात कसा झाला हेही आठवतं..मात्र हा सर्व फ़्लॅशबॅक कधीही वर्तमानासारखा रंगीत दिसत नाही तर कायम आपलं फोटो निगेटिव्हसारखं वातावरण eg. 'कर्ज' मध्ये ऋषी कपूरच्या पुनर्जन्मातील आठवणी..
|
Sadda
| |
| Saturday, May 26, 2007 - 5:50 am: |
| 
|
मस्तच चालल आहे.... तुम्हाल तो जुन्या Don मधला प्राणचा सीन आठ्वतोय का? तो त्याच्या मुलाना गुंडाच्या इथुन पळ्वत असतो.... आणि या Building वरुन त्या building वर दोर टाकुन जात असतो एका हातात एक मुलगा दुसरिकडे मुलगी.. आणी हा लंगडा..मला खरच कळाल नाहि हा कसा balance करतो ते? 
|
प्रत्येक मेसेज म्हणजे ह. ह. पु. वा. मस्तच. मिथुनच्या प्रत्येक सिनेमात तो व्हिलनवर अटक करण्याअगोदर बोटं वेडीवाकडी हलवतो, अख्ख्या हॉलमध्ये कडा कडा आवाज घुमतो. वात झालेला असला की चांगली मारामारी करता येते असं मिथुनच्या दिग्द. चे मत असते, असे वाटते.
|
Mukund
| |
| Saturday, May 26, 2007 - 10:14 am: |
| 
|
शेंडेनक्षत्र... ह ह पु वा.. चतुर डायलॉग.. कोठा साफ़ नसल्यासारखे.. कमालीचा विनोदी अहवाल आहे तुझा.. इथे अमेरिकेत कॉमेडी सेंट्रल वर ९० च्या दशकात एक मिस्टरी सायंस ३००० म्हणुन एक प्रोग्रॅम यायचा.. त्यात एक माणुस २ रोबॉट्स ना बाजुला घेउन असेच अचाट व अतर्क्य मुव्ही थिएटरात बसुन बघत असताना आपल्याला पाठमोरी दिसतात.. म्हणजे तुम्हाला तो अचाट मुव्हीसुद्धा दिसतो व यांची डोकी... व ते तिघे ते अचाट व अतर्क्य मुव्ही बघताना कॉमेंट्स मारत मारत मुव्ही बघत असतात.. त्यांच्या कॉमेंट्स ऐकुन ह ह पु वा व्हायची..तो प्रोग्रॅम त्यांच्या कॉमेंट्स साठी होता.. म्हणुन मुद्दाम अचाट व अतर्क्यच मुव्ही निवडायचे त्यासाठी... इथे नमुद केलेले काही मुव्ही त्या प्रोग्रॅम मधे एकदम फ़िट्ट बसले असते! या बीबी वरचे सगळे कॉमेंट्स वाचुन मला त्याची फार आठवण आली.. तुमच्यापैकी कोणी पाहीला आहे को तो प्रोग्रॅम?
|
Zakasrao
| |
| Saturday, May 26, 2007 - 11:29 am: |
| 
|
मला खरच कळाल नाहि हा कसा balance करतो ते?>>>>>> अरे ते सोड त्या सिन मधे सगळे गुंड त्याचा दोर चाकुने कापत बसतात. एकजण कापतो आणि बाकिचे बघत बसतात. ते जर दुसर्या बिल्डिंगच्या टेरेस वर गेले तर चालले नसते का त्याला पकडायला. किंवा त्याला गोळी मारायची सरळ. आणि शेवटची फ़ायटींग अजुन नाहि बघितली का?? त्यात सगळ्यानी भरपुर उड्या मारल्या आहेत. इतक्या कि त्याना नंतर सर्कस मधे काम करायची ऑफ़र आली होति म्हणे.
|
Ajjuka
| |
| Saturday, May 26, 2007 - 2:24 pm: |
| 
|
makadacha kam karayachi offer ka zakas?
|
Deshi
| |
| Saturday, May 26, 2007 - 3:53 pm: |
| 
|
अशा वेळी हे शेकोटीबहाद्दर लोक (उदा शर्मिला, रूप तेरा मस्ताना मधे) अंगावरचे सगळे कपडे काढून लगेच दोरीवर वाळत वगैरे टाकण्याचा उरक का पाडतात >> असा एक प्रसंग माझ्यावर आला होता. म्हनजे पावसाचा हो. पण मला शेकोटी ही पेटवता आली नाही (काडीपेटी काय नेहमी बाळगु का?) व माझ्या मैत्रीनीला कुठे ते चिथडेही भेटले नाही. व आम्हाला कात्रज घाटात असुन सुध्द्दा एकादा पडका बंगला सापडला नाही. काय करनार भिजत भिजत कात्रज पार केला.
|
या बाबतीत दक्षिणेकडचे पिक्चर बघायचे.वाट्टेल ते दाखवतात. रजनीकांत ३०-४० लोकांना ठोकतो मग फ़ाइट झाल्यावर तो हवेत उडी मारतो (म्हणजे matrix स्टाइलमधे) ,आणि उडी मारुन आपल्या पांढर्या रंगाच्या pant वरील धुळ साफ़ करतो(म्हणजे pant झटकतो पायांनीच, हवेतच). आणी इतकी फ़ाइट झाल्यावर ही त्याचे कपडे 'सर्फ़ एक्सेल'च्या जाहिरातिप्रमाणेच स्वच्छ आणि पांढरेशुभ्र असतात. एक तेलगु हिरो तर बाइकवरुन रैल्वे चेझ करत तिला मागे टाकतो मग चालत्या रेल्वेवरुन बाइक चालवत स्टंट देतो सर्व अफ़लातूनच. एका सीनमधे हिरो आणि हिरॉइनचे हातपाय बांधलेले असतात. आणी सगळे व्हिलन आणि गुंडे टाईम बॉंब लावुन निघुन जातात.जमिनीवर एक गोळी पडलेली असते मग हिरो खाली पडतो पण त्याला जागेवरुन हालता येत नाही. टाइम संपत आलेला असतो, मग हिरो त्याच्या तोंदात गोळी घेतो.१०-९-८ वगैरे सुरु.मग हिरो ति गोळी तिथुनच तोंडानिच बरोबर फ़ेकुन मारतो आणि ती गोळी जाउन बरोबर off बटणाला लागते आणि काउंट्डाउन बंद होतो. आणि सगळे सुटकेचा निश्वास टाकतात (प्रेक्षकसुद्धा)
|
.. आणि शेवटच्या सीन मध्ये हिरो आणि व्हिलन ह्यांची बराच वेळ मारा मारी होते. जुन्य movies मध्ये तर ढिशुम अस तोंडाने आवाज काढायचे की काय कोण जाणे तर मारामारी संपते तेंव्हा व्हीलन निपचीत पडतो. तिथेच मग हीरो आणि हीरोईन घुटमळत का थांबतात कळत नाही. पटापट तिथून निघून जाव की नाही. मग तो अर्धमेला व्हिलन उठतो. नेमका एखाद पिस्तूल त्याच्या जवळ पडलेल असत. मग तो मरता मरता गोळी झाडणार. इथे मग बर्याच गोष्टी होऊ शकतात. प्रेमाचा त्रिकोण असेल तर तो त्रिकोण समोर येतो आणि गोळीने मरतो. आई च प्रेम दाखवायच असेल तर आई समोर येते. किंवा त्याग दाखवायचा असेल तर हीरोईन समोर येते. मग तो xyz person मेला की पोलिस येतात
|
दक्षिणेतल्या चित्रपटात तर खरच इतके larger than life दाखवतात की विचारायची सोय नाही. त्या चित्रपटचा हिरो हिरोच्या ऐवजी सर्कशीचा विदुषक वाटायला लागतो. याहून कमाल म्हणजे रजनीकांत, बाल्या आणि तत्सम हिरो यांचे चित्रपट ४,४ महिने धुमाकूळ घालतात. अगदी हाउसफ़ुल्ल. तमिळ लोकांशी या बाबतीत वादही घालायची सोय नाही. ते तर रजनीकांत, बाल्याना देव समजतात. या तमिळ चित्रपटांच्या विषयासाठी खरच एक नवीन बीबी उघडता येईल.
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 4:09 am: |
| 
|
मग हिरो ति गोळी तिथुनच तोंडानिच बरोबर फ़ेकुन मारतो आणि ती गोळी जाउन बरोबर off बटणाला लागते आणि काउंट्डाउन बंद होतो.>>>>>>>>>> अरे हा यार. ती क्लिप मेल वर पाहिली होति. असती आता तर इकडे द्यायला मजा आली असती. त्यात त्या हिरो ला गोळी तोंडात धरुन त्या ऑफ़ च्या बटन वर नेम लावावा लागतो. तो त्यावेळी मन एकाग्र करतो ते इतक एकाग्र होत कि त्याला घामाच्या धारा लागतात. हे द्रुश्य असच आहे चित्रपटात. BTW ह्या हिरोला ऑलिंपिक मधे पाठवायला हरकत नाहिये. अज्जुका
|
Aamya
| |
| Monday, May 28, 2007 - 9:20 am: |
| 
|
झकासराव मझ्या काडे आहे ती मेल. पण ती येथे टकायची कशी.
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 9:44 am: |
| 
|
अम्या ती क्लिप एकतर u-tube किंवा google video वर अपलोड कर आणि लिन्क दे इथे. किंवा मला मेल कर मी करतो अपलोड. zakasrao@gmail.com
|
Aamya
| |
| Monday, May 28, 2007 - 11:11 am: |
| 
|
झकासराव मी तुम्हाला मेल केला आहे
|