अज्जुका.. मी गेलेय त्यातून. टीव्ही सीरियलला असिस्टंटगिरी करताना असं काही सांगायला गेलं की "अभी इतना कौन देखेगा? टाईम नही है." वगैरे ऐकायला लागायचं. वर त्या हीरॉईनी कायम मेकपच्याच फ़िकीरमधे कसेही डायलॉग बोलायच्या. काही सांगिअतलं की म्हणायच्या. "ऐसेही बोलते है.."
|
Ajjuka
| |
| Thursday, May 24, 2007 - 12:37 pm: |
| 
|
|मी आतापर्यंत पाहिलेल श्वास मधील हॉस्पिटल सगळ्यात वास्तववादी वाटल मला.| धन्यवाद झकास! |टीव्ही सीरियलला असिस्टंटगिरी करताना असं काही सांगायला गेलं की "अभी इतना कौन देखेगा? टाईम नही है." वगैरे ऐकायला लागायचं.| अर्ध्याहून अधिक चित्रपटांमधेही हेच असतं. पण आमच्या युनिटमधे नाही... लागल्यात त्यामुळे वाईट सवयी तपशीलवार काम करायच्या. मग इतर ठिकाणी काम करताना होतो घोळ मग तिथे costume cont. साठी मी AD पेक्षा माझ्या asst. लाच लिहायला बसवते. अगदी तपशीलासकट. खांद्यावर टाकलेला पंचा एकेरी की दुहेरी, कुठला खांदा, दुहेरी असेल तर घडीचा भाग कुठे आणि सुटा कुठे, घडी बरोब्बर मध्यावर की आजूबाजूला इत्यादी इत्यादी... सुरूवातीला वैतागतात नवीन मुली पण मग होते सवय..
|
मी माझ्या सीरियलच्या डीरेक्टरला संगितलं की त्या शब्दला (काय तरी नावं ठेवतात सीरीयलम्धे) बंकेत जॉब कसा लागेल तो तर बी ए झालाय ना.. तर तो माझ्यावरच भडकला. म्हणे तुला जास्त कळत असेल ऑडीयन्सला नाही.. म्हणजे बहुतेक हे लोक आपल्याला मूर्ख समजून पिक्चर सीरियल काढतात. आणि आपण उगाच त्याची अक्कल काढत बसतो. खरंतर प्रत्येक department ने continuity सांभाळायला हवी. पण इथे तर मी किंवा अजून एक मुलगा मिळून costume सीन, लोकेशन, actors डायलॉग सगळंच सांभाळायचो. वर दिवसाला कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस सीन शूट करायचो. ते TCR पण आम्हीच लिहायचं. शूटच्या वेळी प्रत्येक जण खुर्चीत. आम्ही दोघेच इकडॅ तिकडे भटकत. पिक्चरच्या वेळेला तर मला डेव्हीड धवनच्या सेटचा अनुभव आहे. पण तिथे काम खूप नीट असायचं. तो पिक्चरमधे आचरटपणा करू देत पण सेटवर खूप organised असायचा. पण सीरियल्स, नको रे बाबा... आता कधी कधी ते फ़ील्ड सोडल्याचा पश्चाताप होतो पण मग ते अनिश्चित लाईफ़ पण नको होतं... जाऊ दे खूपच विषयांतर झालं.
|
>> तो पिक्चरमधे आचरटपणा करू देत पण सेटवर खूप organised असायचा. म्हणूनच नंबर वन आहे ना आणि विषयांतर कुठे होतेय? असे अनुभव वाचायला interesting वाटतात.
|
Ajjuka
| |
| Thursday, May 24, 2007 - 1:35 pm: |
| 
|
hee hee sanme pan he achaat ani atarkya nahiye na...
|
Slarti
| |
| Thursday, May 24, 2007 - 3:30 pm: |
| 
|
मिथुनदांच्या चित्रपटातील एक शीन : एकदा मिथुनदांना तुरुंगात टाकतात. त्यांच्या अंगावर नेहमीचे तुरुंगी (चौकडीचे) कपडे त्या खास टोपीसकट. तर त्या खोलीमध्ये ते इकडे तिकडे बघतात आणि सरळ हाताचे बोट भिंतीला टेकवतात आणि अक्षरशः ड्रिलसारखे बोट चालवतात. ड्रिल.... ड्रिल.... ड्रिल .... (मी विचार करतो, आयला, दा तुरुंग फोडून सटकणार असे दिसते. "मेरा नाम हीरा, मैंने सबको चीरा" वगैरे...) भिंतीला भोक पडते, मिथुनदा खिशातून पेन काढतात, भोकात घुसवतात आणि पेनरूपी त्या खिळ्याला त्यांची टोपी लटकवतात. (मी दांच्या आरतीच्या तयारीला लागतो.)
|
Slarti
| |
| Thursday, May 24, 2007 - 3:44 pm: |
| 
|
btw भाग्य, रजनी वेळसुद्धा वाया घालवतो तर इष्टाईलने!
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:05 pm: |
| 
|
संघमित्रा खरे आहे. अज्जुका, नन्दिनी इथे नाही तर निदान इतर कोठेतरी हे वाचायला आवडेल. आणि काहीतरी असेलच की अतर्क्य आणि अचाट साध्या ऑफिसेस मधेही असते तर ह्या (सेट्स) तर तशा गोष्टी निर्माण करण्याच्या जागा.
|
Mbhure
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:25 pm: |
| 
|
Slarti जबरी आहे. कुठचा चित्र्रपट आठवत नाही, बहुधा सुरक्षा असावा. मिथुन्च्या गाडीवर लिहीलेले असतेः G-9 SECRET AGENT कोणी नाना आणि ऋषी कपुरचा हम दोनो पाहिला आहे का? त्यातील क्लायमॅक्स मधील एक संवाद बराच प्रॅक्टीकल आहेः नानाच्या सिनेमातील मामाने मोहन जोशीला नाना आणि ऋषीला मारायची ५० लाखाची सुपारी दिलेली असते. म्हणजे मग मामा " पुरी जायदाद का वारीस बन सकता है " . नेहमीप्रमाणे क्लायमॅक्स असल्याने सर्व मारामारीत एकत्र " भेटतात. " मामा भाच्यांना गोळी मारायला सांगतो. मामाः दोनो उडा दे और एक करोड लेके जा. नानाः रुको. अभी तो मैन जिंदा हूँ. मेरे मरने के बाद जायदाद और पैसा उसका होगा. तुम्ही पैसे से मतलब. मैं तुम्हे अभ्भी दो करोड देता हूँ. तुम मामा को मारो. असा विचार बाकीचे का करत नाहीत. ती खांबाला बांधाबांधी, नकली आणि मग असली कागज जायदाद के वगैरे वगैरे. चित्रपटः त्रिदेव. सुलभा देशपांडेः (सनी देओलला) बेटा मैं तो पढ लिख नही सकती. उसका फायदा लेके इस कमीनेने STAMP PAPER पे मेरा अंगुठा लिया. ह्याच चित्रपटात सनी अमरीश पुरीला घरातील फोनेवरुन धमकी देत असतो. आणि घरात खंडीने खोके रचलेले असतात.
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:36 pm: |
| 
|
भूषण तो Gun master G 9 म्हणजे सुरक्षा.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:50 pm: |
| 
|
मित्रानो या ऐतिहासिक गोष्टी नाहीत. सनी देओलचा बिग ब्रदर बघा. माणुस कायकाय उचलुन फ़ेकु शकतो ते बघा. हा म्हणे प्रियांका चोप्राने साईन केलेला पहिला सिनेमा. नुसती प्रॉपेर्टी म्हणुन वावरलीय सिनेमाभर.
|
खरच बिग ब्रदर अचाट आहे.प्रेक्षकांनी केस उपटले तरी चालेल असच सर्व होत त्याच्यात.
|
अचाट गोष्टीत करन्यात सन्नी देओलचे स्थान पहील्या पाचात हवे. आठवा तो गदर चा शिन. हो तोच तो ज्यात तो पंप उखडतो व तोच फेकतो. (मला दरवेळी उगीच भिम म्हणुन सन्नी ला घेतले असते तर काय बहार आली असती असे वाटते). मिथुन्दाचा विष्य असल्यामुळे - मध्यंतरी एक सलमान व मिथुन्चा एक रशीयातला पिक्चर आला होता. त्यात मिथुन दरवेळी वेगवेगळे वेष करुन अचानक प्रगट होतो. मला ते अतर्क्य वाटले.
|
Slarti
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:35 pm: |
| 
|
खरे आहे दिनेश तुमचे. ऐश्वर्या, गोविंदाच्या 'अलबेला'मध्ये (अलबेलाच ना ? CBDG ) सईद जाफ़्री हा आॅस्ट्रीयाचा राजदूत आहे. म्हणजे तो भारताचा आॅस्ट्रीयातील राजदूत आहे कि आॅस्ट्रीयाचा भारतातील राजदूत आहे ते मला चित्रपट बघूनसुद्धा कळाले नाही. पण आॅस्ट्रीया आहे आणि राजदूत आहे एवढे नक्की. त्यामुळे त्याच्या हिंदी व इंग्रजीला भन्नाट जर्मन / आॅस्ट्रीयन हेल आहे (हे खरेतर वेगळे असावेत, पण आपण पडलो अडाणी). तो दोनच जर्मन शब्द बोलतो : nein & fraulein . त्याच्या जर्मन सेक्रेटरीशी बोलताना तो fraulein म्हणून सुरूवात करतो आणि पुढे इंग्रजीत बोलतो ! शिवाय 'नहीं !!!' हे ज्या सुरा - चालीत म्हणतात तस्सेच तो 'nein !!!' म्हणतो. असो. सईद जाफ़्रीला राजदूत केले हेही नसे थोडके. समजा कादरखानला केले असते तर... त्याच्या सिमेंट लावलेल्या वरच्या ओठाने तो जर्मन बोलला असता तर एक देशी माणूस ब्रिटीश accent मध्ये जर्मन बोलत आहे असे आंतरराष्ट्रीय चित्र दिसले असते.
|
Mukund
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:26 pm: |
| 
|
केदार.. अरे सनी एक वेळ तरुण व फ़िट असल्यामुळे तो काहीही करु शकेल हा बेनीफ़ीट ऑफ़ डाउट आपण त्याला देउ शकतो.. पण मी आता सांगत असलेल्या सीनचे लॉजीक कोणी मला सांगेल काय? देव आनंदचा देस परदेस का कुठलासा मुव्ही होता... देव आनंद आणी अमजद खानची फ़ायटींग सुरु होते व ७० वर्षाचा (चिरतरुण) फाटक्या शरीराचा देव आनंद अगडबंब अमजदला एकच फ़ाइट मारतो.. तर अमजदखान बेशुद्धच पडतो... आता बोल!... मी लहान असुनही देव आनंदच्या व अमजदखानच्या शरीरयष्टींकडे पाहुन मला ती गोष्ट इतकी अतर्क्य व अचाट विनोदी वाटली की थीएटरात मी खो खो करुन हसत सुटलो होतो... आणी मोठ्या भावाचा धपाटा खाल्ला होता... स्लर्टी.. तोंडात पानाचा सदैव तोबरा असणारा सईद जाफ़री जर्मन बोलणारा राजदुत? तसा तोबरा असणार्या मुखातुन जर्मन गळले असते तरी कळले नसते
|
फाटक्या शरीराचा देव आनंद अगडबंब अमजदला एकच फ़ाइट मारतो.. तर अमजदखान बेशुद्धच पडतो 
|
Mbhure
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:11 pm: |
| 
|
कलेला कसलेच बंधन नसते. म्हणुन ही सिनेमावाली मंडळी हिरो हिरॉईनच्या नात्याचा संबंध आला की नुसते सुटतात. रंगीलाः चित्रपट धमाल आहे. पण काय ते आदर्श आई - बाप. आपली पोरगी एका टपोरी मवाल्या बरोबर फिरते तरी खुश. नंन्तर तीच एका फिल्मी हिरोबरोबर तरीही खुश. किती ते फ़ॉरव्स्र्ड! फनामध्येही आपली मुलगी कोण्या एका, ज्याचे आई - बाप माहित नाहीत की ज्याच्याबद्दल ओ की ठो माहिती नाही अश्या एका टपोर्या गाईडशी लग्न करणार म्हटल्यावर निघाले लगेच दिल्लीला. ............................. पुर्वीच्या चित्रपटातील हिरे खाऊन मरणे हा एक विनेदी प्रसंग असायचा. कशाला तो हिरा फुकट घालवतात. तसेच, फक्त POISON लिहील्या बाटल्या कुठच्या केमिस्टकडे मिळतात.
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:12 pm: |
| 
|
केदार तो म्हणजे Lucky, no time for love . हे एक आजकाल हिंदी नावाबरोबर एक इंग्रजी वाक्य का टाकावे लागते माहीत नाही. त्या लकी मधे इतरही काही अचाट प्रकार आहेत. सलमान आणि ती नायिका कोठेतरी अज्ञात ठिकाणी असतात आणि सलमान ला काहीतरी आणायला जायचे असते, तर ते एकमेकांना सापडावे म्हणून दोर्याचे एक टोक तो तिच्याकडे देतो आणि दुसरे स्वत: घेऊन जातो. आणि एका शॉट मधे रेल्वेचे दोन ट्रॅक दाखवले आहेत. त्यात एक पूर्ण बर्फाच्छादित असतो तर दुसरा पूर्ण नॉर्मल. केवळ एक दोन गाड्या एकाच रूळावरून गेल्यातर एवढे होईल असे वाटत नाही, पण कॅमेरामन ची ट्रॉल्ली जर बरेच रिटेक घेत गेली तर नक्कीच बर्फ वितळेल. नाहीतर पूर्ण बर्फ पडलेल्या भागात एकच रूळ पूर्ण कोरडा कसा राहील!
|
अमजादखानला आम्ही अम जाड खान म्हणत असू...
|
Gobu
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:15 pm: |
| 
|
मुकुन्दा, सही रे!
मित्रहो, मिथुनदा च्या कुठ्ल्यातरी पिक्चर मध्ये तो चालत भिन्त चढताना दाखवला आहे म्हणजे तो पळत येतो आणि ९० अन्शाचा कोन करुन भिन्तीवरुन चालत वर जातो! धरम पाजी तर एका पिक्चरमध्ये हाताने गोळी अडवतो असे दाखवलय!
|