|
Dakshina
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:27 am: |
| 
|
आपल्यापैकी बहुतेक जणांनी हा टूकार चित्रपट पाहीला असेल. हृतिक रोशनला म्हणे अख्ख्या जगावर अपल्या नावाचे अद्याक्षर लिहायचे असते.. ते का बुवा? बरं, लिहायचं असेल तर लिही.. पण आम्हाला कशाला त्रास? वर या चित्रपटात इतके योगायोग की विचारता सोय नाही. याचं नाव A पासून सुरु होतं, तर त्याच shape मध्ये connected असलेली ठिकाणंच नेमकी कशी मौल्यवान वस्तूंची माहेरघरं असतात? पोलिस department मध्ये अख्ख. आयुष्यं घालवून सुद्धा जी गोष्टं मोठमोठ्या अधिकार्यांना कळत नाही ती 'कल का छोकरा' अभिषेकला कळते. मग तो सांगतो, कि तो हृतिक पुढची चोरी कुठे करणार आहे ते. हिरा चोरण्याचा scene तर अशक्यं आहे. मुळात त्या Museum मधे जर इतकी कडक सुरक्षा असेल तर तो baathroom मध्ये पोहोचतोच कसा? बरं पोचला तर पोचला अंगाला पांढरा रंग फ़ासेपर्यंत बाथरूमात कुणीच गेलं नाही? का सगळे त्याचा make up व्हायची वाट बघत बसलेले? btw मला एक प्रश्नं आहे. त्याने एकट्याने पाठीला रंग कसा काय लावला असेल? असो... तो हिरा चोरण्यासाठी.. त्यानं जे specific यंत्र बनवलेलं असतं ते इतक Perfect कस काय असतं? ते जणू कही त्यांचं ऐकतंच... दरम्यानच्या काळात त्याला शिंक, खोकला.. काही येत नाही... काय अचाट योगायोग आहे ना? तिथून गायब झाल्यावर तर तो direct म्हाताराच दाखवलाय.. जणू त्याला पहिल्यापासून माहीत असतं की तिथे अपल्याला पोलिस पकडणार आहेत, त्याने घरूनच बूटात acid भरून आणलेलं असतं. पोलिस पण त्याला नेमका Drainage च्या झाकणावरंच कसा काय थंबवतात? आणि ते I-Card तो कधी छापून घेतो म्हणे? या हृतिक ला सगळ्या गोष्टिंची अचूक माहीती असते. काही c.m. वर ठेवलेलं coke याला spider man सारख ओढून कशाला घ्यावं लागतं? अहो आयुष्यात करण्याजोगं अजुन काही नाही का? जगावर नाव काय, इतके hi-fi equiepments काय, ती डोळे फ़िरवणारी technology काय. सामान्य माणसाला ते काही झेपण्यातलं प्रकरण नाही. अजुनी एक प्रश्नं त्याला हे सगळं करायला किती खर्च आला असेल? का आंगाला लावण्यासाठीचा रंग बिंग फ़ुकट मिळत असेल त्याला? जसं काही तो रंगारी म्हाणेल 'जा बाबा जगावर नाव लिहिण्याचं फ़ार मोठं काम करतोयस.. एव्हढा रंग घे, माझं contribution म्हणून. (काय नव्हेच!   आणि त्या झाकणात पडल्यावर बाहेर येतो तेव्हा jeans आणि T-shrit घालून, ते कधी बदलले? काय उल्लू बनावतात हे हिंदी सिनेमावाले???? ऐश्वर्या राय हे एक नको असलेलं पात्रं पोलिस इन्स्पेटर.. म्हणे... जिने पोलिसगिरी करण्यापेक्षा fashion जास्त उडवली... crazy किया रे म्हणत... जर का हा हृतिक इतका पोचलेला माणूस आहे, तर याला कळंत कसं नाही की ही पोलिस आहे ते? शिवाय हिंदी चित्रपटांमध्ये lady inspector ला uniform घालायची सक्ती नसते. त्यांनी खूप कमी कपडे घालायचे, गाणी म्हणायची, डान्स करायचा आणि जमलं तर चोर पकडायचा.. अरे! काय....?? ज्या देशात चोरी करायला जाईल तिथे तिथे यांचं घर.. ते पण अलिशान... कड्यावरून उड्या, पिस्तूलं. आणि तो कुठला उत्सव असतो? ज्यात तो जोकर झालेला असतो? आणि त्याला कळतं की ऐश्वर्या अभिषेकची बातमीदार आहे ते.. त्या उत्सवात त्याला प्रवेश कसा मिळतो? मूळात पोटापाण्याचा धंदा काय? आभिषेक आणि पोलिस Department ल फ़क्त एकच चोर दिसतो बहुधा... सगळे त्याच्याच मागे असतात ते ही without unifor जमेल तसं नाचत, गात. अरे काय? अजुन एक लक्षात रहण्याजोगा scene म्हणजे, जेव्हा ऐश्वर्या आणि हृतिक्च्या मागे अभिषेक आणि तो उदय लागलेले असतात तेव्हा एका ठिकाणी २ बाईकस लवून ठेवलेल्या असतात.... त्या कुणी लवल्या? धबधब्यात तो हृतिक पडतो काय.. ऐश्वर्या त्याला खोट्या गोळ्या काय घालते? by the way खर्या पिस्तूलात खोट्या गोळ्या कशा काय घालायच्या? एव्हढं करून शेवटी त्यांना सोडून देण्याचा मुर्खपणा... अभिषेक करतोच.. चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याच्या प्रेमामुळे जे तो हृतिक चोरी करायचं सोडून good boy बनतो... तेच तिला सुरवातील करायला काय बिघडत होता? निदान अमच्यावर इतके अत्याचार तरी झाले नसते.
|
Monakshi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:56 am: |
| 
|
दक्षिणा, अगं तो पिक्चर सगळे ऐश्वर्या आणि बिपाशाला बघायला मिळावं म्हणून बघतात. दोघी कसल्या दिसल्यात त्यात? बाकी पिक्चरच्या ष्टोरी शी कोणाला काहीही देणंघेणं नाही. तीन तास AC त बसून coke पित त्या देवींचं दर्शन मिळत असेल तर कोण नाही बघणार? (हे मी मुलांच्या बाजूने बोलतेय बर्का. हो, नाही तर उगाच गैरसमज व्हायचा.)
|
सगळ्या लॉजिकला बाजुला ठवून हा पिक्चर बनवलाय हे खरय. पण दक्षिणा तुम्ही लॉजिकच्या गडबडीत बर्याच गोष्टी इकडच्या तिकडे केल्या आहेत. ऐश्वर्या पोलिस इन्स्पेक्टर नसते. ती चोर असते. आणि जय दिक्षित तिला आर्यनच्या मागावर पाठवतो. त्यासाठी मुद्दामहून त्या किल्ल्यातली चोरीचा डाव आखला जातो. मिस्टर ए ला जाळ्यात अडकवण्यासाठी. तो जो कोक ओढतानाचा सीन आहे ना तिथे actually तो ते मॅग्नेट टेस्ट करून पाहतो. जे नंतरच्या पळापळीत तो वापरतो. पोलिस त्याला ड्रेनेजच्या झाकणावर थांबवत नाहीत. तो तिथे जाईपर्यन्त चालत राहतो, अलि त्याला गोळी घालायच्या तयारीत असतो तेव्हा हा पाठी वळून पाहतो. सही मेक अप. आणि आय कार्ड काय कुठेही नकली बनवता येतंच. मुळात इथे स्टाईलच्या नादात कुठेतरी आर्यनची व्यक्तिरेखा हरवून जाते. हा माणूस प्रचंड हुशार आहे. Techno savvy आहे. पण त्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. तो एकटा आहे. त्याचा कुणावरही विश्वास नाही. त्याच्या पाठी कारण असलं पाहिजे. दिग्दर्शकाला इथे अनावश्यक मेलो ड्रामा टाळायचा असेल पण तरीही कारण मीमांसा देणं गरजेचं होतं. तो या चोर्या पैशासाठी करत नाही. किंबहुना त्याला पैशाची गरज देखील नाही, याचा अर्थ त्याला "चोरी" पेक्षा त्यातलं थ्रिल्ल जास्त भावतय. शेवटचा सीनमधे आर्यन आणि सुनहरी आधीच ठरवून ठेवतात की जर पकडले गेलो तर आपण असं खोटं खोटं मारायचं.. बरेचसे प्रेक्षक किसिंग सीनच्या नादात विसरूनच गेले. त्यामुळे शेवटी जेव्हा तो तीनदा एकच डायलॉग म्हणतो आणि सुनहरी गोळ्या झाडते तेव्हा "असं कसं झालं?" हा प्रश्न पडला नसेल तर नवलच. जो माणूस इतक्या चोर्या करतो तो बाईक लपवून ठवणार नाही का?? दक्षिणा.. I am really surprised तुम्ही बिपाशाला विसरलात? ती पोलिस होती... मुळात तिला डबल रोलमधे का घेतलं तेच मला समजलं नाही. पोलिस म्हणून बरं काम करत होती. अचूक निशाणा असताना नेमका चोर समोर असताना गोळीच मारत नाही.. उदय चोप्रा मधे मधे असह्य होतो. ह्रितिक लाजवाब.. मला तरी हा पिक्चर "अत्याचार" वाटला नाही. काय दिसतो. स्पेशली म्युझिअयम मधे ग्रीक गॉड म्हणात ते उगाच नाही त्याला. आणि काय नाचतो.. धमाल.. }
|
Dakshina
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:52 am: |
| 
|
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं जसं माझ्या लक्षात आलं तसं हा चित्रपट पहाताना मी डोकं बाजूला काढून ठेवलं त्यामुळे बर्याच गोष्टी miss झाल्या.. आणि मी दृश्यांचे पण घोळ घातले. आणि खरंतर ती technology पचवता पचवता काय काय डोक्यात ठेवावं माणसनं? तुम्हीच सांगा.... बिपाषाबद्दल म्हणाल तर ती पहील्या रोल मधून गायब होउन दुसर्या रोल मध्ये परत पडद्यावर कधी अवतरली तेच कळलं नाही.
|
Farend
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:08 am: |
| 
|
आणि डबल रोल सहसा अशा वेळी देतात जेव्हा दोघींच्या सारख्या दिसण्यामुळे काही गोंधळ होऊ शकतो. येथे तसा काहीच संबंध दिसला नाही, कदाचित असेल आणि मला झेपला नसेल आणि परदेशात labor problem वगैरे मुळे ठीक आहे पण भारतात जर एवढा हीरा म्युजियम मधे ठेवला असेल तर ती खोली सोडून इतरत्र पोलिस कशाला बसतात? आणि मग उगाच क्लोज सर्किट टीव्ही वगैरे.
|
Dakshina
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:30 am: |
| 
|
अभिषेकच्या heroin ला तर अपण अगदी विसरूनच गेलो. तिला पण उगिच खोगिरभरती केल्यासारखं घेउन ठेवलय.
|
मी कशी विसरेन तिला? तिचं नाव रीमी सेन. उंचीला बुटकी आहे. पण अखंड बडबड हे तिचं वैशिष्ट्य आहे. धूम ३ मधे तिला घेऊ नका असं युनिटवाल्यानी सांगितलल्य. धूम ३ मधे रणबीर कपूर सोनम कपूर आणि शाहरुख खान याच्या नावाची चर्चा आहे. डीरेक्टर बदलेले बहुतेक. उदय आणि अभिषेक पण नसतील. बाय द वे कुणाला यामधले ह्रितिकचे मेक अप कुणी केलं माहित आहे का? कुणीही स्पेशलिस्ट बोलावलेला नाही. (यशराज असूनही) ह्रितिकच्या पर्सनल मेकपमॅननेच काम केलय. त्याचं नाव जेम्स. ह्रितिकला प्रत्येक पिक्चरमधे वेगळा लूक देण्याचं श्रेय याचंच. अजून एक, सुरुवातीच्या चोरीमधे जी राणी दाखवली आहे. ते काम कुणी केलय? बहुतेक ह्रितिकनेच केलय असं मला वाटतं. परफ़ेक्ट चेहरा जुळतोय.
|
हो ती राणी हृतीकच असतो. फारेंडा, पैसे वाचवण्यासाठीचा डबल रोल होता तो. रिमी किंवा बिपाशा कुणाचीही जुळी चालली असती.
|
Apurv
| |
| Tuesday, May 22, 2007 - 3:09 pm: |
| 
|
दक्षिणा, ज्या सर्व गोष्टींमुळे चित्रपट मजेशीर ठरतो त्याच गोष्टींवर तुम्ही आक्षेप करता आहत. जर ह्रितिक कडे सगळ्या situations साठी solutions नसेल तर तो hero काय आणि मग चित्रपटा मध्ये राहीले काय? पण अभिषेकचे पात्र फारच अति आहे... ह्रितिक च्या तोडीला त्याच्या मध्ये काहीच गुण नसतात बरोबरी करायला. जस तुम्ही म्हणालात, जी गोष्ट मोठ्या मोठ्या अधिकार्यांना कळत नाही ती कल का छोकरा अभिषेकला कळते. आणि लगेच computer वर टकाटका बोट मारून numbers, lines, maps वगैरे तयार करतो. ज्या साठी आम्ही गरीब programmers तासं तास, दिवसें दिवस कष्ट करतो, ते हा बापडा दोन मिनीटात करतो, त्या software ला ह्याच्या डोक्यात काय चालले आहे ते लगेच दाखवता येतं. अभिषेक इकडे तिकडे भटकण्या शिवाय काहीच करत नाही, सगळ सुनहरी वरतीच. रंगे हात पकडण्याची काय गरज आहे? बरे रंगे हातच पकडायचे होते तर सुनहरीच्या भेटीच्याच वेळी होउन द्यायचे की, तलवार चोरताना, ती भेटलीच ना, मग तिच्या जागी अभिषेकला ठेवायचे होते. बर जाउन्दे एकदा सुरू झाले की थांबणे कठीण...पण एकंदरीत चित्रपट बघायला मजा आली ती ह्रितिक आणि उदयच्या comedy ने.
|
अभिषेक २ मिनिटात computer वर टकाटक बोटं मारतो त्यावरून आठवलं. ओम जय जगदीश मधे अख्ख्या सॉफ़्टवेअर कंपनीला जो प्रॉब्लेम सोडवायला जमत नाही ते अभिषेक बच्चन त्या कंपनीत कधीही काम न करता "सिर्फ़ सौ सेकंद" मधे सोडवून दाखवतो, आणि त्याहून म्हणजे त्या कंपनी चा मालक नुसता स्क्रीन पाहून अभिषेकला तिथे नोकरीही देतो! काहीच्या कैच. असं सौ सेकंदात सगळं झालं असतं तर वर्षानुवर्षं प्रोजेक्ट कशाला चालले असते
|
ज्या साठी आम्ही गरीब programmers तासं तास, दिवसें दिवस कष्ट करतो, ते हा बापडा दोन मिनीटात करतो >>>> फार जुनी गोष्ट आहे जेव्हा कंम्प्युटर्स सिनेमात जास्त दिसत नव्हते. काजोल की टिंव्कल खन्न्ना कंम्प्युटर ऑपरेट करत असते. अगदी मन लावुन काम करताना दाखविले आहे. निट लक्ष दिले तर स्क्रिन्वर काय दिसले win 98 ची जान काढल्यावर तो चालु व्ह्यायच्या आधी पहीलेदां सर्व FS scan करतो व कुठे काही प्रॉब्लेम आहे का हे पाहतो. वरिल नटी त्या स्क्रीन कडे अगदी लक्ष देऊन पाहात असते. असा जोरात हसलो होतो मी. पिक्चर चे नाव आठवत नाहीये. पण हिंदी पिक्चर ला लॉजीक असत ह्यावर विश्वास नाहीये.
|
Atul
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:09 pm: |
| 
|
दक्षिणा, भावना पोहोचल्या... मी पण हा चित्रपट नुकताच पाहिला आणि पस्तावलो, या चित्रपटा पुढे 'Tom and Jerry' जास्त लॉजिकल वाटते . मला कळले नाही वाळवन्टात राणी काय करत होती? (पोश्टात पोलीस काय करतोय.. श्टाईल )तेही ट्रेन मध्ये आणि मुकुट घेउन??. मला तर वाटले की ती चोरी झाल्यावर ह्रितीक त्याच वाळवन्टात घागरा चोली मधल्या ऐश्वर्या च्या प्रेमात वगैरे पडणार . कारण अतर्क्य गोश्टी हा ह्या शिणुमाचा आत्मा आहे.
|
Dinesh77
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:00 pm: |
| 
|
ऋतिकला कसे काय कळते की ती राणी कुठला ड्रेस घालणार आहे? तो काय राणीचा सगळा कपडेपट घेउन हिंडत असतो काय?
|
Sas
| |
| Wednesday, May 23, 2007 - 2:25 am: |
| 
|
पांढर्या रंगातला पुतळ्यांसोबतचा Ritik हिरा चोरल्यावर त्यांच्या बाहेर कसा येतो, पुतळा चालतोय हे तिथल्या पोलिसांना वा कुणालाही कस दिसत नाही? आणी इतका मोठा ६ फुटी पुतळा गायब झाला हे हि कस तिथल्या पैकी कुणालाच कळत नाही? मला हे कोड ३ वेळा movie पाहुनही सुटल नाही (कदाचित सारे हिर्याकडेच टक लावुन त्याची निगराणी करत असतिल अस मग मनाला समजावल.) But I liked watching movie D2 
|
"ब्त्व मला एक प्रश्नं आहे. त्याने एकट्याने पाठीला रंग कसा काय लावला असेल? " . माझि एक बहिण 'हिरो हिरोइन जंगलात पळुन गेल्यावर सकाळचि आन्हिक कशि उरकत असतिल?' याचि चिंता कारायचि त्याचि आठवण झालि.
|
Swa_26
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:05 am: |
| 
|
काल आम्च्या केबल वाल्याने पण बहुधा इथली चार्चा वाचलेली... D2 लागलेला काल रात्री. त्या द्रेनेज पाईपाचा सीन अगदी लक्ष देऊन पाहीला आणि मग कळले, की तो त्या पाईपात जाताना त्याच्यासोबत एक मोठे बोचके होते, त्यात ती नंतर घातलेली जिन्स आणि ती शर्ट होता.... (इति आमचे धाकटे बन्धुराज...) त्याच्या मते तो एवढासा हिरा ठेवायला एवढी मोठी गोण कशाला घेऊन येईल? कपडेच ठेवायला आणलेली ती!!
|
Dakshina
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:07 am: |
| 
|
मराठ्मोळी, ही गोष्टं अत्यंत खरी आहे. जंगलात अडकल्यावर त्यांनी सकळची कामं कशी उरकली असतील हा प्रश्नं मला कयामत से... पाहील्यावर पण पडलेला... शिवाय जुही आणि आमिर गवताच्या गंजीवर झोपतात, मग त्यांना डास चावले नसतील काय? असा एक भाबडा प्रश्नं पण मला पडला होता..
|
Mandard
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:07 am: |
| 
|
शिवाय जुही आणि आमिर गवताच्या गंजीवर झोपतात, मग त्यांना डास चावले नसतील काय????????????????? त्यांनी ओडोमास लावला होता. समजुन घ्या हो. हे सगळे दाखवले तर सिनेमा(गाणी, रडारडी,मारामारी) केव्हा दाखवणार. :-)
|
Saee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 7:10 am: |
| 
|
किती त्रासली आहेस दक्षिणा!!  
|
अरे काय हसतेय मी इथे बसून. कॉंप्युटर बद्दलचे अज्ञान तर अगदी अगाध असते शिणिमात. ( HAHK मधे माधूरी क्या कर रही हो आजकल यावर स्टाईलमधे कंप्युटर्स म्हणते. पुढे ४ तासात कद्धी काही करताना दिसत नाही कंप्युटरवर. २६ दिसंबर नावाचा एक सही मूव्ही होता. फार आवडलेला मला. त्यातही असेच अतर्क्य होते. एक जिन्न स्टाईल चित्र स्क्रीनवर दाखवलेय पासवर्ड शोधताना. अर्थात ते लेमॅनसाठी योग्य होते. त्यांना खरे interesting वाटणारच नाही.) वाळवंटात राणी (पोष्टात पोलीस स्टाईल) >> जंगलात पळुन गेल्यावर सकाळचि आन्हिक कशि उरकत असतिल? मर्हाटमोळी अगदी वर्षानुवर्षे माझ्या मनात हा प्रश्न होता. विशेषतः कुठल्याशा पिच्चरमधे दोघांना एकाच हथकडीत अडकवलेले असते आणि मग ते दोन दोन दिवस (किंवा त्याहून जास्त) तसेच फिरत असतात(लोहाराच्या शोधात) तेंव्हा शेवटी जाऊ द्या असेल काहीतरी ऍडजस्टमेंट म्हणून सोडून दिले. If tomorrow comes नावाच्या पुस्तकात तर अशा कितीतरी ट्रिक्स आहेत पण त्या लेखकाने व्यवस्थित explain पण केल्यात. त्यातही अगदी सिमिलर ट्रिक्स आहेत. ट्रेनमधली चोरी, म्युझियममधली चोरी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|