|
Zakasrao
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:28 am: |
| 
|
सही BB आहे हा. एखादा प्रसंग लिहायला छान. अरे त्या चिरंजिवीकडे प्रचंड शक्तीचे लोहचुम्बक असते मात्र रजनीकांतला असे काहि लागत नाही रे. चित्रपट फ़रिश्ते असावा. धर्मेन्द्र आणि विनोद खन्ना हिरो. त्यांची एक मानलेली का सख्खि काहितरी बहिण असते आणि तिचा नवरा रजनीकांत. तो पोलिस इन्स्पेक्टर असतो. त्याच्या खिशात एक साध लोहचुम्बक असत. (आता खिशात बसत म्हणजे किती छोट हे लक्षात घ्या) तो त्या लोहचुम्बकाचा वापर करुन गुंडाच्या अंगावर सायकली आदळतो.त्यावेळची त्याचा अभिनय अहाहा. मी धन्य झालो. वाटल १२ वी सायन्स सोडुन आपण पण हिरो व्हाव किंवा डायरेक्टर. magnetism चा अभ्यास करायची गरज नाही.कुठेतरी ४-८ मार्कासाठी तो एवढा मोठा धडा कशाला शिकायचा. रॉबिन मला पण ते म्हातारा असच दिसल. तामिळ पिक्चरमधे असे सिन जरा जास्तच असतात ना.बर झाल न्युटन आधीच्या काळात होवुन गेला नाहितर त्याला पश्चाताप झाला असता गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करण्याचा. हा BB वाचुन पोटभर हसलो आज. सगळ्यानी सहि लिहिलय.
|
Mukund
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:20 am: |
| 
|
नंदिनी व अमोल.. हे बीबी उघडुन तुम्ही मस्त काम केलेत बघा... मला नाव आठवत नाही पण प्राण एका मुव्हीमधे इंटरव्हल पर्यंत डाव्या पायात लंगडा दाखवला आहे व मधेच इंटरव्हल नंतर डाव्या ऐवजी उजव्या पायात लंगडा दाखवला आहे... दिग्दर्शकाची डिटेलकडे लक्ष द्यायची अचाट क्षमता बघुन मी मुव्हीच बंद केला...(डावा पाय लंगडा दाखवताना बहुतेक उजव्या पायावर उभे राहुन राहुन प्राणने उजवा पाय दुखतो म्हणुन तक्रार केली असावी...) सिलसिला मुव्हीमधे.. मुव्ही मला आवडला होता पण.. त्यातले ३ सीन... सीन एक.... शशी कपुर एअर फ़ोर्सचा पायलट असतो व तो फ़ायटर प्लेनमधे बसलेला असतो व जया भादुरीला खाली पार्कमधे उभे करुन तो फ़ायटर प्लेनमधुन वर खाली ऍक्रोबेटीक्स करुन खालपर्यंत येउन जया भादुरीला घाबरवुन बाचकवत असतो... केवढे प्रचंड कौशल्य... सीन दोन.... अमिताभ व रेखाचा अपघात होतो.. डॉक्टरला बोलावले जाते.. डॉक्टर असतो संजीव कुमार... नंतर जया भादुरी व अमिताभ चा अपघात होतो... ते दोघे हॉस्पीटल मधे ऍडमिट होतात... डॉक्टर असतो.. संजीव कुमार... सबंध दिल्ली शहरात बहुदा एकच डॉक्टर असावा किंवा संजीव कुमारची प्रॅक्टीस जोरात चालली असावी... सीन तिसरा.. संजीव कुमारच्या विमानाचा ऍक्सीडंट होतो.. इंस्पेक्टर कुलभुशण खरबंदा जो आधीच्या अमिताभ रेखाच्या कार अपघाताला पण पंचनामा करत असतो.. तोच विमान अपघाताला(पंचनामा करायला?) विमान अपघातस्थळी हजर असतो... असे तत्पर व हरकामी उपयोगाला येणारे इंस्पेक्टर खरच बघायला मिळाले भारतात तर किती बरे होईल.. नंदिनी... हिंदी मुव्हीमधे डॉक्टरच्या करामतीचा कळस तुला सफ़र या राजेश खन्नाच्या जुन्या मुव्हीमधे बघायला मिळेल.. त्यात ऑपरेशन दाखवत असताना सर्जन ऑपरेशन रुममधे रक्ताने भरलेले मोठेमोठे रुमाल एका मागे एक असे नर्सला देत असतो ऑपरेशन करत असताना.... व नर्सही ते रक्ताने भरलेले रुमाल धुणी वाळत टाकावी तशी तिथेच बाजुला दांडीला लटकवत ठेवत असते.. एक दोन तीन असे मोजत... तात्पर्य... किती मोठे व अवघड ऑपरेशन चालु आहे...
|
Rajya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:33 am: |
| 
|
कोणत्याही ऍक्शन चित्रपटातील मारामारीचा सीन पहा, हीरोच्या मागे व्हीलन चे १५, २० गुंड हातात बंदुका, मशीनगण घेऊन पळत असतात. हजारो गोळ्या झाडल्या तरी एकही गोळी हीरोला लागत नाही, हीरोही नेम चुकवण्यात माहीर असतो, अत्यंत स्पीडने सुटलेली गोळी हीरोला ultra slow motion मध्ये दिसत असल्याप्रमाणे दिसते व हे साहेब गोळी सुटल्यावर आरामात ईकडे तिकडे माकड उड्या मारत गोळ्या चुकवतात, ईथे हे कळत नाही speed गोळीचा जास्त असतो की हीरोच्या हालचालीचा. पण हीरोच्या बंदुकीतुन सुटलेली प्रत्येक गोळी दुष्मनाच्या छातीचाच वेध घेते. कदाचीत director लाही गोळी फक्त छातीतच घुसु शकते असं वाटत असावं मग काय सर्व गुंडांचे निर्दालन होते कारण त्या १५, २० गुंडांच्या मागे कोणीही नसते व आपल्या हीरोच्या मागे director देवा सारखा उभा असतो. मग, हीरोचे काम व्यवस्थित पार पडल्यावर आपल्या कायद्याचे रक्षक म्हणजेच पोलीस येतात, मेलेल्या व जिवंत लोकांचा जमा खर्च मांडतात व हीरोचे आभार मानुन निघुन जातात.
|
Dakshina
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:40 am: |
| 
|
या B.B वर हिन्दी सिनेमातले आतर्क्य संवाद लिहीले तर अणखीन बहार येइल. मैंने तुम्हरे लिये गाजर का हलावा बनया हैं..... तुम्हे सुनना हैं, मैंने ऐसा क्यूँ किया.. तो सुनो.. २० साल पहले की कहानी हैं....वगैरे.....
|
चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण त्यात धर्मेंद्र गुंडानी त्याच्यावर झाडलेल्या पिस्तुलाच्या गोळ्या हातात पकडतो असा 'शीण' आहे...
|
Himscool
| |
| Wednesday, May 23, 2007 - 8:29 am: |
| 
|
कोणी "डर" नावाचा सिनेमा पहिला आहे का... डऽ डऽ डऽऽ डऽऽऽ डऽऽऽऽर त्यात फार महान सीन आहेत... शेवटी सनी पाजी आणि शारुक खान ह्यंच्यातली मारामारी... इतके बुकल बुकल बुकलल्यानंतरही दोघेही एकमेकांना बडवतच रहातात... आणि जुही चावला फक्त आरडा ओरड करत तिथे उभी असते. कोणालाच मदत करत नाही असे का?
|
Nkashi
| |
| Wednesday, May 23, 2007 - 8:44 am: |
| 
|
कोणी अजनबी पाहिला आहे का? अक्षयकुमार, बोबी देओल चा (अरे चंद्रकोर कशी द्यायची?) शेवटच फ़ाइट सीन च्या आधी ब. देओल अक्षयकुमारचे स्विस बन्केतले सगळे पैसे ट्रान्सफ़र करतो... आणी त्यासाठी तो साइट वर user id & password टाकतो... आणी आश्चर्य म्हणजे तो पासवर्ड आपल्याला वाचता येतो... (काहीतरी इत्तेफ़ाक वरुन असतो...)
|
Monakshi
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:25 am: |
| 
|
हिंदी मालिकांमध्ये आणि पिक्चरमध्ये हमख़ास आढळणारा डायलॉग्: "मुझे समझनेकी कोशिश करो"
|
Giriraj
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:07 am: |
| 
|
मुझे भगवान के लिये छोड दो.. बच्चाव.. बच्चाव... कोई हय??
  
|
Supermom
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:15 am: |
| 
|
मी आत्ता लिहिणारच होते, फ़क्त डायलॉग थोडा वेगळा, म्हणजे 'कमीने, कुत्ते, छोड दे मुझे....' (इतक्या कर्णकर्कश्श किंचाळ्या नि अशी वाक्य म्हणत बसण्यापेक्षा थोडी हातापाई केली तर? हिरोची वाट का बघत रहायची? पण नाही, मेकप बिघडेल हो....) आणि अजून एक म्हणजे देवळात घंटी वाजवून कायम... 'मैने आजतक तुमसे कुछ नही मांगा, लेकिन........' या वाक्यानंतर बहुधा इतके लांबलचक डायलॉग्स असतात की मला तर कधीकधी ती देवाची मूर्ती, 'मुद्द्याचं बोला की राव...' असा डायलॉग म्हणेल अशी भीती वाटते.
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:32 am: |
| 
|
आश्चर्य म्हणजे तो पासवर्ड आपल्याला वाचता येतो... (काहीतरी इत्तेफ़ाक वरुन असतो...) >>> every thing is planned असा आहे तो. 'मुद्द्याचं बोला की राव...' असा डायलॉग म्हणेल अशी भीती वाटते>>>
|
Manya2804
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:04 am: |
| 
|
काही अमर डायलाॅग : "मै तुम्हारे बच्चेकी मांॅ बनने वाली हूंॅ" "निकल जा मेरी नजरोंके सामनेसे, मै तुम्हारा मुॅहतक नही देखना चाहता ती" "अब इन्हे दवाकी नही दुवाकी जरूरत है" "तमाम सबूत और गवाहोंको मद्देनजर रखते हुए यह अदालत इस नतीजे पर पहूॅंचती है...." "माॅं, तुम्हारी आॅंख में आंसूॅं...." "ये तो खुशीके आंसूॅ है बेटा..." "माॅं मैं पास हो गया" "मेरी साॅसें हरपल तुम्हारे नाम की ही माला जपती है" "मैं गंगाजल की तर्हा पवीत्र हूॅ" "माॅं, अब मै बडा हो गया हूॅं"
|
Lalitas
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:15 am: |
| 
|
माझी आई आपल्या नातींना - त्या शाळेच्या वयांत असताना - नकली डूल, गळ्यातल्या साखळ्या असं काही भेट देत असे. तिच्या नाती हे अलंकार लगेच हरवून टाकत असत. माझी आई वैतागून म्हणत असे... ते सिनेमातले जत्रेत हरवलेले भाऊ कसे एक लॉकेट वीस - पंचवीस वर्षे गळ्यांत सुरक्षित ठेवतात, तुम्हाला दोन दिवसही वस्तू टिकवता येत नाहीत!
|
Rajya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:50 am: |
| 
|
मन्या, "मैं तुम्हारा खून पी जाऊंगा" "भगवान के लिए मुझे छोड दो" म्हणे या डायलाॅग वर भगवान खुप खुश असतो. "नही SSSSSSSSS "
|
Dakshina
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:53 am: |
| 
|
तुमने आने में बहोत देर कर दी, विजय, अब मैं किसी और की हो चुकी हूँ. और ये पाप है. मुझे हमेशा हमेशा के लिए भूल जाओ.... क्या कहा? हे भगवान, तेरे मूँह से ये शब्द सुननेसे पहले मेरे कान क्यूँ नही फ़ट गए? क्या यहि सब देखने और सुनने के लिए तुझे पाल - पोसकर इतना बडा किया? बहोत खून बेहगया हैं इन्हें फ़ौरन hospital में भरती करना पडेगा.
|
Saee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:05 pm: |
| 
|
आणि तो पिक्चर कोणता? रजनीकांतच्या पिस्तुलात एकच गोळी उरलेली असते आणि समोर दोन शत्रू उभे असतात. मग तो ट्रिगर दाबुन लगेच हवेत सुरा फेकतो आणि ती उडालेली गोळी बरोब्बर त्या सुर्यावरुन फिरुन तिची दोन छकलं होतात आणि त्याच वेगानं दोन दिशांना जाऊन त्या समोरच्या शत्रूंच्या छात्यांमधे घुसतात!!!!
|
Zakki
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:15 pm: |
| 
|
पूर्वी खानदान की इज्जत फार महत्वाची होती. पण ती बहुधा 'मिट्टी मे मिलाने' साठीच वापरली जायची. नेहेमी, 'ये हमारे खनदानकी इज्जत मिट्टिमे मिला देगा' वगैरे. रस्मोरिवाज नावाचा शब्द प्रचलित होता. ते फक्त तोडण्यासाठीच होते, पाळण्यासाठी नसत. 'दुनिया के सारे रस्मोरिवाजोंको तोडकर तेरे साथ मै इस दुनिया से दूर जाना चाहता हूं.' अरे बाबा तुला जायचे दुनिया से दूर जा, वर तिला कशाला आपल्याबरोबर नेतोस? तिला, तू गेल्यावर दुसरा कुणि तरी भेटेल तुझ्याहून चांगला!
|
फिजिक्स आणि ऑर्गॅनिक केम चे फॉर्म्युले आठवतील का कुणाला? शिणिमाचे डायलॉग बरे आठवतात.
सुमॉ मुद्द्याचं बोला... अगदी अजून काही अगर मेरे अंदर का जानवर जाग गया तो.... वो एक बडी लंऽऽऽबी कहानी है. .. पे मैं अपनी जानभी कुर्बान करनेको तय्यार हू. (ही वरची तीन वाक्यं लोक घरोघरी म्हणत असतील असं वाटतं?) भगवानके घर देर है अंधेर नही. वो अभी नाबालिग है. उस्से पहले तुझे मेरी लाशपरसे गुजरना होगा. (याचाच धाकटा भाऊ) तू मेरा मरा मुह देखेगा.
|
Sheshhnag
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:43 pm: |
| 
|
"मै तुम्हारे बच्चेकी मांॅ बनने वाली हूंॅ" हा डायलॉग मी माझ्या बायकोला ती जेव्हा `मेरे बच्चे की मां बननेवाली है' हे कळलं तेव्हा तिला म्हणालो होतो. जाम लाजली होती. तात्पर्य चित्रपटातले डायलॉग असेही उपयोगी पडतात.
|
Imtushar
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:25 pm: |
| 
|
हिरोईन ला घरी आणल्यानंतर हिरो ने कपाटातून लाल साडी किंन्वा बा.गड्या काढल्या की समजावे... ये साडी (किंवा कंगन) मेरी मां ने अपनी होनेवाली बहू के लिये रखे थे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|