|
फ़ार म्हणजे फ़ारच महान चित्रपट आहे हा. ह्यात Rh factor comman असेल ( जो सगळ्या humans मध्ये comman असतो पण blood groups वेगवेगळे असतात) तर कुणिहि कुणालाहि रक्त देवू शकत अस दाखवलय त्याहि पेक्शा कमाल म्हणजे रक्त अगदि direct मुले ते आइ अस दिल जात आणि हे कमि म्हणुन कि काय तर त्या मुलांच रक्त gravity च्या opposite direction मध्ये वरति टांगलेल्या बाटलित collect होत! निरुपा राय चे डोळे येण्याचा सीन तर अफ़लातुनच. हा चित्रपट बघितल्यावर रजनिकांत त्याच्या picture मध्ये बरेच वेळा हातानि बंदुकिचि गोळि अडवतो ते अशक्य नाहि वाटत!
|
जेव्हापासून हा बीबी उघडला तेव्हापासून हा पिक्चर माझ्या ध्यानात होताच. चला आता सुरुवात तर तुम्ही केलीच आहे. माझाही हातभार मला पडलेला एक प्रश्न, हे तिघेही भाऊ मोठे होउन एकमेकाना कसे काय भेटत राहतात? तेही सारखे? म्हणहे अमरला ऍन्थनीचा दारुचा धंदा आणि स्मगलर्सना पकडायचे ही दोन्ही कामे कशी करावी लागतात? वर त्या तिघाना निरुपा रॉय पण भेटत राहते. वर तिघानाही त्याच्याच धर्मातल्या प्रेयस्या मिळतात. तिथे तरी अजून शीख, तमिळ, किंवा पारशी पात्रे आणुन आपल्याला त्रास दिला नाही त्याबद्दल दिग्दर्शकाचे आभार!! कुणाला सांगू नका. पण कमीत कमी दहावेळा पाहिलाय हा पिक्चर तरी अजून ते स्मगलर्स आणि प्राणचे कोडे काही सुटले नाही. काय भानगड आहे तेच समजत नाही. रक्ताचा तो सीन तर अफ़लातून आहे. काय रे पिक्चरवाल्यानो, शाळेत कधी गेला नाहीत कालिजात नाहीच, हॉस्पिटलात पण गेला नाईत का? आणि एका बाईला तिघे तिघे रक्त देतायत. पाठीमागे.. खून खून होता है पानी नही... म्हणून काय पंप लावल्यासारखे रक्त काढताय काय?? पूर्ण पिक्चर्भर बघण्यालायक गोष्ट म्हणजे रिषी कपूर आणि नीतू सिंग. अहाहा... काय जोडी दिसते. स्पेशली.. पर्दा है पर्दा. आणि हो तय्यब अली प्यार का दुष्मन,,, रिषी पक्का भेंडी बझारमधला वाटतो.. तसा अमिताभ नाही ख्रिश्चन वाटत. विनोद खन्ना पुलिस इन्स्पेक्टर असल्यामुळे काहिच वाटत नाही. सगळ्यात फ़सलेले काम अर्थात शबाना आझमीचे आहे. कुटएच शोभत नाही, शेवटच्या टायट सॉन्ग मधे बिचारी इतकी गोंधळली आहे ना,, पण हा पिक्चर पाहून वैतागलेले असाल किंवा पाहिलाच नसेल तर डेव्हीड धवन सलमाअन सोहेल आणि अरबाझला घेऊन रेमेक बनवतोय तेव्हा तयार रहा....
|
मनमोहन देसाई या महामानवाच्या एका चित्रपटात अमिताभ पाठीला मगर बांधून येताना दाखवला आहे. तज्ञ मंडळीनी या चित्रपटाकडे पण लक्ष द्यावे...
|
Farend
| |
| Monday, May 21, 2007 - 7:16 am: |
| 
|
हो तो 'गंगा जमुना सरस्वती'. पाहायला हवा आता पुन्हा त्यात बच्चनजी 'डिस्को भांगडा' करतात, ते ही शब्बीर किंवा मोहम्मद अज़ीज़ च्या आवाजात. त्यापेक्षा पाठीवरची मगर (त्याच्या, आपल्या नव्हे) बरीच सुसह्य होती
|
अरे हो! आत्ता आठवलं त्यात आणखी एक भीषण सीन होता. अमिताभ आॅल्मोस्ट मेलेला असतो, जयाप्रदा त्याला पती मानून हातावर जळता कापूर ठेवून तुळशीला प्रदक्षिणा घालते, आणि मेलेला अमिताभ परत जिवंत होतो... हा सीन पाहून मी जो बेशुध्द पडलो तो एकदम मगरीच्या सीनला भानावर आलो....
|
मिथुन आणि अमिताभ वाला पिक्चर ना? धमाल आहे. मला जास्त आठवत नाही पण तरीही हा प्रदक्षिणावाला सीन आठवला. मगरवाला का आठवत नाहीये? एक आठवतोय.. पण तो अजूबामधे अमिताभ त्या मगरीला का शार्कला "मा" म्हणतो तो सीन
|
Alpana
| |
| Monday, May 21, 2007 - 8:20 am: |
| 
|
बहुतेक dolphin ला म्हणतो मा अजुबा मध्ये.... btw, माहेरचि साडी चा review वाचला आणी पुन्हा एकदा पिक्चर न बघितल्याबद्दल आन्नद ज़ल
|
Dinesh77
| |
| Monday, May 21, 2007 - 2:41 pm: |
| 
|
अजय देवगणच्या जिगर मधेही असाच अतर्क्य सिन होता. व्हिलननी मरेपर्यंत मारल्यावर डाॅक्टर त्याला मृत घोषित करतात. मग अरुणा इराणी, त्याची चित्रपटातली आई, येते आणि त्याला फ़डाफ़डा कानाखाली मारते "तु अपनी बहेनका बदलालियेबिना नही मर सकता वगैरे" आणि लगेच अजय देवगण जिवंत होतो. मला त्या डाॅक्टरची कीव येते.
|
Supermom
| |
| Monday, May 21, 2007 - 3:30 pm: |
| 
|
आणि मला बापड्या प्रेक्षकांची
|
Disha013
| |
| Monday, May 21, 2007 - 4:17 pm: |
| 
|
आईशप्पथ! हसुन हसुन वाट लागली. मला हसताना बघुन माझी लेकही हसतिये. फ़रेन्ड,मस्त bb सुरु केलात!सगळ्या जुन्या,शाळेतल्या दिवसांना उजाळा मिळतोय! आता हे सगळे movies परत बघुशी वाटतायत.
|
नन्दिनि, अभ्यस केल नाहि इत्यदि कारणांसाठि तुझे आइ बाबा तुला वाइट pictures बघण्याचि शिक्शा द्यायचेत का? नाहि माहेरचि साडि आणि अमर अकबर अंथोनि हे दोन्हि pictures तु अनेक वेळेला बघित्ले आहेस म्हणुन विचारल.
|
नाही गं बाई, मला शिक्षा देण्याची कधी वेलच ययची नाही. मी अभ्यास वगैरे करून मग असे उपद्व्याप करायची. AAA ची माझ्याकदे video cassatte होती. पपानी आणलेली. त्याचं काय आहे. पिक्चर बघायची आमच्याकडे खानदानी परंपरा आहे. आजी, पपा काका सगळे त्यातलेच. धारवाडला पप्पा "तीसरी म.ंझिल"चा matinee show बघायला बसले होते आणि आजोबा कॉलेजात पोचले. या वेळेस ते कुठे असतील ते "हितचिंतकानी" सांगितलंच. आजोबा थेटरात गेले आणि पप्पाना अक्षरश्: मारत घरी आणलं.. मग काय??/ दुसर्या दिवशी परत matinee चे तिकीट काढावं लागलं,
|
समस्त हीरो मंडळी "बेमालूम" वेषांतर करुन खलनायकांच्या अड्ड्यावर जाऊन शीर्षकगीत गातात (अर्थात्"अमुक करेंगे तमुक करेंगे अमर अकबर अंथनी वगैरे) त्यातील नामोल्लेख ऐकून कुठल्याही गुंड मंडळींना कसला संशय का येत नाही? कारण बहुतेक खलनायकांची अमर आणि आंथनी ह्या सद् गृहस्थांशी ओळख असते. हे गाणे संपेपेर्यंत सदर खलपुरुष दुष्ट चेहेरे करण्यापलीकडे काही कारवाई करत नाहीत हे अतर्क्य आहे. असो, क्लायम्याक्सला हिरो आणि हिराईन वेष बदलून गुंडाच्या अड्ड्यावर नाचणार ही हिंदी सिनेमांची फार प्राचीन परंपरा आहे. सगळा दोष देसायांच्या मनमोहनाचा नाही.
|
नन्दिनि, अग मी मस्करि करत होते. दिवा घ्या त्य्पे काहितरि लिहायला हव होत. Anyways तुझ्या बाबांचा किस्सा एकदम solid .
|
Farend
| |
| Monday, May 21, 2007 - 10:57 pm: |
| 
|
AAA च्या बाबतीत आम्ही दुसर्या बाजूला आहोत, म्हणजे 'आपला तो बाळ्या' असं आहे जरा मनमोहन देसाईचे बरेचसे पिक्चर अतर्क्य आणि अचाटच होते, पण, त्यावर लक्ष देऊ नका, जो काही एकूण मसाला समोर दिसतोय तो आवडला तर पाहा असा प्रकार होता. आणि सर्व पुब्लिक ला तो AAA , परवरिश, सुहाग, चाचा भतिजा, धरम वीर, नसीब पर्यंत खूप आवडला. लोक बहुधा अमिताभ पुढे आणि गाणी वगैरे बघून त्या चमत्कारांना फारसे महत्त्व न देता चित्रपट जबरी हिट करायचे. मलाही हे सर्व चित्रपट तेव्हा आवडले होते, अजूनही आवडतात. AAA तर अजून दहा वेळा सुद्धा. येथे बहुधा अमिताभ ऐन भरात आला तेव्हा नुकतेच चित्रपट पाहू आणि जरा कळू लागलेली पिढी आणि इतर यांच्या मतात फरक पडेल. पण मला जसा नगीना, महाराजा हास्यास्पद वाटतो तसे काहींना हे हास्यास्पद वाटतील, त्यात काही वाद नाही. आणि त्या अचाट गोष्टींबद्दल ही नाही पण AAA तुफान चालला कारण त्यात माझ्या मते काही जबरदस्त चांगले पॉइंट्स होते: शोले, दीवार, ज़ंज़ीर मधे आग ओकणार्या अमिताभला मनमोहन देसाईने प्रथमच इतका अफलातून रोल दिला. अमिताभच्या टॉप ५ रोलपैकी मला तो वाटतो. त्याचे बम्बैय्या हावभाव " Andy Roberts ?, मॅच खतम हो गया, वेस्ट इंडीज चला गया", "है किधर तू आजकल, दिखताइच नही", "माय नेम इस..." मधला डान्स (किंव जे काही तो करतो ते), क्लायमॅक्स च्या वेळेस "लगता है उपरवाले ने बहुत फ़ुरसत से बनाया है, लेकिन जब बिगाडने का टाईम आयेगा तब बहुत बुरा होगा", किंवा "पहचानो अन्जानोंको" म्हणताना नकली मिशी काढून दाखवणे वगैरे धमाल आहेत. असे म्हणता येईल की अमिताभच्या लोकप्रियतेचा त्याने फक्त फायदा करून घेतला, पण angry young man बरोबरच थोडे हलकी फुलकी व्यक्तिरेखा असलेले आणि पब्लिकला जाम आवडणारे रोल त्याने दिले. तशाच वातावरणात मोठे झालेल्या लोकांना तसा रोल करणे जड नाही, पण सभ्य आणि सुशिक्षित अमिताभने हा रोल असा केला की त्यावेळेस गल्लोगल्ली पोरांनी त्याचे मॅनरिजम कॉपी केले. त्याखेरीज सर्व गाणी सुंदर आहेत. त्यामुळे मला वाटते पब्लिक निरुपा रॉय चे डोळे परत येतानाच्या त्या अफलातून शॉट कडे लक्ष न देता मागे चाललेले रफ़ीचे सुंदर गाणे आणि त्यात आनंद बक्षीने बरोबर जमवलेल्या ओळी ऐकत होते.
|
फ़रेन्ड, त्यातला तो आरशाला मलमपट्टी करताना चा सीन विसरलास का अमिताभचा one of the 'बेष्ट' कॉमेडी सीन आहे तो!
|
अरे हो, जबरदस्त सीन आहे. "थोडासा जलेगा.." छ्याअ परत बघायला लागणार हा पिक्चर. अमिताभ आणि रिशीसाठी. मला तो जाम आवडला होता या पिक्चरमधे. कुठेतरी वाचलेलं परत लिहितेय "अमिताभ नावाचं एक साम्राज्य होतं. त्याच्या बाजुलाच रिशी नीतुने आपलं एक छोटंसं संस्थान वसवलं होतं. मनमोहन देसाईनी या दोघाना एक करण्याचा अजब प्रयोग AAA मधे केला. यशस्वी झाला, कारण अमिताभ angry young man होता तर रिशी chocolate boy होता. तय्यब अलि ला रफ़ी आणि रिशी इतके परफ़ेक्ट मस्ती मूडम्धे आहेत. बिचार्या विनोद खन्नाबद्दल लिहा ना कुणीतरी..
|
Farend
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:24 am: |
| 
|
अरे हो तो विसरलोच. आरशा समोरच उभे राहून दुसरीकडे बोट दाखवून 'जरा जाके आइनेमे देख' म्हणून सांगतो स्वत:लाच त्यावेळी विनोद खन्ना आणि शबाना अशी जोडी होऊ घातली होती, AAA व्यतिरिक्त परवरिश आणि हत्यारा या विनोद च्या चित्रपटात ते होते, आणखी ही असतील. दोघांनीही कमर्शियल सिनेमा सोडल्याने पुढे आणखी गाजले नाहीत बहुधा. बाकी विनोदचा चांगला शॉट म्हणजे ती घराजवळ लपवलेली पिस्तूल आठवल्यावर तेथे जाऊन बघताना. नाहीतर तो अमिताभची धुलाई करतो याशिवाय त्याची यात फारशी कमाई नाही आणखी गंमत म्हणजे तो दुसरा जीवन, ज्याला जेमतेम दोन मिनिटांचा रोल आहे. आणि शबाना चक्क रणजित ची बहीण आहे. त्या 'माय नेम इज...' मधली अचाट इंग्रजी वाक्ये कोणाच्या लक्षात आहेत का? मला एकच आठवते " The coefficient of the linear is just a position by the haemoglobin in the atmospheric pressure of the country"
|
ते juxtapositioned आहे ना.. मला ही इतकेच आठवतय. घरी गेल्यावर गाणं लावून बघते.
|
Zakki
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:55 am: |
| 
|
मला पण तो आरश्यासमोर उभा राहून मलमपट्टी करतानाचा सीन आवडला. मी परत परत पाहीन. तसेच मला आवडलेले एक गाणे, जे बहुधा अभिताभच्याच सिनेमात आहे, ते 'खईके पान बनारसवाला'. मला गाण्यातले काही कळत नाही, पण शब्द जेव्हढे कळले ते बरेच अर्थपूर्ण वाटले, कारण बहुधा त्याच सिनेमात सुरुवातीला एका 'भोला भाला' मणूस पकडून पोलीस त्याला खलनायकांच्या टोळीत रहायला सांगतात, असे काहीतरी आहे. चू. भू. द्या घ्या. नि हसू नका. एकूणच हिंदी सिनेमातले मला काही कळत नाही नि लक्षातहि रहात नाही!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|