Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through May 22, 2007 « Previous Next »

Nandini2911
Tuesday, May 22, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "


Zelam
Tuesday, May 22, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्ये एक जीतेंद्र चा movie पाहिला होता. नावही आठवत नाही पण त्यात highly radioactive असं लिहिलेल्या material चे पुट्ठ्याचे खोके हातात घेऊन गुंड माणसे फिरत होती.

Supermom
Tuesday, May 22, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर नेहेमीच पिक्चरच्या शेवटी कोणीतरी मरताना दाखवतात अन आप्तस्वकीय आजूबाजूला हंबरडे फ़ोडून मोठेमोठे डायलॉग्ज म्हणत बसतात तेव्हा...


'अरे त्याला डॉक्टरकडे न्या की मूर्खांनो त्यापेक्षा' असे ओरडावेसे वाटते.


Sanghamitra
Tuesday, May 22, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा मस्त बीबी सुरू केलाय. अतर्क्य चित्रपट पूर्ण पहाणे आणि पुन्हा ते अक्खे आठवणे कठीणच. पण हे असले डिरेक्टरच्या अकलेचे छोटे मोठे तारे सहज आठवतील.
राजा चित्रपटात गाडीची धडक लागून परेश रावल सरळ दुसर्‍या मजल्यावरच्या कुठल्यातरी जबरदस्त करंट असलेल्या इलेक्ट्रिसिटी अप्लायन्सवर जाऊन चिकटतो आणि मतिमंद होतो(!) या सीनला तोड नाही.


Dinesh77
Tuesday, May 22, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय देवगण, सुनिल शेट्टी आणि रविना टंडन यांच्या "दिलवाले" चित्रपटातील क्लायमॅक्सचा सिन आठवतोय का?
ऑस्कर विनिंग शॉट आहे तो.
व्हिलन (बहुतेक रामी रेड्डी का असाच कोणीसा आहे) अजय देवगणला तलवार फ़ेकून मारतो. इतरत्र मारामारी करत असलेल्या सुनिल शेट्टीला ते दिसते. पळत पळत येउन तो त्या तलवारीला लाथ मारतो. ती तलवार बरोबर काटकोनात वळते आणि वर जाते. नंतर गुरुत्त्वाकर्षणाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन उलटी होउन (म्हणजे ती "उलटी" नाही, १८० अंशाच्या कोनात वळुन) ती तलवार खाली येते. खाली येत असताना अजय देवगण तिला परत एक लाथ मारतो. परत ती तलवार काटकोनात वळून व्हिलनच्या पोटात घुसते आणि व्हिलन मरतो. (आणि प्रेक्षक सुटतात)


Disha013
Tuesday, May 22, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे छान BB ! 'टक्कर' पिक्चरमधे एक मजेशीर सीन आहे. सुनील शेट्टीला गोळ्या लागल्याने त्याचे ऑपरेशन झालेय आणि सोनाली डॉ. कडे हट्ट करुन त्याला बघायला आत जाते. तिने 'मै आयी हु' म्हणताच सुनील आधी डोळे गरागरा फ़िरवुन मग स्थिर करुन तिच्याकडे बघतो.सोनालीने काय म्हणावे? 'तुम जिंदा हो?मुझे तो यकीन ही नही हो रहा है की तुम जिंदा हो!'

मरणाच्या दाढेतुन परत आलेल्या प्रियकराला असं कोण बोलेल हो?


Supermom
Tuesday, May 22, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असाच एक डायलॉग फ़ार irritate करतो.

'तुम्हारी आखोंमे पानी?'

(नाहीतर काय दूध?)


Saj81
Tuesday, May 22, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ःरितिक च्या 'कोइ मिल गया' मधला दएलोग..
शेवतच्य सिन मधे त्या जादुला पोलिस बाहेर यायल सानगतत तेन्व्हा म्हनतत : ' अए बाहरी दुनिया से आये हुअ अलिएन' म्हनजे कय?
मग ह्रितिक काय प्रुथवीवरचा अलिएन का :-)?


Shendenaxatra
Tuesday, May 22, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजनीकांत नामक तमिळ महातार्‍याचा एक तमिळ सिनेमा पाहिला ज्यात त्याने गुडघ्यापर्यंत येणारे बूट घातलेले असतात. घालू द्या बापडे. पण एका मारामारीच्या प्रसंगी सदर अतीगृहस्थ जोरात पाय झाडतो तर तो बूट पायातून निघतो, संबंधित खलनायकाचा कपाळमोक्ष करतो आणि काम झाल्यावर झटकन आपल्या मूळ जागी जाऊन बसतो. हा अचाट शीन बघून अवाक् झालो.
सिनेमाचे नाव आठवत नाही पण हा प्रसंग रेल्वेच्या यार्डात घडतो.


Disha013
Tuesday, May 22, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
शेन्डेनक्षत्र,ते बूट बूमरॅन्गचे modern version असतील!


Robeenhood
Tuesday, May 22, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमिळ महातार्‍याचा >>>>


मला सुरुवातीस एकदम ते ’तमिळ म्हाता-याचा ” असेच वाटले:-)

Apurv
Tuesday, May 22, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी hero किंवा heroin च्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्याचे निरीक्षण केले आहे का? दिल तो पागल है किंवा अश्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये. बाकी कोणाला सुगावाच नसतो, किंवा काही पडलेलीच नसते की हे एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडत आहे, नाही तर friends circle मध्ये अश्या गोष्टी कुणाच्या नजरेतून सुटत नाही. ह्या व्यतिरिक्त ह्या मित्र मैत्रिणीना फारच वाईट वागणूक दिली जाते. त्यांच्यावर बरेच विनोद केले जातात, बरीच कामं सांगीतली जातात, विनोदाच्या नावाखाली सरळ सरळ अपमान केला जातो, पण त्यांना स्वाभिमान वगैरे काहीच नसतो, त्यांच्या आयुष्याला काहीच मह्त्व नसते, आणि ते त्यातच खूश असतात.

Shendenaxatra
Tuesday, May 22, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक आचरटपणा म्हणजे सिनेमात जेव्हा हिरो वा हिराईन कॉलेजमधे आहे असे दाखवतात तेव्हा कुठली शाखा वा वर्ष हे भानगड नसते. एखाद्या शॉटमधे नुसताच "कालेज" असा ठसठशीत बोर्ड दिसतो. नाव गाव काही नाही. कधी बॉम्बे कालेज असाही बोर्ड पाहिला आहे.

बहुधा डायरेक्टरने कॉलेजचे तोंडही बघितले नसावे.
अर्थात असे असले तरी हीरो फस्क्लास फस्ट यायला काही आडकाठी होत नाही. मग काश तुम्हारे पापा आज जिंदा होते किंवा काश तुम्हारी मा आज होती असे नेहमीचेच यशस्वी दर्दभरे संवाद.


Mbhure
Tuesday, May 22, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल चित्रपटातील आमिर - माधुरीने अनुपम खेरच्या नाकावर टिच्चुन केलेले लग्न.

Shendenaxatra
Tuesday, May 22, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रॉबिन हूड,
त्या सिनेमात रजनीकांत म्हाताराही दिसतो त्यामुळे कसेही वाचले तरी चालेल!
असो. आपले आसमान में तारे कितने है चे उत्तर सांगता का प्लीज?


Upas
Tuesday, May 22, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" तुम्हारि आखो मे पानी? "
>> ( नाहीतर काय दूध.. )
सुमॉ म्हैस आठवली पुलंची..

Farend
Tuesday, May 22, 2007 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा हे एक्-दोन शॉट्स बद्दल लिहिण्यासाठी चांगले आहे.

अंधा कानून मधे अमिताभ शेवटी तलवार घेऊन एकाचा कोर्टात खून करतो. त्याला तलवार कोठून मिळते? तर एकजण रस्त्यावर जनरली एक तलवार घेऊन चाललेला असतो :-)


Farend
Tuesday, May 22, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि चिरंजीवीचा तो कोणता? बहुधा State Rowdy . यात त्याच्या कडे एक प्रचंड शक्तीचे लोह चुंबक असते. ते ON केल्यावर आजूबाजूच्या गुंड मंडळींची पिस्तुले बंदुका वगैरे एकदम खेचली जातात, अगदी एकजण ते ओढून धरायचा प्रयत्न करत असताना सुद्धा :-)

Slarti
Wednesday, May 23, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिथुनचा सुप्रसिद्ध brain tumor शीन आठवला का? चित्रपट आहे 'अविनाश'. कथाभाग असा आहे : मिथुनला प्राणघातक ब्रेन ट्यूमर असतो, पण तो असा खास असतो की ज्यामुळे त्याला खास शक्ती येते, तो 'अविनाश' बनतो. (अर्थात, ब्रेन ट्यूमर हा वाईटच हो! तर या अतिमानवी शक्तीबरोबरच त्याला विस्मरणाचा ( amnesia ) त्रास आहे. चालायचंच. बाकरवडीसुद्धा आकाशातून पडत नाही, त्यासाठी चितळ्यांकडे जावं लागतं.) चित्रपटाच्या शेवटी मारामारीत व्हिलन (बहुधा सदाशिव अमरापूरकर) गोळी झाडतो. ती गोळी मिथुनच्या डोक्यात घुसते आणि ट्यूमरला घेऊन बाहेर पडते. ट्यूमर खलास, शक्ती खलास पण स्मरणशक्ती व जीव वाचला.
तात्पर्य : ('कुष्ठरोग बरा होऊ शकतो' च्या चालीवर) गोळ्यांनी ब्रेन ट्यूमर बरा होऊ शकतो.


Slarti
Wednesday, May 23, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

btw , इथे काही 'शीन' लिहिणे अपेक्षीत आहे, पण जर आख्खा चित्रपटच जर एकामागून एक शीनांची रांग असेल तर... 'लोहा'

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators