|
का का आणि का.. हा प्रस्न मी अजूनही स्वत्:ला विचारते. का मी हा पिक्चर पाहिला? ते पण एकदा कानडीत एकदा मराठीत आणि एकदा हिंदीत. दूरदर्शनवर लागलेले ओरिजिनल गुज्जु व्हर्जन पण थोडे थोडे पाहिले. अर्थात मी हा पिक्चर पाहिला तेव्हा बरीच लहान होते. पण तरीही सतरा बायका (घरातले लग्न संपल्यावर काम काय आहे?) डोळ्यला रुमाल लावून रडतायत. (थेटरात, लग्नातली रडारड कार्यालायापुरती मर्यादित) आणी मी एकटी हसत बसलि आहे. काय तर स्टोरी. एका स्त्रीच्या आयुष्याची ससेहोलपट दाखवायची ना.. मग आधी आई मारा. मग तिला "अपशकुनी ठरवा" सावत्र आईचा त्रास, वडीलाची नफ़रत, मग लग्नानंतर सासुचा त्रास, बाळ मारा, घरातून हाकलून द्या. आणि शेवटी तिलाही मारा... हेच आयुष्य असतं का? एक मुलगी, एक बहीण, एक बायको, एक सून या नात्याच्या पलिकडे कथा जातच नाही. कुठेही ती नायिका स्वत्:चा शोध घेत नाही. तिला काय हवं, तीचं काय मत आहे हे कधीच विचारलं जात नाही. यातले प्रत्येक पात्र extreme दाखवलय. अति प्रेमळ, अति सहनशील, अति त्यागी. वगैरे वगैरे. मला स्वत्:ला पिक्चर जास्त आठवत नाही. पण जो शेवटचा सीन आहे ना, माहेरची साडी नेसवायचा. तो जितक्या वाईट रित्या interpret केलाय की बास्स.. अजूनही मला चीड येते. मुलीच्या प्रेताला माहेरचीच साडी नेसवायची कारण ती असतना आणि गेल्यावर सुद्धा माहेराशी तिचं नाते राहिले पाहिजे. जर समजा सासरी मुलीचे काही बरं वाईट झालं तर आई वडीलाना कळालंच पाहिजे, असा या रुढी मागचा हेतू आहे, असं माझी आजी म्हणते. पण यात काय नी काय? रडारड आणि मग तो विक्रम गोखले, (स्म्रूतिभ्रष्ट) अजिंक्य देव आणि रमेश भाटकर देवा... लवकर संपव रे हा सीन असं म्हणायची वेळ आणली होती. मला पिक्चर पाहताना रडणार्याचं कायम कौतुक वाटतं. मला रडू येत नाही हे खरय पण तरीही इतकं रडणं.?? कमाल आहे. प्रेक्षकाची आणि अलका कुबलची शर्यत. तू जास्त रडते की मी. बरं पिक्चर संपल्यावर काय मिळतं? समाधान तर नाहीच. अर्थ पण नाहीच. उगा छान नटून थटून थेटरात जाय्चं आणि रडून रडून डोळे सुजवाय्चे.. कुणी सांगितलल्य? हा पिक्चर पाहतानाच मी थेटरात पॉपकॉर्न कसे मारायचे? अगदी रडका ईन चालू असताना शिटी मारायची, आणि त्याहून रडका सीन चालू असल्यास बाहेर जाऊन टाईमपास कसा करायचा हे उपद्व्याप शिकले त्याबद्दल पुन्हा केव्हातरी..
|
Zakasrao
| |
| Saturday, May 19, 2007 - 3:54 am: |
| 
|
नन्दिनी माझ दु:ख हलक केलस. बर वाटल बघ. त्यातल शेवटच गाण ऐकुन डोक्यात तिडिक जाणे, तळपायाची आग मस्तकाला जाणे इ.इ. वाक्यप्रचार अनुभवले. हे इतक सगळ होउन काय म्हणे कि तिच सार्थक झाल अस काहितरी गाण आहे. बर पुर्ण पिक्चर मधे काहिही दाखवलय. शेवटाच्या प्रसंगात अलका कुबल मरताना तुळशी पाशी पडलिय आणि तिची सासु मात्र वेड्यासारख त्या नवजात बाळाचे भरपुर पप्पि घेतेय. अरे इतक का कोणी वाइट असत? कोणी तरी मरतय आणि आणि तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही. ति सासरी येते आणि तिच्या सासर्यांचे डोळे परत येतात. ते ही डोक्यावर पडल्यामुळे. मला तर ह्या पिक्चरचे कथाकार,पटकथाकार आणि दिग्दर्शक डोक्यावर पडलेले वाटले.
|
Monakshi
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:18 pm: |
| 
|
झकासराव, तरी नशीब, तुम्ही फक्त माहेरची साडीच पाहिलात. त्याचं हिंदी version (बहुतेक 'साजन का घर' हे नाव आहे) तो नाही पाहिलात. नाहीतर कुठेतरी नक्की डोकं आपटून घेतलं असतं.
|
Gobu
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:28 pm: |
| 
|
मला तर ह्या पिक्चरचे कथाकार,पटकथाकार आणि दिग्दर्शक डोक्यावर पडलेले वाटले. झकास,
|
Dineshvs
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:38 pm: |
| 
|
त्या काळात परळच्या एक बसस्टॉपचे नावदेखील माहेरची साडी असे पडले होते. या सिनेमामुळे विजय कोंडके ना चांगलाच फायदा झाला. एक संपुर्ण समाज, एका निर्बुद्ध सिनेमासाठी असा वेडा होतो, याचे मला खुप नवल वाटायचे. मी अजुनही तो सिनेमा बघितला नाही. पण आपल्याकडेच असे होते असे नाही, अरब, आफ़्रिका, थाई सगळीकडेच हे अशी सिनेमात प्रचंड मानसिक गुंतवणुक झालेली मी बघितलीय. अश्या मास हिस्टेरियामुळेच तर एकता कपुरसारखा भस्मासुर निर्माण होतो.
|
Mansmi18
| |
| Sunday, May 20, 2007 - 6:11 am: |
| 
|
मी पुण्यात कॉलेजला असताना १९९१ साली हा चित्रपट लागला होता तो मी कॉलेज्मधुन निघेपर्यन्त १९९४ सालापर्यन्त सुरुच होता. मला आठवतेय तो जिथे लागला होता तिथे प्रत्येक शो ला एका लकी प्रेक्षकाला साडी बक्षिस म्हणुन ठेवली होती. आणि स्त्रियान्ची अलोट गर्दी असायची. काही चित्रपट का चालतात कोणी सान्गु शकत नाही.(उदा. बन्टी आणि बबली, फ़ना इ इ).
|
फ़ना हा पिक्चर काजोल आणि आमिरच्या स्टारडमवर चालला. पण तरीही त्याची हाताळणी चांगली होती. अतिरेक्याची प्रेम कहाणी साकारणे तेवढे सोपे नाही. पण कुणाल कहलीने इथे खूप मेहनत घेतली होती. अत्यंत वाईट हाताळणी कधी असू शकते याचं उदाहरण हवंच असेल तर त्याचाच मुझसे दोस्ती करोगे बघा. मी अख्खा पिक्चर रितिकच्या दर्शनासाठी पाहिला. माती केलीये प्रत्येकाची त्यामधे. बंटी और बबली तद्दन व्यावसायिक चित्रपट होता. त्यामधे आम्ही काहीतरी महान तुम्हाला सांगतोय, तुम्हाला समजत नसेल तर तुमचा दोष आहेचा अविर्भाव नव्हता. महेश भट्ट वगैरे प्रमाणे. मात्र त्यात कथेवर भर दिला गेला होता. यामधली पात्रे खूपच वेगळी घेतली आहेत. साधारणपणे ग्रे देखील म्हणता येणार नाहीत, पण तरीही कायदा मोडणारी आणि प्रत्येक क्षण जगणारी दोघे मला आवडली. मस्त आहे अमिताभचा एक डायलॉग. पूर्ण पिक्चरभर तो एकाच ड्रेस्मधे दिसतो. वर त्याच्या बॉसला ऐकवतो "इन दोनो को पकदने की फ़ुरकतमे मैने छे महिने से दाढी नही बनायी. कपडे नही बदले...." पूर्ण आठवत नाही. पण धमाल आहे.
|
Mandard
| |
| Sunday, May 20, 2007 - 4:49 pm: |
| 
|
फ़ना हा अत्यंत टुकार सिनेमा. मी तर फ़क्त अर्धा तास कसातरी बघितला. आमिरचा पुर्ण गंडलेला सिनेमा म्हणजे 'मेला'.
|
Bee
| |
| Monday, May 21, 2007 - 5:42 am: |
| 
|
काल मी अपुर संसार बघितला. सौमित्र चटर्जींचा काय सुरेख अभिनय आहे आणि रेंचे दिग्दर्शन तर लाजबाब आहे..
|
बंटी आणि बबली हा शाद अलिचा एक चांगला प्रयत्न होता. हॉलिवूड मध्ये भरपूर कॉन मूव्हीज आल्या आहेत. हिंदी मध्ये पहिलेली ही पहिलीच कॉन मूव्ही (अजुन असतील तर मला माहिती नाही). दुसर्याला टोपी घालण्याची अतिशय प्रबळ प्रवृत्ती असलेली २ पात्रे. कुठेही उगीच भाषणबाजी नाही. एकुण मला हा सिनेमा बरा वाटला. यश चोप्रा बनरचे मला आवडलेले दोनच सिनेमे- साथिया आणि बंटी आणि बबली. जर कुणि ओरिजिनल अलेपायुथी पाहिला असेल तर साथिया बघायला अजुन मजा येइल.
|
सही जवाब नंदिनी. मी वाटच बघत होते की या सेक्शन मधे मा. सा. येईल म्हणून. (मी पाहिला नाहीये नाहीतर मी पण लिहीले असते.) पण सोलापूरला तो लागला होता त्या थेटरसमोरून शो सुटायच्या वेळी गेले तर अजून डोळे गळत असलेल्या, किंवा लाल झालेल्या आणि मोठमोठ्याने आइगं पापबिच्चारी वगैरे म्हणत निघालेल्या बायका कित्येक महिने पहात होते.
|
Zakasrao
| |
| Monday, May 21, 2007 - 6:03 am: |
| 
|
काल मी अपुर संसार बघितला. सौमित्र चटर्जींचा काय सुरेख अभिनय आहे आणि रेंचे दिग्दर्शन तर लाजबाब आहे.. >>>>>>>> तु हे इथ ह्या BB वर लिहिण हे अतर्क्य आहे आणि तुझी हि कामगिरी अचाट आहे. दिवा घे दिवा आणि बघ हा BB कोणता आहे ते. नीट दिसेल दिवा घेतल्यावर.
|
मंदारजी... एक माझं वैयक्तिक मत सांगू... अर्थात तुम्हाला किंवा दुसर्या कुणालाही पटलेच पाहिजे असे नाही. पिक्चर पूर्ण बघूनच मग तो चांगला किंवा वाईट ठरवावे. त्याला "टुकार" वगैरे विशेषणे लावण्या आधी किंवा ग्रेट म्हणण्या आधी तो एकदा तरी डोळ्याखालून घालावा. स्पेशली फ़ना उत्तर्रार्धात चांगलाच रंगतो. त्याम्धे बघण्यालायक महत्वाची गोष्ट म्हणजे काजोलचा अभिनय. इतकी सशक्त अभिनेत्री असूनदेखील तिला आव्हानात्मक भूमिका अजूनही मिळालेल्या नाहीत. पण मिळालेल्या प्रत्येक रोलचे ती सोने करूउन दाखवते. मला काजोल "सीमा" किंवा बंदिनी" सारखे रोल करताना बघायला आवडेल.
|
Mandard
| |
| Monday, May 21, 2007 - 6:44 am: |
| 
|
फ़ना बघताना पुर्वाधात झोप आली. त्यामुळे उत्तरार्ध बघायचा राहीला. नंतर कधीतरी बघेन.:-).काजोल चांगली आहे.के३जी तिच्यामुळे बघायला बरा वाटतो.
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 6:51 am: |
| 
|
झकास शी सहमत या बीबी वरील बर्याच पोस्ट्स विषयाला धरुन नाहीत. दिवे घ्यालच.
|
Milindaa
| |
| Monday, May 21, 2007 - 9:40 am: |
| 
|
एका बीबी वर जर अनेक चित्रपटांविषयी लिहीले तर नवीन बीबी उघडण्याचा मूळ उद्देश फोल ठरतो असे मला वाटते. किमान कोठे लिहीतो आहे याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे
|
मोनाक्शी, मी पाहिला गं तो "साजन का घर" जुही चावला आणि रिषी कपूर आहेत. या पिक्चरमधे माझं एक आवडतं गाणं आहे. अजूनही माझं आणि पपाचे वादविवाद (काही लोक त्याला भांडण ही म्हणतात) मी मोठमोठ्याने हे गाणं म्हणते.. "बाबुल दे दो दुआ आज तो प्यार से. छोडके जा रही मे तेरे संसार से..."
|
"बाबुल दे दो दुआ आज तो प्यार से. छोडके जा रही मे तेरे संसार से..." एकदम सही नंदिनी....
|
Disha013
| |
| Monday, May 21, 2007 - 4:25 pm: |
| 
|
काहिही म्हणा,पण मा.सा. ने बायकांच्या काळजाला हात घातला होता. देवाने एक्दा हाउसफ़ुल्ल चा board दाखवुन वाचवले होते. तरिही दुस-या दिवशी तिकिटं मिळवुन पहीला तो पिक्चर. सबंध चित्रपटात नायिकेच्या पायाची वाट लावलेली. एकदा चांगला पायगुण तर दुस-याच क्षणी वाईट! अन लग्नानंतर तिच्या आयुष्याची जी वाट लागते तिला तिच्या नव-याचा पायगुण कारणीभुत न्हवता का?असो.समाजात अजुनही असे चालते. थिएटरमधुन बाहेर येताना ढसाढसा रडणा-या बायका अजुन डोळ्यासमोर आहेत.
|
मला एकन्दरीतच इथला अशा पॉप्युलिटिक चित्रपटाबद्दलचा हेटाळणीचा सूर अमानुष वाटतो... हा चित्रपट पहाणार्या अल्पशिक्षीत महिला ज्या वातावरणात जन्मल्या, वाढल्या, चूल अन मूल या चक्रात अडकल्या त्यांच्या संवेदना चुकिच्या असतील पण त्या हास्यविषय व्हाव्यात हे खरच अमानुष आहे. इथे लिहिणारे ज्या सांस्कृतिक स्तरातून आलेले आहेत त्याना जे शिक्षण मिळालेय, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्यामुळे जी बेदरकारी आली आहे त्यामुळे हळवेपणा कमी झाला असेल पण याचा अर्थ ज्यानी ती पातळी गाठली त्यांची टिंगलच केली पाहिजे का? हे म्हनजे सोळाव्या लुईच्या बायकोसारखे झाले ' ब्रेड मिळत नाहीत तर लोक केक का खात नाहीत. परमेश्वरी योजनेने सुस्थितीतील, सुशिक्शीत कुटुम्बात जन्म झाल्याने पालकांच्या कृपेने चांगले शिक्षण मिळल्याने कदाचित तुमची रसास्वाद घेण्याची दृष्टी वेगळी झाली असली तर त्यात तुमचे contribution काय? लक्षावधी लोकांशी भावनिक तादत्म्य साधणार्या कृतीत सर्व टाकाऊ असते अन ते सगळे हास्यास्पदच असते? तुम्ही काढून दाखवता असा मूर्ख वाटणारा पण चालणारा मूव्ही? इथे प्रत्येकाच्या मानसिक गरजेप्रमाणे प्रॉडक्ट उपलब्ध असतो, असला पाहिजे. उद्या तुम्ही गरिबांच्या कपड्याना उथळ अभिरुची म्हणून हसाल. एकदा PMT बस स्टॉपवर एक झोपडपट्टीतील बाई अन तीन चार college girls होत्या. बाई गरीब पण नटण्याची आवड असलेली असावी. तिच्या अंगावरचे कपडे, बांगड्या, कानातले खोटे दागिने, माळा, टिकल्या भडक रंगाच्या, स्वस्त, दर्जाहीनच होत्या. अभिजनांच्या भाषेत म्हणजे 'चीप'टेस्टच्या होत्या. त्यावर त्या मुली आपसात शेरेबाजी करून तुच्छतेने हसत खिदळत होत्या. थोडक्यात तिची टर उडवण्याचाच कार्यक्रम चालू होता.काही वेळाने त्या बाईच्या ते लक्षात आले. त्यावर तिने सन्तापून त्यांचा जो उद्धार केला ते ऐकल्यावर त्यांची दातखीळच बसण्याची पाळी आली. अशी हेटाळणी करणे हे क्रूरपणाचे आहे असे मला वाटते... जेम्सबॉन्डचे पिक्चर माहेरच्या साडीपेक्षा बिनडोक नसतात काय? थोडा चमचमीत पणात कमी पडलेल्या स्वयंपाकाची चेष्टा करण्याची एक क्रूर पद्धत असते. तीच पद्धत अभ्यासात mediocre असलेली मुले, रूपाने बेताच्याच असणार्या व्यक्ती याना सुद्धा अशा comments ला बळी पडावे लागते... हो, ठीक आहे असला पिक्चर may not be your cup of tea पण त्याला हास्यास्पद ठरवण्याचे काय कारण? केवळ तुमच्या कथित अभिरुचीच्या पातळीला तो आला नाही म्हणून? जे टाकाऊ आहे ते आपोआपच जाईलना मरून... पण आम्ही म्हणू तोच खरा दर्जा ही विचारसरणी भयावह आहे इतकेच!! They are not inferior, they are different. Thats all!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|