|
Farend
| |
| Monday, May 21, 2007 - 8:16 am: |
| 
|
"देखो तो सही, सोचो तो जरा, मौसम की रवानी तुम ही तो हो" असे मृदू आवाजात गाणे ऐकले की डोळ्यासमोर राज बब्बर, राज किरण किंवा मार्क ज़ुबेर हातात पेला घेऊन गातायत आणि अत्यंत कडवट हसणारी शबाना उभी आहे असे चित्र राहते ना? तर तसे नाही. आता याची कल्पना द्यायची म्हणजे उद्या जर टारझन त्याच्या एन्ट्री शॉट ला त्या जोरदार आरोळ्या मारण्या ऐवजी काही प्राण्यांना बाजूला बसवून शांतरसात एखादे गाणे म्हणू लागला तर कसे दिसेल? तसे काहीसे आहे. हा गोविंदाचा "महाराजा". यात गोविंदाचा रोल साधारण तसाच आहे. कोणत्याही अचाट चित्रपटांच्या तोडीस तोड हा चित्रपट आहे. गोविन्दाचे नाव यात कोहिनूर असते. तो एका कोणत्यातरी राजाचा मुलगा असतो. चित्रीकरणावरून इतिहासात ही कथा नक्की केव्हा झाली ते कळत नाही. गोविन्दा खेरीज मनिषा कोइराला अधून मधून येते. आणि यात बरेच सिंह आहेत ज्यांच्या पंजावर वीस वर्षापूर्वी बोचलेल्या काट्यांचे वण अजून असतात, हिरो व हिरॉइन जर विहिरीत पडले तर बाहेर काढू शकणारे घोडे आहेत, एक ससाण्यासारखा पक्षी आहे जो हिरॉइन संकटात सापडली तर हिरो ला ओरडून सांगू शकतो. एक माकड ही आहे, पण ते विशेष काही करत नाही, माकडचेष्टा सुद्धा इतरच जास्त करतात त्याच्यापेक्षा. पूर्ण कथा लिहिणे अशक्य आहे. पण काही रोमहर्षक प्रसंग्: गोविन्दा लहान असतानाच त्याला दैवी देणगी असते. तो प्राण्यांकडे नुसते बघून त्यांचे हावभाव ओळखतो आणि ते याचे. त्याचा intro शॉट असाच आहे: हा आपला महालाच्या जवळ खेळत असतो, जवळच दोन तीन सिंहाचे बछडे खेळत असतात (असेच जनरली कोठेही? म्हणूनच कधी ही कथा घडली ते शोधत होतो), आणि त्यातील एक जखमी दिसतो. खेळत खेळत आपला कोहिनूर तेथे जातो आणि पडद्यावर सस्पेन्स गंभीरता वगैरे, इतर लोकांचे घाबरलेले reaction शॉट्स. पण हा डायरेक्ट त्याच्या पंजातील काटा काढतो. चांगल्या चित्रपटांमधे जसे एखादा उगाचच वाटणारा शॉट म्हणजे पुढच्या महत्त्वाच्या शॉट ची नांदी असते तसा हा शॉट आहे, तेव्हा लक्ष द्या (बघताना). पण आंद्रोक्लीस ची गोष्ट दाखवायची पण गोविन्दाला गुलाम दाखवायचे नाही असा खटाटोप दिसतो. पुढे काही 'असामाजिक तत्त्वे' राजाला आणि त्याच्या फॅमिलीला मारायला येतात. पण अशा राज्यात असले नसले तरी अशा चित्रपटांत नेहमीच विश्वासू वगैरे नोकर असतातच ना? अरुणा इराणी राजपुत्राला वाचवण्यासाठी स्वत:च्या मुलाला त्या जागी ठेवून मोठ्या मुलाला राजपुत्राला घेऊन पळून जाण्यास सांगते. एवढे चांगले काम करून सुद्धा तो बिचारा मोठा मुलगा मोठा झाला की राज बब्बर होतो. मोठे होण्याची नक्की वेळ मग ते वाईट लोक अरुणा इराणीला एका अमावस की रातको पकडतात आणि विचारतात की राजपुत्र कोठे आहे? म्हणजे काय? मग छोटा मुलगा नसता झोपवला तरी चालले असते. मग ती सांगते "आज से ठीक बीस साल बाद जब वो बडा होगा तब...". म्हणजे तो त्या दिवसानंतर बरोब्बर २० वर्षांनी मोठा होणार, एक दिवस अलीकडे पलीकडे नाही. जरा आकाशात तरी बघायचे (२० वर्षांनी) हळुहळू चित्रपट पुढे सरकतो आणि पुन्हा ते वाईट लोक अरुणा इराणीकडे येतात, "आज अमावस है, कहा है तुम्हारा राजकुमार?". त्यावर ती म्हणते, "आज अमावस नही, पुनम की रात है. वो देख चॉंद". मग हे व्हिलन लोक काय आकाशात न बघता पंचांग बघून आले होते की काय? पुन्हा आंद्रोक्लीस चित्रपटाच्या शेवटी शेवटी गोविन्दाला कोठेतरी दोन सिंहांबरोबर अडकवून ठेवलेले असते. मधे इतका गोंधळ घातलेला असतो की ती सिंहांची भानगड आपण साफ विसरतो आणि मग धक्कातंत्र वगैरे. पण गोविन्दातर नुसता सिंहांच्या डोळ्यात बघून त्यांना वट्टेल ते करायला लावो शकतो ना? हो. म्हणून त्या सिंहांना अंध करून उभे करतात. म्हणजे ते गोविन्दावर हल्ला करतील म्हणून. अरुणा इराणी ही असते. आता एक सिंह गोविन्दाजवळ येतो. पुन्हा घबराट, सस्पेन्स वगैरे. पण त्याच्यावर हल्ला करायच्या ऐवजी तो एकदम थांबतो आणि पंजा पुढे करतो. येथे आपण थक्क होतो. तेवढ्यात गोविन्दाचे प्राण्यांमधील माणुसकी बद्दल चे संवाद निसटून जातात, तेव्हा थक्क व्हायच्या आधी तेवढे ऐका. आणि त्यावेळचे ग्राफिक्स स्पीलबर्ग, लुकास वगैरेंना निवृत्तीचे विचार करायला लावेल असे आहे, म्हणजे गोविन्दा असा उभा आणि पडद्याच्या दुसर्या बाजूला लहान मुले प्रोजेक्ट वर दुसरा कागदाचा तुकडा लावतात तसा सिंह असे अनेक चमत्कृतीपूर्ण प्रसंग तुम्हाला खिळवून ठेवतील. पण ते शांतरसातेल टारझन ऐकल्यावर इतर गाणी पळविली त्यामुळे कळली नाहीत. जरूर पाहा, जमल्यास मित्र मैत्रिणींबरोबर
|
फ़ारेंड, या पिक्चर्मधे गोविंदाने घार्या लेन्स लावल्या आहेत ना? आणि ती मनिषा कोइराला इतकी आचरट वागते ना.. की बस्स.. त्यामधे अजून एक गाणं छान होतं. ठेहरो तो सही. हा पिक्चर बर्याचदा झीवर लागतो. लागलयास पहायला विसरू नका.
|
>>>एवढे चांगले काम करून सुद्धा तो बिचारा मोठा मुलगा मोठा झाला की राज बब्बर होतो.
|
Farend, LOL ... त्यामध्ये मै तेरा दीवाना, तू मेरी दीवानी बस यही है महाराजा की कहानी... असंही गाणं आहे ना? खरं म्हणजे यातच त्याची अख्खी कथा (?) सामावलीये असं नाही का वाटत? सिंहाच्या पंजातला काटा काढणे LOL .... आपल्याकडच्या सिनेमांत काय काय म्हणून करायला लावतात प्राण्यांना? मर्द मध्ये निरुपा रॉयला होडीपर्यंत सोडून देणारा आणि तिला नमस्कार करणारा वाघ आठवला. शक्य असतं तर डायरेक्टरने त्याच्या तोंडी ' आती रहना मांजी ' असा डायलॉगही घालायला कमी केलं नसतं. :-P
|
Dakshina
| |
| Monday, May 21, 2007 - 11:58 am: |
| 
|
श्रद्धा... आती रहना माँजी
|
Sakhi_d
| |
| Wednesday, May 30, 2007 - 11:26 am: |
| 
|
' आती रहना मांजी ' 
|
Swa_26
| |
| Wednesday, May 30, 2007 - 11:33 am: |
| 
|
'आती रहना मांजी '

|
Disha013
| |
| Wednesday, May 30, 2007 - 9:51 pm: |
| 
|
farend ,हाहाहा!! अजुन तरी हा शिनेमा पूर्ण बघायचा योग आलेला नाहिये,पण तुकड्यातुकड्यात पाहीलाय. बघायलाच हवा. श्रद्धा,आती रहना माजी.....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|