|
अगदि असेच मी पण केले मागच्याच आठवड्यात...शेवटच्या दिवशी म्हणुन पाठवायला एका draft email मधे आठवतील तशी नावे टाकत होते... अगदि business users पासुन झाडुन सगळे जमा केले आणि चुकुन Save च्या ऐवजी Send केले एकेकाचा reply यायला लागल्यावर लक्शात आले blank mail पाठवला आहे
|
Upas
| |
| Monday, May 14, 2007 - 3:51 pm: |
| 
|
>>"सांगितलं पण होतं, ऐकलं नसेल तूम्ही. " ह्यावर एक छा sss न कथा होती गुलमोहर मध्ये काही महिन्यांपूर्वी कोणाला आठवतेय का?
|
हा प्रत्यक्षात केला नाही, तरीही 'वेंधळेपणा'... आज पंजाबात दोन संप्रदायांत जब्बरदस्त हाणामारी झाली! शहराचं नाव भटिंडा... आम्ही सर्वांनी ठरवून पंजाबी स्पेलिंगप्रमाणे 'बठिंडा' लिहायचं ठरवलं... दुपारच्या बातमीपत्राला ग्राफ़िक्स विभागातून एका ताईंनी काॅल केला. स्पेलिंग विचारायला... " Isn't the spelling of Bhatinda wrong? Shouldn't it be 'भ'?" मीही लगेच, "भ? You mean 'भ' for ..." (शब्दच सुचेना!! 'भ' वरून कुठलीही मराठी जीभ सहजासहजी सभ्य शब्द बोलेल का? ) मग २ सेकंदांचा मोठ्ठा पाॅझ घेतला. हसू गिळलं, आणि वाक्य पूर्ण केलं... "भ? You mean 'भ' for ... भूलभुलैय्या?"
|
Chyayla
| |
| Tuesday, May 15, 2007 - 9:15 pm: |
| 
|
योग्या तु नक्कीच मार खाणार सोबत भ ची बाराखडी मोफ़त राहील..
|
Manjud
| |
| Wednesday, May 16, 2007 - 8:16 am: |
| 
|
मी आठवीत असतानाचा हा प्रसंग…………..आमच्या शाळेत सातवीतून आठवीत जाताना वर्ग बदलतात. त्यामुळे सुरुवातीला कोणालाच माहीत नसते आपल्या वर्गात कोण कोण आहे ते. असेच एकदा मधल्या सुट्टीत आम्ही वर्गाबाहेर उनाडक्या करत उभ्या होतो. एक छानसा, छोटुकला गोंडस मुलगा वर्गात सारखा डोकावुन बघत होता. आम्ही सर्वांनी अगदी दयाबुद्धिने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत विचारले,"बाळ, कुठल्या दादाला भेटायला आला आहेस तु?" तो मुलगा अगदी भेदरून जाउन म्हणाला,"मी……….मी………..मी नाही कोणाला भेटायला आलो………..मी…..मी ह्याच वर्गात आहे…" अरे बाप रे!!! आपल्याच वर्गातल्या ४-५ दान्डगट मुली आपल्या डोक्यावरुन वगैरे हात फिरवुन आपली चौकशी करत आहेत म्हटल्यावर त्याला बिचार्याला गहिवरुनच आले अगदी………..
|
मंजू.. जाम हसले हे वाचून... बाय द वे, असं झाल्यावर लगेच त्याने ragging वगैरे ची तक्रार तर नाही ना दिली? मला अजूनही लोक "कितवीला आहेस?" हे विचारतातच त्याची आठवण झाली.
|
योगेश, तुझा किस्सा वाचून आठवले. राज ठाकरेनी सेना सोडल्यावर "माझे विठ्ठलाशी भांडण नाही, त्याच्या बडव्याशी भांडण आहे" असे स्टेटमेंट दिले. ऑफ़िसमधे जो मुलगा ही प्रेस कॉन्फ़रन्स कव्हर करायला गेला होता. तो परत आल्यावर I dont believe this, पूरे प्रेस कॉन्फ़रन्समे ऐसी बाते बोलते है क्या? वगैरे वगैरे. तो दिल्लीवाला. त्यामुळे काय म्हणत होता ते कळायला तयार नाही. वर प्रेस रीलिज दाखवायला तयार नाही. ( BYline पाहिजे ना...) बातमी लिहून बॉसला दाखवली आणि बॉसने आम्हाला बोलावलं. मराठी का नाही समजावलं म्हणून... आम्ही चाट. मोजून तिघेजण मराठी. त्यात ह्याने कुणालाच काय लिहिले ते सांगितले नाही. तुम्हाला सांगायला हवं का??
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:12 am: |
| 
|
मला अजूनही लोक "कितवीला आहेस?" हे विचारतातच>>>> मी १८ वीला म्हणुन सांगायच ना. आम्ही लहान होतो म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत त्यावेळी कोणी विचारल तर बिनधास्त बोलुन टाकायच की मी १५ वी पर्यंत शिकणार अस. आणि ते खेड्यामधील कोणत्याही शाळेत न गेलेले लोक खुष व्हायचे नी आम्ही पण. मामाच्या गावी गेल की एक मुलगा होता आम्हाला खुप सिनियर. मी त्याला ७ वी पर्यंत विचारत होतो की तु आता कितवीला आहेस? तो बिचारा सांगायचा की मी BA 2 वै. पण मी त्याला सोप्या भाषेत विचारत होतो म्हणजे कितवीला? मग तो बिचारा सांगायचा की १४ वीला म्हणुन. नंतर त्यानेच एकदा सर्व माहिती दिली. तो आता PSI झालाय अस ऐकल. तुम्हाला सांगायला हवं का?? >> त्याने "ब" चा "भ" केला काय?
|
ह. ह. पु. वा...म्हणजे 'भ' ची बाराखडी सुरु केली होती की काय नंदीनी???
|
Manjud
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:17 am: |
| 
|
मला अजूनही लोक "कितवीला आहेस?" हे विचारतातच त्याची आठवण झाली. मग ही तुला compliment वाटत नाही का? ....... रडका smiley टाकलास म्हणून विचारते हो.......... माझी ताड माड उंची बघुन असे विचारायचे धाडस कोणीच कधीच केले नाही....
|
त्यात आनंद वाटण्यासारखं काय आहे? छानसा हीरो जेव्हा असं विचारतो "तो बेटा कौनसे स्कूलमे जाते हो?" आणि त्या हिरोचे नाव सलमान खान असते. आणि मी autograph घ्यायला नाही तर मुलाखत घ्यायला गेलेली असते तेव्हा असाच चेहरा होणार ना?? नाही म्हणायला माझे नाव ऐकून तो जाम खुश झाला होता nice name, I really like this name असं चक्क दोनदा म्हणाला.
|
Gobu
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:38 am: |
| 
|
नन्दिनी, सही है बॉस!!!
हम खुष हो चुके मैडम!!!
|
Zakki
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:40 pm: |
| 
|
त्या हिरोचे नाव सलमान खान असते. त्याला आम्ही सलवार कुर्ता खान म्हणतो. त्याच्या हिरोगिरीत, बेकायदेशीरपणे जनावरे मारणे, दारू पिउन गाडी चालवल्याने रस्त्यावरच्या मुसलमानाला मारणे असले अनेक प्रकार येतात. त्याची एक जवळची मावशी आमची मैत्रिण आहे. मुसलमानाशी लग्न केले म्हणून त्या मावशी नि इतर लोक त्यांच्यापासून दूर रहातात. मायबोलीवरील Deeptiw या बर्याच वर्षांपूर्वी इथे लिहीत असत, त्यांचा तो आवडता नट होता, म्हणून Deeptiw आल्यावर त्यांना चिडवायला आम्ही मुद्दाम सलवार कुर्ता खानाची चेष्टा करत असू. तेंव्हा मायबोलीवर अत्यंत खेळीमेळिचे वातावरण असे, आजच्या सारखी ऊठसूट भांडाभांडी, शिव्यागाळी हे प्रकार नव्हते. त्यामुळेच मायबोलीवर मी बर्याच लोकांना मिस करतो. नव्यांशी तितकेच चांगले खेळीमेळीने वागता येणे कठिण दिसते. जो तो मारामारी करायला आलेल्यासारखा असतो. हटकेश्वर, हटकेश्वर!
|
Chyayla
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:48 pm: |
| 
|
बर मग आता तरी सान्ग तु कितवीला आहेस? (काय परत एका हिरोनि विचारल्यासारख वाटतय ना ) बाकी मन्जुला तिच्या ताड माड उन्चीवरुन नक्कीच विचारल्या गेले असेल कोणत्या वर्गात शिकवता किन्वा तुमचा बाळ्या कोणत्या वर्गात आहे
|
Zakasrao
| |
| Thursday, May 17, 2007 - 5:43 am: |
| 
|
तुझ नाव ऐकुन त्याला त्याचा "ऐश्वर्यसंपन्न" भुतकाळ आठवला असेल. आता जावु नको त्याच्याकडे नाव सांगत नायतर कितना गंदा नाम हे म्हणेल सारखे सारखे. त्याने तुला बेटा म्हणलं म्हणजे तो म्हातारा आहे हे कबुल करतोय तर......
|
Manjud
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:41 am: |
| 
|
नंदिनी, स.खा. असे म्हणाल्यावर तुल वाईट वाटणे साहजिकच आहे. पण zakasrao लिहितात ते पण खरे आहे. chyayla , ईतके पण मला मोठे नाही हो केले कुणी, सातवीत असताना सुट्टीत आता तु दहावीचा अभ्यास करत असशील ना किंवा बारावीत गेल्यावर तु post graduation करणार की नाही असे किंवा या type चे प्रश्न विचारत असत लोक मला. तुम्ही तर एकदम express way वरुन bangalore गाठलेत. zakki , मायबोलीवर आता आम्ही आहोत ना? आम्हाला सुद्धा खेळीमेळीचेच वातावरण आवडते. उगाच चिखलात दगड मारायला जात नाही आम्ही. त्यामुळे तुम्ही उगाच जुने दिवस आठवून उसासे सोडु नका. जुने ते सोने आणि नवे ते platinum 
|
Giriraj
| |
| Friday, May 18, 2007 - 4:54 am: |
| 
|
इतके दिवस मी रेहान हा नंदिनीचा मुलगा किंवा दत्तक पुत्र आहे असेच समजत होतो... ईब्लिसपणाच्या BB मुळे माझा वेंधळेपणा उघड झाला!
|
Chyayla
| |
| Friday, May 18, 2007 - 3:40 pm: |
| 
|
आता माझ्या अकोल्याच्या मावशीचा मस्त वेन्धळेपणा सान्गतो. लग्नघरात नुकतेच लग्न आटोपले होते त्यामुळे सगळे आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत. मग बसची चौकशी करायची. मावशीनी चुकुन घरचाच नम्बर माझ्या मावसभावाला (दुसर्या मावशीचा मुलगा) बस स्ट्यान्डचा म्हणुन दीला. हा अन्गणात बसुन मोबाईलवरुन बस स्ट्यान्ड वर फ़ोन लावतोय आणी रीन्ग गेली, आतमधे नेमक्या त्याच मावशीनी फ़ोन उचलला या प्रकाराची दोघानाही मुळीच कल्पना नाही. त्यातल्या त्यात दोघानाही अस्पष्ट ऐकु होत त्या गदारोळातच... मा.भा.: हल्लो एस टी स्ट्यान्ड? मावशी: हा मा.भा.: बुलढाण्याला जाणारी बस किती वाजता आहे? मावशी: हो किती वाजता आहे? मा. भा.: मै आपको पुछ रहा हु, राईट टाईम है? (हा हिन्दीत सुरु झाला) मावशी: अछा: राईट टाईम आहे (असे म्हणुन फ़ोन ठेवुन दीला) मा.भा आम्हाला म्हणतोय, अरे काय बाई आहे मी तीला विचारतोय की बस किती वाजता आहे तर तीच मला उलट विचारतेय. तितक्यात मावशी अन्गणात आली म्हणाली... अरे त्या एस. टी स्ट्यान्ड वरुनच फ़ोन आला होता आणी ते म्हणाले की बस राईट टाईम आहे. मग मा.भा त्यानी डायल केलेला नम्बर दाखवला आणी सगळा उलगडा झाला की मावशीनी घरचाच नम्बर दीला होता आणी हा घरीच मावशीशी बोलत होता. आम्ही तिथेच सगळे जण अक्षरशा: पोट धरुन गडबडा लोळत हसत सुटलो. मावशीला म्हटल अग ते एस. टी स्ट्यान्ड वाले ईतके नाही सुधारले की घरी फ़ोन करुन सान्गतील की बस किती वाजता आहे.
|
Madhura
| |
| Friday, May 18, 2007 - 4:13 pm: |
| 
|
अरे बापरे, च्यायला , हसुन हसुन पुरेवाट झाली. ROTFL.
|
च्या. धमाल किस्सा आहे. ह. ह. पु. वा. झाली. आणि HH असे लिहीताना हहची आठवण झाली. बर्याच दिवसात कुजबूज नाही आले. नंदिनी सलमानने विचारले ना मग नको मनावर घेऊ. शाळेत जाणारी माणसे साधारण कशी दिसतात हे त्याला बिचार्याला कसे माहिती असणार?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|