|
Farend
| |
| Friday, May 04, 2007 - 11:17 pm: |
| 
|
परवाच झी किंवा अशाच कोणत्यातरी चॅनेल वर एक अचाट चित्रपटाची शेवटची १० मिनिटे पाहिली. नाव 'जननी' असावे. "असावे" कारण या काही चॅनेल्स ला प्रोग्रॅम मधे येणारे नाव आणि प्रत्यक्षात चाललेला चित्रपट यात बर्याच वेळा काही ताळमेळ नसतो. भाग्यश्री पटवर्धन, हिमालय दासानी ला कोणी चित्रपटांत घेत नाही असे शेवटी लक्षात आल्यावर पुन्हा काम करायचे ठरवून यात आलेली दिसते. आयेशा ज़ुल्का सुद्धा आहे. दोघींचा प्रत्येकी एक एक पांढरा केस दाखवून त्या हिंदी चित्रपटाच्या व्याख्ये प्रमाणे "म्हातार्या" झालेल्या असतात. एक चिंताग्रस्त मोहनीश बहलही आहे. मो.ब. व भा. एकमेकांकडे प्रेमळ दृष्टीने बघत होते त्यामुळे मला कळले की हा "मैने प्यार किया" नाही. एक तरूण मुलगा व एक मुलगी एकदम प्रचंड मेलोड्रॅमॅटिक संवाद म्हणतात, त्यातून असे वाटले की त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, पण नातेसंबंधांचा प्रचंड घोळ घातल्यामुळे त्यांना असे वाटत आहे की ते भाऊ बहीण असल्याची शक्यता निर्माण झालीय ( "This movie is about relationships" नक्की त्या दिग्दर्शकाने कोठेतरी मुलाखत दिली असेल). मग आता काय करायचे ते न कळल्यामुळे तो हीरो स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करायचा प्रयत्न करण्याचा शॉट देतो, पण भाग्यश्री वगैरे घराच्या अगदी जवळ येइपर्यंत त्याला गोळी झाडता येत नाही. शेवटी त्या दारात पोहोचताना एक "ठो" किंवा अशाच प्रकारचा आवाज येतो. मग कळते की हीरो च्या छातीत गोळी लागली आहे. स्वत:लाच गोळी झाडताना एव्हढा नेम चुकावा? आपल्याला प्रश्न पडतो. बरं आता गोळी लागली आहे तर पटकन डॉक्टर वगैरे बोलविण्यापेक्षा सर्वजण रडके डायलॉग बोलत राहतात. मग कळते ज्या ती हिरॉइन भाग्यश्रीची मुलगी आहे असे हीरो ला वाटल्याने हा घोळ झाला होता, ती हिरॉइन सांगते की मी तिची खरी मुलगी नसून दत्तक घेतलेली आहे ("उसने मुझे पाला है"). मग गोळी वगैरे लागलेला हीरो मरणार की जगणार याचे क्लू देण्याचे हिंदी चित्रपटांचे काही संकेत असतात त्यातील कोणतेच दिसत नाहीत त्यामुळे आपला सस्पेंस तसाच राहतो. मधल्या काळात काय होते कळत नाही, एकदम "१ साल के बाद" पाटी येते. भाग्यश्री आणि आयेशा आनंदी किंवा गंभीर कसे दिसायचे नक्की न ठरल्यासारख्या उभ्या असतात आणि एक गाडी येते. त्यातून तो हीरो ती हिरॉइन आणि एक बाळ उतरतात. म्हणजे हिरो ची रिकव्हरी लौकर झाली हे लक्षात येते. आणि मग कोणतेतरी कहानीकी मांग असलेले नृत्य दाखवून चित्रपट संपतो. १० मिनिटांत एव्हढी जबरदस्त करमणूक करणार्या या चित्रपटाचा आधीचा भाग केव्हा बघायला मिळेल याची वाट पाहातोय. कोणी पाहिला असल्यास (आणि अजून स्वत:च्या डोक्यात किंवा छातीत गोळी घालून घेतली नसल्यास) रिव्ह्यू लिहावा
|
Farend हो मी काल तो गोळीमारू सीन बघितला. आधी त्यातली पात्रे बघून B-grade असणार असे वाटुन मी ते नाव जनानी असेल असे समजत होते. पण मग ती हिरोईन गोळी लागून पडलेल्या हिरोच्या जवळ बसून आक्रोश करत असताना पाहिले " हम दोनो भाई बहन नही है. " आणि मग भाग्यश्री (एक केस पांढरा. अगदी अगदी) आता रडू आलेच तर धबधबाच कोसळणार असा चेहरा करून बघत असते. त्या अर्ध्या मिनीटात आणि एका वाक्यात सगळे कळले. (मग मी चॅनल बदलला.) पण पूर्ण मूव्ही बघायची तुझी महत्वाकांक्षा फारच धाडसी आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, May 18, 2007 - 11:52 am: |
| 
|
कोणी सुनिल शेट्टी अभिनित(???????????) खंजर पाहिलाय का? माझ्या डोक्यावरुन जात होता म्हणुन मी झोपलो आणि वाचलो. हा चित्रपट पुणे ते कोल्हापुर ह्या प्रवासात पाहण्याचे योग आला. असाच एक मिथुन पट प्रवासात पहावा लागला. नाव विसरलो आणी चित्रपटाला कथा नसल्यामुळे काही सांगु शकत नाही. पण मिथुन हा कॉलेजमधे प्रोफ़ेसर म्हणुन नवीन जॉइन झाला आहे. त्याच कॉलेजात त्याची लहाण बहिण शिकत आहे. तिची एक मैत्रीण आहे (हिरॉइन). आणि ती मिथुनला एक फ़ायटींग करताना बघते आणि बघताक्षणी प्रेमात पडते. त्यानंतर एक कोणते तरी गाणे सद्रुश काहि तरी होते. हळु हळु हा ही डोक्यावरुन जात होता. त्यामुळे पुढचे काहि आठवत नाहिये पण मी झोप येत नसल्यामुळे तासभर तो सगळा प्रकार सहन केला आणि नंतर मागे वळुन पाहिले तर बरेच पब्लिक झोपले होते. मग मी पुढे जावुन त्या "डायवर" ला बोललो कि सगळे झोपलेत आता बंद करा. त्यावर तो हसुन चक्क म्हणाला तुम्ही नाही का बघणार. मी त्याला केविलवाणा चेहरा करुन नाही सांगितल मग तो बंद झाला. हुश्श.. अरे कोणी माहेरची साडी आणि काळुबाइच्या नावाने चांगभल पाहिला असेल तर रिव्यु टाका रे. माझ दु:ख हलक होइल.
|
मी मिथुन च पन्खा असल्याने आणी मिथुन च्या चित्रपटाला तिकिट न मिळणे हा प्रकार नसल्याने कधी कधी मिथुनपट पहातो. एकदा हैदराबाद मध्ये एका मिथुनपटला फक्त तिघे ( मी धरून) आल्यावर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण प्रत्येकी पाचशे रुपये घेवून परत जावूयात. मालकाला सुद्धा वीजेची बचत होवून फायदा होईल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|