Dineshvs
| |
| Sunday, May 13, 2007 - 4:19 pm: |
| 
|
अज्जुका, त्यावेळी वाचले नव्हते. आज वाचले. पण फारच त्रोटक लिहिलेय. ते सागर कॅंप वैगरे मला कळले नाही, कारण त्यांचे इतर सिनेमे बघितल्याचे आठवत नाही. मला यातले रात्रीचे चित्रणही उल्लेखनीय वाटले. खुपदा निळा फ़िल्टर लावुन दिवसाच चित्रण करतात आणि ते रात्रीचे म्हणुन दाखवतात. त्यात सावल्या पडलेल्या दिसतात. हि कथाही खासच होती. ( काल्पनिकच असावी, असा माझा अंदाज ) अशी कथा हिंदी पडद्यावर सादर होणे हेच अप्रुप आहे.
|
Ajjuka
| |
| Sunday, May 13, 2007 - 4:46 pm: |
| 
|
तेच तर दुर्दैव ना... कथा उत्तम होती, विषयही महत्वाचा आणि ताकदीचा होता. आणि मग असा चित्रपट ( below average production value ) असला की अजून हळहळायला होतं हो. अहो सागर कॅम्प म्हणजे ते रामायण वाले हो. त्यांच्याकडून थोडीच extraordinary दर्जाची अपेक्षा करणार? रामायणातले बाण आठवतायत का युद्धातले? त्याबद्दल म्हणतेय मी.. त्रोटक अश्यासाठी की अजून काही लिहावंसं वाटलंच नाही. चांगल्या विषयाची वाट लागलेली पाहून mood off पूर्ण... काय लिहिणार!
|
चला, incredibles ची तिकीटे काढायची गरज नाही आता. धन्यवाद डीप्स.
|
स्पायडरमॅन-३, तद्दन टुकार!! अगदी रिलीज झाला त्या दिवशी (नवर्याच्या आणि पोराच्या प्रेमापोटी? ) धडपडत बघून आले. बाकी मंडळी तशी खूष वाटली हा सिनेमा बघून!) काल रॉबिन विलियमचा 'मॅन ऑफ द इयर' बघीतला. एकदा बघण्याइतपत बरा वाटला!
|
सेट पिक्स ह्या चॅनलवर अतिशय जबरी पिक्चर दाखवतात. सध्या मार्टीन स्कोर्ससी आणि वूडी अलन महीना चालू आहे. काल टॅक्सी ड्रायव्हर होता. असो. मेट्रो बघितला. चांगला वाटला. विशेषत्: काही काही संवाद मस्त आहेत. जवळपास सर्व कलाकारांना equal screenspace आहे.
|
Bee
| |
| Monday, May 14, 2007 - 8:49 am: |
| 
|
ह्या रविवारी मी 'आरोहण' बघितला. ओम पुरी फ़क्त एक ओळखीचा कलाकार बाकी सर्व बंगाली कलाकार. काय सशक्त अभिनय करतो ओम पुरी खरच. हां विक्टर बॅनर्जी पण एक ओळखीचा होता. पण त्याचे नाव हा चित्रपट बघितल्या मुळे कळले. इथल्या एका ग्रंथलयात मला हिंदी आणि इतर भाषेतील फ़क्त art/classic चित्रपटांची खाण प्राप्त झाली. सत्यजित रेंचे Apu triology पण इथे मिळाली. मी पाथेर पांचाली बघायला सुरवात केली पण खूप जुना आणि अत्यंत दुर्गम चित्रण असल्यामुळे मला हा चित्रपट एकाच बैठकीत बघणे खूप जड जाते आहे. पण अपुचे तिन्ही भाग नक्कीच बघायचे आहेत. शशि कपूरचा the householder, In custody हे दोन english चित्रपट पण मिळालेत. In custody मधे माझा आवडता कवी, फ़ैज अहमद फ़ैज ह्यांच्या कविता, नज्म, गझल घेतल्या आहेत.
|
Disha013
| |
| Monday, May 14, 2007 - 8:55 pm: |
| 
|
तारा रम पम एकदा बघायला ठीक आहे.सैफ़ मस्तच. राणी चा अभिनय चांगला असला तरी तिला बघाय्चा कंटाळा आलाय आता. ती दोन पोरे अगदी गोड. 'श्रीमंत NRI ' गरीब झाले की काय होते त्यावर कथानक. त्यांना कसे compramise करावे लागते. गरीब होवुन ते बंगला सोडुन अपार्ट्मेन्ट मधे राहण्याची तड्जोड करतात. गाणे एकही लक्षात राहात नाही. 'वाह क्या प्यार है!' अशा विचित्र नावाचा एक हिन्ग्लिश चित्रपट पाहीला. अत्यंत सुमार आणि दर्जाहीन. तसाच सुमार तुषार कपुर. नकटी आयेशा टाकिया बरा अभिनय करते. अजुन एक कोणीतरी माठ हिरो आहे. त्याच्यापेक्षा तुषार कपुरचा अभिनय बरा असे वाटते म्हण्जे बघा! विनोद तर अगदी पांचट आहेत. कल्लु लोक आणि गो-या बाया घेणे आणि त्यांना नाचवणे म्हनजे फ़ॅशन झालिये. संपुर्ण देशी movie बनायचे बंदच झालेय.
|
Ksha
| |
| Tuesday, May 15, 2007 - 1:53 am: |
| 
|
अगदी वाट बघून बघून शेवटी शनिवारी incredibles बघितला आणि जो काही पोपट झाला तो विचारू नका. सर्वात वाईट वाटलं जेव्हा आशाचा स्वर "चैनसे हमको कभी"ला देखील लागला नाही तेव्हा ! आणि टोपी घालून "झलक दिखला जा" ( ते ही सुरुवातीच्या ऊऽऽऽ ऊऽऽऽ करत विव्हळण्यासकट ) म्हणून तर तिने काळजाला अगदी भेगा पाडल्या हो मग तिचं नाचून वगैरे झालं .. वय सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला .. मराठी किती आहेत हे विचारल्यावर माझ्या "आता मराठी - नशिब जोरदार असेल तर एखादी ठसक्या लावणी किंवा नाट्यगीत - ऐकायला मिळणार" अशा अपेक्षा अगदी वाढल्या होत्या पण बरेच मराठी लोक उपस्थित असताना देखील तिने पंजाब्याच्या कार्यक्रमाला आलो तर पंजाबीच गायचं असा ( बे ) सूर लावून पोपट केला. सोनूने आपल्या परीने कार्यक्रम जोशपूर्ण होईल याचा प्रयत्न केला, त्यात त्याला काहीही दोष देता येणार नाही.. कैलास खेरच्या गाण्यांनी मात्र मन अगदी तुडुंब भरलं. कुणाल गांजावालाला गायचं होतं की पोट झाकायचं होतं हे शेवटपर्यंत कळलं नाही असो .. थोडक्यात "आशा" पहायला गेलो आणि पदरी निराशाच पडली
|
नमस्ते लंडन पाहिला.मला आवडला.कारण ग़ुरुनंतर पहिलाच हिंदी चित्रपट पहात होतो. गोर्याला दिलेले सडेतोड उत्तर आवडले.शिवाय कॉमेडी पण चांगली आहे. नवर्या मुलाच्या शोधात बोलणी करतानाची कॉमेडी आणि रग्बी मच जिंकल्यानंतरची डिनर टेबलवरची कॉमेडी खासकरून आवडली. पण आजकाल आपल्याकडे दारु (यात बिअर पण येते) ला चित्रपटांमधे इतक प्रमोट का केलं जातं समजत नाही.गरज नसताना बिअर पितानाची द्रुश्य दाखवली जातात.त्या 'डेल्ही हाईट्स'मधे पण दारु तशीच प्रमोट केली आहे.त्यात तर हानीमुन ला पण दारु पिताना दाखावलं आहे आणि दररोजच्या जेवणाच्या वेळी पण.
|
नमस्ते लंडन मलाही बरा वाट्ला TP म्हणून. तो एकता कपूर छाप नवरा मुलगा मस्त होता चिन्या, बॉलिवुड चित्रपटात फ़क्त दारूच नै कै, extra marrital affairs , कल्लू छाप नाच, 'आनंदी' लोक असं बरंच कै कै promote केलं जातं! 
|
Mansmi18
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:06 pm: |
| 
|
भेजा फ़्राय नावाचा चित्रपट पाहिला. एवढी अपेक्षा नव्हती पण चान्गला वाटला. बर्याच दिवसानी हसायला आले.
|
Farend
| |
| Tuesday, May 15, 2007 - 7:03 pm: |
| 
|
मैत्रेयी, chinya मी ही ७-८ दिवसांपूर्वीच नमस्ते लंडन बद्दल लिहिले होते, मला ही बरा वाटला होता. आणखी काही जाहिराती तुम्हाला दिसल्या का? मैत्रेयी, 'आनंदी' LOL . अमेरिकनांनी त्या मूळ शब्दाचा अर्थ पार बदलून टाकला, तसे आता मराठीतही होणार का?
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 4:00 am: |
| 
|
काल मी शशी देशपांडेच्या कादंबरीवर आधारीत 'दृष्टी' बघितला... तर हा चित्रपट मला मुळीच आवडला नाही.. सहसा साहित्यावर आधारीत चित्रपट मला आवडतात..
|
काल सलाम ए इश्क़ पाहिला. परत पाहिला. तिसर्यादा वही पेन घेऊन बसले आणी कुणाचे कोण आणि काय भान्गड हे लिहून काढले. सलमान प्रियाकाचे नक्की काय चाललय ते कळतच नव्हते. म्हणजे तो मरतो म्हणून सांगितलं तर शेवटी परत "त्याच" लग्नात तो काय करत होता आणि प्रियाकाला कसं समजलं की तो "तिथे" आहे?? अक्षय आयेशा ची भानगड भलतीच मजेदार होती. engagement करेपर्यन्त त्याला नात्यातला सीरीयसनेस जाणवत नाही धन्य आहे... सोहेल आणि इशा.... नक्की त्याच पिक्चर मधे होते का दुसयाच कुठल्यातरी पिक्चरचे रशेस इथे टाकले होते?? त्या दोन पात्राची नावे सुद्धा कळत नाही. अवघे तीन सीन आणि कथेशी त्याचा संबन्ध नाही. जॉन आणि विद्याची प्रेमकहाणी हा एक स्वत्तंत्र सुन्दर विषय झाला असता. मुळात inter religion marraige आणि psychological problems नीट दाखवून व्यवस्थित कथा फ़ुलवता आली असती. पण इथल्या जत्रेत सगळंच हरवून जातं. अनिल कपूर आणि जुही चावलाची संयत कथा खूप छान होती. जुहीच्या चेहर्यातला फ़्रेशनेस अजूनही जाणवतो. वयाला साजेलसं काम दोघानीही मस्त केलय. मला सगळ्यात जास्त आवडली ती गोविंदा आणी गोर्या मेमची कहाणी. गोविंदा जबरदस्त काम करतो. अजिबात आचरटपणा न करता. मुळात तो चांगला अभिनेता आहे. यामधे तर त्याने देहबोली आणि संवादफ़ेक यावरच मस्त काम केलय. स्पेशली तिच्या एंट्रीचा सीन सही शूट केलाय. एकूण चित्रप्ट पाहताना मला पडलेले प्रश्न.. अक्षय खन्नाचे आईवडील कुठे आहेत? जर तो अनाथ असेल तर इतका श्रीमंत कसा? त्याच पोटापाण्याचा उद्योग काय? सलमानचा पोटापाण्याचा उद्योग काय? वेटर इतका पैसेवाला??? प्रियान्का अक्षयच्या पार्टीत नाचते. ती पार्टी कुठे होते? दिल्ली की मुन्बई? आणि ती त्या पार्टीत का नाचते? ती अक्षयला पर्सनली ओळखते का? जर तिला item queen व्हाय्चे नाही तर ती अशी कामे स्विकारतेच का? करन जोहर चांगले family पिक्चर्स बनवतो. बाकीची अख्खी फ़िल्म इंडस्ट्री "नीलकमल" बनवते का? सोहेल आणि इशाला कशासाठी घेतलय? आयेशा इतक्या टकलू अक्षयवर का मरते? अक्षय कॉमेडी करायचा प्रयत्न का करतो? प्रियान्का मधेच करीना कपूर सारखा चेहरा का करते? जमत नाही तर सलमान तरूण दिसायचा प्रयत्न का करतो? वगैरे वगैरे...
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 16, 2007 - 10:40 am: |
| 
|
तुझ्याकडे त्या फ़िल्म ची CD असेल अत्र एखाद्या गरीब रस्त्यावर CD विकणार्या विक्रेत्याला दे. तेवढेच तुझे पाप फ़िटेल हा पिक्चर पाहिल्याचे.
|
Mbhure
| |
| Wednesday, May 16, 2007 - 3:36 pm: |
| 
|
नंदिनी तू " सलाम... " नुसताच शेवटपर्यंत बघितला नाहीस (आणि तेही तिसर्यांदा) तर त्याचा एव्हढा अभ्यास केलास याबद्दल तुला एक वेगळे फिल्मफेअर द्यायला पाहिजे. त्या चित्रपटाचा तू जेव्हढा विचार आणि अभ्यास केलास त्याच्या निमपट जरी दिग्दर्शकाने केला असता तर..... एक " चुकीचा " गैरसमजः करन जोहर चांगले (?) आणि फॅमिली(?) चित्रपट बनवतो. चित्रपटात कुटुंब असले के तो कौटुंबिक होत नाही हे त्या क. जो. ला सांगवेसे वाटते.
|
Disha013
| |
| Wednesday, May 16, 2007 - 4:11 pm: |
| 
|
नंदिनी,सर्वात जास्त वेळा 'सलामे-इश्क़' बघणारी प्रेक्षक म्हणुन तुझी नोंद गिनीज बुकात झाली पाहीजे.मी तर एकदाच बघितला आणि बघताना मधे १० मिनिटांचि डुलकी काढली होति! आणि तरीही काही IMP MISS झालेय असे आढळले नाही!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:56 pm: |
| 
|
नंदिनी, या सिनेमाच्या तीन CD आहेत. मी चुकुन तिसरी आधी बघितली, तरी मला ते संपुर्ण सिनेमा बघेपर्यंत कळले नाही. तो सिनेमा बघता बघता, मी पेपर वाचला, कुकर लावला, जेवलो. मायबोलीवर लेख लिहिला, अंताक्षरीवर संपुर्ण गाणे लिहिले, तरीहि कुठेही सिनेमा, ( आहे त्यापेक्षा ) तुटक वाटला नाही. वरच्या यादीशिवाय अनिल कपुरची पण एक प्रेयसी आहे ना ? ती कोण ? ( बनानेवालेने बडी फुरसतसे बनाया है. )
|
भयानक अभ्यास नंदिनी.. जबरी.. आमच्या कॉलेज मध्ये मिथुनच्या गुंडा आणि लोहा ह्या २ चित्रपटांवर काही मुलांनी असाच गाढ अभ्यास केला होता. ऑर्कूटवर ह्या दोनही चित्रपटांवर जबरी ग्रूप्स आहेत. कुणि बघितले आहेत का हे २ पिक्चर?
|
Vidyaraj
| |
| Thursday, May 17, 2007 - 5:56 am: |
| 
|
कालच डोंबीवली फास्ट बघितला खुप आवडला. खरोखरच या देशाला भरपुर माधव आपटेंची गरज आहे. शेवट मात्र आवडला नाही.
|