Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 14, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through May 14, 2007 « Previous Next »

Zakasrao
Thursday, May 10, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी आणि मन्जु
नन्दु तुझ्या मित्राच्या आईने तुझ खुप कौतुक केल असेल ना!
आणि मन्जु तुमचे सा.बा. ना तुम्ही चान्स दिलात की अस करुन.


Psg
Thursday, May 10, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी दोघेही कळजीपूर्वक पाहत होते मि पर्स मधे काय टाकत आहे ते!!!!
मन्जू, जबरी!

Yogita_dear
Thursday, May 10, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच केलेला वेंधळेपणा...
office मध्ये stationery हवी होती मला.२ types चे lockers आहेत office मध्ये. एकाची key Godrej कपाटासारखी आहे आणि दुसर्याची scooty ची असते तशी.
stationery कपाटाची godrej कपाटासारखी आहे. sec ने मला scooty सारखी key दिली आणि मी पण मुर्खासारखी जाउन locker ला लावली.उघडत का नाही म्हणुन बघितल तर वेगळीच key ...


Alpana
Thursday, May 10, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i have tried to write in devnaagari many times...pan sagale lihilyanantar error in page cha msg yeto..mhanun shevati asach lihitey..........
lagnanantarchya pahilya birthdayla (navaryachya nahi hann..mazya) mi dudh gas war tasach thevale....aani shopping la gele...mall chya parking madhye pochalyawar navaryani wicharale...gas band kelas? n i was like not remembering anything...not even ki mi dudh tapat thevale hote.....ghari pocheparyant basundichya pudhachee step zali hoti....patelyacha kolasa n gharat sagaLa dhur....ghari mothe dir yenar hote ratri gavahun..tyamule sagalLa welL aamhi doghe dudhache bhande ghasaNe (actually screw driver ne saaf kele...thokun thokun) aaNi dhur ghalaWane n also room freshner fawaraNe hyaat ghalawala....ajunahi sasarche sagaLe wicharatat ki basundi punha kadhi karnar?

Dineshvs
Thursday, May 10, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही वेंधळेपणा करता खरा पण तो लपवण्याचा इब्लीसपणा पण जमायला हवा.

आमच्या घरी मिठाचाच चहा करतात बाई.

हळद पोटात जावी गडे, जंतुनाशक असते ती.

ऑफ़िसच्या टिव्हीचा रिमोट हरवलाय, म्हणुन घेऊन गेले होते. सांगितलं पण होतं, ऐकलं नसेल तूम्ही.

असे म्हणुन, सहज बाजु सावरता आली असती.


Alpana
Friday, May 11, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah dinesh....good idea.....hya pudhe he lakshat thevunch kaam karen...punjabi navryala mhanen ki aamchyakade wadhdiwasala dudhache patele jaLane shubh mantaat...

Alpana
Friday, May 11, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

paN aata 3-4 mahinyanatar sangaNe mhaNje mi vendhaLi aahe he prove karaNe hoil na?

Manjud
Friday, May 11, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

हे वाक्य म्हणजे तुमचा स्वानुभव वाटते,

"सांगितलं पण होतं, ऐकलं नसेल तूम्ही. "

Good Idea ह्यापुढे लक्शात ठेविन.


Sunidhee
Friday, May 11, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कल्पना मस्तच आहे पण असे म्हटले तर माझ्या लोकांबरोबरच्या मैत्र्या तटातटा तुटतील ना .... त्याना वाटेल , बया कशात काय काय घालून काय खायला-प्यायला देते काय माहीत? :-)

Dineshvs
Friday, May 11, 2007 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु, बोलताना ईतका कॉन्फ़िडन्स दाखवायचा, कि समोरचा कबुल करुन मोकळा झालाच पाहिजे.

सुनीधी,
एवढ्याश्या मिठाने / हळदीने / तिखटाने / मोहरीने तुटते ती मैत्रीच कसली ? लोक मैत्रीसाठी कायकाय करतात. मीराबाईने तर विषाच्या प्याला रिचवला,

असेही वर सुनावुन द्यावे.


Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, बास... आपल्याला तुमचा सल्ला जाम पटला. आचरणात देखील आणला. आता canteen मधे उनाडक्या करून आल्यावर बॉसने विचारले "कुठे होती?"

साळसूदपणे सांगितलं "तुम्हाला सांगून गेले होते ना... canteen ला जात आहे म्हणून. ऐकले नाही का?"

अर्थात माझे पास्ट रेकॉर्ड पाहता.. हे असं काही पहिल्यान्दाच केलेले नाही हेही खरे.. :-)


Gobu
Saturday, May 12, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
तुस्सी ग्रेट हो!
"केन्टीनमध्ये उनाडक्या!!!"
एकदम सही!!


Manjud
Saturday, May 12, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो, हा confidence आपण ऑफिसमध्ये पण आचरणात आणु शकतो नाही का!!!!!

thanks नन्दिनि, उनाडक्यांसाठी सहि reason दिलेस.


Sakhi_d
Saturday, May 12, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा कालचा वेंधळेपणा... :-)

फ़्रीज उघडला तर पाण्याच्या सगळ्या बाटल्या अर्ध्याच भरलेल्या.... म्हणुन एकेक करत सगळ्या भरल्या... थोड्यावेळाने एक मित्र आला त्याला पाणी द्यायला गेले तर पाणी पिवळे..... बाटली बघीतली आणि लक्षात आले.... मी पाणी समजून Mountain Dew असलेल्या बाटलीत पाणी भरले..... :-)(हा वेंधळेपणा)

नंतर मित्राला त्यातच ENO टाकून दिले..... (हा इब्लिसपणा)



Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेट, सखी,, आयडीया भन्नाट आहे. हा इब्लिस्पणा करायलाच हवा.

Sanghamitra
Sunday, May 13, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> नंतर मित्राला त्यातच ENO टाकून दिले

टाकाऊतून टिकाऊ. सही आहे.

Yogesh_damle
Monday, May 14, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईनो!! ह. ह. पु.वा!! :-)

कधी किचनमधल्या गप्पांच्या भरात, 'काल्पनिक' भांड्यात अंडं फोडूनदूध ओतून ओट्याचे बारा वाजवलेत का? :-)


Chyayla
Monday, May 14, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्ड आणी वर त्यात दुध हे कस काय बुवा? मी तर कधी अन्ड खात नाही पण असल कधी ऐकलही नाही हो...

माझा हा पहिल्या नौकरीच्या वेळेसचा वेन्धळेपणा..

स्पिनिन्ग मील मधे Supervisor असताना टेलीफ़ोन पासुन, Power Sub-station चे काम करायचो. एकदा एक टेलीफ़ोन लाईन दुरुस्त केली आणी टेस्ट करायचा म्हणुन एक फ़ोन क्रमान्क फ़िरवला. आणी तो नेमका माझ्याच मागे थोड्या दुरवर उभ्या असलेल्या बन्गाली सहकार्याने उचलला तो पण ईलेक्ट्रोनिक्स इन्जीयर होता बाकी सगळे ईलेक्ट्रीशियन आमच्या हाताखाली होते.
मला काही कल्पनाच नाही की हा फ़ोन माझ्याच मागे असलेल्या सेन ने उचलला.

मी: हल्लो
सेन: (हळु आवाजात) ओये नीचे रख
मी: आप कौन बोल रहे है? (मी काही त्याचा आवाज ओळखला नाही कारण टोनीन्ग वेगळच होत त्याच)
सेन्: अबे नीचे रख
मी: (लगेच राग आलेला) अबे कौन है बे, मुझसे ऐसी बात करता है?
सेन्: अबे तुझे नीचे रख बोला तो, सुनताही नही
मी: ( माझा राग चान्गलाच वाढलेला) कौन है रे तु, साले सिर्फ़ नाम बता तेरा, समझता क्या है अपने आप को, किसको अबे काबे बोल रहा है बे...
आणी तितक्यात मागुन खान्द्यावर थाप पडली, आणी सेन मला म्हणतोय Relax man.. Relax.. its me

माझा तो लालबुन्द झालेला अवतार आणी त्याला असे शान्तपणे, मिस्किलपणे बोलताना पाहीले मीच क्षणभर ओशाळलो. आणी सगळा घोटाळा लक्शात आल्यावर मीच जोर जोरात हसायला लागलो.



Chyayla
Monday, May 14, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या निवान्त मिळाला आहे तर अजुन एक किस्सा देउनच देतोय..

आपल्याच मायबोलीकरान्सोबर झालेला वेन्धळेपणा..

जयमहाराष्ट्राने मेल पाठवुन विचारले होते की महाराष्ट्रातल्या शरद पवारान्च्या राष्ट्रवादी कॉन्ग्रेस व शिवसेना यान्च्यात जर युती झाली तर काय वाटत. तर दुसरीकडे अल्टीमा ने मेल केली होती की.. तुम्ही विचारा, म्हणुन विचारले मला ते काही कळलेच नाही तशी ती तीची पहिलीच मेल.

उत्तर देताना, अल्टीमाला राजकारणावर दील भाषण ठोकुन आणी, जयमहाराष्ट्राला विचारपुस करतोय कारण अल्टीमा मला नवीनच होती, तर जयमहाराष्ट्रचा परिचय V&C मधे आधीच झालेला होता..

हा घोटाळा तेन्व्हा लक्षात आला जेन्व्हा अल्टीमानी मला कळवल की तीचा ई-मेल आयडी तो नाहीच ज्यावर मी मेललो..
झाल आता जयमहाराष्ट्र माझ्या बाबतित काय विचार केला असेल कुणास ठाउक, कदाचित V&C करताना याचा डोका पार कामातुन गेला असावा असे तीला वाटले असावे.. कारण त्या नन्तर त्यानी मेल टाकायचे धाडस नाही केले.



Zakasrao
Monday, May 14, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या पैकी बर्‍याच जणानी हा उपद्व्याप केला असेलच. मागच्या दसर्‍याला सर्व जणाना शुभेच्छा देताना झालेला हा किस्सा.
मी आठवुन आठवुन सर्व मित्र,नातेवाइक,हितचिंतक यांची नाव मेल मधे आहेत का ही खात्री केली आणि मेल दिलि पाठवुन. मी खुश. थोड्याच वेळात रिप्लाय यायला सुरु की हे काय आहे वैगेरे. मी गोंधळलो आनि सेंट मधे जावुन पाहिल तर मी फ़क्त विषय लिहिला बाकिची नाव लिहिली पण आत मधे शुभेच्छा म्हणुन काहिच लिहिल नव्हत शिवाय त्या मेल ला मी जे आपट्याच्या पानाच चित्र जोडणार होतो ते हि नाही. मग सगळ्याना उत्तर देण्यापेक्षा परत एक मेल तयार करुन पाठवली.
ता. क. काहि इब्लिस मित्रानी का रे ही काय मिस मेल होति का ब्लॅंक मेल अस मिस कॉल आणि ब्लॅंक कॉलच्या धर्तीवर विचारल. पण मी ही त्याना तुमची आठवण येत होती अस ठोकुन दिल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators