Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 13, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through May 13, 2007 « Previous Next »

Psg
Thursday, May 10, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही घातल्यासारखाच होता :-).. 'मुझसे शादी करोगी' का गं सन्मे?

म्हणजे, हे त्या पिक्चरचे नाव का गं सन्मे?


Farend
Thursday, May 10, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलमान कहानी की मांग हो तोच कपडे पहनतो. :-)

Savyasachi
Thursday, May 10, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाही ग पुनम, आता काय करावे बरे, मी तर तुझ्यापुढे हातच टेकले बुवा :-)

Dineshvs
Thursday, May 10, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिदी तेरा देवर दिवाना मधे चक्क, गर्भारशी बाईचा ड्रेस घातलाय कि सल्लुने.

Disha013
Thursday, May 10, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती 'गाणे की मांग' होती!
तेवढ्या एकाच चित्रपटात त्याने अंगभर कपडे घालुन 'अभिनय' केलाय असे मला वाटते!


Sanghamitra
Thursday, May 10, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> 'मुझसे शादी करोगी'
पूनम :-)
असेल असेल. मला चोचोचुचु (म्हन्जे चोरी चोरी चुपके चुपके) वाटत होते.
हुडा
काय की? सल्लूचा नाच एवढा वेळ कोण बघायला बसलेय?
पण धन्य झाले असेल ते सारोंग.
farend अगदी अगदी


Robeenhood
Thursday, May 10, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसमानमे कितने तारे है?' ह्या कोडवर्डला उत्तर म्हणून देतात" अब हम तुम्हारे है"
हे कोणत्या पिक्चरमध्ये आहे?


Farend
Thursday, May 10, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता एवढ्यात पाहिला होता तो पिक्चर, धर्मेन्द्र चा 'आंखे' का? नक्की आठवत नाही.

आता दिवसभर हैराण होणार ते सापडेपर्यंत :-)


Farend
Friday, May 11, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते लंडन चक्क बर्‍यापैकी हसवतो! आधी सर्वात आवडलेले:
कतरिना ला नवरा शोधत असताना तो सांस बहू सिरीयल बघून इफेक्ट झालेला मुलगा, जबरी! कतरिना ने आधीच्या चित्रपटांपेक्षा खूपच बरे काम केलेले आहे. अशा चित्रपटांत लंडन (किंवा परदेशात कोठेही) मोठ्या झालेल्या पिढीचे काही ठराविक हाव भाव असतात आणि कोणत्याही प्रसंगाला काही प्रतिक्रिया असतात, तसे कतरिनाचे आहेत का नाहीत हे लंडन वासीच सांगू शकतील पण मुळात हाव भाव असणे ही तिच्या दृष्टीने प्रगती आहे. कारण पूर्वी ती Just chill chill वगैरे म्हणताना जरा जास्तच chill होउन just freeze झाल्यासारखा चेहरा करायची. अक्षय कुमार जरा म्हातारा वाटतो (जरा म्हातारा ही द्विरुक्ती नाही, जरा म्हणजे थोडा :-) ), आणि मागचे केस जास्त ठेवलेल्या Simon Cowell सारखा दिसतो (" American Idol " मधला एक जज्ज), पण हेरा फेरी वगैरे पासून त्याला बेअरिंग वगैरे समजायला लागलेले दिसते. काही विनोदही छन आहेत.

आणि त्याच्या मनोज कुमारगिरी च्या शॉट मधे बाकी भाषणबाजी असली तरी आपल्याला एकदम आवडलेला डॉयलॉग म्हणजे तो "एक कॅथॉलिक बाईने शीख माणसाला पंतप्रधान बनवले, ज्याने एका मुस्लिम राष्ट्रपतीकडून शपथ घेतली अशा देशात की जेथे ८०% हिंदू आहेत", अशा अर्थाचा. निदान एवढ्या एका बाबतीत तरी आपली लोकशाही अमेरिकेच्या पुढे आहे.

बहुतेक एवढ्या जमेच्या बाजू झाल्या.

एक दोन ठिकाणी जाहिराती इतक्या उघड वापरलेल्या आहेत की "चित्रपटाची ही दोन मिनिटे Western Union तर्फे प्रायोजित" असे म्हणायचे बाकी ठेवले आहे. कारण नुसती शॉट च्या मागे उत्पादने न दाखवता साधारण "यादे" प्रमाणे त्यांची जाहिरात होईल अशा पद्धतीने संवादच रचले आहेत (उदा: कोणतातरी जीन चा ब्रॅंड "ये इंडिया का पहला ब्रॅन्ड है जो यूके मे..."). इतर संवाद आणि प्रसंगात सुद्धा परदेशातील भारतीय आणि पाकिस्तानी (आणि त्यातही दोन्हीकडच्या पंजाबी) प्रेक्षकांच्या आप आपल्या देशांबद्दलच्या frozen images डोळ्यासमोर ठेऊन त्यांना बघायला आवडेल असे बनवून घेतले आहेत.

गाणे सर्व पळवली त्यामुळे नीट कळली नाहीत. लंडन आणि भारतातील आऊटडोर शॉट्स खूप प्रेक्षणीय आहेत.

बाकी गोष्टी ठराविक वळणाने जातात पण धाटणी थोडी यश चोप्रा वगैरे पेक्षा वेगळी आहे त्यामुळे बघवतो.


Bee
Friday, May 11, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेप्रेमावर पेष्टोनजी किती सुंदर चित्रपट आहे खरच. वेषभुशा अप्रतीम जमली आहे. नशरुध्दीन शहा आणि अनुपम खेर अप्रतीम.. शबाना एकदम वेगळी.. फ़ारसी लोकांचे राहणीमान, त्याचे कपडे, पार्ट्या सगळेच वेगळे. तो पांढरा गंजी मस्त दिसतो नशरुद्धीन शहाला..

Tanyabedekar
Friday, May 11, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे फ़ारसी नव्हे, पेश्टनजी पारशी लोकांवर आहे.

Giriraj
Friday, May 11, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असू दे असू दे... त्याने 'फ़ारसी' चूक नाही केली.. नाहीतर त्याच्या इतर धमाल विनोद पूर्ण मायबोलिविश्वात विनोद क्रमांक सांगितले तरी लोकांना आठवतात! :-)

Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मला बिल्कुल न आवडलेल्या चित्रपटाअची थोडीफ़ार चिरफ़ाड करणार आहे. मी कॉलेजमधे असताना या पिक्चरने मुलाना मुलीना वेड लावले होते. मी सुद्धा लेक्चर बंक करून पाहिला... पण बात जमी नही. खरंतर काजोल ला पिक्चरभर वाया घालवलय. इतकी छान अभिनेत्री पण तिच्या अभिनयाचा कस लावेल असा अजूनही एकपण पिक्चर आला नाहे. रानी अभिनेत्री आहे हे इथूनच दाखवून द्यायला सुरुवात केली. आणि शाहरुख शाकरुखसारखंच काम करू शकतो हे यातुन परत सिद्ध केलं गेलय. सलमान बिचारा काय करतोय हे न त्याला माहित ना दिग्दर्शकाला. आणि या जहाजाचा captain करन जोहर,.. ओळखला ना पिक्चर?

"जर तुमच्या आवडत्या चित्रपटापैकी असेल तर पुढचे स्किप करा.. भयानक आहे"

कुच कुच होता है असा (स्पेलिंग असंच आहे) अशा टुकार नावाचा हा टुकार चित्रपट. स्टोरी नाही सांगत कारण सगळ्यानी पाहिलाय. (असे गृहित धरते. नसेल पाहिला तरी बिघडत नाही.):-)

तर नवर्याची बायको इस्पितळात बाळंत होते. पोरगी झाल्यावर नर्ससकत सगळे बाळाला घेऊन नाचतात. पण डॉक्टर नवर्‍याला बोलावून सांगतो की "तुझी बायको आता मरणार आहे. तिचे हे बाळंतपण रिस्की होतं पण तरीही तिने जीवावर उदार होऊन या बाळाला जन्म दिला." झालं. एमोशनल सीन सुरू. अरे, यमराज सहोदरानो. internal bleeding हा प्रॉब्लेम होता ना. मग उपचार वगैरे शिकवले नाहित का मेडिकल कॉलएजमधे? का तिथे पण कुच कुच होता है केलं??

आता ही बायको मरायच्या आधी नवर्‍यला काही सांगत नाही पण पोरीच्या नावाने चिट्ठ्या ठेवून जाते. आणि आठ... हो आठ वर्षाच्या मुलीला आपण कॉलेजमधे काय उपद्व्याप केले ते लिहून ठेवते. अरे काय हे? अजून थोडी वर्षे थांबायचे ना... पण नाही. अगदी, तो राहुल गच्चीतून तिच्या बेडरूममधे कसा आला पासून ते अंजली कुठल्य रंगाचा ड्रेस घालून ट्रेन्मधे गेली. इथपर्यन्तचे डीटेल्स. आणि नन्तर बापाचे लफ़डे जमवण्याचा मुलीचा आणि तिच्या आजीचा हास्यास्पद प्रयत्न. (लग्न नव्हे.. कारण "हम कोग एक बार जीते है एक बार मरते है. शादी भी एकही बार करते है" इति राहुल.)

पूर्ण पिक्चर इतका मजेशीर आहे आणि तरीही जेव्हा त्याच्या वर उड्या पडत होत्या त्यावेळेला मला समजलं की candy floss पिक्चर म्हणजे काय प्रकरण.

On a very serious note , स्त्री देहाचे यात जे दर्शन दाखवलय ते मला बिल्कुल पटलं नाहि. अंजली जेव्हा टॉमबॉय आहे तेव्हा तिला मुलगी सुध्दा राहुल मानत नाही आणि नंतरच्या एका शॉटमधे तिचा पदर ऊडलाय आणि राहुलच्या तोंडी लाईन आहे. "कुच कुच होता है" तरीही मुलीना हा राहुल कूल का वाटला ते देव जाणे.

प्रेम या भावनेचा यात जितकी खिल्ली उडवली आहे की बास्स...


Zakasrao
Saturday, May 12, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी करन जोहर ची पिक्चर बिलकुल पाहत नाही. शाहरुख फ़क्त बाजीगर आणि स्वदेस मधे आवडला. त्यामुळे मी त्याचे चकाचक असलेले पिक्चर बिलकुल बघत नाही. त्याच्या पिक्चर ला पैसे घालवण्यापेक्षा विन्ग्रजी थ्रिलर परवडतो. त्यामुळे माझे पैसे वाचले ह्या पिक्चरवरचे. आणि असे बरेच आहेत:-)

Robeenhood
Saturday, May 12, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आसमानमे कितने तारे है?"

"अब हम तुम्हारे है"

हा डायलॉग कोणत्या पिक्चरमधला आहे? यात धर्मेन्द्र नाही. १९८५ च्या आसपासचा आहे. बच्चन, विनोद खन्ना, शम्मि कपूर वगैरे आहेत. एक स्मगलरांचे कन्साइनमेन्ट आलेले असते. त्यातला 'माल' ताब्यात घेन्यासाठी'गॅन्ग'ची माणसे आलेली असतात. खरे तर ते पोलिसच असतात. त्यावेळा जहाजातून विचारतात' आसमानमे कितने तारे है' त्यावर उत्तर येते'अब हम तुम्हारे है' मग ओळख पटते. मग आधीच फाडलेल्या नोटेचा एक तुकडा जहाजावरील लोक दाखवतात व खालचे दुसरा उरलेला तुकडा जुळवतात ओळख कन्फर्म होते. नन्तर अचानक गोळीबार सुरू होतो.

आठवते का कुणाला?


Shendenaxatra
Saturday, May 12, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते परवरीश असावा.


Dineshvs
Saturday, May 12, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच १९७१ नावाचा सिनेमा बघितला. हा सिनेमा आला कधी गेला कधी ते कळलेच नव्हते. आणि आता सीडी आणुन पाहिला, तर वाईट वाटले. इतक्या सुंदर सिनेमाची चर्चाच झाली नाही म्हणुन.
१९७१ च्या बांगला देश संबंधी लढाईत, काहि भारतीय सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडले, आणि पुढे त्यांची कधीच सुटका होवु शकली नाही. त्याना १९८६ मधे शेवटचे जिवंत बघितले होते.
अश्याच काही सैनिकानी केलेल्या ( बहुतेक काल्पनिक ) सुटकेच्या प्रयत्नावर ह्या सिनेमाची कथा बेतलेली आहे.
या सर्व प्रयत्नात, वेड्या साहसापेक्षा योजनाबद्ध प्रयत्न आहेत. आणि म्हणुनच कथानक खुपच विश्वासार्ह वाटते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणलेली राहते, आणि शेवट ( नाही सांगु शकत मी. )

यातले सर्वच अभिनेते, अगदी पाकिस्तानी सैनिकदेखील उत्तम अभिनय करुन गेले आहेत. प्रत्येक पात्रासाठी केलेली पात्रनिवड अगदी चपखल आहे.
मोजक्याच स्त्री व्यक्तीरेखांसाठी देखील, चपखल कलाकार निवडले आहेत.

बॉर्डर पासुन, पाकिस्तानचा थेट उल्लेख केला जातो. आणि याही कथानकात कुठेही दिखाऊपणा नाही.
यातले संवाद इतके नैसर्गिक आहेत, कि ते कुणी खास लिहिले आहेत, असे वाटतच नाही. पाकिस्तानी पात्रांच्या तोंडची उर्दु भाषा थोडी टोन डाऊन केलीय.
चित्रीकरण सुंदर. कालसंदर्भ अचुक. हिमालयन पर्वतराजींचे चित्रण असुनही, मुद्दाम फ़्रेम देखणी करण्याच्या प्रयत्न नाही.
यात संगीताला तसा फारसा वाव नाही. संदेसे चले आते है, असा भावनेला हात घालणारा प्रकार नाही. पण आहेत ती दोन नृत्ये अत्यंत उस्फ़ुर्तपणे सादर झालीत. आनंदाने बेहोश होवुन नाचणे, शब्दशः साकार झालेय.
शेवटी, सत्यपरिस्थितीच्या बातम्या दाखवुन सिनेमाचा परिणाम खुप गडद केलाय.
अवश्य बघावा असा सिनेमा.



Ajjuka
Sunday, May 13, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अजिबात नाही आवडला. चांगल्या कथेचं मातेरं कसं करावं याचं खास उदाहरण वाटलं मला. मी लिहिलंय या फिल्मबद्दल आधी.

Ajjuka
Sunday, May 13, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२२ मार्च पर्यंतच्या अर्काइव्ह मधे. १६ मार्च ची पोस्ट.

Deepanjali
Sunday, May 13, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The incredibles: आशा भोसले , सोनु निगम , कुणाल गांजावाला कैलाश खेर यांचा Big show:
अतिशय अपेक्षाभंग झाला .
सगळे जण एवढे आवडते म्हंटल्यावर miss करायचा chance च नव्हता पण thr' out या program मधे technical faults, कायम speakerds चा कर्कश्श आवाज चालु होता .
Program चा format अतिशय boring!
एक एक singer येउन आपली सहा सात गाणी म्हणून जायचा कि मग दुसरा singer येणार .
कुणाल गांजावाला चांगला गायला पण सर्वात जास्त वेळ बहुदा तोच स्टेज वर होता .
सर्वात सुरेख गाणी झाली ती कैलाश खेर ची ... सुरवातीचे ' मंगल पांडे ' मधले गाणं आणि नंतर ची नुसरत अली ची गाणी जबरदस्त !
पण प्रेक्षकांना फ़क्त नाचायची गाणी हवी असल्याने लोक नेमके त्याच्याच गाण्यांना उठून जायला लागले त्यामुळे त्याला आवरते घ्यायला लावले .
त्याची अतिशय प्रसिध्द अशी ' अल्लह के बंदे , ओ सिकंदर , सुभानल्लाह , पिया के रंग रंग दिनी ओढणी ही गाणी झालीच नाहीत !!
त्याला चक्क आवरतं घ्यायला लावलं show host नी . :-(
सोनु निगम चे song selection पण नाही आवडलं !
' बिजुरीया ' सोडून कुठलच गाणं खास नाली झालं .. अर्थात लोकांना नाचवायचं काम केल्याने लोक बरेचसे खूश दिसले त्याच्यावर !
पण A.R. रेहमान च्या वेळचा सोनु आणि हा सोनु यात खूप फ़रक दिसला , शिवाय त्याचं ते flirting with "MEN" musicians पण अतिच चाललं होतं? !
' मेरी रंग दे बसन्ती चोला ' चांगलं झालं पण नेहेमी सोनु गातो तसे नाही:-(
आशा चा performance झकास होता पण ' आशा भोसले ' कडून ज्या आपेक्षा होत्या त्या काही पूर्ण झाल्या नाहीत . :-(
मराठी गाणं जाउच दे पण तिची अनेक super duper hit गाणी झाली नाहीत:-(
सर्वात चांगलं झालं ते ' चैन से हमको कभी ' without music.
आशा भोसले हे main attraction होती पण तिने स्टेज वर फ़ार वेळ दिला नाही !
अर्थात आशा भोसले ला live ऐकणे हाच एक experience असला तरीही खरोखर , overall program ने साफ़ निराशा झाली !!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators