|
Pravinme
| |
| Sunday, April 15, 2007 - 2:39 pm: |
| 
|
अरे जरा छानसा किस्सा टाका की
|
Durandar
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:50 am: |
| 
|
जास्त लागले का चाफ़्फ़ा वाटाणे, कि हात? नविन किस्सा लिहिला नाहिस? कि आता ईब्लिसपणा सोडलास?
|
आम्हा दहाजणांचा कंपू जमला होता... नेहमीप्रमाणे हास्यविनोदाला ऊत आला होता. आज त्याला लाजपत नगर मार्केटच्या गजबजाटाचा कॅनव्हास लाभला होता- कुणी कपड्यांचे स्टाॅल्स पाहतेय, तिघंचौघं लस्सीचे 'खंबे' रिचवतायत्- एकमेकांची टांग खेचतायत... एकजण त्यातल्या त्यात गप्प होती. तिचं पोट बिघडलं होतं, आणि त्यामुळे बाहेरचं खाणं नाही, पण इतर मौजमजा चालली होती. तिला मेंदीचे कोन घेऊन बसलेला एक माणूस दिसला. लगेच बाई मेंदी काढून घ्यायला सरसावल्या... ... मी पटकन् बोलून गेलो, "बरी होईपर्यंत मेंदी नको काढूस!" सगळे हसून लोटपोट आणि हिला कळेचना काय चाललंय. असंच होता होता एका 'शीघ्रकवी' वर गाडी थांबली... माझ्या तोंडून परत निघून गेलं, "तुला कविता होतेय का? कागद घे खाली!" माझ्या तोंडून असंच काही निघत राहिलं, तर एका दिवशी तोंडच राहणार नाही!! : O
|
Suvikask
| |
| Monday, April 23, 2007 - 7:56 am: |
| 
|
द(आ)मले बाई मी हसुन हसुन... काय हे बोलणे??? ऐकणार्याला लाज वाटते... दिवे घ्या!!!
|
Tanya
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:27 am: |
| 
|
हा किस्सा, मी केलेला इब्लिसपणा नसुन नवर्याने केलेला आहे. पाच-सहा वर्षांपुर्वी, इथे प्रथमच amway चा सिंगापुरप्रवेश झाला होता तेव्हाचा. नवर्याचा एक office मित्र, जो amway ग्रस्त होता, तो जाम पिडत होता, एकदातरी आमच्या meeting ला ये, मी तुझ्या घरी येतो blah blah ... त्याच सुमारास, मुलांच्या play ground वर नव्यानेच मैत्रिण झालेल्या एकीने (तीही अर्थात amwya ग्रस्तच होती.) as usual मला फोन करुन,प्रत्यक्ष भेटीत, पिडायला सुरुवात केली. मी दाद देत नाही असे बघुन एकदा तिच्या नवर्याने आमच्याकडे फोन केला, आणि टेप सुरु केली. माझ्या नवर्याने शांतपणे त्याचा फोन नंबर लिहुन घेतला. दुसर्यादिवशी जेव्हा नवर्याला office मित्राने पिडायला सुरुवात केली, तेव्हा ह्याने शांतपणे आदल्या रात्री टिपुन घेतलेला फोन नंबर दिला आणि त्याला सांगितले की हा माणूस अतिशय हुशार आहे, पण गरजु आहे. चांगल्या business च्या opportunity च्या शोधात आहे. त्यानंतर, काय झाल असेल त्याची कल्पना आलीच असेल.
|
Chaffa
| |
| Sunday, April 29, 2007 - 2:18 pm: |
| 
|
अरे काय हे?? किती बरं अशक्त झाला हा BB च्यायला, नंदिनी,झकास,आणी बाकी सगळेच महारथी आहात कुठे?
|
Chaffa
| |
| Sunday, April 29, 2007 - 2:26 pm: |
| 
|
हुश्यऽऽ संपली एकदाची सगळी गडबड गेले काही दिवस ईब्लीसपणाची साखळीप्रक्रिया चालु होती मी वाट बघत होतो म्हंटलं "मेरा नंबर कब आयेगा" पण नाहीच आला नंबर. या उचापतींना सुरुवात झाली ती चार दिवसांपुर्वी एका सहकार्याच्या लग्नात. आम्ही सगळेच गेलो होतो, आणी अक्षता मारण्याचा ( टाकण्याचा नव्हे, आमच्या कंपनीतल्या कुणाचं लग्न असेल तर अक्षता आम्ही टाकत नाही तर त्या पाण्यात भिजवुन अक्षरशः मारतो, फ़्फ़ारऽऽ जोरात लागतात बरं! )कार्यक्रम रंगात आला होता आणी आमचा विजयन!त्याला हा प्रकार नविन आहेच पण ती एक परंपरा आहे असे सांगुन त्यालाही सामिल केला होताच. लग्न आटोपले आणी त्याच हॉलमधे बहूतेक दुसरे लग्न असावे म्हणुन साफ़सफ़ाई चालु झाली होती. जमिनीवरच्या अक्षता झाडूने साफ़ करताना बघुन विजयन मला विचारतो " अब ईसका क्या करेंगे?" मी सहज उत्तर देउन टाकले " अभी ईसिका तो राईस बनायेंगे, देखो अभी खानेमे वही होगा" आणी खरचं जेवणात रंगीबेरंगी नक्षीकाम केलेला राईसच टेबलावर पाहील्यावर स्वारी राईसला हात लावे ना! हा पक्का भातखाउ म्हणुन त्याला यजमान सहकारी आग्रह करुन राईस घ्यायला सांगत होता पण हा ढीम्म! शेवटी त्याला एकदाचे सत्य सांगीतले बाबा या भाताचा आणी त्या तांदळाचा काही संबंध नाहीये अशी काही पध्दत वगैरे नसते, पण संशय एकदा मनात शिरला म्हणजे जातो होय? अखेर नाही म्हणजे नाहीच खाल्ला त्याने राईस. बरं हा पराक्रम ईथेच संपत नाही तर TG वाले आता प्रोजेक्टवर जाणार म्हणुन आम्ही सगळ्यांना छोट्याशा भेटी आणल्या होत्या आणी पुन्हा सगळे कधी एकत्र जमणार? म्हणुन त्याही त्याच वेळी वाटून टाकायचे ठरवले नाहीतरी एका सगळ्या रुमवर आमचाच कब्जा होता. मग भेटवस्तुंचे वाटप. त्यात पुन्हा ह्या काळ्याकुट्ट विजयनला त्याचा खोका उघडायला सांगीतला तर त्यात पावडरची डबी ( पफ़ सहीत) आणी रेडीयमची पट्टी. एकंदरीत सगळ्यांनाच अंदाज आला, आता आपल्या खोक्यातुन काय निघते? म्हणुन सगळे चाचपडत खोकडी उघडतायत. त्यात आणखी एका टकल्या सहकार्याला गंगावन मिळाले भेट म्हणुन मग पुढे कुणीच आग्रह केला तरी खोकी उघडली नाहीत. आज दुपारी बाकी सहकार्यांकडुन TG वाल्यांना भेटवस्तु दिल्या गेल्या आगदी समारंभपुर्वक! आयला मला जरा धास्तीच होती म्हंटलं काय देतात नी काय नाही! पण उघडून पाहीले तर त्यात सुंदर पेन आहेत. मात्र उद्या कदाचीत वातावरण तापलेले असेल कारण दुपारी टी टाईमच्या आधी पेंट्रीत ठेवलेल्ता बॉक्सवरची लेबल मी हळूच बदलली होती माझ्या बॉक्षचे लेबल मी GM च्या बॉक्सला लावले होते आणी त्यांच्या बॉक्सचे अर्थात.............. कारण मला माहीताय त्या बॉक्समधे पॉयझन असे लिहीलेली रिकामी बाटली आहे.............
|
Ultima
| |
| Sunday, April 29, 2007 - 5:17 pm: |
| 
|
बापरे... चाफ़्या!!!  ती बाटली नक्की रिकामी होती ना... नाहीतर उद्या जी एम ती नक्की रिकामी करायला लावायचा.
|
Zakasrao
| |
| Monday, April 30, 2007 - 4:35 am: |
| 
|
चाफ़्या  इब्लिसपणाचा कारखाना सुरु झाला रे. हे अक्षता मारण प्रकरण जोरात असत. माझ्या लग्नात मी जो फ़ेटा बांधला होता त्याचा शेला ज्या बाजुने हल्ला होत होता तिकडे ओढुन घेतला होता.
|
Durandar
| |
| Wednesday, May 02, 2007 - 11:44 am: |
| 
|
खिऽऽखिऽऽ चाफ़्फ़्या काहि खरं नाही नक्कि आहेस ना? ३० तारखेनंतर आला नाहिस म्हणुन हो. आणी तुझे बाकी साथिदार कुठे आहेत?
|
Chyayla
| |
| Thursday, May 03, 2007 - 8:53 pm: |
| 
|
आजोबा आन्घोळीला बाथरुममधे जात होते, आईने माझ्याजवळ त्यान्चे कपडे दीले आणी म्हणाली आजोबाना दे. मी: आजोबा हे घ्या कपडे आणी बाहेर येताना नक्की घालुन या ह.
|
Rajankul
| |
| Friday, May 04, 2007 - 3:33 am: |
| 
|
आजोबा हे घ्या कपडे आणी बाहेर येताना नक्की घालुन या ह.>>..आजोबांसोबत इतका पांचटपणा? चाफ़ा तुझे किस्से भन्नाट आहेत
|
Chyayla
| |
| Friday, May 04, 2007 - 8:24 am: |
| 
|
चाफ़्या अन योग्या खी.. खी.. तन्या ते Amway च सान्गुच नको एखादी व्यक्ती आपल्याकडे बघुन हसायला लागली, प्रेमानी विचारपुस करायला लागली की भीतीच वाटते त्याना फ़क्त काय करता हे विचारायचाच अवकाश की झाला Business सुरु. माझ्या मामाला पण एकदा हा Amway चा रोग लागला होता पण ईब्लीस मामाने काय केले घरात आकडेमोड केलेला एक तक्ता लावुन ठेवला होता. घरी कोणी आले की तो हमखास विचारायचा हे काय? झाल पिन्जर्यात उन्दीर पकडल्या जावा तश्याच आनन्दात आयता सापडलेला बकरा बघुन मग मामापण Amway चा फ़ायदा कसा वाढत जातो हे पटवुन द्यायचा... बरेच दीवसान्नी ते Amway चे भुत त्याच्या डोक्यातुन उतरले व मित्र, नातेवाईक यान्ची सुटका झाली. माझ्या कडुन माझ्या बहिणीनी केलेला हा ईब्लीसपणाचा किस्सा. माझ्या बहिणीचे लग्न आमच्याच घरोबातल्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशी जमले. आमचे होणारे जावईबापु पण ईब्लीस त्यान्नी देउन देउन फ़ोटो कोणता द्यावा तर केस पान्ढरे केलेले, म्हातारबोआन्सारखा चष्मा व डोळ्यासमोर एक वर्तमान पत्र वाचतानाचा मुद्दाम फ़ोटो काढुन पाठविला. त्यामुळे आमच्याकडे आधीच ह. ह. पु. वा. एक दीवस हिवाळ्यात समोरच्या अन्गणात मस्त पैकी उन्हात आई, बहिण, मी आणी सोबत त्या काकु अर्थात जावईबापुन्ची आई पण गप्पा मारत बसलो होतो. तितक्यात बहिणीची मैत्रीण आली तीला काही कल्पनाच नाही की समोरच बहिणीची होणारी सासु बसली आहे. माझ्या बहिणीनी तीला तोच म्हातारा वेष केलेला फ़ोटो दाखवला व म्हटले हाच माझा होणारा नवरा. तो फ़ोटो बघुन तीला काय बोलाव सुचेच ना अगदीच कसनुस तोन्ड करुन बसली, बहीण म्हणाली थोडेसे वयस्कर वाटतात ना? ... अग हो मी तेच म्हणणार होती पण चान्गला आहे नवरा मुलगा असे ती जबरदस्तीने म्हणाली. पण अग बाई तु कशी काय तयार झाली लग्नाला?... तर बहीण म्हणाली याना विचारा ह्या माझ्या होणार्या सासु... झाल आता तर तीची अजुनच ताराम्बळ उडालेली. आता मात्र कुणालाच तो प्रचन्ड हस्याचा धबधबा रोखता येत नव्हता व फ़स्सकन सगळेच हसायला लागले. शेवटी बहिणीनी चान्गला फ़ोटो दाखवुन तीच्यासोबत केलेला हा ईब्लीसपणा होता हे सान्गितले.
|
च्यायला, तू तर खानदानी इब्लिस आहेस. याच दाखवण्याच्या फोटोवरून.... घरातून अति त्रास दिल्यानंतर मी फोटोग्राफर मित्राकडे जाऊन "दाखवायचे" साडी वगैरे नेसलेले फोटो काढले. काहीही विचित्रपणा केला नाही. फ़क्त चेहर्यावर टीपिकल बावळटपणाचे expression दिले आहेत. डोळे किंचित चकणे केले आहेत. बास्स... कुणी फोटो पाहून तरी पसंद करणार नाही याची खात्री...
|
Chyayla
| |
| Friday, May 04, 2007 - 1:51 pm: |
| 
|
नन्दिनी, साम्भाळुन एखादा चकणा, टिपीकल बावळट ध्यानच तुला पसन्त करायच आणी मग पुर्ण खानदानचा फ़ोटो असाच निघायचा.
|
Zakki
| |
| Friday, May 04, 2007 - 2:15 pm: |
| 
|
इब्लिसचा अर्थ काय? E-bliss ! जसे E-business !
|
उगीच फाको करू नका. इब्लिस हे विशेषण आहे झक्की या विशेष्याचे...
|
Zakasrao
| |
| Friday, May 11, 2007 - 9:16 am: |
| 
|
अरे रे तो चाफ़ा "चिन्ग चॅंन्ग चो" करायला तिकडे गेल्यापासुन ह्या BB ची दुरावस्था झाली आहे. असो मी केलेला इब्लिसपणा ऐका. फ़ोन हे इब्लिसपणा करण्याच एक मस्त साधन आहे. आणि इतका झकास इब्लिस पणा करुन आपण प्रत्यक्ष त्या माणसाचे expression कानाने ऐकण्यात मजा येते. नं १. आपला मायबोलीकर मित्र गिरी ह्याने मला त्याचा फ़ोन नं दिला होता. मी ज्यावेळी त्याला फ़ोन केला ते इब्लिसपणा करायचा हे ठरवुनच. एका संध्याकाळी त्याला फ़ोन केला आणि मग सुरु...... मी: हेलो, सर मी HDFC बॅन्केतुन बोलतोय. आणि तुम्ही जे लोन मागितले होते त्याविषयी बोलायच आहे. गिरी: तुम्हाला नक्कि कोण हवय? मी असा काहि कधीही फ़ॉर्म भरला नाहिये. मी: तुम्ही गिरिश सोनार ना. तुमच्या सहीचा फ़ॉर्म माझ्यासमोर आहे आणि म्हणुनच मी फ़ोन केलाय. गिरी: हे बघा मी कधीतरी एखाद्या प्रदर्शनात चौकशी केली असेल पण असा फ़ॉर्म नाही भरलेला. हे वरच वाक्याच टोनिंग बरच वेगळं त्यामुळे मी वाक्य तोडत मी: अरे गिर्या तुला आज कोण फ़ोन करणार होत? विसरलास का? मग त्याच्या लक्षात आल आणि मग रेग्युलर संभाषण सुरु झाल. पण हा गिरी वस्ताद आहे बरं, हा त्याचा नं सगळ्याना देतो आणि फ़ोन येण्याची वाट बघत बसतो. एकदा फ़ोन आला की मग अघळपघळ गप्पा मारत बसतो. त्याच कारण फ़ोन ठेवताना सांगतो की त्याला BSNL सोडुन इतर नेटवर्क मधुन फ़ोन आला की काहितरी पर्क्स मिळुन त्याचा Balance वाढतो. हा इब्लिसपणा करुन खुप दिवस झाले आहेत त्यामुळे शब्द न शब्द आठवत नव्हता पण हे अशा प्रकारच बोलण झाल होत. अरे हो त्यानंतर मला गिरी अधे मधे ते लोन कधी देतोय अस विचारतोय त्यामुळे मी आता अशा लोन देणार्याच्या शोधात आहे. मी व गिरी मिळुनच करु तो फ़ोन. नं २ कालच नन्दिनीला फ़ोन केला होता रात्री ११ वाजता. मी: तुम्ही केक पाठवणार होता त्याच काय झाल? ति: तुम्हाला कोण हवय? कोणता नं. हवाय? (हे चिडक्या स्वरात.) मी: तुम्ही नन्दिनी ना? ति: हो. पण मी: (तिच वाक्य तोडत) रेहान बेकरी ना? आता तिची ट्युब पेतली होती त्यामुळे. ति: तुम्ही कोण? मी:झकासराव. ति: मी रेहान बेकरी म्हणल्यावर ओळखल पण तु जर हे केक केक करत बसला असता ना मग मी तुला अस्सल शब्द बोलणार होते. मी: ते माहीत होत म्हणुन तर रेहान बेकरी बोललो ना! हा इब्लिसपणा करण्यासाठी तुमचा नं समोरच्या माणासाकडे नाहिये ह्याची खात्री करा नाहितर वेंधळेपणा होइल तो.
|
Chyayla
| |
| Friday, May 11, 2007 - 1:35 pm: |
| 
|
मी: (तिच वाक्य तोडत) रेहान बेकरी ना? अरे वा झकास झकासच आहे तुझे किस्से. खुप दीवसान्नी छान किस्सा टाकलास.. माझा नम्बर देउ का? तु बरे झाले रेहान बेकरी म्हटले नाही तर आयला मायला पासुन सुरुवात झाली असती. दुसरीकडे गिर्याला लोन वैगेरे देउ नकोस त्यातही तो काही पर्क्स जमवत असेल.
|
झकासराव, च्यायला, असं करू नये... भर आॅफिसात हसावं कसं आणि कुठे ते कळेनासं होतं वाचकांना!! Lol!! माझा आजचा इब्लिसपणा... आज एका मैत्रिणीचा SMS आला.. "ओम् नमो भगवते वासुदेवाय्- ओम् गं गणपतये नम:, जयजय रामकृष्ण हरी--- पहा माझा चमत्कार!! मीही रेड्याच्या तोंडून वेद वदवले!!" माझा हास्याचा झटका ओसरल्यावर तिला रिप्लाय केला... "फोन खाली ठेव.. पाणी पिऊन ये... आलीस? आता पुढे वाच्--- पहा माझा चमत्कार!! मीही भिंताड चालवून दाखवलं!!" : D गेल्या आठवड्यातला इब्लिसपणा... आमच्याइथे एखादी बातमी एडिट करताना त्या मूव्ही फ़ाईल ला त्याच नावाने ओळखतात... उदा "समीर 'दिल्ली मेट्रो प्राॅब्लेम्स" वर काम करतोय इत्यादि... असंच एका दिवशी संसदेत गोंधळ झाला, आणि भोपाळ ला मंत्री पाहुणा असलेल्या एका लग्नात ओंगळवाणा नाच झाला. माझी मैत्रीण येऊन मला म्हणाली, "योगेश, you do 'संसद में हंगामा', 'शादी में अश्लील नाच' I'm doing ." मी एकदम भुवया उंचावून " Oh yeah?! कब?" विचारलं आणि सगळी एडिट रूम खीऽऽऽखीऽऽऽ करून हसू लागली... बापरे... तिचा कोपर आणि माझ्या बरगड्या!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|