Manjud
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:06 am: |
| 
|
रोज ऑफिस ला जाण्यासाठि नवरा बाइक ने स्टेशन वर सोडायला येतो. मी ऑफिस ला जाताना इस्त्रीवाल्याकडे कपडे देउ इस्त्रीला असा विचार करुन बरेचदा कपडे स्टेशनपर्यंत घेउन गेले आहे. 
|
Manjud
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:13 am: |
| 
|
अहो झक्की, अडुळसा जरा २-३ चमचे घेउन बघा. चव छन आहे. शान्त झोप लगेल निदान १२-१३ तास तरी. आणि शांत झोपेमुळे कदाचित आहेत ते २-४ केस मजबूत होतील.....घेउन बघाच तुम्हि....... 
|
Chyayla
| |
| Saturday, May 05, 2007 - 2:16 pm: |
| 
|
शिवाय शान्त झोप झाली की डोकही शान्त रहात, उगीच चीड्चीड पण दीसत नाही (मायबोलीवर)... तेव्हा प्रीय झक्की, लोक आग्रहास्तोवर व लोकान्च्या प्रेमाखातर तुम्ही अडुळसा घ्याच. (सोबत दीवा पण घ्याल) आपला अजुन एक हीतचिन्तक... मग घेताय ना?
|
Zakki
| |
| Saturday, May 05, 2007 - 2:58 pm: |
| 
|
लोकहो, धन्यवाद. 'अडुळसा!' न्यूजर्सीत कुणि आयुर्वेदिक वैद्य आहेत का? त्यांच्याकडे अडुळसा मिळेल का? मला वाटते गूगलवर याची माहिति मिळेल. बघतो.
|
Sunidhee
| |
| Saturday, May 05, 2007 - 3:15 pm: |
| 
|
मी बर्याचदा शेवटच्या मेसेज पासून वर वाचायला सुरुवात करते.. आताही झक्किंचा मेसेज पाहुन मला कळेना वेंधळेपणात (म्हणजे बीबीत)प्रश्न का विचारला गेलाय? मग त्या वरचे २ मेसेज वाचून सांगावे वाटले झक्किंना की, खरच घ्या, माझी मुलगी, आम्ही सर्व पण रोज ते आवडीने घेतो.. मग अज्जूका चे वाचले.. आणि वाटले, अरे वा 'हे' खोकल्यावर पण उपयोगी आहे की!! मग मगे जाऊन पुन्हा तिचा मुळ मेसेज वाचला आणि मला कळेना.. 'अडुळसा' तर इतके घट्ट असते आणि हिच्या हातात कसे काय आले तेलासारखे? इतके पातळ कसे मिळते भारतात? मी पण तर तिथुनच हल्लीच घेऊन आले.. ???? मग ट्युब पेटली.. 'च्यवनप्राश' ला अडूळसा समजून माझे सर्व विचार चालले होते.
|
Bsk
| |
| Saturday, May 05, 2007 - 5:14 pm: |
| 
|
बापरे सुनिधी! अशक्क्य वेंधळेपणा झाला की तुझा.. सही आहे!
|
Chaffa
| |
| Saturday, May 05, 2007 - 7:43 pm: |
| 
|
ईथल्या आमच्या ड्रायव्हरला सारख्या सिगारेटी ओढायची सवय आहे, आख्ख्या गाडीत त्यांचा वास भरुन रहातो. त्यावरुन आम्ही त्याला समज द्यायला लावली होती. आता तो आम्हाला येताना पाहीले की सिगारेट घाईघाईत टाकुन देतो. काल त्याच्या या धांदलीत एक छोटीशी गडबड झाली. त्याने सिगारेट पेटवायला काडी सिगारेटजवळ न्यायला आणी आम्ही बाहेर यायला, एकच गाठ पडली, त्याने घाईघाईत माचीस बाहेर फ़ेकली आणी पेटती सिगारेट ग्लोव्ह कंपार्ट्मेंटमधे!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
हा बी बी माझ्या वेंधळेपणाचा आहे, ड्रायव्हरच्या वेन्धळेपणाचा नाही हे कृपया लक्षात घ्यावे!
|
Ajjuka
| |
| Sunday, May 06, 2007 - 7:18 am: |
| 
|
http://www.herbsnspicesinfo.com/medicinal-herbs/malabar-nut.aspx http://www.niam.com/corp-web/justicia.htm हि घ्या झक्की अडुळसा किंवा अढातोढा वसिका ची माहिती.
|
Zakki
| |
| Sunday, May 06, 2007 - 1:34 pm: |
| 
|
धन्यवाद, अज्जुक्का. मला खोकल्यापेक्षा टाळके ठिकाणावर आणण्याचे औषध हवे आहे. त्यासाठी मी नामस्मरण करतो. थोडा थोडा फायदा होतो. तेव्हढा पुरे मला वाटते. अक्कल वाढली तर इथे येणे बंद होईल, नि मग मनोरंजन कसे होणार? (म्हणजे इतरांचे हो.)
|
झक्की, नामस्मरण कोणाचे करता? आईचा, बापाचा की अजून कोणाचा जप करता? जगात एकच नामस्मरण खर आहे, बाकी सगळ मिथ्थ्या ! आणि त्या व्यक्तीचा एक स्टिकर कायमचा टकलावर चिकटवा. बघा डोक कायम ताळ्यावर राहील.
|
मला खोकल्यापेक्षा टाळके ठिकाणावर आणण्याचे औषध हवे आहे>>>>> लोकमान्यानी सांगितल्याप्रमाणे दिड पैशाची भांग घेऊन बघा बोवाजी. नाहीतर एक पावशेर नवटाक घेऊन बघा...
|
Zakki
| |
| Sunday, May 06, 2007 - 11:07 pm: |
| 
|
मी नुकताच केलेला वेंधळेपणा! वेंधळेपणा लिहिण्याच्या BB वर वेगळेच काहीतरी लिहीले, नि इतरांनी पण!
|
Giriraj
| |
| Monday, May 07, 2007 - 4:32 am: |
| 
|
परवा कपड्यांच्या दुकानात short कुर्ता घेतांना ट्रायल घेत होतो.. तिथल्या विक्रेत्यांना कसा दिसतोय वगैरे विचारल्यवर त्यंनी नेहेमीप्रमाणे 'छान' असा पुणेरी शेरा दिला! मग बायकोला विचारले आणि हा घेऊ की तो घेऊ यावर चर्चासत्र चलू झले. शेवटी 'हा' च घ्यायचे ठरले. पण या गडबडीत मी कुठे आहे ते विसरून गेलो आणि पुन्हा ट्रायल रूममध्ये न जाताच तिथेच काऊंटरवर कुर्ता काढून ठेवायला लागलोऽचानक माझ्याच लक्षात आले आणि मी अर्धवट डोक्यात अडाकलेला कुर्ता घेऊन ट्रायल रूमात पळालो!!
|
>>>>> अर्धवट डोक्यात अडाकलेला कुर्ता अर्धवट डोक्यात??????? असेल असेल! तसच असेल! (हे अस हव होत ना? डोक्यात अर्धवट अडकलेला?????..... वेन्धळेपणा सान्गतानाही वेन्धळाच की.... हटकेश्वर हटकेश्वर हटकेश्वर!)
|
Manjud
| |
| Monday, May 07, 2007 - 5:44 am: |
| 
|
सव्यसचि, ह्या BB वर हा नामस्मरणाचा सल्ला चुकुन दिलात का? आणि बहुतेक 'बापाचा' लिहिताना एक काना मात्रा वेलांटी उकार बिकार चुकलात द्यायला...........
|
>> त्यासाठी मी नामस्मरण करतो. हॅं त्याने काय होतंय? त्यापेक्ष वही का नाही लिहीत? त्याने टा. आणि अक्षर दोन्ही सुधारेल. गिरी तुझी बायको थोड्या दिवसांनी तुला म्हणणार आहे "... म्हणून मी तुला कुठं नेत नाही."
|
मंजु, अग नामस्मरण ते करतच आहेत, फ़क्त योग्य नाम कोणत यावर जरा सल्ला दिला. बाकी काहीतरी वेंधळेपणा केला आहे हे त्यांना कळतय म्हणजे कुठे उकार वेलांटी चुकली आहे हेही कळेलच अस गृहीत धरतो
|
Gobu
| |
| Monday, May 07, 2007 - 11:29 am: |
| 
|
रोबिनभाऊ, काय जालिम ऊपाय आहे हो तुमचा!!! माझी विनन्ती आहे की तुम्ही सान्गितलेला ऊपाय तुम्ही झक्कीकडे जरुर पाठवुन द्यावा!!! (त्याना फ़ार गरज आहे हो त्याची!!! )
|
Zakki
| |
| Monday, May 07, 2007 - 12:39 pm: |
| 
|
वेंधळेपणा, वेंधळेपणा! इथे वेंधळेपणाचे किस्से सांगा. इतर सल्ले नकोत.! पहा पुन: मी तोच वेंधळेपणा केला! हे स्पष्ट व्हावे म्हणूनच मी वर तसे लिहीले.
|