|
Yogibear
| |
| Thursday, May 03, 2007 - 3:48 am: |
| 
|
Sayuri: u bet, '1971' good movie, not a typical war movie and no where close to recent movie 'Deewar'. Based on real story and shocking ending leaves you with ton of thoughts..... must watch if you like movies based on real life.
|
Mbhure
| |
| Thursday, May 03, 2007 - 5:20 pm: |
| 
|
हां तेच ते " हनिमुन ट्रॅव्हल... " . ....पण काय ती प्रियंका चोप्रा आणि तो सल्लु मिया ची कट कट.... फ़ार बोर केल आहे आहे हो त्यांनी ++++++++ फक्त त्यानीच का????? अख्खा चित्रपटच बोअरिंग आहे. IN Fact काही घडते आहे असे वाटतच नाही.
|
Sunidhee
| |
| Thursday, May 03, 2007 - 7:24 pm: |
| 
|
१९७१ मला पण आवडला होता. बरेच दिवस झाले पाहुन म्हणा. १-२ चेहरे सोडले तर बाकी कोणी ओळखीचा चेहरा नाही, पण सर्वानी प्रामाणिकपणे कामे केली आहेत. वेग आहे मुव्ही ला
|
भेजा-फ़्राय कसा आहे?? कोणी पाहिला का??
|
Bee
| |
| Friday, May 04, 2007 - 1:35 am: |
| 
|
तुमच्या पैकी कुणी इस्माईल मर्चन्टचे चित्रपट बघितले आहेत का? In custory, Sidhdarth, Shakespears wallah, Householder मधील पात्र बहुतेक भारतीय आहेत.
|
भेजा फ़्राय, स्वताचा भेजा जर फ़्राय करायचा असेल तर बघायला ठिक आहे...... ४-५ लोक आहेत आणि एक घर..... पण त्या भारत भुषण (पिक्चारातले नाव, त्याचे खरे नाव माहित नाहि) ने चांगल काम केल आहे
|
Bee, mi pahile 3 pahile ahet. Sidhdhartha tar Hesse chya pustakavar adharit ahe.
|
बी.. अरे पाहिलास का casablanca ? youtube वर बरेच फ़ेमस सीन आहेत. मी काल सीमा पाहिला. (परत एकदा) नूतन आणि बलराज. तू प्यार का सागर है आणि मनमोहना बडे झूठे.. काय परफ़ॉर्मन्स आहे...
|
Mbhure
| |
| Friday, May 04, 2007 - 4:31 pm: |
| 
|
काल रात्री Hallmark (USA) वर Last Brickmaker in America नावाचा चित्रपट पाहिला.सिनेमा अप्रतिम नसला तरी **3/4 दर्जाचा आहे. " आम्ही कौटुंबिक चित्रपट काढतो " असे ढोल बडवणर्या दिग्दर्शकांनी एकदा नक्की बघावा. उत्तम वीटा बनवणे आणि त्याच बरोबर एका उनाड मुलाला चांगले वळण लावण्याचे धेय्य ह्या दोन्ही गोष्टीचे छान Combination साधले आहे. Sidney Poiter मुख्य भुमिकेत असल्याने मी हा चित्रपट चुकवला नाही.
|
Yogibear
| |
| Friday, May 04, 2007 - 8:20 pm: |
| 
|
'तारा रम पम' : अजुन एक typical हिंदी चित्रपट. कथानक so-so च आहे, गाणि अगदीच टुकार आणि अभिनयला दाद द्यावि असले काही नाही. Speed racing दाखवण्याचा वायफ़ळ प्रयत्न. Theater ला जाउन पैसे आणी वेळ वाया घालवु नये...
|
Sayuri
| |
| Friday, May 04, 2007 - 9:07 pm: |
| 
|
Yogibear, १००% अनुमोदन. तारा रम पम अगदी फालतू चित्रपट आहे. आणि ते स्पीड रेसिंग अतिरेकी प्रमाणात दाखवलंय. त्यापेक्षा खरंखुरं स्पीड रेसिंग बघावं.
|
Sashal
| |
| Friday, May 04, 2007 - 11:24 pm: |
| 
|
LOL Farend .. पिक्चर बराच आवडलेला दिसतोय .. नुसताच पाहून समाधान झालं नाही तर चांगला लांबलचक review पण लिहिलास आणि बाकि कोणी बघितला असल्यास त्याबद्दल आणखी वाचायला मिळावं ही उत्सुकता पण ..
|
तारा रम पम मला पण खास नाही वाटला , एकदा पहायला ok आहे . सैफ़ आली खान साठी शेवट पर्यंत पाहिला सैफ़ चे गेले काही outstanding performances पाहून आमिर नंतर फ़क्त सैफ़ च एकटा असा आहे जो खरोखरच ' अभिनयात ' तितका powerful आहे आणि superstar personality असूनही movie मधला character ही वाटतो . यातही सैफ़ आवडला आणि ती दोन लहान मुले पण . रानी मात्र अता फ़ार monotonous वाटायला लागलीये . दिसते पण काहीतरीच . सुरवातीचा तिचा तो ' साधना कट विग ' आणि केवीलवाणा teen age look फ़ारच horrible दिसतो तिला . एके काळी रानी आवडती होती मात्र अता almost सगळ्याच movies मधे तिला पाहून ती आणि तिच्या त्याच त्या रडण्याच्या आणि हसण्याच्या styles फ़ारच boring वाटायला लागल्यात . गाण्यां मधले एक ऍनिमेटेड गाणे छान picturise केलय . आजा नचले गाणे चांगले वाटले , बाकी गाणी लक्षातही रहात नाहीत .
|
लहानपणी attend केलेल्या प्रत्येक लग्नात वाजणारं ' मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा... ' हे गाणं ऐकून ( ती नवरी उगीच मधूनच सापासारखा फूत्कार करेल असंच वाटायचं.) नगीना पाहायची कैक वर्षं इच्छा होती. तो योग अखेर शनिवारी आला. आणि इतकी वर्षं वाट पाहण्याचे सार्थक झाले. :-P आपल्या कुलदैवताची पूजा करायला पडक्या पुरखोंकी हवेलीत जावे लागते हे माहीत असूनही त्या हवेलीची डागडुजी हे लोक का करून घेत नाहीत बरं? मग तिथे साप न रहायला आले तरच नवल. बरं आता असल्या हवेलीत पूजा करायला जाताना, आपला मुलगा उचापतखोर आहे हे जाणून त्याच्यावर नजर ठेवावी ना... पण नाही. तो मुलगा अनवाणी पायाने ( इथे आपली आई, कार्ट्या, चप्पल घाल नाहीतर पायाला काच, काटा लागला तर आधी दोन फटके देईन म्हणाली असती.) हवेलीत फिरतो आणि सापावर पाय देतो. ( ह्यांच्या आया यांना समोर नीट पाहून चालायचं हेदेखील शिकवत नाहीत.) साप चावून मुलगा मरतो. आता त्या मॉंचा आक्रोश. लगेच अमरीश पुरी तिथे हजर. ( तो जितक्या लगेच तिथे येतो त्यावरून तो ' फिरता सापविष उतरवणारा ' आहे असंच वाटतं.) तर अमरीश पुरी पुंगी वाजवून वाजवून त्या सापाला नकोसे करून सोडतो आणि तो साप ' जीव देतो, पण पुंगी आवर ' असे म्हणत त्या मुलाला जिवंत करतो आणि सापाचे प्राण जातात. इकडे सापीण विधवा. ( सापाचे स्त्रीलिंग काय हो?) लंडनला साप नसतात असे कायसेसे हिरोच्या आईने फ़ेमिना मासिकात वाचल्याने ती त्याला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवून देते. आता हिरो तरूण होऊन त्याच गावात परत येतो. त्यापेक्षा आईला तिकडे न्यायचे ना! असो. सापीण त्याच वाड्यात वाट बघत असते. ( प्लीज नोट, अजूनही त्या वाड्याची डागडुजी केलेली नाही.) हिरोचे लग्न व्हिलनच्या मुलीशी ठरलेले. सापिणीला आपल्या नवर्याला जिवंत करायचे असते. त्याचे प्राण हिरोमध्ये. हिरो मेला की साप जिवंत होणार. ( प्राण इतके सहजी transferrable असतात?) सापीण इच्छाधारी असते. ती श्रीदेवीचे रूप घेऊन हिरोला प्रेमात पाडते. थोडाफार घरच्यांचा ( पक्षी: आई) विरोध मोडून हिरो सापिणीशी लग्न करतो. संसार सुखाने चालू होतो. ( हेच का सापिणी तुझं त्या सापावरचं प्रेम?) सापीण दोन रक्षक सापांच्या मदतीने छोट्या व्हिलनला धडा शिकवते. अब आई बडे व्हिलनकी बारी! हा व्हिलन म्हणजे तोच तो अमरीश पुरी. रहस्योद्घाटन होते की, अमरीश पुरीने ज्या सापाला मारले आहे त्याच सापाला अमरीश पुरीला हव्या असलेल्या नागमण्याचे डिटेल्स माहीत. ( सापाला मरता मरता एवढाही वेळ मिळत नाही की तो बिळात येऊन सापिणीला सांगू शकेल, ' अगं माझे फार थोडे फूत्कार शिल्लक राहिले आहेत. नीट लक्ष देऊन काय सांगतो ते ऐक. उजवीकडच्या बिळात ठेवलेला नागमणी अमरीश पुरीला दे. ' ) तर मग आता हिरोला मारून सापामध्ये त्याचे प्राण transfer करणे आले. इकडे अमरीश पुरी सापिणीच्या सासूला तिची सून सापीण असल्याचे सांगून तिच्या मनात अक्षरशः विष कालवतो. मात्र सापीण सासूला अभय देते की, तुझ्या मुलाला मी काही होऊ देणार नाही. ( हेच का सापिणी तुझं त्या सापावरचं प्रेम?) आता अमरीश पुरी आणि सापिणीची फ़ाईट. नांदी म्हणून ' मै तेरी दुश्मन ' गाणे होते. सापिणीने या गाण्यासाठी एक पांढरा ड्रेस कपाटात इस्त्री करून तयार ठेवलेला दिसतो. बरं हिला नवराही विचारत नाही की तू सदैव साड्या नेसतेस, मग हा असला ड्रेस कधी घेतलास? नाच झाल्यावर त्याच त्या पडक्या वाड्यात त्रिशूळांनी मारामारी. हिरोवर व्हिलन प्राणघातक हल्ले करतोय म्हटल्यावर त्याला वाचवायचा एकच उपाय असतो. सापिणीने सापाच्या इतके वर्षं सांभाळलेल्या मृतदेहाचे दहन करायचे. बरं त्या सापाचा मृतदेहही एकदम सुस्थितीत राहिलेला असतो. ( सापिणीला ममीफ़िकेशन करणे येत असावे.) तर ती त्याचे दहन करते. आणि व्हिलनची नागमणी मिळवण्याची आशा संपते. थोड्या वेळाने तोही संपतो. ( साप चावून!) साप उतरवणार्या मांत्रिकाचा साप चावून मृत्यू पाहून एकदम ' अच्छा तैराकही पानीमे डूब मरता है ' वगैरे आठवलं.) मध्ये हिरोला लागणार असलेला एक त्रिशूळ स्वतः झेलून हिरोची आईही गेलेली असते. श्रीदेवीचे घारे डोळे कायमचे काळे होतात ( येस... दरवेळी ती सापीण व्हायला लागली की तिचे डोळे रंग बदलून घारे होत असतात.) आणि They lived happily everafter अशी पाटी येते. सिनेमा ' क्लासिक ' आहे यात वादच नाही. :-P अजून पाह्यला नसेल तर नक्की पहावा. वि.सू.: हा पाहिलेल्यांनी ' तो नागमणी ' नक्की कुठे असतो, हे जाणून घेण्यासाठी निगाहे उर्फ नगीना पार्ट २ पहावा. दोन्ही पाहिलेल्यांनी सर्पमित्र व्हायला हरकत नाही. :-P
|
Psg
| |
| Monday, May 07, 2007 - 8:31 am: |
| 
|
श्र झकास! सापीण, सर्पमित्र!!!
|
Disha013
| |
| Monday, May 07, 2007 - 1:49 pm: |
| 
|
farend ,श्र, lol !! 'जीव देतो,पण पुंगि आवर!'... हीहीही!!! नशीब, विष उतरवायला पुंगी लागते. ढोल वाजवावे लागले असते तर!
|
वि.सू.: हा पाहिलेल्यांनी ' तो नागमणी ' नक्की कुठे असतो, हे जाणून घेण्यासाठी निगाहे उर्फ नगीना पार्ट २ पहावा. दोन्ही पाहिलेल्यांनी सर्पमित्र व्हायला हरकत नाही. :-P <<<< Shra, माझा पण जाम आवडता आहे नगिना ! आणि मी तो खूप वेळा पाहिलाय , आणि अर्थातच ' निगाहे ' पण .. इतकेच नाही तर रेखाचा ' शेषनाग ' आणि मीनाक्षी शेषाद्री आणि नितिश भारद्वाज चा ' नाचे नागीन गली गली ' पण चिकाटीने पाहिले . आणि तो अविनाश वाधवन आणि शाहिन चा ' आयी मिलन कि रात ' तर कसला funny होता , आठवतेय का त्याची concept दिवसा heroine नागीन आणि रात्री hero नाग !!!! आणि जेंव्हा शापमुक्त होउन दोघे एका रात्री माणून बनतात तेंव्हा वेळ सत्कारणी लावण्या ऐवजी ' कितने दिनोंके बाद है आयी सजना रात मिलन कि ' गाणे गाण्यात वेळ दवडतात बाकी काही असो , पण नागीणीचे ग्लॅमर फ़क्त श्रीदेवी च दाखवू जाणे , रेखालाही तिची सर नाही ! श्रीदेवी आणि नागीण यांचा काही तरी संबंध असावा अशी शंका नेहेमी येते ' चालबाझ ' मधल्या गाण्यात एक ओळ आहे ' ये लडकी भीगी भागी सी क्या घर से भागके आयी है ' त्या वर श्रीदेवी गाते , ' ये लडकी नही है नागीन है , जो नीन्द से जाग के आयी है ' त्या वेळी अचानक श्रीदेवी चे डोळे घारे होतात ! शिवाय जांबाज मधे तिला व्हिलन चे टोळके जेंव्हा जबरदस्तीने नशा करायला लावते तेंव्हा तिचे डोळे घारे होतात ! वरील सगळी movies मी श्रीदेवी साठी पारायणे करून पाहिले आहेत तेंव्हा श्र , अता अता मला तू सर्प मैत्रीण / भक्त म्हणशील कि सर्प fan ?? 
|
Dineshvs
| |
| Monday, May 07, 2007 - 4:30 pm: |
| 
|
हे साप सापीण प्रकरण पुर्वी फार असायचे. एका सिनेमात नागोबे ( नागोबाचे अनेकवचन काय ?) अनेक वाद्ये वाजवताना दाखवलेय. रफ़ीचे दोनोने किया था, प्यार मगर मुझे याद रहा, तुम भुल गये मैने तेरे लिये रे जग छोडा तुम मुझको छोड चले, मेरी महुआ हे गाणे पण नाग चावुन मेलेल्या, अंजना मुमताजला जिवंत करण्यासाठी गायलेले आहे. जल बिन मछली मधे, कजरा लगाके, बिजुरी सजाके मै तो आयी रे आयी रे यावर संध्याने, एक संध्यानाच केलाय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|