|
Farend
| |
| Monday, April 16, 2007 - 10:31 pm: |
| 
|
मला असे वाटले दिग्दर्शकाला असे दाखवायचे असावे... एखाद्या कसलेही कनेक्षन (वकील, पोलिस, राजकारणी) नसलेल्या आणि एरव्ही आपल्या कामात असलेल्या सामान्य माणसाने जर असे केले तर त्याची साधारण अशीच अवस्था होईल. एक दोन गोष्टी अतर्क्य असतीलही, पण सिस्टीम मधला प्रत्येक घटक स्वत:चे हितसंबंध जपत असताना प्रत्येकाशी जर एकदम वैर पत्करले, तर असाच कोठेतरी हा प्रतिकार संपणार. मलाही दु:खांत आवडत नाहीत. यात त्यांनी तो या अनुभवातून शहाणा होऊन पुढच्या वेळेला आणखी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो असे दाखवायला हवे होते.
|
Svsameer
| |
| Monday, April 16, 2007 - 11:19 pm: |
| 
|
सुनिधी तसाच अजुन एक प्रकार हा बघ देवदास आणि शकिरा
|
साशल.. मला तरी असं वाटल की जे त्यात दाखवलय तसच होईल प्रत्यक्षात! माधव आपटे यशस्वी, प्रसिद्ध झाला असता, शेवटी लोकांची (नाटकी) दुतर्फ़ा टाळ्यांची सलामी इ इ असतं तर च ते फ़िल्मी वाटलं असतं उलट असो. पसन्द अपनी अपनी!
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:12 am: |
| 
|
साशल तू हा विचार का नाही करत की खरच जर आजच्या समाजात असा एखादा माधव आपटे झाला तर त्याची अवस्था काय होइल? रंग दे बसंती, युवा आणि डोम्बीवली फ़ाष्ट ह्या तिनी चित्रपटांची थीम खूप वेगळी होती. माधव आपटे इथे एकटा असतो. नळावरील पाण्यासाठीचे भांडण दाखविले आहे त्यावरूनच कळते की समाजाला पुढाकार घेणे जमत नाही. माधव आपटे हे सर्व गप्प निमूटपणे बघत असतो. तो एक अति सभ्य प्रामाणिक मनुष्य असतो. दाअदागिरी उर्मटपणा करायला त्याला जमत नाही. त्याचा तोल जातो आणि तो हिंसात्मक बनतो. त्याला जे चालले आहे ते असह्य होते. तो जे करतो तो खचून गेलेल्या स्थितीत करतो. जे अगदी स्वाभाविक आहे. आपण नाही का घरात असह्य झाले की आदळ आपट करतो. सो.. मला तरी माधव आपटेची ही कथा खूप आवडली.. मनाला भिडली.. मुंबईसारख्या महानगरात हे सर्व घडू शकते..
|
Psg
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:52 am: |
| 
|
सुनिधी, svs .. जबरी आहेत व्हीडीयोज! हे असं remix करायला डोकं लागतं! कोणतं गाणं घ्यायचं, त्याचं lip sync दुसरीकडे बसवायचं.. देवदासच्या व्हीडीयोत माधुरीचं lip sync सही झालय!
|
Sunidhee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:44 pm: |
| 
|
svs मस्त.... काय हुशार लोक असतात... आहे तेच जोडुन नवीन माल तयार करतात..
|
Supermom
| |
| Thursday, April 19, 2007 - 12:18 pm: |
| 
|
काल खूप वर्षांनी परत 'बावर्ची' बघितला. तशी मी राजेश खन्नाची फ़ॅन नाही. पण हा चित्रपट अन त्यातला त्याचा अभिनय एकदम लाजवाब.
|
Runi
| |
| Thursday, April 19, 2007 - 4:36 pm: |
| 
|
मी अजुन डोंबिवलि फास्ट बघितला नाहिये पण इथल्या प्रतिक्रिया वाचुन असे वाटले की हा सिनेमा मायकल डगलसच्या Falling Down सारखा असावा. कोणी हे दोन्ही बघितलेत का, यात काही साधर्म्य आहे का?
|
Mepunekar
| |
| Thursday, April 19, 2007 - 9:09 pm: |
| 
|
'मातीच्या चुली', एकदा बघण्या सारखा आहे. वंदना गुप्तें ची acting सहिच..
|
Provoked: चांगला वाटला . तसा हा विषय हिंदी चित्रपटां मधून आधी बरेचदा हाताळलेला असला तरी ' किरनजीत आहलुवालिया ' च्या आत्मचरीत्रा वरून inspire झालेला असल्यामुळे कदाचित जास्त appealing-realistic वाटला . किरनजीत चा role अतिशय प्राभावी पणे मांडल्याचे credit ऐश्वर्याला नक्कीच दिले पाहिजे . मीता नायर नी नाच गाणी किंवा ऐश्वर्याची overshadow होणारी beauty या गोष्टींना zero importance देउन ऍश पण खरोखरच कथेचे 'character' वाटू शकते हे दाखवून दिलय . ऍश च्या अत्ता पर्यंतच्या career मधला फ़क्त ' अभिनयसाठी ' लक्षात राहिल असा जबरदस्त performance देण्यात ऍश ही नक्कीच 100% यशस्वी झालीय . शिवाय नवीन ऍंड्र्यु , नंदिता दास आणि जेल मधल्या ऍश च्या room mate चा अभिनय पण चांगला आहे . जरी थोडा documentary style वाटला तरी खरोखरच या वरून अनेक abused cases नी प्रेरणा घ्यावी असा 'Provoked' नक्कीच effective वाटला .
|
Deeps movie कुठे बघितलास? नाझ?
|
RB, अग ' सूरसंगीत ' मधून DVD आणून पाहिला . 
|
Sandu
| |
| Friday, April 20, 2007 - 6:37 pm: |
| 
|
आरे बाप रे दिपांजली एशचा कौतुक करतेय. व्वा काय बदल आहे. असे काय घडले बरे?
|
Zakki
| |
| Friday, April 20, 2007 - 8:54 pm: |
| 
|
त्या बाईचा झाडाशी घटस्फोट झाला तेंव्हा दीपांजलीलाच मेंदीचे काँट्रॅक्ट मिळाले होते ना? मग? आता या ओळखीने इतर लोक जेंव्हा घटस्फोट घेतील तेंव्हा हिलाच सगळी काँट्रॅक्ट्स मिळतील. मग नको का चांगले बोलायला त्या बाईबद्दल?

|
आरे बाप रे दिपांजली एशचा कौतुक करतेय. व्वा काय बदल आहे. असे काय घडले बरे? <<<<ए , मला आवडतेच ऍश . तिचा horrible dress sense, काही चित्रपटां मधले फ़सलेले roles किंवा अभिनयाची limitations सगळे मान्य केले तरी पण सध्याच्या so called top च्या रानी - प्रीती पेक्षा thousand times superior,dignified,classy आहे ऍश .
|
बरच काय काय मान्य कराव लगणार अस दिसतय DVD आली पण? बर शोधते आता
|
Sas
| |
| Sunday, April 22, 2007 - 5:13 pm: |
| 
|
काल रात्री 'जत्रा' पाहिला; धम्माल! एकदम Full 2 Time Pass एकदा नक्किच पहाण्या सारखा. भरत जाधव, विजय चव्हाण & all hv made it full to comedy. शहरी आणी ग्रामीण दोन्हि भागातली Story असली तरी जमलिय.
|
परत एकदा कॅसाब्लांका पाहीला.. अरे काय ती इन्ग्रिड बर्गमन.. वाह वाह.. उगाच नाही ग्रेस पागल झाला इतका..
|
Mbhure
| |
| Monday, April 23, 2007 - 9:08 pm: |
| 
|
तन्या, "Spellbound" पहाच मग.... ग्रेगरी पेक आणि ती.
|
सरीवर सरी : अजिबात आवडला नाही . यातून नक्की काय message द्यायचाय तेच कळाले नाही . चित्रपटाच्या आधी premier show ला निर्मात्या ' लता नार्वेकर ' म्हणे कि modelling हे क्षेत्र सर्व सामान्य parents ना काही तरी भयंकर आहे असे वाटते तो गैरसमज आम्हाला दूर करायचाय . पण प्रत्यक्षात दाखवताना या profession चे negative points च जास्त दाखवलेत . मधुर वेलणकर चा modelling मधे काही संघर्ष ही फ़ार काही दाखवला नाहीये . आणि तिचे आई वडिल आधी तिचे tank top jeans घातलेले glamerous फोटो पाहून तिला लाथ्या बुक्क्याने , पट्ट्याने बदडतात पण नंतर ती त्यांना covnince करायला येताना सांगते कि अता ती nudes करणारे , तेंव्हा मात्र काहीच react करत नाहीत , उलट मोहन जोशी तर तिची पाठ थोपटतो . शिवाय modelling मधे येण्या आधी घरातलं इतकं कडक वातावरण असून तिचे चाळीतल्या शेजारच्या मुलाशी पाठीवर बसून मारामार्या करणे वगैरे funny वाटले . एकंदरीत सगळेच confusing वाटले . मधुरा वेलणकर , नीना कुलकर्णी नी चांगले acting केलय . मोहन जोशीचे accents खूप कृत्रिम वाटले .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|