|
शर्टाच्या खिशात मोबाईल ठेऊन फ्रिज मधून काकडी काढायला वाकलो, मोबाईल पडला. काकडी आणि उचललेला मोबाईल एकाच हातात धरून नळावर गेलो. नळ चालू केला आणि मोठ्ठ्याने किंचाळलो... काकडी दुसर्या हातात धरून नेमका मोबाईल वाहत्या धारेत धरणार होतो... बचावलो!
|
Ultima
| |
| Thursday, April 12, 2007 - 1:05 pm: |
| 
|
आरे त्यात काय एवढं मग काकडी चार्जिंज्ग ला लावायचि.....
  
|
Zakki
| |
| Thursday, April 12, 2007 - 1:30 pm: |
| 
|
nEsh , नॅश, असेहि लिहीता येते. झकासराव, मी बरोबर लिहीले नव्हते. दोन वर्षांपूर्वी मी सहा महिने पुण्यात राहिलो, तेंव्हाचे पाहून मी म्हणतो की त्यावेळी मला भीति वाटली, पण इतर पुणेकर मात्र शांत होते, त्यांना त्या रहदारीचे काही वाटले नाही
|
Runi
| |
| Thursday, April 12, 2007 - 2:40 pm: |
| 
|
मग ती काय आता तळ्यात बसुन लिहितेय अस वाटल काय तुला? >>>> झकासराव, तुम्ही पण एकदम अशक्य आहात

|
Deshi
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:02 pm: |
| 
|
इतर पुणेकर मात्र शांत होते, त्यांना त्या रहदारीचे काही वाटले नाही >>>> काय वाटनार झक्की. अहो रोज त्याच त्या ख्ड्यातुन गेल्यामुळे त्यांना खड्डेही पाठ झालेत. पुण्यात ख्ड्डे असुनही तेथील जागरुक म्हणुन घेनारी जनता काही करत नाही. (खड्यातुन जान्याशिवाय). तेथे लागतात जातिचे आपल्या सारखे परपुनेरी (परप्रातींय )सारखे चालत नाहीत. कारण आपण लगेच तक्रार करतो.
|
Dinesh77
| |
| Thursday, April 12, 2007 - 3:46 pm: |
| 
|
पण तरीही तक्रार करुन काही उपयोग होत नाही.
|
Zakki
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:42 pm: |
| 
|
आता खड्ड्यांबद्दल बोलणार असाल, तर खड्ड्यात जा! ( I mean , तिकडे एक वेगळा BB आहे, पुण्यातील खड्ड्यांवर.) त्यातलेच काही मुद्दे मी इथे परत लिहितो. एखाद्या गोष्टीकडे नकारात्मक किंवा तक्रारी करण्याच्या भूमिकेतून न पहाता, सकारात्मक भूमिकेतून पाहिले तर असे आढळून येईल की, १. खड्डे असले तरी जागोजाग, काही बेकायदेशीर का होईना, गतिरोधक आहेत. त्यामुळे सर्व रस्ते सरासरी सपाटच आहेत. २. वाहनांचा वेग कमी झाल्याने, अपघातांचे प्रमाण दरवर्षी कमी कमी होत आहे.
|
Nash
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:51 pm: |
| 
|
आजचीच गोष्ट. आमच्या फ़र्ममध्ये दोनच दिवसांपूर्वी एक नवीन मुलगा join झाला. आज तो काम करत असताना त्याचा computer थोडा वेळ idle राहीला त्यामुळे त्याचे session expire झाले. मग जेव्हा तो पुन्हा काम करायला गेला तर system ने message दिला "your session has expired.Please enter your password". त्याने मला विचार्ले काय झाले? मी गंमतीत म्हटले की session मेले. आता पुन्हा login कर आणि condolence लिही. तो password टाकू लागला. मला त्याच्या password ची लांबी जरा जास्त वाटली. म्हणून मी त्याला विचारले काय लिहित आहेस? तो म्हणाला तूच सांगितलेस ना condolence लिहायला,तेच लिहितोय. तो password म्हणून 'condolence' हा शब्द टाकत होता.
|
Music
| |
| Thursday, April 12, 2007 - 6:33 pm: |
| 
|
Maaze barechse Mitramaitrini Patni Computers madhe kaam kartaat. Parvaa sahaj sagaLyaanaa email kelaa.... ! Barechase emails parat ... !!! mhaTla.n he kaay ?? paahila.n tar sagaLeekaDe Patni chyaa aivajee Pati.com jhaalela.n. .... maajhyaa keyboard chaa "N" ganDlaay ..... !!!! ... :-))
|
Mahesh
| |
| Friday, April 13, 2007 - 2:57 am: |
| 
|
पती, पत्नी और वो (म्हणजे तुमचा कीबोर्ड) 
|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 4:33 am: |
| 
|
योगेशा दिल्लीमधे कोणी भेटलीय का? एवढा कसा काय गुंग होतास? अल्टिमा
|
हा माझा नसला, तरी खास वेंधळेपणा आहे! आमच्याकडे सहसा हिंदी चॅनल चे रिपोर्टर आणि इंग्लिश चॅनल चे रिपोर्टर एकमेकांच्या कुरणात शिरत नाहीत. एकदा मात्र दसर्याला हिंदी रिपोर्टर्स कमी होते, म्हणून रावणदहनाचं थेट प्रक्षेपण करायला एका इंग्रजी रिपोर्टरला पाचारण केलं. ही मुलगी घाबरली ना!! Desk वर येऊन म्हणाली, "Dude, I can't speak Hindi to save my life, count me out!" बाॅस तिला अतीशय प्रेमाने म्हणाला, " Listen girl, go there, or lose your job!" मग ही देवाला आळवत लोकेशनवर पोचली... इकडे स्टूडियोत अँकर म्हणू लागली, "जानते हैं लंकादहन का ताज़ा हाल हमारी संवाददाता xyz से..." ३... २.. १. Fade into Pragati Maidan . ही मुलगी कॅमेर्यासमोर थरथरत उभी... "अँ... जी... हाँ... जैसा की आप मेरे पीछे देख सकते हैं, रावण दहन शुरू हो चुका है, लोगों की भीड़ जुटी हुई है, धुआँ उठ रहा है, और रावण के लटक रहे हैं [मोठ्ठा पाॅझ... शब्द आठवेना..] जले हुए हाथ (इथे desperate हातवारे)." Office मध्ये आग लागलेली, "तिला कुणी पाठवलं? जा! रिलीव करा तिला!" म्हणत बाॅस चा थयथयाट चाललेला.. आता असला नग उचलून Live ला पाठवणार्या प्रोड्यूसर चा वेंधळेपणा मोठा, की प्रत्यक्ष बाॅस च्या नाकाशी आधी कांदा-मग सूत नेणारी ही मुलगी... The battle goes on!
|
तरीच सगळ्या न्युज चॅनलवरच्या बाया असं कसं वागतात? हा मला पडलेला प्रश्न...
|
मेरे पीछे रावणदहन आणि योगेश दसर्याला प्रगती मैदानात लंकादहन होते? एक भा. प्र.
|
Suvikask
| |
| Friday, April 13, 2007 - 7:43 am: |
| 
|
यापेक्षा सह्याद्री चे रिपोर्टर बरे...
|
हो ना.. ते रावणदहनाच्या वेळेला बळीराजाची गोष्ट सांगतील..
|
Nash
| |
| Friday, April 13, 2007 - 8:50 am: |
| 
|
माझे पण एकदा काहिसे त्या news reporter सारखे झाले होते.एकदा आम्ही सगळे lecture मध्ये होतो. lecture नुकतेच चालू झाले होते. एक मुलगा जरा उशीरा आला. त्याने शिस्तीत Professor ला विचारले,"May I come in Madam?" मला थोडी comment pass करायची हुक्की आली. मी ऐटीत उद्गारलो,"Sorry,you are too late for the next lecture!!" आणि मागून सगळे ओरडले,"Late? Early !!!!". त्या मुलाचा पोपट करता करता माझाच पोपट झाला.
|
संघमित्रा... तेच गं... जसं पेस्तनकाका 'साला सुब्रमन्नम' म्हणतात, तसं मी 'अमुक तमुक मैदान' ऐवजी 'प्रगती' म्हणून मोकळा झालो! (एक भा. उ.)
|
अय्या तू प्रगती मैदान म्हणतोयस ते लक्षात नाहीच आलं. मी आपलं रावणदहनाऐवजी लंकादहन ( LTTE धाऊन यायचे नाहीतर.) म्हणालास ना म्हणून आगावपणा केला
|
Sakhi_d
| |
| Wednesday, April 18, 2007 - 8:28 am: |
| 
|
नुकताच केलेला वेंधळेपणा......... मैत्रीणीला केलेला SMS १२१ वर पाठवला.....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|