|
>> पाहीला ठिक आहे, नाही पाहिला तरि चालेल सास जाऊ द्याहो इतकं कशाला मनाला लाऊन घेताय?
|
Suvikask
| |
| Thursday, April 05, 2007 - 12:08 pm: |
| 
|
मोझेर बेरच्या ३५-४० रुपयात हिन्दी सिनेमाच्या सीडी कुठे मिळतात? की भविष्यात मिळणार आहेत?
|
Disha013
| |
| Thursday, April 05, 2007 - 8:57 pm: |
| 
|
सलामे इश्क़ बघितला. कंटाळ्वाणा आहे. ५ जोड्या नि त्यांचे रडगाणे. कोणाचे काय तर कोणाचे काय! दमल्यासारखे दिसतात सगळे. गोविंदा भरपुर सुटलाय अंगाने. जरा वेगवान असता तर सुसह्य झाला असता.
|
Mandarnk
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:15 pm: |
| 
|
मला पण सलाम-ए-इश्क बघीतल्यावर असंच वाटलं होतं, पण नंतर नेहले पे देहला बघीतला, आणी खरा असह्य पिक्चर कसा असतो, ते कळलं!!!
|
नेमसेक पाहिला. थोडा कंटाळवाणा वाटला. कथा पुढे सरकत नाही असे काही ठिकाणी वाटले. ABCD लोकांची कथा थोड्या वेगळ्या प्रकारे मांडली आहे असे वाटले. कलाकारांमध्ये इरफान चे काम ठीक आहे. बर्याच काळानंतर त्याला Normal माणसाचे काम मिळाले आहे. नाहीतर नेहमी सणकू भूमिकांमध्येच जास्त दिसायचा. तब्बू चे काम चांगले आहे. ती आता म्हातारी वाटते. तीचे इंग्रजी उच्चार दाक्षिणात्य वाटतात. चित्रपट बघण्या आधी मूळ कादंबरी वाचली तर चित्रपट कंटाळवाणा वाटणार नाही.
|
Yogibear
| |
| Monday, April 09, 2007 - 12:31 am: |
| 
|
'गफ़ला' : केवळ अश्या नावामुळे आणि कुठलेच नामांकीत कलाकार नसल्याने बरीच मंडळी हा चित्रपट बघणार नाहीत म्हणुन इथे ह्या चित्रपटा बद्दल लिहावेसे वाटले. १९९२ साली घडवुन आणलेल्या हर्शद मेहता रचीत झालेल्या stock market scam वर आधारीत हा चित्रपट. कथेची सुरेख मांडणी, कलाकारांचा छान अभिनय आणि चित्रपटाची गती लक्ष वेधुन घेते. चित्रपट एकदा जरूर बघावा... 'Just Married': हा चित्रपट बघण्या पेक्षा 'यंदा कर्तव्य आहे' हा मराठी चित्रपट बघावा, जास्त enjoy कराल... 'Hattrick' : टुकार चित्रपट... '... ... मातीच्या चुली' : अजुन एक चांगली करमणूक करणारा चित्रपट. सुन आणि सासू मधले मतभेद दर्शवणारा आणि त्याचे रूपांतर म्हणुन मुलाची झालेली ओधाताण ह्या वर आधारीत एक हलका - फ़ुलका चित्रपट. सासू च्या भुमिकेत वंदना गुप्ते ह्यांना २००७ best actress screen award मिळाले आहे.
|
Badbadi
| |
| Monday, April 09, 2007 - 6:40 am: |
| 
|
१९९२ साली घडवुन आणलेल्या हर्शद मेहता रचीत झालेल्या stock market scam >> Yogi, do u mean to say that scam was preplanned to trap Harshad Mehta??????????
|
Sashal
| |
| Monday, April 09, 2007 - 7:52 pm: |
| 
|
यंदा कर्तव्य आहे : अजिबात पटला नाहि .. ती मुलगी जशी present केली आहे आणि ज्या प्रकारे अनभिज्ञ(?) दाखवली आहे ते अजिबात पटलं नाहि .. प्रचंड slow होता चित्रपट .. ओढून ताणून केलेले विनोद अजिबात विनोदी वाटले नाहित .. मोहन जोशी ineffective .. आणि मी 'अगंबाई अरेच्च्या' आधी बघितल्यामुळे केदार शिंदे कडून अपेक्षा उंचावल्या होत्या ..
|
Yogibear
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:44 am: |
| 
|
Bad: Its not my view, its the movie view... nice one to watch onetime 
|
Swaroop
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:35 pm: |
| 
|
साशल... १००% अनुमोदन! यंदा कर्तव्य.... अतिशय बालिश चित्रपट. मी फक्त तो 'आभास हा...' या गाण्यासाठी बघितला... मस्त आहे न हे गाणं!
|
Swaroop
| |
| Wednesday, April 11, 2007 - 4:41 pm: |
| 
|
योगी... मलाही आवडला 'मातीच्या चुली ' सुधीर जोशींच्या निधनामुळे थोडी discontinuty आलीय... पण तरीही एकदा नक्की पहावा असा आहे हा चित्रपट.... सुधीर जोशी आणि आनंद अभ्यंकरांसाठी वापरलेला आवाज कुणाचा आहे.... मला तो सचिन खेडेकरसारखा वाटला!
|
Adi787
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:58 pm: |
| 
|
just married बद्दल काय लिहायचे... जर एखादा मित्रांचा group महाबळेश्वरला गेला आनि सहज म्हणुन video shoot केलं तरी ते उत्तम येईल.
|
Sashal
| |
| Monday, April 16, 2007 - 4:36 pm: |
| 
|
'डोंबिवली फ़ास्ट' बघितला .. मला नाहि आवडला ..
|
Sunidhee
| |
| Monday, April 16, 2007 - 4:44 pm: |
| 
|
हे कुठे टाकावे काही कळत नाहीये. आजच १ मेल आली. ज्याना माहित नसेल त्यांच्याकरता.. http://www.youtube.com/watch?v=KZI4uBjLTJg
|
Grindhouse: काहीतरी वेगळे बघायाला मिळेल म्हणुन मित्राने नेले. ते इतके वेगळे होते की २० मिनीटात पळ काढला. भ या न क बेकार. पुढे काय आहे ते माहीत नाही. कोणी बघीतला असेल तर सांगा. Wild Hogs: कॊमेडी पिक्चर. बरा आहे टीपी.
|
Farend
| |
| Monday, April 16, 2007 - 6:25 pm: |
| 
|
केदार Ireland Bangladesh एव्हढी जबरदस्त चालू असताना 'काहीतरी वेगळे' कशाला? असो. मी '99 Australia-RSA semi final चालू असताना 'बीवी नं १' बघायला गेलो होतो (जेव्हा गेलो तेव्हा एव्हढी अटीतटीची होईल असे वाटले नव्हते), तसे इतरांचे होऊ नये म्हणून हा सल्ला
|
Ireland Bangladesh . अरे शनिवारी रात्री गेलो होतो. AUS vs SL पाहात आहेस काय?
|
Farend
| |
| Monday, April 16, 2007 - 7:34 pm: |
| 
|
हो पाहातोय तर. The Illusionist छान आहे. मला चित्रकलेतील फारसे कळत नाही, पण एकेक फ्रेम्स म्हणजे जुन्या स्टाइलची चित्रे वाटतात. यातील illusions सुद्धा छान आहेत. इंग्रजीचे युरोपियन उच्चार, ते साधारण १८ व्या शतकातील mannerism वगैरे एकदम वेगळे वाटते बघायला. कथे चा शेवट थोडा The usual suspects सारखा आहे, पण एकूण चित्रपट नकीच बघण्यासरखा आहे. सशल्: डों. फा. का आवडला नाही?
|
Sashal
| |
| Monday, April 16, 2007 - 9:31 pm: |
| 
|
डोंबिवली फ़ास्ट चा विषय खूपच छान आहे पण चित्रपट काहि जमला नाहि असं वाटलं .. किंवा मला तरी पटला नाहि .. अनिल कपूर चा नायक खूप छान होता, अर्थात या दोन्हींचे विषय खूप वेगळे आहेत पण तरी तो पटला ( Matrix सारखे action sequences वगळता .. ) इथे एक तत्वनिष्ठ माणूस frustration मुळे violent होतो .. TV वर त्याला बघूनही पोलिस दोन दिवस त्याला पकडू शकत नाहित, आणि त्या दोन दिवसात तो जे काहि करतो, ते तुकड्यातुकड्यातून दाखवलं अस वाटलं .. काहिच आगापिछा नसल्यासारखं .. आणि शेवटी गोळी लागून तो मरतो .. त्या इन्स्पेक्टर ला त्याच्याविषयी empathy वाटायला लागते आणि लगेच तोच इन्स्पेक्टर त्याला मारतो, system के हाथों मजबूर वगैरे होऊन .. म्हणजे या सगळ्यांतून शेवटी निष्पन्न काहिच होत नाहि .. अर्धी लोकं माधव आपटे ला वेडा समजतात, फ़क्त थोड्या लोकांना त्याची तळमळ, लढा कळतो, आणि इतर लोकांना काहिच फ़रक पडत नाहि .. मग असं वाटलं की माधव आपटे ला आणि समाजाला काय मिळालं त्यातून .. बायका, मुलं पोरकी झाली, आयुष्य गमवावं लागलं आणि तरी फ़क्त थोड्या लोकांनाच कळू शकलं त्याला जे काहि सांगायचं होतं ते .. 'रंग दे बसंती' ची आठवण झाली .. समाजाची अवस्था बदलायची तर 'काय करून दाखवता येईल' अशा आशयाचा 'युवा' खूप effective होता .. आणि अर्थातच, दुःखांत असलेले चित्रपट बघून मला त्रास होतो, हे अजून एक कारण ..
|
Mahaguru
| |
| Monday, April 16, 2007 - 10:23 pm: |
| 
|
यंदा कर्तव्य आहे : तसा टुकारच आहे. नाही बघितला तरी चालेल. डोंबिवली फास्ट : खुप वाचले होते भट्टी काय जमली नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|