Chaffa
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:50 am: |
| 
|
रुनी, नक्की कुठे आहे ते नाही माहीत. हा किस्सा गप्पागोष्टी करताना मित्राकडून ऐकला. आणी कदाचीत शहराचे नाव चुकीचे ऐकले असण्याची शक्यता आहे.
|
अरे. काय हे आठ दिवस मी नव्हते तर काय शंख चालु आहेत. घरी गेले होते.. यावेळेला भरपूर वेळ असल्यामुळे भरपूर इब्लिसपणा केला... सोबत मामीचा तीन वर्षाचा तेजस घेऊन बाजारात गेले होते. जवळ जवळ चार वर्षानी भेटलेल्या मैत्रीणीला हा बघ माझा मुलगा" अशी ओळख करून दिली. बिच्चारी...
|
वा! म्हणजे तू लग्न होण्याच्या आधी आई होऊन मोकळी झालीस तर इब्लीसपणा करता करता!!!
|
Chyayla
| |
| Sunday, April 01, 2007 - 9:57 pm: |
| 
|
नशीब तीने स्वता:चे नाव मेरी व मुलाचे नाव जिजस नाही सान्गितले.
|
सध्या ती मैत्रीण सर्वाना फ़ोन करून माझे लग्न झाले आणि मूल झाले तरी मी कुणाला सांगितले नाही... वगैरे सांगत आहे. (हे बाकीच्या मित्रवर्यानी कळवले आहे... ते साळसूदपणे "आम्हाला काहीच माहित नाही" असे म्हणून तिची अजूनच खेचत आहेत.) त्यातूनच माझा नवरा कोण हा शोध सुरू आहे. बिच्चारी..
|
Ultima
| |
| Monday, April 02, 2007 - 3:42 pm: |
| 
|
मग काय नन्दुताई तिचा हा शोध पुर्ण कधी करताय??
|
अल्टिमा... वेळ आहे हो अजून.. काल माझा एक गोडखाऊ मित्र घरी आला होता. साला कॉफ़ीत चार चमचे साखर घेतो. इतकं गोड खातो की याला एक दिवस मुंग्या खातील असं आम्ही म्हणतो., तर याला काल बेसनाचे लाडु खायला दिले. थोडी गंमत करून.. काय केलं मस्तपैकी बेसनचा लाडू घेतला अर्धा केला. आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवून परत वळला. आणि खायला दिला... जास्त काही नाही... दोन सणसणीत धपाटे मिळाले आहेत.. आई गं.
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:25 am: |
| 
|
नंदिनी मस्त.... मी पण माझ्या एका मित्राला कोकम सरबत फ़क्त पाणी टाकुन दिलेले, साखर, मीठ न टाकता
|
Ultima
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:37 am: |
| 
|
आई शपथ हिरव्या आता यापुढे तो बेसनाचाच काय पण लाडु हा शब्द जरी ऐकला तरी धुम ठोकेल..... नुसत्या कल्पनेनेच ह. ह. पु. वा. 
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:01 am: |
| 
|
सखि आणि नन्दिनी ता. क. नन्दिनी मला तुझे उकडिचे मोदक नकोत.
|
Chaffa
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:25 pm: |
| 
|
ता. क. नन्दिनी मला तुझे उकडिचे मोदक नकोत. आता या पेक्षा चांगली पावती काय असणार तुझ्या इब्लीसपणाला नंदिनी? सखी, मी आता आजीबात येणार नाही तुझ्या घरी. (झकासराव स्टाईल)
|
Chaffa
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:30 pm: |
| 
|
आणी हा किस्सा चाफ़्फ़ी के नाम चाफ़्फ़ी लग्नाआधी कधी एकटी किचन संभाळत नव्हती आता लग्नानंतर तिचा उत्साह उतु जात असतो तिकडे किचनमधे. तिचे किचनकिस्से किंवा बिघडलेल्या पाककृती भरपुर आहेत ते मी नाही लिहीत बसत पण......... कालचाच किस्सा: आई सात आठ शिट्ट्या झाल्यातरी ते वाटाणे शिजतच नाहीयेत अशी तक्रार तिने आईकडे मांडली मी सोफ़्यावर पसरुन वाचत होतो पटकन जाउन एक लहानसा गारगोटीचा दगड आणला आणी तिच्या हातात दिला सांगितले हा टाक कुकरमधे आणी कर शिट्ट्या, तिनेही आजिबात विचार न करता मी सांगितले तसेच केले. थोड्या वेळाने मला येउन विचारले असे केल्यावर खरंच शिजतील वाटाणे लवकर? काय लॉजीक काय त्याच्यामागे? म्हंटलं कसलं डोंबल्याचं लॉजीक! आता कुकर उघड आणी बघ जर तो दगड शिजला असेल तर वाटाणेपण शिजले असतील. कपाळावर हात मारण्याखेरीज काय करु शकणार होती चाफ़्फ़ी
|
Runi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:10 pm: |
| 
|
आयला चाफ्फा तू बायकोला पण सोडत नाहिस इब्लिसपणा करण्यात खुपच चालु आहेस की. आणि तुझ्या चाफ्फीला पण मायबोली वर घेवुन ये म्हणजे ती पण तिचे धमाल किस्से सांगेल
|
hahaa... chafa, sahi re..
|
Runi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:13 pm: |
| 
|
झकासराव, नंदिनीने उकडीच्या मोदकाने तुमची वाट लावली का, त्यात पण हिरवी मिरचीच का?
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:17 am: |
| 
|
नंदिनीने उकडीच्या मोदकाने तुमची वाट लावली का>>> अजुन नाही रुनी पण तिने परवा मोदकांची आठवण करुन दिली आणि मला खावेसे वाटले मग मी तिला बोल्लो की मला पण दे थोडे. वरचा किस्सा वाचुन वाटल रिस्क कशाला? चाफ़ा मोड घरीपण सुरु का? चाफ़्या संभाळुन रे, आता बायका आपला गिनिपिग करुन टाकतात.
|
>> आई शपथ हिरव्या आता यापुढे ... अल्टिमा तुम्ही लाडाने नंदिनीला हिरव्या म्हणताय का?
|
चाफ़ा.. सांभाळून एखाद दिवशी असलाच एखादा दगड डोक्यात बसायचा..
|
नंदिनी चाफ्या तू नंदिनीच्या घरी जाऊ नकोस (नाहीतर ती उकडीचे मोदक किंवा लाडू खाऊ घालेल.) आणि तिलाही तुझ्या घरी बोलवू नको. ती चाफ़्फ़ीला ही दगडाची आयडिया देईल
|
Ultima
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:58 am: |
| 
|
अल्टिमा तुम्ही लाडाने नंदिनीला हिरव्या म्हणताय का? नाही हो....मला "आई शपथ !!!! हिरव्या??? आता यापुढे ... " अस म्हणायच होत......
|