चाफ़्फ़ा.. गणितातही वेंधळेपणा? हा नक्की शाळेच्या वेळेत विटी दांडू नाहीतर कंचे खेळत असणार...
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:03 am: |
| 
|
चाफ़्या आणि सव्यासाची चाफ़्या हे कसल गणित. तु स्वताला न पकडता माणसं मोजतोय्स का?
|
Suvikask
| |
| Tuesday, April 10, 2007 - 11:36 am: |
| 
|
सव्यसाची, ****दोन्ही पाय सरळ बोटीच्यावर दिसत आहेत आणि मी मात्र दिसत नाही असे मजेशीर दृश्य लोकांनी बराच वेळ अनुभवले. **** चित्र डोळ्यासमोरुन जात नाही, ऑफिसात हसताही येत नाही... अव्घड परिस्थिती झाली आहे... replay करुन एखदा फोटो टाकला तर... कशी वाटते कल्पना.... replay ची
|
Chaffa
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:29 pm: |
| 
|
पाच पुरुष आणी चार स्त्रिया, नऊ लोकातले दोन अर्धवट होते का? आयला सहीच, म्हणजे बोटींग करताना त्याच्या बद्दल सांगताना आणी आता लिहीतानाही.? ही झाली हॅट्रीक वेंधळेपणाची. बाकी आर्च तुझ लक्ष आगदी बारीक असतं हं!
|
मला खात्री आहे कोणितरी माझा तसा फ़ोटो काढला असणार. कारण ३ ४ मिनीटेतरी मी तसाच होतो धडपड करत. action replay करायला मला जरूर आवडेल. त्यानिमित्ताने परत मश्वरला जाता येईल.
|
Arch
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:23 pm: |
| 
|
सव्या दोन्ही हाताने वल्ही मारताना काय रे ही तुझी स्थीति? कसा आहेस? 
|
मी मजेत आर्च. एडीसन नामक देशी प्रदेशात आराम करतोय तू कशी आहेस? अग बहुतेक दोन्ही हात एकदम वापरल्याने त्यांच confusion झाल पण खरच, वेण्णा मधेच काय, कुठेही स्वच्छ पाण्यात रोईंग करायला फ़ार मजा येते.
|
बापरे त्या महाबळेश्वरच लेक प्रकरण हॉरीबल आहे. आम्ही पण उत्साहाने त्यात बोटींग करायला शिरलो. सगळेच हौशी लोक. आणि लेकमध्ये इतकी गर्दी. कोणीतरी येऊन आमच्या बोटीवर आपटणार आणि मी पाण्यात बुडणार अशी माझी खात्री होती. त्यात ३ जण वल्हवत आमच्या अगदी समोर आले आणि जोरात सरका सरका करून ओरडत सांगत होते. इतर वेळ असती तर कडाक्याच भांडण झाल असत पण आम्ही निमुटपणे बाजूला झालो. लाईफ़ जॅकेट प्रकार नाही. कोणाला बोट वल्हवता येते की नाही काही फ़रक पडत नाही. भितीदायक
|
Zakki
| |
| Wednesday, April 11, 2007 - 12:56 pm: |
| 
|
ज्यात तुम्हाला भीति वाटते त्यात इतरांना 'adventure' वाटते. नि काही जणांना त्यात काहीच वाटत नाही. पुण्यातील रहदारी बघून मला अशीच भीति वाटत होती. पण तिथल्या लोकांना त्यात काहीच वाटत नाही!
|
Nash
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:26 pm: |
| 
|
नाही मित्रहो, कुत्रा एकच होता आणि प्रसंग पण एकदाच घडला. पण वेंधळेपणाने ते दोनदा लिहिले गेले.(काय करणार, आदतसे मजबूर !!!)
|
Nash
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:48 pm: |
| 
|
आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे username लोक वेगवेगळ्या प्रकारे उच्चारतायत. तर त्याचा उच्चार 'नॅश' असा करावा. ते माझ्या कॉलेजच्या मित्रांनी केलेले माझे बारसे आहे. धन्यवाद !!!
|
Sheshhnag
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:02 pm: |
| 
|
हा कुत्रा मध्येच कुठून उपटला? त्या अंधाराची सवय गेली नाही वाटते अजून. इथे चांगले तळ्यात हातपाय मारत होतो, टांगा वर करून लोकाना हसवत होतो... आणि हा कुत्रा आला मध्येच... सवय जात नाही... दिवे घ्या... अंधारात बरे...
|
Storvi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:15 pm: |
| 
|
त्या boating चे आमचे yosemite मध्ये एकदा झाले. आम्ही ६ जण गेलो होतो. आमचे आघाडीवीर धुरंधर योद्धे (आम्ही तीन couples गेलो होतो, त्या मुळे हे योद्धे कोण ते सांगणे नलगे ) rowing करु लागले... मध्ये गेल्यावर ताकत कमी पडायला लागली म्हणुन परत फ़िरायचे ठरले. त्यामुळे एका बाजुने जोरात वल्ह्वुन वळायचे हे माहित, पण तो control न जम्ल्याने मधोमध आम्ही गोल गोल फ़िरू लागलो.. मला एक्दम freinds मधले pivot pivot आठवले 
|
Runi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:32 pm: |
| 
|
आघाडीवीर धुरंधर योद्धे >>> storvi मग तुमच्या धुरंधर योद्ध्यांनी आणले की नाही परत काठावर?
|
Farend
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:41 pm: |
| 
|
Storvi Pivot Pivot LOL त्याच्यावरून कळले की तुमचे काय झाले असेल
|
Zakasrao
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:23 am: |
| 
|
storvi मग तुमच्या धुरंधर योद्ध्यांनी आणले की नाही परत काठावर? >>>>. मग ती काय आता तळ्यात बसुन लिहितेय अस वाटल काय तुला? पुण्यातील रहदारी बघून मला अशीच भीति वाटत होती. पण तिथल्या लोकांना त्यात काहीच वाटत नाही>>>>>>. झक्की काका तुम्ही जे सांगताय ते फ़ार जुण पुराणं. आता या आणि गाडी चालवुन दाखवा पुण्यातल्या खड्ड्यातुन रस्त्यातुन. सगळीकडे छान खुदाइ झाली आहे. उड्डाणपुलांचे काम रांगाळल्यामुळे ट्रॆफ़िकचा छान मुरांबा असतो. अशा वेळी डोक्यावर शिरस्त्राण घालुन आपला घोडा पुढ दामटुन दाखवा. मग म्हणाल आमच्या वेळी बर होत.
|
Dhumketu
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:55 am: |
| 
|
अहो नॅश लोकांना ॅ लिहायला त्रास पडतो.. ईथल्या देवनागरी च्या खिडकीत .c लिहीले तरी अर्धचंद्र येत नाही तुमचे नशीब जोरावर की ईब्लीस bb मधील लोक ईथे नाहीत नाहीतर न पुढे आ लाऊन लिहायला कमी नसते केले
|
Nash
| |
| Thursday, April 12, 2007 - 8:14 am: |
| 
|
तुमचे नशीब जोरावर की ईब्लीस bb मधील लोक ईथे नाहीत नाहीतर न पुढे आ लाऊन लिहायला कमी नसते केले >>>>> खरेच, नाहीतर माझ्या usernameचा सत्या-नाश झाला असता....
|
Milindaa
| |
| Thursday, April 12, 2007 - 9:14 am: |
| 
|
ईथल्या देवनागरी च्या खिडकीत .c लिहीले तरी अर्धचंद्र येत नाही << dhumketu , ही अडचण n नंतर a न लावल्यामुळे येते. हे बघ, नॅश असे लिहीता येते नॅश = \dev2{na.csh}
|
Nash
| |
| Thursday, April 12, 2007 - 9:15 am: |
| 
|
एकदा माझ्या आई-वडिलांना पुण्याला एका लग्नासाठी जायचे होते. म्हणून मुंबई-पुणे ट्रेनचे आरक्षण केले. ठरल्यादिवशी दोघे स्टेशनवर गेले. ट्रेन आली. दोघे चढले. थोडे पुढे गेल्यावर जाणवले की ओळखीची स्टेशने काही लागत नाहीत. मग आजुबाजुला विचारणा केल्यावर कळले की ती ट्रेन पुण्याची नसून नाशिकची होती. त्यादिवशी नेमकी announcement ची system पण बंद होती आणि दोन्ही ट्रेनचे timings पण जवळपासचे होते.(माझा ह्यावर बाबांशी मतभेद झाला. माझ्या मते त्यांनी गाडीवरची पाटी वाचली पाहिजे होती.) मग काय, मुंबई-पुणे प्रवास via नाशिक सुफळ संपूर्ण !! (तरी नशीब, वाटेत T.C. नाही भेटला)
|