|
Nanya
| |
| Thursday, April 05, 2007 - 4:22 pm: |
| 
|
>>सुरवातीचे initials सेम असल्यामुळे मला असे मेल येतात. मजा असते. सुरवातीचे initials ?? हा पण एक वेंधळेपणा म्हणायचा का झकासराव? दिवे घ्या..
|
पूनम, तुझा वेंधळेपणा जिवाशी खेळ होता. तेंव्हा जपून.
|
Disha013
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:52 pm: |
| 
|
सही किस्से आहेत सगळ्यांचे! हा एक आमचा वेंधळेपणा. भारतात जात होतो. मधे सिंगापुरला ८ तासांचा halt होता. इतका वेळ काय करणार म्हणुन त्यांच्यातर्फ़े असलेली २ तासांची tour करण्याचे ठरविले. परत येवुन airport वर timepass करत फ़िरु असे ठरविले. चेक इन केलेले सामान सोडुनही अमच्याकडे भरपुर सामान आणि ५ महिन्यांचा मुलगा. airport वर सामान ठेवण्यासाठी lockers होते. २ तासांसाठी min. पैसे आणि पुढे मग १२ की २४ तासांसाठी extra पैसे होते. समान ठेवुन फ़िरायला गेलो. परत अल्यावर २ तासा.वर १५ मिन. झालेली. फ़ार हळहळलो आणि extra पैसे भरले. सामान काढुन घेतले. cart वर रचले आणि मग दोघांची tube पेटली. २ तासाच्या वर झाल्याने वरचे पैसे भरुन सामान १२ तास ठेवता येत होते की! आम्ही आपले घाई करुन बसलो. मग काय एवढा बोजा संभाळत फ़िरावे लागले.
|
Adi787
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:54 pm: |
| 
|
मंदार, या किस्स्याकडे त्या cop च्या द्रुष्टीने बघितल्यास... असला वीनोद नाही ... कसला scene असेल तो... समोरचा स्पीड मध्ये reverse घेवुन cop च्या car ला धडकतोय ... 
|
Psg
| |
| Friday, April 06, 2007 - 7:49 am: |
| 
|
हो सव्या यापुढे नक्कीच मंदारचा किस्सा भन्नाट आहे!!
|
मी आताच अकराव्या मजल्यावरून सातव्यावर जाण्याऐवजी.. मोबाईलवर बोलत बोलत ग्राउंड फ़्लोअरपर्यंत गेले आणि तिथे गेल्यावर समजलं की लिफ़्ट बंद आहे.,.. आणि सात मजले चढून वर आले.
|
Nash
| |
| Sunday, April 08, 2007 - 6:31 pm: |
| 
|
काही दिवसांपुर्वी मी रस्त्यावरून चालत होतो. रात्रीची वेळ होती त्यामुळे थोडा अंधार होता. चालता चालता अचानक पायाखालून एक भयंकर आवाज आला. मी घाबरून विद्युतवेगाने दूर झालो. बघितले तर मी चक्क एका कुत्र्यावर पाय दिला होता !! नशिबाने तो माझ्याहीपेक्षा जास्त घाबरला होता म्हणून अस्मादिक वाचले नाहीतर खैर नव्हती.
|
Nash
| |
| Sunday, April 08, 2007 - 6:35 pm: |
| 
|
काही दिवसांपुर्वी मी रस्त्यावरून चालत होतो. रात्रीची वेळ होती त्यामुळे थोडा अंधार होता. चालता चालता अचानक पायाखालून एक भयंकर आवाज आला. मी घाबरून विद्युतवेगाने दूर झालो. बघितले तर मी चक्क एका कुत्र्यावर पाय दिला होता !! नशिबाने तो माझ्याहीपेक्षा जास्त घाबरला होता म्हणून अस्मादिक वाचले नाहीतर खैर नव्हती.
|
Mahesh
| |
| Monday, April 09, 2007 - 11:14 am: |
| 
|
नश, असे दोनदा घडले का ? तसे असेल तर दोन्ही वेळेस कुत्रा तोच होता की वेगळा ? तोच असेल तर परत अजिबात ओळख देऊ नकोस. 
|
दोन्ही वेळी प्रसंग एकच, कुत्रा तोच, माणूस तोच... पण तरीही कुत्रा घाबरून पळतोय, याचा अर्थ...
|
Chaffa
| |
| Monday, April 09, 2007 - 2:59 pm: |
| 
|
आम्ही मित्रमंडळी महाबळेश्वरला गेलो होतो तेंव्हाचा हा किस्सा, आता महाबळेश्वर म्हंटले की वेण्णा लेक आणी त्यातले बोटींगचा आनंद घेतल्याखेरीज कोण राहू शकेल.? म्हणुन आम्ही सगळे आठजण बोटींग करायला गेलो वेळ संध्याकाळचीच, त्यामुळे गर्दी फ़ार नसली तरी बर्यापैकी होती आणी सगळ्यांना बसता येईल अशी एकच बोट घेणे भाग होते पण नेमका तिथेच प्रश्न आला तिथे बोट तर होती पण ती वल्हवायला त्यांचा माणुस नव्हता आणी आम्हाला तर लवकरच परत निघायचे होते शेवटी बोटवाल्यानेच एक मार्ग सुचवला जर तुम्ही वल्हवुशकणार असाल तर बोट घेउन जा! आता झाले का? ईथे वल्हवायचा अनुभव होता कुणाकडे? पण आमच्याजवळच एक पिकनीक स्पॉट आहे तिथे जाताना नदी पार करायला लागते तेंव्हाच्या तुटपुंज्या अनुभवावर मी म्हणालो एका बाजुचे वल्हे मी चालवीन पण दुसर्या बाजुचे तुम्हीच बघा. आता परत प्रॉब्लेम बाकी कुणाला माझ्यासारखा मोडकातोडका अनुभवपण नाही, पण त्यातल्या दोन नवविवाहीत मित्रांनी जरा रुबाब करावा म्हणुन वल्हवायची तयारी दाखवली. आता बोटीत आम्ही पाच पुरुष आणी चार स्त्रिया, निघालो बोटींगला सुरुवातीलाच पहीला शोध हा लागला की माझ्या त्या दोन दोस्तांना वल्हे कसे मारायचे याची प्राथमीक माहितीही नव्हती ते दोघे आणी एकत्र मिळुन बरं का! पाण्यात चमचा ढवळल्यासारखे वल्हे ढवळत होते आणी मी ईकडून यथाशक्ती वल्हे मारत होतो त्यामुळे झालं काय की बोट किनारा सोडून मध्यावर जायला तयारच होईना ती आपली कडेकडेने पुढे सरकत राहीली मग शेवटी वल्ह्याचा उपयोग काठीसारखा करत आम्ही तिला कशिबशी पाण्यात लोटली पण थोडी पुढे जते तो पुन्हा पाणी ढवळण्याचा खेळ आमचा चालुच! मग मात्र बोटीलाही राग आला असावा, ती लागली गोल गोल फ़िरायला. ना पुढे जाई ना मागे, मधे मधे तर ईतकी हालायची की तिची टायटॅनीक होते की काय असे वाटायला लागले होते. आणी आमची ही दशा किनार्यावरुन बरेचजण पहात होते पण त्यांच्या हसण्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ होताच कुठे शेवटी भरपुर गिरक्या घेउन आणी बोटीतल्या महिलामंडळाच्या शिव्या खाउन एका तासाकरता नेलेले ते तारु आम्ही पावणेदोन तासांनी परत दुसर्याच किनार्याला नेउन टेकवले आणी सुटकेचा श्वास टाकला. आता त्याच्यापुढचा वेंधळेपणा म्हणजे हा सगळा किस्सा परवा महाबळेश्वरला जाताना चाफ़्फ़ीला गाडीत ऐकवला मग तिथे गेल्यावर तिचा म्हणे बोटींग करायचा मुडच नव्हता.
|
हेहेहे.. चाफ़ा, तुझ्यासारखी गत झालेले कितीक पाहीले आहेत वेण्णाला. नुसते गोल गोल फ़िरत बसतात. आणि वल्ह्याचा उपयोग शेवटी काठी म्हणून करून कसेबसे किनार्याला लागतात. मला एकदम तिथेच आहे असे वाटले. कितीवेळा मश्वरला गेलो आणि किती वेळा self rowing केले त्याला गणती नाही. एकदा मी आणि माझा भाऊ वल्हवत होतो. आणि जास्तीतजास्त किती वेगाने जाता येते ते पाहू म्हणुन जोरजोरात वल्हे मारत होतो. त्यामुळे ईतर लोक आमच्याकडे पहात होते. आणि एकदम माझे पाय रेटा दिलेल्या ठीकाणावरून सुटले. मी मागे बोटीत पडलो. दोन्ही पाय सरळ बोटीच्यावर दिसत आहेत आणि मी मात्र दिसत नाही असे मजेशीर दृश्य लोकांनी बराच वेळ अनुभवले. एकदा मी आणि भाऊ वल्हवत असताना जोरात पाऊस सुरू झाला. डाविकडे एक देऊळ आहे तिथे लगेच बोट लाऊन मी उडी टाकली. भाऊ म्हणाला इथे फ़ार चिखल आहे. दुसर्या बाजूला लावतो. म्हणून त्याने बोट काढली आणि जोरदार वार्याने एकदम पलिकडच्या किनार्याला पोचला. तिथुन परत बोट घेऊन आला आणि मग उतरला. पण तोपर्यंत पुर्ण भिजला होता.
|
Disha013
| |
| Monday, April 09, 2007 - 4:54 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा,सव्यासची! आम्ही पण स्वत्:च वल्हवायची बहादुरकी एकदा दाखविलेलि. माझा ३ वर्षांचा मुलगा घाबरुन जोरा जोरात 'I'm done! I'm done' असे ओरडालया लागलेला.
|
Chyayla
| |
| Monday, April 09, 2007 - 5:12 pm: |
| 
|
नश, असे दोनदा घडले का ? तसे असेल तर दोन्ही वेळेस कुत्रा तोच होता की वेगळा ? तोच असेल तर परत अजिबात ओळख देऊ नकोस. दोन्ही वेळी प्रसंग एकच, कुत्रा तोच, माणूस तोच... पण तरीही कुत्रा घाबरून पळतोय, याचा अर्थ... ....महेष अन शेषनाग...  आता नाशला Hattrick Chance आहे बर का.. ईजा बीजा अन आता तीजा.. अरे लवकर भेट बाबा त्या कुत्र्याला परत एकदा. चाफ़्फ़ा, सव्यसाची... वल्हव रे नाखवा.. (नाखवा = नवीन असा अर्थ घ्यावा) हे गाणे ऐकले नव्हते का? अशावेळेस महिला मन्डळ काही कामाच नसत हे लक्षात आल वाटत तुमच्या ते फ़क्त वल्हव रे नवरा...
|
Ultima
| |
| Monday, April 09, 2007 - 5:27 pm: |
| 
|
अरे लवकर भेट बाबा त्या कुत्र्याला परत एकदा. >>>> Nako re baba...2 wela to ghabarla (kutra) tisrya weli nahi ghabarla tar ;))
|
Nanya
| |
| Monday, April 09, 2007 - 6:02 pm: |
| 
|
च्यायला, तो शब्द नवखा असा आहे ना? पण असुदे.. "वल्हव रे नवखा हो" पेक्शा "वल्हव रे नाखवा हो" हेच बरे वाटते
|
Arch
| |
| Monday, April 09, 2007 - 6:59 pm: |
| 
|
आठजण बोटींग करायला गेलो पाच पुरुष आणी चार स्त्रिया, >> नऊ लोकातले दोन अर्धवट होते का? 
|
Runi
| |
| Monday, April 09, 2007 - 7:14 pm: |
| 
|
आठजण बोटींग करायला गेलो पाच पुरुष आणी चार स्त्रिया, >> नऊ लोकातले दोन अर्धवट होते का?>>> आर्च सही , हा चाफ़्फ़ा गणितात पण वेंधळा आहे बहुतेक
|
Runi
| |
| Monday, April 09, 2007 - 7:19 pm: |
| 
|
च्यायला, वल्हव रे नवरा Nanya ते मुळ गाणे वल्हव रे नाखवा असेच आहे
|
i am done ... haha... like, bas zali maja.. bharun pavalo. hahaha...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|