|
Suyog
| |
| Sunday, April 01, 2007 - 8:34 pm: |
| 
|
purvi aamhi kasaba pethet wadyat rahat astana wadyache malak aajari hote te 1 aprilala warale teva wadyatali tukar mul hi batami sangu lagli tar sagalyana watle te april fool karatayat
|
Chaffa
| |
| Monday, April 02, 2007 - 7:09 pm: |
| 
|
खंरतर हा किस्सा या BB वर नको टाकायला पण भाषेच्या अज्ञानामुळे अशा काही गंमती पहायला मिळतात. सकाळी चमचे घ्यायला भांड्यांच्या दुकानात गेलो होतो तिथेच एक गृहस्थ अमहाराष्ट्रीयन असलेले, आणी बहुदा नविनच ईथे आलेले काही खरेदी करत होते त्यांना बहुतेक त्यांच्या मातृभाषेखेरिज फ़क्त इंग्रजीच येत असावी कारण दुकानदाराबरोबरची त्यांची घासघीसही इंग्रजीतुन चाललेली, आणी अशावेळी काही जणांचे इंग्रजी मोकाट सुटते तसेच तिथल्या कामगाराचे सुटले असावे तो पाऽऽर काउंटरच्या त्या टोकापासुन ओरडला ' सऽऽर युवर पिंप ' ! आजकाल भाषेच्या या असल्या भेसळीची मलातरी सवय झालेली आहे पण बहुदा त्या सऽऽर ला नसावी. तो प्रचंड भडकला आणी आपल्या इंग्रजीत त्या दुकानदाराचे पाऽऽर पानीपत करुन टाकले बिचार्याला समजेना की आपले काय चुकले? शेवटी दुकानातल्या काही समंजस मंडळींनी हस्तक्षेप केला तेंव्हा कळले की ते गृहस्थ दुकानात तांब्याची टाकी घ्यायला आले होते आणी दुकानदारच्या त्या मुलाने टाकीचे इंग्रजी भाषांतर, 'पिंप' असे करुन ही ठिणगी टाकली होती. भरिस भर म्हणजे त्या गृहस्थांनी युवर च्या ऐवजी यु आर you are असे ऐकले.
|
Adi787
| |
| Monday, April 02, 2007 - 7:33 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा, जबरीच ह ह पु वा.
|
Runi
| |
| Monday, April 02, 2007 - 8:29 pm: |
| 
|
सऽऽर युवर पिंप >>>> आई शप्पथ.... . चाफ़्फ़ा आणि हे सगळे तू तिथे उभा राहुन बघत होतास (म्हणजे न हसता?)
|
Chyayla
| |
| Monday, April 02, 2007 - 11:39 pm: |
| 
|
' सऽऽर युवर पिंप ' चाफ़्फ़ा .... माझ्या कडुन अजुन एक किस्सा माझी अकोल्याची मावशी आणी आई दोघीन्ची चेहरेपट्टी सारखिच पण एक मोठ्ठा फ़रक असा की माझी मावशी चान्गलीच लठ्ठ. तर एक दीवस मावशी आमच्या क्वार्टरच्या फ़ाटकातुन आमच्या घरात येत होती आणी ते पाहिल आमच्या ओळखीच्या एका मुलीनी... ती, घरी गेली आणी थोड्या वेळानी ती, तीची आई, त्यान्च्याच बाजुला राहणारे असे २,३ ज्यान्च्याशी आमचे चान्गलेच घरोब्याचे सम्बन्ध होते त्या काकवा असा ५ जणीन्चा लवाजमा आमच्या कडे हजर आणी माझ्या आईला समोरच अगदी सामान्य पाहुन चाटच पडल्या. त्या मुलीची आई सान्गु लागली की "अहो आज हिने तुम्हाला घरात जातान्ना पाहिले आणी घरी आल्यावर म्हणाली की अग आई त्या काकुन्ना काही तरी झालय, अन्गावर खुप सुज आली आहे, खुपच फ़ुगल्या आहेत, अगदी ओळखुच येत नाहीत" म्हणुन आम्ही तुमची तब्येत आणी विचारपुस करायला आलो... आणी ईकडे आम्ही सगळे बहीण भावन्ड पोट धरुन खो खो हसायला लागलो, म्हटल त्यात तीची काहीच चुकी नाही ही बघा आमची मावशी असे म्हणुन मावशीला दाखवले आणी त्यान्चा तोन्डुन "अय्याSS..." निघाले व आमच्या खो खो हसण्यात तेही शामील झाले. अजुन ही गम्मत ईथेच सम्पत नाही समारम्भात आमच्या ओळखीचे लोक मावशीलाच आई समजुन अगदी छान गप्पा गोष्टी करुन मोकळ्या व्हायच्या व जेन्व्हा आई समोर यायची तेन्व्हा कुठे झालेली फ़जिती लक्षात यायची. मावशीला या प्रकारान्ची सवय झाली आणी ती पण ईब्लिसपणे गप्पा गोष्टी करुन मोकळी होते.. खी.. खी.. खी..
|
Lajo
| |
| Tuesday, April 03, 2007 - 1:24 am: |
| 
|
' सऽऽर युवर पिंप ' ! बाप रे चफ़्फ़ा, अगदीच ह. ह. पु. वा... तुमचे पोस्ट हापिसात वाचणे म्हणजे जरा जिकीरीचेच असते. हसु म्हंटले तर दिलखुलास हसता येत नाही आणि हसू दाबून पण ठेवता येत नाही पण... शेवटी फवारा फुटलाच... माझी कलीग विचारते काय झाल.. आता या गोरी ला काय समजणार मज्जा?
|
Ultima
| |
| Tuesday, April 03, 2007 - 12:41 pm: |
| 
|
सऽऽर युवर पिंप चाफ़्फ़ा आणि हे सगळे तू तिथे उभा राहुन बघत होतास (म्हणजे न हसता?) तो हसला असता तर त्याचेही तिथेच पानिपत झाले असते ना.
|
Sunidhee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 7:34 pm: |
| 
|
चाफ्फा, chyala , धमाऽऽल.. ह्या पिंपाचा अजुन एक किस्सा.. माझी मैत्रिण पहिल्यांदा अमेरिकेत आली, न्युयॉर्क मधे. दुसर्या दिवशी गेली ऑफीसात. तिचे आधीचे काही मित्र होते तिथे. त्यानी तिला मॅनेजर च्या केबीन मधे ओळख करुन देण्यासाठी नेले. तर तिथे असा संवाद झाला. तो - so, which project did you work on? तिने Personal Information Managemant Systems नावाच्या प्रोजेक्ट वर काम केले होते. आणि आपल्याला माहितच आहे, जगात शॉर्टफॉर्म सगळीकडे वापरला जातो. आणि त्या शॉर्टफॉर्म चा पण एक शब्द केला जातो. तर त्या हिशोबानी ती फटकन उत्तरली, 'पिम्स'.... ते ऐकल्यावर ती मुलं जे प्रचंड हसायला लागली की बास.... आणि ही मुलगी इतकी साधी की तिला त्या शब्दाचा 'तो' अर्थ माहीतच नव्हता. म्हणुन ती आपली शांतपणे उभी. मुलांची हसणे थांबल्यावर धक्का बसलेला तो मॅनेजर तिला म्हणाला, 'man, what kind of project do you have in India?'
|
माझ्या आई ची वहिनी एकदा दिल्लीला गेली होती. एका भान्ड्यान्च्या दुकानात गेली, तिला तवा घ्यायचा होता. तिला वाटल आता हिन्दीतच बोलल पाहिजे. ती सुरू झाली."वो जो होता है ना, जो विमान के पत्रे का बनाते है, जिसपे हम पोळी भाजते है." तिला कळत होत कि ती काहितरी चुकिच बोलत्ये. पण कबूल कस करायच. तिची ती गोन्धळलेली अवस्था पाहून तो दुकानदार म्हणाला,"अरे बेहेनजी ऐसा बोलो ना की तवा चाहीये." त्याच्यासमोरच वहिनी म्हणाली," हत मेल्या, हिन्दितपण त्याला तवाच म्हणतात." बापरे आई तर तिकडेच हसून हसून गार पडली
|
Chaffa
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:42 pm: |
| 
|
अन्गावर खुप सुज आली आहे, खुपच फ़ुगल्या आहेत, अगदी ............................. च्यायला लय भारी अल्टीमा, अचुक ओळखलस! दोस्तलोक हे असे किस्से आजुबाजुला रोजचेच आहेत फ़क्त एकच करायच डोळे आणी कानच उघडे ठेउन पहायचं आणी ऐकायचं तोंड उघडनेका नय!!!! लाजो, असं 'पोष्टऑफ़ीसात' हसायला आलच तर काय करायचं याचा सल्ला तु Nkashi आर्थात निलांबरी कडुन घे तिच्याकडे उपाय आहे. सुनिधी, हा तर SF चा पारच धुव्वा उडाला की.? सचिन मजा आ गया
|
Sas
| |
| Wednesday, April 04, 2007 - 9:53 pm: |
| 
|
जो विमान के पत्रे का बनाते है 
|
Mandarnk
| |
| Thursday, April 05, 2007 - 1:03 am: |
| 
|
माझ्या मित्राबाबत घडलेला हा किस्सा: US मधे नवीनच आला होता, आणी पहील्यांदाच कार चालवत होता इकडे. एका orange signal ला जावं की नं जावं या संभ्रमात तो ऐनवेळी थांबला, पण तोपर्यंत तो white line च्या बर्यापैकी पुढे आला होता. आणी नेमका मागुन त्याला cop येताना दिसला. तसा cop थोडा लांब होता, तेवढ्यात त्यानी पटकन reverse gear टाकुन कार जरा मागे घेतली. तोपर्यंत cop त्याच्या बरोब्बर मागे येउन थांबला. आता cop ने त्याला मागे येताना नक्कीच पाहीलं होत, त्यामुळे हा आरशातुन टेंशन मधे मागे पहात होता, की आता cop वर दिवे लावतो की काय. cop नी काही लाइट चालू केले नाहीत, पण माझा मित्रच घाबरला होता. त्यामुळे signal green झाल्याबरोब्बर त्याने आरशात पहातच full accelarator दिला........ आणी कार reverese gear मधेच होती हे तो विसरला!!!
|
Mahesh
| |
| Thursday, April 05, 2007 - 3:31 am: |
| 
|
मंदार, चांगली उत्कंठावर्धक सिरिअल चालू असताना मधेच ब्रेक येतो तसे वाटले. रिव्हर्स गिअर मधे गाडी accelarate केली पण मग त्या कॉपचे काय झाले ? 
|
चाफ़्फ़्या सुनिधी खरंच abbr जपूनच वापरले पाहिजेत. मंदार आईशप्पत. उडवले का त्या कॉपला त्याने? सचिन विमान के पत्रेका... जनरल नॉलेज भारी आहे की आईच्या वैनीचं. आणि हो मराठीत आईच्या वैनीला मामी नावाचा शब्द आहे बर्का. प्रत्येक वेळी विमानके पत्रेका पोळी भाजनेका तुकडा असं explain करायची गरज नसते. च्यायला अगदी असाच किस्सा आठवला. आमच्या शेजारी एक बिहारी नवराबायको रहायचे. एक दिवस संध्याकाळी बाहेर जाताना ते आम्हाला भेटले आणि नेहेमीचे small talk झाले. दुसर्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाताना लिफ्टपाशी त्यातला नवरा उभा होता. मला कळेना रात्रीतून याच्या मिशा इतक्या भरघोस कशा वाढल्या. म्हणजे काल तर होत्या पण इतक्या मोठ्या नव्हत्या. म्हटलं आपल्याकडे बायका केसांची स्टाईल करायला गंगावन ,switches, wigs वापरतात तशा यांच्याकडे मिशा वापरत असतील. रोज बाहेर पडताना आपल्या कलेक्शनमधली एक काढून लावायची. मग संध्याकाळी त्याच्या बायकोने संगितले. हमारे जेठजी आये है गांवसे.
|
Zakasrao
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:58 am: |
| 
|
आता हा प्रकार काय आहे ते तुम्हीच ठरवा. मला कंपनीतुनच बरेच असे मेल येतात की सर ते हाउस कीपिंग च बघा. ते मटेरिअल असे पडलेल आहे ई. (सोबत फ़ोटो) कधी कधी हा काम करत नाही अशा तक्रारी. एकदा तर माझ विमानाच बुकिंग करुन द्या अशी मेल आली. एकदा तर transport वाल्याने झालेल्या accident ची डिटेल मेल पाठवली होती. मी त्या सगळ्याना हे माझ्या कामाशी related आहे का एवढाच reply देतो. मग ते sorry चा मेल पाठवतात. सुरवातीचे initials सेम असल्यामुळे मला असे मेल येतात. मजा असते.
|
Psg
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:41 am: |
| 
|
कालचाच माझा वेंधळेपणा.. कूकरची सगळी तयारी केली.. एका हाताने गॅसचे बटण चालू केले आणि तसाच कूकर चढवला! गॅस ऑन केलाच नाही!!!! उन्हाळ्यामुळे खिडकी उघडी होती किचनची त्यामुळे गॅसचा वासबिस आला नाही.. थोड्या वेळानी शिट्टी का होत नाही म्हणून पहायला गेले तेव्हा लक्षात आले!
|
झकासराव.. मला असे मेल येत नाहीत पण मी लोकाना मात्र पाठवते. म्हणजे.. दैनिक सामना असे लिहून लोकमतला पाठवणे वगैरे भयानक प्रकार मी केलेले आहेत. मेलवर आलेले एक अत्यत वात्रट जोक चुकून HR च्या प्रेसिंडेटला पाठवलाय. आणि पोस्ट ऑफ़िसात हसायला आलं तर काय करायचे हा उपाय कुणास्कडून घ्यायचे म्हणालात?
|
Sheshhnag
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:17 am: |
| 
|
कार reverese gear मधेच होती हे तो विसरला!!! baap re!!! mag puDhe kAy jhAle?
|
ऑफ़िसेमधे मी नवीनच जॉईन झाले होते. आणि सगळ्या मैत्रिणि मिळुन Tea Break साथी pantry मधे जमायचो. तेव्हा सगळ्यांना बोलवायचे काम मी IP Msg वरुन करायचे. एकदा चुकुन मी माझ्या H.O.D. ला Tea/ Coffee???? असा मेसेज पाठवला. त्यांचा reply आला? "WITH ME?????" म्हणुन एवढी वाट लागली ना तेव्हा... एकतर ते सगळ्यात खडुस बॉस म्हणुन प्रसिद्ध आहेत पुर्ण कंपनीत....
|
Mandarnk
| |
| Thursday, April 05, 2007 - 3:25 pm: |
| 
|
काय होणार, तो cop च्या कार वर जाउन धडकला. आता अंतर फार नसल्यामुळे फार काही झालं नाही, पण तिकीट ४५० फक्त द्यावं लागलं.... (ही मी आजपर्यंत ऐकलेली सगळ्यात मोठी रक्कम आहे तिकीटासाठी!)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|