Giriraj
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:38 am: |
| 
|
मगच्याच महिन्यात झालेल्या माझ्याच लग्नात मुलीने हार घातल्यावर मी हार घालायचेच विसरलो आणि वेगेवेगळे फोटोग्राफर सांगत होते तसेच करत बसलो... हार घाला म्हणून ईतरांकडून आणि दस्तुरखुद्द मुलीकडून आवाज आला तेव्हा मी माझ्या समोर केलेला हार घातला... होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!
|
Suvikask
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:45 am: |
| 
|
प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!.... great आहात आता लग्नानंतर बर्याच गोष्टी प्रथमच करतात... मग ते कस manage केल?
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:23 am: |
| 
|
होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ!>>>>. गिर्या आताच नाव आणि प्रतिमा वाचुन आलोय आता इथ मात्र हद्द झाली रे. असा कसा रे तू. अब तेरेको बराबर सजा मिलेगी. बायकांची मेमरी लग्नानंतर हार्डडिस्क होते त्या सगळ लक्षात ठेवतात. (स्वानुभव आहे ) आता हे आणि ते सिमरन एकत्र झालकी तु आता मात्र हेल्मेट सहीत सगळे गार्ड घेउनच घरी entry कर बाबा.
|
Mahesh
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:11 am: |
| 
|
सुनिधी, कोणाला अर्धचंद्र द्यायचा आहे ? अर्धचंद्र देणे म्हणजे नोकरीवरून काढून टाकणे किंवा हाकलून देणे. 
|
Mahesh
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:14 am: |
| 
|
>>आता लग्नानंतर बर्याच गोष्टी प्रथमच करतात... मग ते कस manage केल? का छळता त्यांना ? बिचारे आधीच परेशान असावेत...
|
Badbadi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 8:55 am: |
| 
|
गिर्या, .... दिनेश ने एक मायबोलीकर या नात्याने एक टप्पल नाही का मारली तुला??
|
Ultima
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:44 am: |
| 
|
नमस्कार मंडळी.... आज पहिल्यांदाच मराठीत लिहितेय...खुप मस्त वाटलं. पण हे स्य्म्बोल्स्/ फ़cएस कसे बुवा टाकयचे
|
Sheshhnag
| |
| Wednesday, March 14, 2007 - 11:37 am: |
| 
|
होते असे कधी कधी.. प्रथमच लग्न करत होतो नाऽऽ! म्हणजे....? 
|
Ultima
| |
| Wednesday, March 14, 2007 - 12:05 pm: |
| 
|
प्रथमच म्हणजे??................. ये शेष मला पण सांग ना हे चित्र कसं आल??
|
Sheshhnag
| |
| Wednesday, March 14, 2007 - 12:31 pm: |
| 
|
फार सोपे आहे... /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi इथे जा, हवं ते मिळेल...
|
Mrinmayee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 1:38 pm: |
| 
|
आज नवर्याला लंचबॉक्स देताना दह्याच्या डब्या ऐवजी सावर क्रीमचा डबा दिलाय!
|
Anilbhai
| |
| Wednesday, March 14, 2007 - 2:44 pm: |
| 
|
काही काळजी करु नकोस. सावरेल तो ह्यातुनही. 
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:10 pm: |
| 
|
बडबडी, बाळाला टपल्या मारमारुन आता माझीच मला लाज वाटायला लागलीय. भाचीच्या ताब्यात दिलाय त्याला. माणसळवायचा प्रयत्न करत्येय बिचारी.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:12 pm: |
| 
|
सावरेल तो ह्यातुनही. सावरला सावरला!!! ('ऑफिसजवळच्या मेक्सिकन हॉटेलातून टाको घेऊन येईन' म्हणालाय!)
|
Runi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:16 pm: |
| 
|
अहो गिरीराज धन्य आहात, पण तुम्ही लग्नात फक्त हार घालायचा विसरलात. मी गावाकडे एका लग्नात बघितलेय की लग्न लावायच्या वेळी वधु आणि वरा कडच्यांना समजले की त्यांनी लग्न लावण्यासाठी भटजीच बोलवले नव्हते.....मग ही पळापळ... धमाल आली 
|
Sunidhee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:58 pm: |
| 
|
अजय थॅन्क्स.. महेश . गिर्राज नशीब तुझ्याच लग्नात हा घोटाळा केलास.. नाही म्हणजे तिसर्याच्या लग्नात गडबडीत 'तु' हार घातला असतास तर बर दिसलं नसतं ना?
|
तो पानातलं टाकून टाको घेऊन आला? माझा एक सीनिअर लग्नात बायकोकडे इतकी टक लावून पाहत होता की बाकी सगळं विसरला! अर्धा अल्ब्म भरून तसले फोटो आहेत शहाण्याचे! [ ]
|
हा माझा वेंधळेपणा.. वरच्या पोस्टवरचा स्माईली [ ] अशा कंसात टाकला! Orkut ची सवय!!
|
Disha013
| |
| Friday, March 16, 2007 - 4:10 pm: |
| 
|
हा हा छान वेंधळेपणा चालु आहे! माझ्या एका मावशीचे लग्न दोन्ही बाजुंना मध्यवर्ती पडेल म्हणुन पुण्यात ठेवले होते. आणि घरुन निघताना तिच्या सासरच्यांना द्याय्च्या मानपानाच्या साड्यांची पेटीच घरी विसरलेले सगळे. पुण्याला गेल्यावर लक्षात आले. नशीब वेळ मिळाला होता. मग काय पटापटा दुसर्या साड्यांची खरेदी झाली.
|
Chyayla
| |
| Sunday, April 01, 2007 - 3:19 am: |
| 
|
एका १ एप्रिलला मी चुकुन ४,५ मीत्र, मैत्रीणी, सहकुटुम्बीयान्ची अशी आमच्याच घरी छोटीशी पार्टी ठेवली अर्थात त्यात सगळे आमच्याच कॉलनीतले राहणारे. सगळी तयारी केली सगळ्याना निरोप दीले सगळ्यानी अगदी हसत हसतच येतो म्हणाले.. होता होता सन्ध्याकाळ झाली पण कुणाचा पत्ताच नाही. आम्ही आपली वाटच पहात बसलो. थोडा वेळ झाला तेन्व्हा एका कुटुम्बातले दोन छोटेसे भावन्ड आलेत आणी आईला म्हणाले आम्ही ईकडुन जात होतो तर पाणी प्यायला आलोत मी त्याना म्हटल कारे आई-बाबा नाही आलेत?... तर म्हणाले येतील आताच आम्हाला वाटल की तुम्ही एप्रिल फ़ुल बनवताय. मग कुठे उलगडा झाला आणी मी धावाधाव करत प्रत्येकाकडे परत गेलो आणी शप्पथ घेउन सान्गितले की अहो खरच पार्टी आहे म्हणुन बापारे किती आणी कशी खात्री पटवुन देउ असे झाले होते आणी तरी पण कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हत.. माहिती आहे माहिती आहे तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार आणी तोही १ एप्रिलला... असे काही एकुन घ्यावे लागले. (ईब्लिसपणाचे दुष्परीणाम) शेवटी एका काकुना गाडीवर घरी घेउन आलो आणी सगळी पार्टीची तयारी दाखवली तेन्व्हा कुठे सगळ्यान्चा विश्वास बसला व शेवटी मस्त पार्टी झाली. आजही १ एप्रिल तारीख पाहिली की मला ही १ एप्रिलची पार्टी आठवते... ही.. ही... मायबोलीकरान्नो तुमची वाट पहातोय येताय ना पार्टीला.. अरे निदान आता तरी विश्वास ठेवा
|